मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

ही थोडीशी" असे म्हणाले आणि एकदम विषय बदलला. त्यांना "ही थोडीशी मलाइका अरोरा सारखी दिसते" असे म्हणायचे होते बहूतेक.>>हे मीही ऑबझर्व्ह केला. म. मां नी विषय बदलला.

स्वामिनी ही मालिका उंच माझा झोका आणि राधा प्रेम रंगी रंगलीवाल्या विरेन प्रधानची आहे.
बहुतेक स्वामी कादंबरीवर आहे.माधवराव पेशवे आणि रमा यांच्यावर.

ओढून ताणून त्यांच्या मैत्रीच्या कथा ? Sanjay, salman , manjya batali friend ahet.

Maanjya havala karto ani barach black to white karto ashi afwaa ahe .
Tyamule tyache barech high level la contact ahet

बिचुकले उगाचच काहितरी गोल गोल बोलून मांजरेकरांना गुंडाळून ठेवतात. जनतेने किशोरीला वोट जास्त केले अभिजित पेक्षा असे सांगितल्यावर मधुनच टाळ्या वाजवायला लागले. अरे वेळ काय.
बिचुकले पाहुणे असुन टॉप 5मध्ये येणार असल्यासारखा वागतो. त्याना खात्री आहे का पूढे जाऊन बीबी त्याना सदस्य करणार . असे झाले तर पुढचा सीज़न अजिबात बघणार नाही.
आरोह ने 5लाख देऊन केळकर ला nominate केले. आणी तो गेल्यावर इतका का रडायला लागला.
केळकर कसाही असला तरी बिचुकले पेक्षा खेळण्यात आणी वागण्यात 10पटीने चांगला होता. तरी सोशल मीडिया वर बिचुकले ना जास्त सपोर्ट आणी केळकरला काहीच सपोर्ट नाहिये.
पुढ चा नंबर हिना किंवा किशोरी ताई चा लागावा.
हिना चा गेम बिचुकले आल्यापासुन परत बिघडला आहे.

केळ्या गेला खरा, पण मलाही असं वाटतं की तो रड्या आणि कुजकट असला तरी गेमप्लेयर होता. हीरा टास्कवेळी आरोहचं एक वाक्य होतं 'तो ग्रुप गेममध्ये इंडिव्हिजुअल गेम खेळतो, मीच कसा भारी आहे, सगळं कसं मलाच सुचतं हे दाखवतो' ते पर्फेक्ट होतं. केळ्याच्या मते त्याच्या इतकं कोणीच हुशार नव्हतं, त्यामुळेच तो कोणाला आवडत नव्हता आणि गेला. तो गेल्याबद्दल कोणाला काही वाईटही वाटलं नाही फारसं. शिव काय तो रडला जरा. शिव गोड आहे, त्याने आता जरा स्मार्ट व्हायला हवं. नेहा आणि शिव असतीलच टॉप २. विनर यांपैकीच एक कोणीतरी होईल, सुमडीत किशोरीच्या फॅन्सनी काही गेम नाही केली तर!

बिचुकलेला काढतच नाहीयेत! Angry मला वाटलं होतं केळ्याबरोबर त्यालाही निरोप देतील. दोन्ही अभिजीत एकसाथ घराबाहेर, पण कसचं काय! इतर हाऊसमेट्सना या निमित्ताने कसली शिक्षा देतायेत बिग बॉस?

होना, बिचूकले पाहुणा आहे हे बिबॉ विसरलेत. हाकला बिचूकले ला.

नॉमिनेट झालेलं कळल्यावर अ.के.ला धक्का बसलेला ना?
पण बाहेर जाताना तर तो एकदम कूल होता.>>>>>> हो भरत, क्लिप बघताना थोडा रडवेला झाला पण नंतर कूल होता ब-यापैकी, शिव साठी गाणं पण छान म्हंटलं

आरोह थोडा शाळकरी वागतो असे नाही का वाटत?
केळ्या आवडत नसला तरी त्याच्यामुळे खेळात रंगत येत होती हे नक्की . त्यामुळे अरेरे उगीचच लवकर गेला असे वाटुन गेले. तसेही किशोरीपेक्शा पैशांची गरज त्याला जास्त होती.त्यामुळे तरी त्याने टिकायला हवे होते. बिचुकले नाही जाणार इतक्यात. त्याला पाहिले कि डोक्यात सणक जाते, ते बिचारी घरातले लोक कसे सहन करत असतील?
केळकर कसाही असला तरी बिचुकले पेक्षा खेळण्यात आणी वागण्यात 10पटीने चांगला होता. तरी सोशल मीडिया वर बिचुकले ना जास्त सपोर्ट आणी केळकरला काहीच सपोर्ट नाहिये...सोमिवर खुप विक्रुत लोक असतात. कशाला पाठिंबा देतील सांगता येत नाही.

The little girl is Srushti Pagare, SNDN chhote sur veer fame!>>>>
Ohhhh Thank you.
मी कधीपासून आठवत होते ह्या मुलीला कुठेतरी पाहिलंय एवढंच आठवत होतं, आता कळलं!

केळ्या जाताना म्हणाला शी यार गेम मिस करणार.. पण इतरवेळी रडत होता तितका हळवा झाला नाहि..
आरोह रडला कारण त्याला वाटत असेल त्याच्यामुळे केळ्या गेला.. एकाच नॉमिनेशन मध्ये तो बाहेर गेला.
हिना खुप छान नाचते.. त्याबाबतीत कुणीच नाहि तिच्या जवळपास.. बाकी स्वभाव किरकिरा आहे..
त्या बिचुकलेला का फेकत नाहित बाहेर आजुन बिबॉ.. बघुन कंटाळा, राग येतो त्यांना तिथे.. सलमान बरं म्हणाला त्याला केसांनी बाथरुम धु म्हणुन.

आज च्या एपिसोड मध्ये ही बिचुकले पकवणार आहे . वीणा त्याला काहितरी बोलली तर तिने सॉरी बोलल्या शिवाय काही खाणार नाही म्हणतोय. हा किती जणा ना सॉरी बोलतो लगेच. तिकडे किशौरी ताई सारख्या बैगा भरायला लागतात म्हणुन रडतात .आणी हा माणुस काहीही झाल तर लगेच बिग बॉस माझी बैग भरा म्हणतो. म बिग्ग बॉस बैग भरुन याची पाठवाणी का करत नाहीत.

सलमानला बघून खूप आनंद झाल्याचा अभिनय करण्याचे निर्देश होते वाटतं, काय ते उड्या मारणं. केळकरचा चेहरा पडला होता पण मग त्याने सावरलं स्वतःला. आरोह उग्गाच रडारड आणि शिवसुद्धा. ममांनी केळकर आपला नट आहे असं म्हटलं त्यातच सगळं आलं, त्याला मांजरेकर नेहेमी काम देणार.

केळ्या जाताना म्हणाला शी यार गेम मिस करणार.. पण इतरवेळी रडत होता तितका हळवा झाला नाहि.. >>>>>>> सहमत. तो रडला नाही हे छान केल. तो शिवला म्हणाला सुद्दा होताना की, मी इथून जाईन तर हसत हसत जाइन. तसच झाल. त्याची एव्ही छान होती. केळकर एव्हिक्ट झाला ऐकून सगळे शॉक्ड झाले. म. मां गम्मत करतायत अस त्यान्ना वाटत होत.

केळया १०० पटीने बिचुकले पेक्षा चान्गला माणूस आहे. सभ्य, जेण्टलमेन आणि गेम जीव लावून खेळणारा. Happy तो टॉप ५ मध्ये हवा होता.

ही थोडीशी" असे म्हणाले आणि एकदम विषय बदलला. त्यांना "ही थोडीशी मलाइका अरोरा सारखी दिसते" असे म्हणायचे होते बहूतेक.>>हे मीही ऑबझर्व्ह केला. म. मां नी विषय बदल हिना खुप छान नाचते. >>>>>>>>> अगदी अगदी. जर ' ते' घडल नसत तर सलमानने निश्चितच हिनाला आपल्या नव्या सिनेमात सन्धी दिली असती. तसाही तो नवीन टॅलेण्टला पुढे आणण्यात माहीर आहे!

नेहा sacred games मध्ये होती हे मला काल कळल.

The little girl is Srushti Pagare, SNDN chhote sur veer fame! मी कधीपासून आठवत होते ह्या मुलीला कुठेतरी पाहिलंय एवढंच आठवत होतं, आता कळलं! >>>>>> सेम पिन्च

'चान्द छुपा बादल में ' गाण लागल्यावर सलमानच्या डोळयात पाणी आलेल. भुली बिसरी यादें!

Sanjay, salman , manjya batali friend ahet. >>>>>> हो. दबन्ग ३ मध्ये म. मांच्या मुलीला लॉन्च केलय सलमानने.

मांजरेकर + व्हायकॉम १८ च्या नव्या चित्रपटातलं गाणं लाँच करायला. >>>>>>> मला तो चित्रपट काकस्पर्श २ वाटला. केतकी माटेगावकरने छान गाण म्हटल. Happy

शिवानी च्या ड्रेस चा रंग खूप आवडला मला. >>>>>>> मलाही

शिवानी बिचुकलेंना म्हणाली, सॉरी म्हणाल्याने तुम्ही लहान होणार आहात का? >>>>>>>>>>>> pot says kettle black

पराग ने त्याच्या इंस्टाग्राम पेज वर लिहले होते 3rd wicket >>>>>>>> केळकर 3rd wicket? मग ह्याचे ह्याआधीचे २ विकेटस कोण होते? रुपाली आणि वैशाली? Uhoh

हो- मी ओव्हर रियाक्ट केले असे मला वाटत आहे. मी Mmmmmm यांची माफी मागतो ! >>>>>>>> गुड, च्रप्स! Happy

बिचुकलेत दुसरा स्वामी ओम बनायची कुवत नक्कीच आहे. >>>>>>>>> सलमान सुद्दा म्हणाला की त्याला बिचकुलेला बघून स्वामी ओमची आठवण झाली.

बाकी काहीही म्हणा, पण बिचकुलेचा गाता गळा छान आहे. Happy त्याने सलमानवर केलेली कविता समर्पक होती.

हिना चा गेम बिचुकले आल्यापासुन परत बिघडला आहे. >>>>>>> हो ना.

बिचकुले कसाही करुन जायला हवा आता! Angry

या सीझनच्या इतिहासात पहिल्यांदाच धागा दुसऱ्या पानावर.

किशोरी वि. शिव captaincy task
शिवानी फ्रस्ट्रेटेड^२
नेहा पाठीत खंजीर खुपसला जाऊनही काही करू शकत नाही.
वीणा फोकस्ड.
आरोह उद्या परत चिडणार ओरडणार रडणार.

शीव आणी किशोरी कैप्टनसी च्या टास्क साठी वीणा आरोह किशोरी च्या टिम मध्ये आहे . शिवानि नेहा बिचुकले शीव च्या टिम मध्ये.

मागच्या वेळी बिबॉ समर्थक निवडण्याची संधी उमेदवारांना द्यायचे ह्यावेळेस असं एकदाही केलं नाही , तेच आपले टीम पाडून देतात प्रत्येक वेळी त्यामुळे spotanity नाही राहत मजा जाते.

या सीझनच्या इतिहासात पहिल्यांदाच धागा दुसऱ्या पानावर.
>>> अंजु लिहत नाहीत ना आता .

किशोरीची टीन स्ट्राँग वाटतेय. हीना पण त्यांच्यातच असेल ना?
शिवच्या टीममध्ये नेहा सोडली तर बाकी दोघे - बिचुकले आणि शिवानी निरुपयोगी आहेत.

या सीझनच्या इतिहासात पहिल्यांदाच धागा दुसऱ्या पानावर.>>>>> Happy भरत

किशोरी वि. शिव captaincy task
शिवानी फ्रस्ट्रेटेड^२
नेहा पाठीत खंजीर खुपसला जाऊनही काही करू शकत नाही. >>>>> खरं म्हणजे तिने ह्यातून धडा शिकला पाहीजे, शिवानी वर कितपत विश्वास ठेवायचा हे आत्तापर्यंत तिला कळायला हवं. पण ती स्वतः गेमच्या /नॉमिनेशन च्या बाबतीत हेच करते तिने सुरवातीलाच दाखवून दिलय.
वीणा फोकस्ड. >>>+++१११११
आरोह उद्या परत चिडणार ओरडणार रडणार.>>>>>+++ कोणीतरी रडका घरात हवाच म्हणून आणलाय बहुतेक ह्याला. बाकी उद्याच्या भागात जे थोडंसं दाखवलं त्यात विणा शिव ला म्हणाली का दादागिरी अजिबात करायची नाही???

काल मी सो.मि असहि ऐकलं कि शिव व्यक्तिगत कारणासाठी बाहेर पडला... खखो बिबॉ जाणे..
शिवानी अजिबात मैत्रिच्या लायकीची नाहि.. मग म्हणे माझा निर्णय चुकला मी माती खाल्ली.. परत नेहाच्या गुडबुक मध्ये जाण्यासाठी असेल कदाचित.. बेक्कार आहे ती.. कधीतरी मला ती खुप आवडली होती.

पण काल मला शिवानीचं वाईटच वाटलं जरा, तिला चॉइसच उरला नाही, नेहालाच काढावं लागलं. हीनाला सगळेच कॉर्नर करतात, तिचंही वाईट वाटलं जरा. किशोरी तर कॅप्टनसीसाठी अक्षरशः तडफडतेय. इतकं काय त्यात? कसली इतकी इन्सेक्युरिटी आहे तिला?
बिचुकलेला कालच्या टास्कमध्ये कोणीही भाव दिला नाही, हे पाहून जरा बरं वाटलं. त्याला आता असंच बाहेरही काढा हळूच मधल्या दिवशी.
आरोहचं 'तोंड काळं करणे' हा वाक्प्रचार आवडला Lol
आज तो परत रडारड करणार आहे वाटतं, हे बोअर वाटतंय हां आता. बाकी छान आहे तो, एक रडणं सोडलं तर.

शिव म्हणे आरोहला कँप्टन्सीच्या टास्क मध्ये चावला,म्हणून बिबॉसने त्याला थेट नॉमिनेट केले आहे.

पण काल मला शिवानीचं वाईटच वाटलं जरा, तिला चॉइसच उरला नाही,>>>
तिला नेहालाच काढायचं होतं बहुतेक
शब्द दिलाय म्हणे किशोरी आणि शिव ला..
ही कधीपासून दिलेला शब्द पाळायला लागली

Pages