मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

ओह केळ्या अजुन आला नाही का ? ट्विटरवर तर वाचलं कि केळ्यानीही नेहाला वोट दिल म्हणून.
वीणा बाकी एलिमिनेट झाली तर आश्चर्य नाही वाटणार, बरेचदा बॉटम २ मधे आली आहे ती, तिचे फॅन्स शिव आणि शिवानीइतके नाहीयेत.
अर्थात शिवच्या फॅन्सचीही वोट्स मिळत असतील तिला पण जेंव्हा ती आणि शिव एकत्र येतील नॉमिनेशनला तेंव्हा नाही करणार कोणी वोट्स.
मला वाटतय कि शिवानी-वीणाची भांडणं चालु रहावीत म्हणुन ठेवतील सगळेच लोक टॉप ६ फाय्नलला, गेले तर फक्तं बिबॉचे प्रमुख पाहुणे बिचुकले जातील, बाकी तरतील.
मागच्या वर्षीही टॉप ६ होते.

बाकी शिवानीच्या charactor वर काहीजण टीका करतायेत, ते फार वाईट. अशी टीका इतक्या खालच्या पातळीला जाऊन करणे योग्य नाही. अगदी कलर्स fb पेजवर पण करतायेत, बाकी ठिकाणी आहेच. असली टीका उडवायला हवी channel च्या admin ने.

वीणा कशीही असुदे शिवानी परत आल्यानंतर ती nominate होऊन वाचली आहे, तिच्यापेक्षा tasks चांगले केले आहेत आणि पहिल्या दिवसापासून घरात आहे त्यामुळे शिवानीच्या आधी ती गेलेली personally मला नाही आवडणार. पण आले bb च्या मना तेव्हा कोणाचे काही चालेना.

https://www.youtube.com/watch?v=90CT_y9IpJc

दोन महिन्यांपूर्वी वीणा जगतापचे एवढे followers होते. आता यात घट झाली असेल तर माहिती नाही. न्यूज खरी का फेक माहिती नाही कारण मी insta वर नाहीये पण इथे दीड लाख आकडा दाखवतायेत. Fanclub काही मी जाऊन बघितला नाही त्यामुळे fans चं नाही माहीती. फेसबुकवर followers कमी आहेत मात्र. सतरा हजार आहेत फक्त.

रूपालीने नेहा शिवानीला व्होट केलं असं उद्याच्या प्रोमोत दाखवलं. म्हणजे त्या दोघींचे फोटो लटकवलेले आणि ती त्यामागे उभी.
केळकरने नेहाला एक मत दिलं कारण ९ पैकी ८ मतं एकाला मिळालीत, अशी अनाउन्समेंट प्रोमोत दाखवलीय.
परागला बोलवलेलं नाही.

शिवानीने खरंच या सगळ्या हाउसमेट्सची मतं /नं जिंकलेली दिसतात. आता ती घरात असताना की बाहेर जाऊन ते माहीत नाही.

"तुझ्या बाहेरच्या बॉयफेंडचा निरोप आहे" असं विद्याधरनी वीणाला म्हणणं हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं.

सोमवारी दाखवलेल्या प्रोमोत किशोरी एकटीच बोलताना दाखवलेली - नेहा मला का टारगेट करतेय इ - ते काल दाखवलंच नाही.

बिचुकलेला स्टॅच्युही न करण्याचं काय कारण ?

मांजरेकरांनी अभिजीत केळकरच्या एव्हिक्शनवरच्या हाउसमेट्सच्या रिअ‍ॅक्शनवर यावेळी कमेंट्स केल्या. की प्रेक्षक कसे व्होट करतात ते तुम्हांला इथे बसून कळणार नाही. नेमके शब्द विसरलो. पण कोणाला टारगेट केलं जात असेल तर प्रेक्षकांना त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू शकते, असं म्हणाले.

अदालतमध्ये प्रत्येकानीच वादविवाद आणि इतरांना दुखावणारं बोललं पाहिजे, सगळ्यांनी तसंच अस लं पाहिजे, जो असं करत नाही, त्याला अक्कल नाही, असं मला वाटत नाही. शिव आपल्या बोलण्याने कोणाला (वीणाशिवाय) दुखावत नाही, हा माझ्यासाठी त्याचा प्लस पॉइंट. (आता शारीरिक बळ वापरून दुखावतो, त्यामुळे तो ऑफसेट होईल :D)
आपलं जिथे चुकलं तिथे त्याने ते सरळ मान्य केलं (कचरा काढणं).. तो अभिनेता नाही. त्यामुळे चांगली संवाद फेक, शब्दांची निवड हे त्याला जमलं च पाहिजे असं नाही. अभिनेत्री असूनही किशोरीला ते जमत नाही. शिव डिजर्विंग नाही म्हणताना चांगलं वागणार्‍या लोकांना या गेममध्ये जागा नाही, असा अर्थ निघतो. माझी या गेमबद्दलची कल्पना तशी नाही. सगळ्यांचीच असेल असं नाही, हेही मान्य. पण मला वाटतं, अधिकतर प्रेक्षकांना वाईट वागणार्‍या स्पर्धकांपेक्षा चांगलं वागणारे स्पर्धक आवडतात.

गुड पोस्ट भरत.

वीणाने तिच्या bf बद्दल सांगितलं आहे शिवला, त्याला सगळं माहितेय. कोणीतरी मागे लिहिलेलं fb वर. अशीच कोणीतरी तिच्यावर टीका केलेली तेव्हा. आपण तर बघत आलोय की शिवच तिच्या पाठीमागे जास्त लागलेला. वीणाने उशिरा त्या दृष्टीने responce दिला.

जळकुटे आहेत सर्वच, त्यांना trp मिळतोय ते बघवत नाही. शिवला voting मिळून विनर करायचं नसेल तर तो bb चा निर्णय असेल. बाकी त्याचे fans खूप आहेत. तो कसाही वागला तरी त्याला votes मिळणार. त्यात वीणा कशी आड येईल, हात चावणे एवढी मोठी गोष्ट आली नाही तर. नेह[, शिवानी पेक्षा त्याला demand आहे, ह्याचा रोष, बाकी काही नाही. बाकी थिल्लरपणा मलाही केलेला आवडत नाही पण ते न दाखवायचं स्वातंत्र्य आहे त्यांना. जे त्याला लांब रहा वीणापासून किंवा हिनाला जवळ कर सांगत होते ते आज बाहेर आहेत हिनासकट. तो आत आहे अजूनही.

Btw जळकुटे हा शब्द इथल्या टीका करणाऱ्या लोकांसाठी नाही. म मां आणि bb घरातले आजी माजी ह्या लोकांसाठी आहे. इथल्या सर्व कमेंटससाठी रिस्पेक्ट, मत पटो न पटो.

परागला नाही बोलवायचे आता. फिनालेला पण नसेल.

शिवला सगळे म्हणत की तो दुसर्‍याचं ऐकून तसं वागतो. स्वतःचं डोकं वापरत नाही. वैशाली, अभिजीतचं ऐकायचा. अदा लतमध्ये त्याच्यावर आरोप ठेवला की तो जोरू का गुलाम आहे , होईल.
दुसरीकडे त्याने वीणापासून दूर राहावं असं इतक्या लोका नी सांगूनही तो ऐकत नाही यावरही सगळ्याचं एकमत आहे.

वीणापासून किती दूर राहायचं याची त्याचीही कॅल्क्युलेशन्स असतीलच. प्रेक्षकांना काय आवडतं याचे आडाखे असतील. ते बरोबर की चूक हा मुद्दा वेगळा.

आपण अनेकदा गृहीत धरून चालतो की आपल्याला जे वाटतंय, तेच बहुसंख्य प्रेक्षकांना वाटतंय. फेसबुक , ट्विटर इत्यादी ठिकाणी आपला जो कल दिसून येतो, तशाच पोस्ट्स आपल्याला अधिक दिसतील, असंच त्यांचं अल्गोरिदम असतं.

आता हीनासाठी सगळे एकत्र आले, voting करा हिनाला असं सांगत. तिला मिळाले votes पण तरीही शिवपेक्षा कमीच votes होते.

त्यामुळे फायनलला तर divide होतील votes. सगळे एकत्र येऊन शिव विरोधात करू शकणार नाहीत voting.

शिव ला रोडीज असल्यापासून बघत आहे, मुद्दाम लो प्रोफाइल खेळत आहे.
सुरुवात आठवा, तेव्हा तो फक्त अंदाज घेत होता, हळूहळू त्याने गेम उंचावला आहे. रोडीज मध्ये पण राखी सोबत हेच केला पण ती दीड शहाणी निघाली आणि याचाच गेम झाला

पण मग असं असेल तर ती त्याची स्ट्रॅटेजी घरच्यांना पण माहिती असेल आणि बाहेरच्या बऱ्याच जणांना, मग सगळे का घाबरतायेत आणि वीणाला का दोष देतायेत. उलट वीणाचा वापर झालाय इथे.

मग कलर्सचा चेहेरा पकडून, तिच्या पाठीमागे लागला, आधी शिवानीकडे डाळ शिजली नाही आणि म मां नी सांगितलं, आजुबाजुला बघ. तो गुंतला नसेल तर मात्र बेस्ट actor आहे.

विणाचं कालचं म्हणणं किती बरोबर होतं, ती शिव आणि किशोरीला समजावून सांगत होती कि ठिक आहे अत्ता पर्यंत आलेल्या जून्या हाउसमेटस् नी आपल्याला वोट/सेफ नाही केलं तर नर्व्हस व्हायचं कारण नाही, ते त्यांच्या ग्रुप मधले होते(बाप्पा, दिगंबर) . आणि नंतर बाप्पा च्या कमेंट वर पण बॅलन्स्ड राहीली ओव्हर रिअॅक्ट नाही झाली, शिवानी ला प्रचंड गुदगुल्या झाल्या होत्या खूपच खुष दिसत होती ती बाप्पाच्या कमेंट वर.

वीणा कशीही असुदे शिवानी परत आल्यानंतर ती nominate होऊन वाचली आहे, तिच्यापेक्षा tasks चांगले केले आहेत आणि पहिल्या दिवसापासून घरात आहे त्यामुळे शिवानीच्या आधी ती गेलेली personally मला नाही आवडणार. पण आले bb च्या मना तेव्हा कोणाचे काही चालेना.>>>>>>>>>>>>>>+१११११
६ की ७ वेळा नॉमिनेशनला आली तरी सेफ झाली आणि एकदाही कॅप्टन होवून इम्युनिटी नाही मिळाली , की कोणी तिला सेफ केले ,तरी ती टिकलीये अजून घरात . म्हणून ती शिवानी पेक्षा जास्त deserving वाटते फिनाले साठी .

अदालतमध्ये प्रत्येकानीच वादविवाद आणि इतरांना दुखावणारं बोललं पाहिजे, सगळ्यांनी तसंच अस लं पाहिजे, जो असं करत नाही, त्याला अक्कल नाही, असं मला वाटत नाही. शिव आपल्या बोलण्याने कोणाला (वीणाशिवाय) दुखावत नाही, हा माझ्यासाठी त्याचा प्लस पॉइंट. (आता शारीरिक बळ वापरून दुखावतो, त्यामुळे तो ऑफसेट होईल :D)
आपलं जिथे चुकलं तिथे त्याने ते सरळ मान्य केलं (कचरा काढणं).. तो अभिनेता नाही. त्यामुळे चांगली संवाद फेक, शब्दांची निवड हे त्याला जमलं च पाहिजे असं नाही. अभिनेत्री असूनही किशोरीला ते जमत नाही. शिव डिजर्विंग नाही म्हणताना चांगलं वागणार्‍या लोकांना या गेममध्ये जागा नाही, असा अर्थ निघतो. माझी या गेमबद्दलची कल्पना तशी नाही. सगळ्यांचीच असेल असं नाही, हेही मान्य. पण मला वाटतं, अधिकतर प्रेक्षकांना वाईट वागणार्‍या स्पर्धकांपेक्षा चांगलं वागणारे स्पर्धक आवडतात.>>>>>>>>>>> पूर्ण सहमत.

त्यामुळे फायनलला तर divide होतील votes. सगळे एकत्र येऊन शिव विरोधात करू शकणार नाहीत voting.>>>>>>>>>> तुमच्या तोंडात साखर पडो.

आधी शिवानीकडे डाळ शिजली नाही आणि म मां नी सांगितलं, आजुबाजुला बघ. तो गुंतला नसेल तर मात्र बेस्ट actor आहे>>>>मला नाही वाटत कि शिव अॅक्टींग करतोय, आणि मी सुरवातीचे बघितले नाहीये , तो शिवानी च्या मागे लागलेला? जस्ट फ्लर्ट करत असेल, आता तो आणि विणा छान दिसताएत आणि प्रेमात आहेत.

शिवानी विनर व्हावी यासाठीचा खटाटोप आहे हा टास्क म्हणजे.. बाकी जिकडे बुद्धीचातुर्य, शारीरिक चपळतेचे टास्क असतात त्यात शिवानी नापास होते. मग तिला फिनालेला न्यायचंच असेल तर असं तिच्या कंपूतल्या लोकांना वोट करायला लावण्याशिवाय पर्याय नाही.

का का का..म्हणजे का??? शिवानी ला का एवढं sponser आणि pamper करतय channel..any clue?? पराग ने तर बिग बॉस आणि शिवानी विरोधात शड्डु ठोकले आहेत.. त्याच्या fb page वर सातत्याने शिवानी आणि ममा कसे partial वागत आहेत त्यावर लिहितोय..कालही लिहिल की अस एवढ सोप्प टिकट तो फिनाले.. लिहून ठेवा शिवानी विनर..

>>पण घरातील १०० दिवसांचा टास्क व्यतिरिक्त वावर, घरकामांतील सहभाग आणि वैचारिक क्लॅरिटी वगैरे गोष्टी विचारात घेतल्या तर नेहा सर्वात डिझर्वींग आहे असं मला वाटतं.
++11 शुगोल!

एक सुरेखा पुणेकर सोडल्या तर बाकीच्यांनी केलेली नेहा ची निवड अगदीच अपेक्षित होती..... सुपु शिव ला निवडतील असे वाटले होते

मैथिली व्यतिरिक्त इतर सर्वांचाच घरातला वावर सहज होता.... मैथिली खरच कृत्रिम वाटत होती!

बाय द वे, शिवानीला इतके अनड्यू फेव्हर करुन प्रेक्षकांना अजूनच तिच्याविरोधात करण्याचा तर प्लॅन नसेल ना बिग बॉसचा..... जेणेकरुन तिच्यासमोर उभे रहाणाऱ्याला जास्तीत जास्त पब्लीक सपोर्ट मिळेल Wink
Think Different Light 1

धनुडी मलाही वाटत नाही की शिव acting करतोय, मी रोडीज बघितलं नाहीये म्हणून तिथे कसा वागला ते वाचून ती reaction दिली एवढंच.

शिवानीची मस्करी केलेली सहज त्याने बिचुकले तिचं ऐकतात का काहीतरी अशीच आल्या आल्या तेव्हा ती उखडलेली. मग विकेंड डावात म मां नी त्यावरून चिडवलं होतं आणि आजुबाजुला पण बघ म्हटलेलं, ते मी साफ विसरले होते, मध्ये भरत यांनी लिहिल्यावर मला आठवलं.

शिव मला पहिल्यापासून आवडतो, मीच पहिल्यांदा लिहिलं त्याला vote देणार नॉमीनेट झालाय तर. पान नं पण लक्षात आहे माझ्या. BB चर्चेचा पहिला भाग आणि पान नं 11.

शिव त्यानंतर आवडतंच गेला, वीणा 50, 50 मला तिच्यातले दोषही दिसतात पण फक्त दोष दिसत नाहीत, तिचे गुणही दिसतात. ती individually टफ द्यायला तयार असते, अनेकदा टास्क चांगल्या प्रकारे खेळून तिच्या वाट्याला कौतुक येत नाही. मलाही आवडते त्यांची जोडी, bonding.

शिवानीला इतके अनड्यू फेव्हर करुन प्रेक्षकांना अजूनच तिच्याविरोधात करण्याचा तर प्लॅन नसेल ना बिग बॉसचा..... जेणेकरुन तिच्यासमोर उभे रहाणाऱ्याला जास्तीत जास्त पब्लीक सपोर्ट मिळेल >>>>>>>>>>>>>>>> अगदी बरोबर.

वीणा दोनदा कॅप्टनशिपसाठी उमेदवार होती तेव्हा तिला हरवून जे कॅप्टन झाले ते आज घराबाहेर आहेत आणि काहीही प्लस points न मिळता ती घरात टिकून आहे अजूनही.

एव्हिक्ट झालेल्यांत कोणाकोणाला सुफरपॉवर दिली गेली?
विद्याधर, माधव आणि रूपाली. पहिल्या दोघांनी नेहाला सेफ केलं. रूपालीने हीनाला.
आणखी कोणाला मिळाली होती का पॉवर?

शिव मलाही आवडतो, एक व्यक्ति म्हणून! पण बिबॉच्या घराचा विनर म्हणून हव्या अशा क्वलिटीज साठी तो कमी आहे. त्याला घरातली महत्वाची कामं करताना पाहिलेलं आठवत नाही. बिचुकले सरळ सरळ नाही करणार म्हणतात, शिव गोड गोड बोलून टाळणारा आहे. असो. नशीब एकेकाचं!

बाय द वे, शिवानीला इतके अनड्यू फेव्हर करुन प्रेक्षकांना अजूनच तिच्याविरोधात करण्याचा तर प्लॅन नसेल ना बिग बॉसचा..... जेणेकरुन तिच्यासमोर उभे रहाणाऱ्याला जास्तीत जास्त पब्लीक सपोर्ट मिळेल Wink >>> तथास्तु! स्वरुप, आपके मुंहमें घी शक्कर!
रच्याकने, स्वरुप तो दिवा कोणासाठी ?

एव्हिक्ट झालेल्यांत कोणाकोणाला सुफरपॉवर दिली गेली?
विद्याधर, माधव आणि रूपाली. पहिल्या दोघांनी नेहाला सेफ केलं. रूपालीने हीनाला.
आणखी कोणाला मिळाली होती का पॉवर?>>>>>>> वैशाली आणि केळ्कर ला का ? मला आठवत नाही. बाप्पाला कोणालातरी नॉमिनेट करायची पण पॉवर दिली होति पण त्याने ती नाही वापरली, तशीच वैशालीला पण दिली होती का? अजून कोणाला तरी नॉमिनेट करायची पॉवर दिली होती पण त्याने /तिने नव्हती वापरली असं वाटतय.

अन्जु , मला माहितीये कि तुला पण शिव आणि विणा आवडतात Happy

वीणा कोणत्या ही मुद्द्यावरुन भांडत बसते काल किशोरी ने तिला वॉशिंग मशीन मधले कपडे काढ तुझे सांगीतल्यावर उगीच दुसर्यांनी टोपली त ठेवलेले कपडे वाळत घातले नाही आणी आमच्याच डोक्यावर का बसतेस तू partial आहेस असा वाद घालत बसली. पण तिचे कपडे मशीन मध्ये होते सो दुसर्यना मशीन लावायचे असेल तर तिने कपडे काढले पहिजेत इतका सिंपल गोष्ट होती. तरिही ती किरकिर करत होती.

सुरेखा ताई छान दिसत होत्या काल. त्यानी नेहा ला सेफ़ कसे केले काय माहिती. शिवानि बरोबर बॉन्डिँग चांगले होते त्यांचे. माधव सोडून बिचुकले बरोबर कोणी जास्त बोलले नाही ते ही नव्हते बोलत जास्त.

बाय द वे, शिवानीला इतके अनड्यू फेव्हर करुन प्रेक्षकांना अजूनच तिच्याविरोधात करण्याचा तर प्लॅन नसेल ना बिग बॉसचा..... जेणेकरुन तिच्यासमोर उभे रहाणाऱ्याला जास्तीत जास्त पब्लीक सपोर्ट मिळेल Wink
Think Different Light 1......
स्वरुप....हाच गेमप्लँन असावा,बरोबर ओळखलत.बिबॉसच्या क्रियेटिव्ह टीममध्ये जायला हरकत नाही.

>>रच्याकने, स्वरुप तो दिवा कोणासाठी ?

तो मायबोलीचा पारंपारिक "दिवा घ्या" वाला दिवा नसून "आयडिया"वाला दिवा आहे!

स्वरूप तिच्या विरोधात एकटी वीणा दंड थोपटून उभी आहे पण तिला सपोर्ट फार मिळेल असं वाटत नाही, तिचे अल्प का होईना गुण कोणाला दिसतंच नाहीत Wink . आता तुम्हाला नेहा म्हणायचं असेल तर जाऊद्या Lol

>>तिचे अल्प का होईना गुण कोणाला दिसतंच नाहीत Wink .
मला दिसतात हो Happy
मला तुमच्यासारखे पान नंबर वगैरे आठवत नाहीत पण सुरुवातीच्या काही आठवड्यातच मी लिहलेले की नेहा किंवा वीणा जिंकलेली मला आवडेल!
पण नंतर नंतर नेहा जरा जास्तच आवडत गेली!

शिवानि कशीही असली तरी तिही तिच्या बरोबर चांगले असणार्यांशी चांगले वागते. सुरेखा ताई खाली बसुन डोक्के टेकवून नमस्कार करत होत्या आणी म उठल्या तेंव्हा शिवानि पटकन त्याना उठताना धरायला धावली. शिवाय आलेल्या प्रत्येकाशी तिचे रिलेशन चांगले होते. याउलट वीणा प्रत्येकाला उलट बोलले ली आहे. बाप्पा माधव दिगंबर वैशाली सुरेखा या सगळ्याना वीणा स्पष्ट वक्ते पणा च्या नावाखाली उलट बोलली आहे.

स्वरूप हो, आठवतंय मला. तुम्ही आमेन म्हणाला होतात, वीणा जिंकली तरी चालेल. पण आता ती जिंकेल असं वाटत नाही मला.

हो अमुपरी वीणा अति फटकळ आहे. तिचे दोष मी नाकारत नाहीच पण तरीही ती शिवानीपेक्षा डीझर्व्हिंग आहे हे नक्की.

बाय द वे, शिवानीला इतके अनड्यू फेव्हर करुन प्रेक्षकांना अजूनच तिच्याविरोधात करण्याचा तर प्लॅन नसेल ना बिग बॉसचा..... जेणेकरुन तिच्यासमोर उभे रहाणाऱ्याला जास्तीत जास्त पब्लीक सपोर्ट मिळेल Wink
Think Different Light 1 >>>>>> असं असेल तर अत्तापर्यंत केलेल्या चुकांचं पापक्षालन होईल बिबॉ चं ( शिवानीच्या बाबतीतलं) .
जसं बिचुकलेंना कशातच इन्व्हॉल्व करत नाहीयेत, ते सोडुन सगळ्यांना स्टॅचू करताएत, एक प्रकारे दखवून देताएत की बिचुकले इज नॉट अ पार्ट ऑफ धिस गेम.

इतकं फालतु , इतकं ऑबव्हियस तिकिट टु फिनाले ? Uhoh
हे तर फॅमिली विकचं एक्स्टेन्डेड व्हर्जन होतं, धन्य आहे हा सिझन !
मागच्या सिझनला फिनाले विक आधी किती डिफिकल्टी लेव्हलवाले टास्क दिले होते म.मांनी स्वतः आत येऊन एक टास्क दिलेला, प्रत्येक टिमचे अर्धे सदस्य स्विमिंगपुलमधे, अर्धे बाहेर आणि भयंकर धावाधावी,ओल्या जमिनीवरून सटकणे , वगैरे, त्या नंतर प्रत्येक सदस्याला कन्फेशनरुममधे जाऊन त्यांच्याबद्दल कोण काय बोललय व्हिडिओ दाखवले होते, अशा २-३ लेव्हलच्या टास्क्स नंतर मग तिकिट टु फिनाले दिलं गेलं होतं मागच्या वर्षी.
इथे मात्रं अपापल्या मित्रांना वाचवा आणि फिनालेत टाका , इतकं सोप्प!
शिवानीला वाचवा ही तर नक्की इन्स्ट्रक्शन्सच दिली होती जणु सदस्यांना.
कालच शिवानीने वीणाला म्हणणे कि वीणानी माणसं नाही जोडली , शिवानीने मात्रं ९ मित्रं बनवले घरात आणि आज लग्गेच बिबॉने तिच्या मित्रांच्या वोट्स च्या आधारे तिला फिनालेत टाकणे, टु ऑबव्हियस!
फिक्स नसतं तर सुरेखाताईंनी शिवला सेव्ह नसतं केलं ?
आता खरच वाटायला लागलय कि शिवानीला डायरेक्ट फिनालेत वोटींगमधे टाकून जिंकून देणार.
जाउद्या, आजची सर्वात जेन्युइन भेट होती शिव आणि वैशालीची, दोघांचे इमोशसन्स खरे वाटले , त्याने तिच्या बर्थडेसाठी पट्कन जाऊन सँडविच घेऊन येणे, तिने त्याच्यासाठी राखी आणणे , सो क्युट !
याविरुध्द नेहा ! भयानक ओव्हर अ‍ॅक्टींग, नुसतं खोटं रडणं आणि खोट्या इमोसन्स, शिवानीच्या भावना तर कायमच रिहॅब मधल्या पेशंटसारख्या असतात !
नेहा-शिवानी मैत्री फेक आहे आणि त्यांचा मॅडी बरोबर ट्रायोही फेक आहे.
आज सगळे एकदम बिचुकलेच्या अंगावर का गेले? त्याने बरोब्बर उत्तर दिलं होतं सुरेखाताईंना !
Btw बाप्पा आज मधेच येऊन वीणाची का खोडी काढून गेला? Wink

डीजे थँक्स, मागच्यावर्षीचे टास्कस आठवण करून दिल्याबद्दल, मला फक्त व्हिडीओज दाखवले तो आठवत होता, बाकी आठवेनाच. गुड मेमरी.

ते माणसे जोडली म्हणणे परवा आणि हा टास्क हे माझ्याही मनात आलं.

Pages