निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजूतै.... मी ठिके, आठवण काढल्याबद्दल मनापासून धन्यवाद ...
तुम्ही ठिक ना !!
__/\__

मनोगतात मुळे 'हे जीवन सुंदर आहे' गाण्याची आठवण झाली आणि आत्ता लगेच युट्यूबवर ऐकलं. किती सुंदर गाणं!
शाली, माशीचा फोटो एकदम भारी. डिटेल्स सुरेख दिसताहेत.
ऋतुराज, त्या लाल फुलाचं नाव काय आहे?

@वर्षा सुरेख फोटो. मी कधी जास्वंद आणि त्याची पुंकेसर दांडी अशी सरळ उभी पाहीली नाही. त्यामुळे फुल वेगळेच वाटतेय.

@अन्जू ती बकरी छान दिसतेय म्हणून फोटो नाही टाकला. तिने त्या बाभळीच्या झुडपावर असलेल्या पाच-सहा प्लॅस्टिकच्या पिशव्या खाऊन टाकल्या. प्लॅस्टीक असे निष्काळजीपण वापरणे वाईटच आहे. Sad

Crested Myna.
मराठी नाव माहीत नाही. मी हिला जंगली साळूंकी म्हणतो.
27E8949B-B3BD-4233-94AA-FB36051F007C.jpeg
.
D912E8CE-F138-4514-9424-EBD7A2FFE469.jpeg
f/6.5
360 mm
1/500
ISO 140
Distance: Approximately 12 to 15 metres.

या दोन्ही फुलांचा आकार गव्हाच्या दाण्याएवढा आहे. एकाही फुलाचे नाव माहीत नाही.
4AABEAEB-5FD4-4B80-8A7F-7B4C2459878C.jpeg
.
26E4635E-84A7-423F-AAC7-2CC2299C7684.jpeg
या फुलांचा आकार मोहरीएवढा आहे. डोळ्यांनी दिसायला कठीण.
6A26301D-257F-466E-BF0D-04F669C61775.jpeg
या फुलांना तर दवबिंदूंचाही भार पेलवत नव्हता. आकार मोहरीहून छोटा.
B8663080-897E-4B5E-BBF0-C6B934079BC4.jpeg

sorry माझं समोर लक्ष नाही गेलं plastic कडे. तिच्याकडे बघत होते आणि तुमचं वरचंही वाचलं नव्हते. तुमचे बरोबर आहे.

तुम्ही ठिक ना !! >>> हो शशांकजी, मजेत आम्ही सर्व.

शालीदा, रानफुलांची बहारदार मेजवानी
पहिली दोन पांढरी फुले Chlorophytum.... मुसळीची एक जात
पिवळं फुल Stylosanthes hamata, हमाटा
त्या खालची दुरंगी शेवरा Alysicarpus longifolius
शेवटची दोन ....ओळख पटेना
खारुताई एक्दम मस्तच......

धन्यवाद ऋतुराज, शाली, वावे.
सुरेख फोटो शाली.
>>तिने त्या बाभळीच्या झुडपावर असलेल्या पाच-सहा प्लॅस्टिकच्या पिशव्या खाऊन टाकल्या. प्लॅस्टीक असे निष्काळजीपण वापरणे वाईटच आहे.

ओह नो! Sad

Danaid eggfly .
Canon Canon PowerShot SX60 HS
@जिजामाता उद्यान, मुंबई.

सिद्धि,ऋतुराज सुंदर मनोगत लिहिलंय दोघांनीही.

एका पेक्षा एक सुंदर निसर्गचित्र!!

जागुताई तुमचा आधीच्या धाग्यावरचा चाफा दिसलाच नाही.रुसला असेल कदाचित. कालचे पोपटाचे फोटोज पण आज दिसेनात. Sad

शालीदा एक से बढकर एक फोटोज.
आळशी खारुताई! Lol

सुप्रभात
हे एक वेगळं सूर्यफूल......

20150215_140810 (2).jpg

मस्तच!
या सुर्यफुलाच्या बीया कशा गोळा करायच्या?

खंड्या किंवा धिवर (White-Throated Kingfisher)
दुर अंतर व मुसळधार पाऊस यामुळे फोटो क्लिअर आला नाही.
2DFF5ADE-228B-4E66-BBD2-4FBADAB65F06.jpeg

सूर्यफुलाची मागची बाजू पूर्ण वाळल्यावर फुले कापून उन्हात आणखी सुकवतात व नंतर काठीने झोडपून बिया गोळा करतात.

अरे वा !! नवीन धागा आला पण आणि सुसाट पळतोय पण !! सिद्धि,ऋतुराज दोघांची मनोगत खरंच खूप आवडली ..
या आणि मागच्या धाग्यावर फोटोंचा नुसता पाऊस पडलाय जणू !! कसले एकेक फोटो आहेत खूप आवडले सग्गळेच
शाली वर्षा वावे जागु ताई ऋतुराज सुंदर फोटो .. अजून कोणी राहिलं का ? माझा बराच बॅकलॉग होता सो सरसकट लिहितेय ..
ऋतुराज तुम्ही मस्त माहिती देताय आणि फुलांची नावं वगैरे पण कळतायत ...
सूर्यफुलाची मागची बाजू पूर्ण वाळल्यावर फुले कापून उन्हात आणखी सुकवतात व नंतर काठीने झोडपून बिया गोळा करतात.>> आणि आपलं नेहेमीचं सूर्यफूल असतं त्याच्या बिया कश्या मिळवायच्या ?! माझ्या गार्डन मधे १ सूर्यफूल फुललंय ..आणि आणखी ४-५ कळ्या आल्यात .. सहज जमलं तर बिया जमवेन म्हणते .. त्या मधल्या काळ्या भागात अजून बिया दिसत नाहीत.. वेळ लागतो का बिया धरायला ?! साधारण १० दिवस झाले फुल तसंच आहे अजून टकटकीत !

अंजलीताई हे मी नेहमीच्या सूर्यफुलाच्या बाबतीतच लिहिलंय ते.
तो फोटो तर प्रदर्शनातील आहे.
बिया धरून फुल सुकायला जरा वेळ लागतो, पण बिया धरायला परागीभवन नीट व्हावं लागत त्यासाठी. फुल पूर्ण फुलल्यावर त्यावर मऊ कापडाचा बोळा हलके फिरवतात.
खर तर सूर्यफूल हे फुल नसून असंख्य फुलांचा फुलोरा आहे (ASTERACEAE फॅमिली - झेंडू, शेवंती, अस्टर , झिनिया)
फक्त कडांच्या फुलांना त्या पिवळ्या पाकळ्या असतात - Ray Floret आणि मध्यभागी असंख्य फुले असतात त्यांना Disk Floret म्हणतात.

Pages