निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागूताई तांबट शक्यतो वठलेल्या झाडांवर ढोलीत रहातो. सकाळी उन्हात छान फोटो काढू देतो. इतर वेळी एका जाग्यावर ठरत नाही.

मला एक सुर्यपक्षी फोटो काढूच देत नाहीये. पंधरा दिवस झाले ओळख करुन घेता घेता. आता त्याचा राग यायला लागलाय. मला शंका आहे की तो मुद्दाम मला चिडवायला असं करतोय.

Gloriosa superba>> येस येस .. ऋतुराज .. माझ्याकडून तुम्हाला एक Gloriosa superba बक्षीस!! Wink
पण त्याला कळलावी म्हणतात ???!!! आई गं कसलं वाईट नाव Uhoh

गौरीचे हात म्हणजे रानहळद, Curcuma longa>> हो का ? असेल कदाचित .. पण आमच्याकडे Gloriosa superba लाच गौरींचे हात म्हणतात ..
कळलावीच्या वाट्याला जनावरे, माणसे कोणी जात नाहीत.>> Gloriosa superba आम्ही कैक वेळा तोडून गौरीना वाहिली आहे .. मग कळलावी कोणीतरी वेगळी असेल .. Lol

धन्यवाद अंजली ताई. हीचा कंद कळा निर्माण करून प्रसूतीवेदना सुखकर करतो. हीच कंद घरात लावला तर नवराबायकोची भांडणं होतात... म्हणून पण कळलावी म्हणतात Happy
ह्या वर्षी येऊर च्या जंगलात दिसली पण अजून फुलावर आली नाहीये. फोटो टाकेनच.

शाली Rofl Rofl माझे कॉलेज मधले नाव डेंजर वूमन असे होते
दिवा देण्यासाठी दिवा असे लिहून त्याच्या मागेपुढे : असे चिन्ह टाकावे स्पेस ठेऊ नये ..
पण दिव्याची गरज नाही .. तेवढी मस्करी कळते मला Happy

त्या कळलावीला आमच्या कडे वाघनखं म्हणतात.
@ऋतुराज हळदी कुंकू फुलांचा फोटो एकदम सुरेख. मी पण पहिल्यांदा च पाहिली.
तांबट पण छान.

ही अशी कोळ्याची जाळी मी कर्नाळा पक्षी अभयारण्यात खूप पाहिली होती. फार सुंदर दिसतात.
जागू, तांबट मस्तच. पिवळा, लाल, काळा, हिरवा किती रंग असतात नाही त्याच्यात.

ऐरोली मॅनग्रोव्जमध्ये दिसलेले Bulbul - white eared
यांना पिवळ्याबुड्या बुलबल म्हणायला पाहिजे ना

त्या कळलावीला आमच्या कडे वाघनखं म्हणतात ------ बरीच नावं आहेत हिला
ऐरोली मॅनग्रोव्जमध्ये दिसलेले Bulbul - white eared
यांना पिवळ्याबुड्या बुलबल म्हणायला पाहिजे ना--------- Happy हो खरच की.
छान आहे फोटो

हो शशांक , रानहळद पहिली आहे कुठे ना कुठे ..
वर्षा ताई पहिल्यांदाच पहातेय बहुतेक हा बुलबुल मी.. मस्तच !
कोळ्याची जाळी अगदी मोहक वाटतात बघायला .. आमच्याकडे पहाटे थंडीत च्या दिवसात जिकडे तिकडे अंतरा अंतराने दिसायची .. थोड्यावेळाने ऊन येऊन दव वाळले कि गायब .. मग जवळ जाऊन पाहिल्यावर एक छोटासा कोळी दिसायचा कधी कधी.
वाघनखं!! Happy

कळलावीसारखी एक दातपाडीही असते Lol तिचा रस चुकून पोटात गेला तर दात दुखतात म्हणे! ( मी दोन्ही वनस्पती पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या नाहीत Wink )

वावे दोन्ही वनस्पती पहा. दातपाडी. Lol
कळलावी म्हणजे अग्नीशीखा असावी. निरुजींनीच हे नाव सांगीतलं होतं मला.

शशांकजी
रानहळद छान, कळलावी आणि रानहळद दोन्हीना गौरीचे हात म्हणतात का?
तू अनंत तुझी अनंत नामे अस आहे आपल्याकडे
निरुदा, भारंगीचा फोटो सुंदर आहे, अरण्यकातला का?
वावे, हो दातपाडी असते, त्याने दात गळून पडतात अस ऐकलंय ख खो दे जा
शालीदा.....फोटो क्लासच

कळलावी, अग्निशिखा... gloriosa superba

गौरीचे हात म्हणजे रानहळद, Curcuma longa

दोन्ही पूर्ण वेगवेगळ्या...

दातपाडी किंवा रामेठा ही म्हशीच्या अंगाला लावतात, जेणेकरुन काही काळ ती म्हैस गरगरीत\ भरल्या अंगाची दिसते. मग हळुहळू ती नाॅर्मलला येते. म्हैस विकताना ही ट्रीक वापरतात....

>>वर्षा, फोटो दिसत नाही.

ओह का बरं, खरं दिसायला हवा. तुम्ही मोबाईलवर बघताय का?
बाकीच्यांनाही प्रॉब्लेम येतोय का?

मला मोबाईल, डेस्कटॉप दोन्हीवर दिसत नाहीये फोटो, बाकीचे दिसतायेत. गुगल क्रोम आहे दोन्ही ठीकाणी.

पावसाळ्यात उमलणारी रानफुले म्हणजे एक नेत्रसुखद पर्वणीच.
ह्यांचं आयुष्य तस काही तास ते काही आठवडे ...क्षणभंगुर. Ephemerals

तुतारी
Rhamphicarpa longiflora
बारीक पानाची, गवताच्या मुळांवर पावसाळ्यात उगवणारी परजीवी वनस्पती. हिची लांब दांड्याची पांढरी फुले संध्याकाळी उमलू लागतात व रात्री पूर्ण उमलतात.
त्याच रात्री परागीभवन पण होत. दुसऱ्या दिवशी कोमेजून जातात. आणि मग अशी पारदर्शक दिसतात.
Tutari 1.jpg
.
Tutari 3.jpg

वर्षा मला दिसत होते तुमचे फोटो पण आता दिसत नाहीत.

ऋतूराज भारीच फोटो. घोड्यांचा कुठे मिळाला? मी वेडा आहे घोड्यासाठी. घेणारच कधीतरी. सारंगखेड्याची यात्रा पाहीली आहेस का कधी? नर्मदेच्या काठावर अशी धावतात ना अबलख घोडी की विचारू नकोस. डोळ्यांचे पारणे फिटते. फोटो टाकतो येथे काही.

Pages