भात करायची आयुर्वेदिक पद्धत

Submitted by सुपर्णा लक्ष्मणतीर्थ on 25 July, 2019 - 09:16

नमस्कार मैत्रिणींनो,
कुटुंबाच्या स्वास्थ्याची वाट स्वयंपाकघरातून जाते, आणि या स्वयंपाकघराची किल्ली घरच्या स्त्रीच्या हातात असते.
आज स्त्री कितीही शिकली, इंजिनिअर झाली, डॉक्टर झाली, न्यायाधीश झाली, शास्त्रज्ञ झाली, शिक्षक झाली, अभिनेत्री झाली, लेखिका झाली, कलाकार झाली, गायिका झाली, उद्योजिका झाली, वैमानिक झाली, अंतराळवीर झाली, मंत्री झाली तरी घराच्या लोकांना पोषक आहार देण्याची जबाबदारी अंतिमतः तिचीच असते.

आज आपण जाहिरातींच्या भडीमारामुळे गोंधळून जाऊन आणि खाद्य पदार्थ डोळे आणि नाकाला सुखावणारे असले पाहिजेत या अट्टाहासाने चुकीच्या गोष्टी आपल्या लाडक्या कुटुंबाच्या पोटात घालत आहोत,

या चुकीच्या अन्नपदार्थामुळे, मधुमेह अक्षरशः साथ पसरावी तसा पसरत आहे. या राक्षसाला वेसण घालण्यासाठी परत गृहलक्ष्मीलाच अवतार घ्यावा लागणार आहे, मात्र या वेळी तिच्या हातात फार फार प्राचीन ज्ञानाचे शस्त्र असणार आहे.

आपल्या जेवणात असणारा मुख्य घटक "भात" हा कसा निवडावा, कसा शिजवावा म्हणजे त्याचे जास्तीतजास्त फायदे आपल्याला मिळतील हे अगदी बारकाईने आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले आहे, मात्र पाश्चात्य जीवनशैलीच्या कच्छपी लागून आपण ते ज्ञान अडगळीत टाकले.

वास्तविक पाहता इकडे अन्नशास्त्राचा गाढा अभ्यास असणारे सारखे लोक आहेत. मोठे मोठे लेख त्यांनी लिहिले आहेत, आपले प्राचीन ज्ञान पुनरुज्जीवित करायला खरेतर त्यांनी पुढाकार घ्यायला हवा, त्यांना ती प्रेरणा होईल तेव्हा होईल, तो पर्यंत तरी हा अंधार दूर करायचा मी काजवा बनून प्रयत्न करेन.

हे ज्ञान प्रकाशात आणणारा खालील लेख मला व्हाट्सअप्प वर मिळाला, तुम्हा सगळ्यांसाठी मी तो इकडे शेअर करते आहे. तुम्हाला काय वाटते ते जरूर खाली लिहा.

आयुर्वेदाच्या पद्धतीने भात करण्याची पद्धत :-

भात कसा पिकवायचा आणि भात कसा खायचा हे ज्ञान सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारताने जगाला दिले. एवढी वर्ष भात खाऊनही भारतीयांना डायबेटीस होत नव्हता आणि आज तोच भारत मधुमेहाची राजधानी झालाय. हे कसं काय ? भात बनवण्याच्या पद्धतीतील बदल याला कारणीभूत आहे.

भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असल्यामुळे त्याच्याने डायबेटीस होऊ शकतो असे आधुनिक विज्ञान सांगते. गंमत म्हणजे भाताच्या काही विशिष्ट जाती खाल्ल्याने किंवा भातापासून बनवलेले खीर, खिचडी यासारखे काही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने प्रमेह हा डायबेटीसशी साम्य दाखवणारा 'प्रमेह' हा आजार होऊ शकतो असे आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदानुसार द्रवरूप कफाला वाढवणारा कोणताही पदार्थ प्रमेह निर्माण करू शकतो. थोडक्यात आधुनिक शास्रानुसार ज्या भाताचा GI जास्त त्याने डायबेटीस होण्याची शक्यता अधिक तर आयुर्वेदानुसार जो भात कफाला वाढवतो त्याच्याने डायबेटीस होण्याची शक्यता जास्त. म्हणजेच आपण भाताची कफ वाढवण्याची प्रवृत्ती कमी करू शकलो तर डायबेटीसला घाबरण्याची गरज नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला ‘दहा कलमी’ कार्यक्रम वापरला पाहिजे. यातील पाच नियम तांदळाच्या निवडीसंदर्भात आहेत तर पाच नियम भात शिजवण्यासंबंधी आहेत.

भाताची निवडणूक

ज्या तांदळाचा दाणा लांब असतो आणि ज्याला सुगंध असतो तो डायबेटीसचे कारण ठरतो असे चरक संहितेत सांगितले आहे. त्यामुळे बासमती, आंबेमोहोर स्पर्धेतून बाद होतात. सुगंध असलेला तांदूळ कधीतरी सणाच्या दिवशीच खावा. International Rice Research Institute आणि University of Queensland यांनी जगातील २३३ तांदळाच्या जातींवर संशोधन केले आहे. या रिसर्चचे प्रमुख डॉ. फिट्सगेराल्ड यांच्या म्हणण्यानुसार “भारतातील सुवर्ण आणि मसुरी तांदळाचा GI ५५ पेक्षा कमी आहे; तर बासमती तांदळाचा GI ६८ आहे असे सांगितले आहे. आयुर्वेदानुसार जे धान्य तुम्ही राहत असलेल्या प्रदेशात तयार होते ते तुमच्यासाठी योग्य असते. म्हणून आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागात तयार होणारा तांदूळ खाण्यास योग्य.

ज्या तांदळाचे पीक कमी दिवसात तयार होते तो पचायला हलका असतो. पूर्वी कोकणात साठ दिवसात तयार होणारा साठेसाळीचा भात मिळत असे. पण आता तो क्वचितच बघायला मिळतो. जागतिकीकरणाच्या उत्साहात आपण आपल्या बऱ्याच देशी गोष्टी गमावून बसलो ही त्यातलीच एक.

तांदळावरील आवरण काढण्यासाठी त्याच्यावर जितक्या अधिक प्रक्रिया केल्या जातात तेवढा तो शुभ्र बनतो आणि पचायला जड होतो. म्हणूनच कमी प्रोसेस केलेल्या ब्राऊन राईसची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ब्राऊन राईस खाल्ल्याने तांदळाच्या वरच्या कवचात असणारे पोषक घटक टिकून राहतात. जास्त पॉलिश केल्याने ते निघून जातात.

पूर्वीच्या काळी धान्य घरात साठवून ठेऊन मग वापरण्याची पद्धत होती. साठवून ठेवलेल्या तांदळातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तो कफ वाढवत नाही. नवीन तांदळाचा भात चिकट होतो आणि जुन्या तांदळाचा भात मोकळा होतो हे आपण पाहतोच. हल्ली धान्य साठवून ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. “महिन्याचे रेशन महिन्याला भरा” अशी कामचलाऊ व्यवस्था उदयास आली आहे. या गोष्टीचा फायदा घेऊनच आता दोन वर्ष ‘एज’ (Aged) केलेला महाग तांदूळ काही कंपन्यानी विकायला आणला आहे. याला पर्याय म्हणून भात करण्यापूर्वी तांदूळ थोडे भाजून घेतल्यास त्याच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि तो पचायला हलका होतो.

म्हणजेच सुगंध नसलेला, आपण राहत असलेल्या प्रदेशात तयार होणारा, कमी दिवसात तयार होणारा, कमी प्रक्रिया केलेला, एक वर्ष साठवून ठेवलेला किंवा भाजून घेतलेला तांदूळ भात करण्यासाठी योग्य आहे.

ऑपरेशन राईस

आता आपण प्रत्यक्ष भात बनवण्याची कृती म्हणजे 'ऑपरेशन राईस'ला सुरुवात करूया. ‘अष्टांगहृदय’ या ग्रंथात चांगल्या भाताचे गुणवर्णन पुढीलप्रकारे केले आहे.
सुधौत: प्रस्रुत: स्विन्नोऽत्यक्तोष्मा च ओदनो लघुः I
यश्चाग्नेय औषध क्वाथसाधितो भृष्टतण्डुल: II

सुधौत म्हणजे व्यवस्थित धवून घेतलेला, प्रस्रुत म्हणजे पेज काढून घेतलेला, पूर्ण शिजलेला आणि खाताना गरम असलेला भात पचायला हलका असतो. त्याचबरोबर पचनाला मदत करणाऱ्या औषधांनी सिद्ध केलेला आणि भाजून घेतलेल्या तांदळाचा भात पचायला हलका असतो. आता यातील प्रत्येक मुद्द्याचा विचार करू.

सुधौत – भात शिजवण्यापूर्वी तांदूळ दोन वेळा व्यवस्थित धुवून घेणे आवश्यक आहे. असा धुतलेला तांदूळ १५ ते २० मिनिट तसाच ठेवल्यास भात लवकर शिजतो.

प्रस्रुत, स्विन्न – याचा अर्थ पेज काढून घेतलेला आणि पूर्ण शिजलेला. आयुर्वेदातल्या ‘भावप्रकाश’ या ग्रंथात भात शिजवण्याची प्रक्रिया सविस्तर वर्णन केली आहे. कोणताही पदार्थ चांगला शिजण्याकरिता त्याला सर्व बाजूने समान उष्णता मिळणे आवश्यक असते. हे काम मातीच्या भांड्यात उत्तम प्रकारे होते. हल्ली चीनी मातीपासून बनवलेली भांडी मिळतात त्यामध्ये भात बनवल्यास ते सर्वात उत्तम. हे शक्य नसेल तर बुडाशी जाड असलेले पितळेचे पातेले वापरावे.

भात शिजवण्यासाठी प्रथम तांदळाच्या पाच पट पाणी घेऊन ते उकळू द्यावे. त्यानंतर अगोदर धुवून ठेवलेला तांदूळ त्यात घालावा. थोडा वेळ भात शिजू द्यावा. तांदळापासून भात करत असताना त्यातील स्टार्चमध्ये ‘जिलेटिनायझेशन’नावाची प्रक्रिया घडते आणि या जिलेटिनायझेशनमुळे भाताचा GI वाढतो. त्यामुळे भात जितका अधिक शिजेल तितका त्याचा GI जास्त. आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीत पाणी अगोदर उकळून घेतलेलं असल्याने भात लवकर शिजतो. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करून झाली की जास्तीचे पाणी म्हणजे पेज बाजूला काढून घ्यावी आणि भात झाकून ठेवावा. आत कोंडून राहिलेल्या वाफेमुळे भाताची शितं मोकळी होतात. बाजूला काढून ठेवलेली पेजेत जास्तीचे स्टार्च बाहेर पडून जाते. त्यामुळे भाताचा चिवटपणा कमी होतो म्हणजेच त्याचा GI कमी होतो. ही पेज घरातल्या लहान मुलांना द्यायला हरकत नाही. गेल्या २५ – ३० वर्षात आपण भात शिजवायला कुकर वापरायला लागलो त्यामुळे पेज वेगळे काढण्याची पद्धत बंद झाली आणि त्यामुळे डायबेटीसचे पेशंट वाढायला सुरुवात झाली. कुकरमध्ये भात लवकर शिजतो पण पचायला जड होतो.

भाताची कफ निर्माण करण्याची प्रवृत्ती कमी करण्याचा अजून एक उपाय आहे; तो म्हणजे पचनाला मदत करणाऱ्या औषधांसोबत भात शिजवणे. यासाठी मिरे, दालचिनी, हळद यासारख्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर होतो. यातही भात खाऊन पोट जड होते त्यासाठी मिरे, छातीत कफ साठतो त्यांच्यासाठी दालचिनी आणि ज्यांच्या घरात डायबेटीसची हिस्ट्री आहे त्यांनी हळकुंड घालून भात करावा. दक्षिण भारतात अनेक राज्यात भात हेच दोन्ही वेळचा आहार असतो म्हणून तिथे इडलीतही मिरे घालण्याची प्रथा दिसते ती यामुळेच.

अशा पद्धतीने केलेला भात हा गरम असतानाच खाल्ला पाहिजे असे आयुर्वेद सांगतो.
जे लोक तांदूळ निवडताना आणि भात शिजवताना आयुर्वेदाचा ‘दहा कलमी’ कार्यक्रम पाळतील त्यांनी डायबेटीसला घाबरण्याची आजिबात गरज नाही. या 'तांदूळ आख्यान' ऐकूल्याने तणाव निवळून दोघेही मोकळे झाल्यासारखे वाटले.
मोकळी झालेली माणसं आणि मोकळा झालेला भात दोन्ही मला आवडतात आणि तुम्हाला ?
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्रोताचा स्पष्ट उल्लेख केला आहे,
लोकांना उपयोगी पडणारे प्राचीन ज्ञान त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी कुणी आडकाठी करेल असे मला वाटत नाही.

तुम्हाला फळांच्या गरात स्वारस्य आहे की ते फळ कुठून आले यावर काट्याकुट करायचा आहे?

मी कुणाच्या अध्यात मध्यात नसते,
कायम मी आणि माझे काम बरे असाच विचार करते.
लागट शेऱ्यांचा मला पण त्रास होतो, पण मी बाई माणूस इंटरनेट वरील ट्रोल्स बरोबर कितपत भांडू शकणार म्हणून गप्प बसते,

पण आता तर हद्द होतेय, आधी तुम्ही फेसबुक वर आहात का म्हणून विचारणा, माझ्या खाजगी आयुष्यात शिरायची संधी शोधणे, आणि आता लेख टाकल्या टाकल्या टपून बसल्या सारखि प्रतिक्रिया, ते ही जेव्हा मी स्पष्टपणे सांगितले होते की हे ज्ञान देणारे साहित्य माझे नाही.

वीट येतो या लोकांचा.

मला साधनाजीं चे प्रतिसाद या साठीच आवडतात, जिथल्या तिथे त्या या ट्रोल्स ना जागा दाखवतात.
समर्थांनी म्हटलेच आहे, धटाशी आणावा धट....

मी माननीय अ‍ॅडमिन यांना विनंती केली होती की शशिकांत जगताप (चक्रम माणूस) आणि सुपर्णा रामतीर्थ हे दोन आयडी एकाच आयपी अ‍ॅड्रेस वरून येतात का ? याचा अर्थ हे दोघे एकमेकांचे ड्युआयडी आहेत असा होतो असा घेऊन एकाने मी केलेली विपू एका धाग्यावर कॉपी पेस्ट केली आहे. तर माझा एक शिळा प्रतिसाद अ‍ॅडमिनच्या विपूत चिकटवला आहे. असे फुकट कुरीअर वाले मिळणे हे भाग्याचेच.

तर हे एकच असते तर बुवा, कसा काय ना एकमेकांचा भांडाफोड केला असता ?
हा लेख कुठेशी आहे याची मला तरी कल्पना नाही. मात्र त्याचा सोर्स इथे जसा लेखिकेला ठाऊक आहे तसाच भांडाफोड करणा-यालाही ठाऊक आहे. उगीच का भांडाफोड केलाय ?
या संवादामुळे हे दोघे एक नाहीत याबद्दल माझी खात्रीच पटलेली आहे.
आपल्याच ड्युआयडीला कशाला कोण खोटे ठरवेल , नाही का ?
अ‍ॅडमिन साहेब, या वेळी मी चूक आहे की बरोबर ?

सुपर्णा जी (आपण कोणाचे डु आयडी आहात हे माहीत नाही) मी वरची प्रस्तावना वाचली नव्हती. हा लेख जसाच्या तसा कॉपी पेस्ट दिसला म्हणून घाईत मत मांडले व लिंक जोडली. माबोच्या धोरणात कॉपी पेस्ट लिखाण चालत नाही हे सांगायचे होते.
राहिले फेसबुक वर आहात का हे, विचारण्यामागे आपले अनमोल अनुभव, विचार जाणून घेण्यासाठी हा हेतू होता. मला तुमच्या खाजगी जीवनात घुसखोरी करायची गरजच नाही.
आणि आणि आपट्या तू लाळ घोटत इथेच .. खात फिरतोय अजून. अजून किती थुंकून चाटणार आहेस.

सुपर्णा जी आपणास माहीत असेलच जसेच्या तसे लिखाण इकडं प्रसिद्ध करणे अलाउड नाही. पुर्वी सुध्दा वांग्मय चोरी म्हणून असे प्रकार गणले गेले आहेत. मी तुम्हाला ट्रोल करायला तुम्ही माझं काय घोडं मारलं आहे. कृपया मला ट्रोल म्हणू नका.

थॅनोस आपटे
20 July, 2019 - 21:55
ट्रोल्स ला खुली सूट देणा-या या संस्थळावर राहण्याची इच्छा नाही हे आपल्याला मी सांगितले आहे. माझा आयडी अद्याप रद्द झालेला नाही. हा आयडी ताबडतोब रद्द करून माझ्या आयपी अ‍ॅड्रेसला देखील ब्लॉक करावे ही विनंती

कुटुंबाच्या स्वास्थ्याची वाट स्वयंपाकघरातून जाते, आणि या स्वयंपाकघराची किल्ली घरच्या स्त्रीच्या हातात असते.
आज स्त्री कितीही शिकली, इंजिनिअर झाली, डॉक्टर झाली, न्यायाधीश झाली, शास्त्रज्ञ झाली, शिक्षक झाली, अभिनेत्री झाली, लेखिका झाली, कलाकार झाली, गायिका झाली, उद्योजिका झाली, वैमानिक झाली, अंतराळवीर झाली, मंत्री झाली तरी घराच्या लोकांना पोषक आहार देण्याची जबाबदारी अंतिमतः तिचीच असते. >> निषेध !

काढून ठेवलेली पेजेत जास्तीचे स्टार्च बाहेर पडून जाते>>
त्यामुळे भाताचा चिवटपणा कमी होतो म्हणजेच त्याचा GI कमी होतो. >> असल्या भंपक , शास्त्रीय भासणार्‍या वाक्यांचा पण निषेध .

भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असल्यामुळे त्याच्याने डायबेटीस होऊ शकतो असे आधुनिक विज्ञान सांगते. >> याचा पण निषेध. डायबेटीस असलेल्यांनी हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ प्रमाणात खावेत असं ऐकलं आहे .

वर बघा आपटे किती दिवसांपासून माबोला कंटाळला सांगतोय पण सोडून जात नाही. हाकलल्याशिवाय जाणार नाही किरणू सारखा.

कुटुंबाच्या स्वास्थ्याची वाट स्वयंपाकघरातून जाते, आणि या स्वयंपाकघराची किल्ली घरच्या स्त्रीच्या हातात असते.
आज स्त्री कितीही शिकली, इंजिनिअर झाली, डॉक्टर झाली, न्यायाधीश झाली, शास्त्रज्ञ झाली, शिक्षक झाली, अभिनेत्री झाली, लेखिका झाली, कलाकार झाली, गायिका झाली, उद्योजिका झाली, वैमानिक झाली, अंतराळवीर झाली, मंत्री झाली तरी घराच्या लोकांना पोषक आहार देण्याची जबाबदारी अंतिमतः तिचीच असते. >> निषेध !

काढून ठेवलेली पेजेत जास्तीचे स्टार्च बाहेर पडून जाते>>
त्यामुळे भाताचा चिवटपणा कमी होतो म्हणजेच त्याचा GI कमी होतो. >> असल्या भंपक , शास्त्रीय भासणार्‍या वाक्यांचा पण निषेध .

नवीन Submitted by मेधा on 25 July, 2019 - 1
+११११११११११११११११११११
भरती ओहोटी तळण, भरतीच्या वेळी शौचाला जावे हे महान विचार सुध्दा माबोवर पहायला मिळाले.

शशीराम तुझी तडफड पाहून मनोरंजन झाले. शेवटी तू तुझे गलीच्छ विचार आणि संस्कार या दोन्हींचे दर्शन घडवलेच इथे. तुझे आधीचे सर्व आयडी अ‍ॅडमिनने हाकललेत याला मी कारणीभूत नाही. फक्त खान ९९ या आयडीने शिव्या दिल्या त्यामुळे त्याची तक्रार करणे गरजेचे होते. पण ती केल्यावर तू सर्वत्र घाण करून ठेवलेली आहेस.

यामुळेच मला अ‍ॅडमिअन यांना बोल लावावे लागले. कारण शिवीगाळ झाल्यानंतर त्यांच्याकडून त्वरीत कारवाई होईल ही अपेक्षा होती. बाकी तुझ्यासारख्या छपरी इसमाशी इथे तर सोडच प्रत्यक्षातही बोलायची इच्छा नाही. अत्यंत नीच दर्जाचा मनुष्य आहेस याची खात्री आहे.

हा तुला उद्देशून शेवटचा प्रतिसाद.

एखादी गोष्ट समोर आली की त्याचा सगळ्या बाजुंनी पूर्ण पाठपुरावा करायची सवयच आहे मला. कोणीही कितीही टवाळी करो मी खाली मान घालून माझे काम करत राहते.

परवाची डॉक्टर साहेबांची पोस्ट अन्य त्यावर बर्वे सरांचे स्पष्टीकरण वाचून ते तत्व कुठे कुठे वापरता येईल याचा विचार चालला होता.
घरात जेष्ठ नागरिक आहेत, वयोमानाप्रमाणे त्यांना मलावरोधाचा त्रास होतो, सारक औषधे घ्यावी लागतात.
बर्वे सरांचे स्पष्टीकरण वाचले आणि तेच तत्व आरोग्याबाबत वापरता येते का पाहू म्हंटले,
गेले 2 दिवस भरतीची वेळ पाहून त्यांना शौचास जाण्यास सुचवले. आणि काय आश्चर्य, कोणतेही औषध न घेता पोट साफ झाले. घरातल्या लहान मुलांचा देखील तसाच अनुभव आला. लगोलग मी आई ला फोन लावला, बाबांच्या बाबतीत प्रयोग करायला सांगितला, तिकडेही तेच.

अजून 3 4 दिवस प्रयोग करून या निष्कर्षांवर ठोसपणे बोलता येईल, विज्ञानाबद्दल बोलत असल्याने सज्जड पुरावे असल्याशिवाय बोलणे योग्य नाही. जितके जास्त डेटा पॉईंट्स तितका जास्त विश्वासार्ह निष्कर्ष. माझी सगळ्यांना विनंती आहे कृपया पुढचा आठवडाभर तरी भरतीची वेळ पाहून विधी आटपावेत आणि नोंदी ठेवाव्यात.हे शेवटी आपल्याच जुन्या ज्ञानाचे पुरुज्जीवन करायला करतो आहोत, त्यात कुणाचा स्वार्थ नाही आहे, त्यामुळे शास्त्रीय प्रयोगात उगाच अवघडलेपण, संकोच आणू नये.

भारतीय संस्कृतीत विशेषतः वेदात दडलेले हे विज्ञान अक्षरशः चमत्कार घडवू शकते गरज आहे ती केवळ आपल्या प्रयत्नांची

Submitted by सुपर्णा लक्ष्मणतीर्थ on 24 July, 2019 - 09:40

आपटे तूला मी आत्मपरीक्षण करण्याचा वारंवार सल्ला दिला. तरी तू शशिराम, खान पुराण उगाळत बसला आहे. सूड भावना घेऊन जगणं तुझ्या नशिबात आहे. तूझा जळून कोळसा होईल पण मी माझी शांती ढळू देणार नाही.

आपटे याचे मासं पुर्ण ढासळले आहे.‌ म्हणून तो हुंगत फिरत असतो व तेच तेच रडगाणे गात असतो. त्याच्याकडे लक्ष दिले की त्याला चेव येतो.

पहिला प्रतिसाद देताना मी उतावळेपणा केला हे मान्य आहे, मी गुगल वर भात करायची आयुर्वेदिक पद्धत हे टाईप करून सर्च केलं व लिंक इकडे जोडली.

थॅनोस आपटे
25 July, 2019 - 11:06
https://www.maayboli.com/node/70794#new
या धाग्यावरचे शिवराळ प्रतिसाद मायबोलीच्या धोरणात बसत असतील तर माफ करा
> > आपटेचे आवडते काम. कुरिअर बॉय आपटे.
या धाग्यावर येऊन मुद्दाम नावं जोडून स्वत: उद्योग करायचे नि कागाळी करीत प्रशासकांना त्रास द्यायचा.

मुख्य लेख आणि तो शौचास जाण्याची वेळ, हा प्रतिसाद Lol Lol दोन्ही भन्नाट विनोदी आहेत Lol

भरती दुपारी असेल तर ऑफिसमध्ये मीटिंगमधून उठून टॉयलेटमध्ये? Proud आणि समजा पहाटे 2.00/ 2.30 ला असेल तर अलार्म लावून उठणार का ?

ऑफिसमध्ये मीटिंगमधून उठून टॉयलेटमध्ये?
<<

आलेले आवेग थांबवू नयेत असे आयुर्वेद सांगतो. असेही कॉन्स्टिपेटेड बॉस शी मिटिंग करण्यापेक्षा त्याला "जाऊ" द्या की Lol सगळ्यांनाच "मोकळे" वाटेल.

भरती दिवसात दोन वेळा येते. आणि पीक भरतीच नको असेल काही! जी ओहोटी नाही ती भरती असा विचार करुन बघा बरं!
आलेले आवेग थांबवू नयेत असे आयुर्वेद सांगतो. >> ते आयुर्वेदाने कशाला सांगायला हवंय म्हणतो मी! Biggrin

Pages