नमस्कार मैत्रिणींनो,
कुटुंबाच्या स्वास्थ्याची वाट स्वयंपाकघरातून जाते, आणि या स्वयंपाकघराची किल्ली घरच्या स्त्रीच्या हातात असते.
आज स्त्री कितीही शिकली, इंजिनिअर झाली, डॉक्टर झाली, न्यायाधीश झाली, शास्त्रज्ञ झाली, शिक्षक झाली, अभिनेत्री झाली, लेखिका झाली, कलाकार झाली, गायिका झाली, उद्योजिका झाली, वैमानिक झाली, अंतराळवीर झाली, मंत्री झाली तरी घराच्या लोकांना पोषक आहार देण्याची जबाबदारी अंतिमतः तिचीच असते.
आज आपण जाहिरातींच्या भडीमारामुळे गोंधळून जाऊन आणि खाद्य पदार्थ डोळे आणि नाकाला सुखावणारे असले पाहिजेत या अट्टाहासाने चुकीच्या गोष्टी आपल्या लाडक्या कुटुंबाच्या पोटात घालत आहोत,
या चुकीच्या अन्नपदार्थामुळे, मधुमेह अक्षरशः साथ पसरावी तसा पसरत आहे. या राक्षसाला वेसण घालण्यासाठी परत गृहलक्ष्मीलाच अवतार घ्यावा लागणार आहे, मात्र या वेळी तिच्या हातात फार फार प्राचीन ज्ञानाचे शस्त्र असणार आहे.
आपल्या जेवणात असणारा मुख्य घटक "भात" हा कसा निवडावा, कसा शिजवावा म्हणजे त्याचे जास्तीतजास्त फायदे आपल्याला मिळतील हे अगदी बारकाईने आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवले आहे, मात्र पाश्चात्य जीवनशैलीच्या कच्छपी लागून आपण ते ज्ञान अडगळीत टाकले.
वास्तविक पाहता इकडे अन्नशास्त्राचा गाढा अभ्यास असणारे सारखे लोक आहेत. मोठे मोठे लेख त्यांनी लिहिले आहेत, आपले प्राचीन ज्ञान पुनरुज्जीवित करायला खरेतर त्यांनी पुढाकार घ्यायला हवा, त्यांना ती प्रेरणा होईल तेव्हा होईल, तो पर्यंत तरी हा अंधार दूर करायचा मी काजवा बनून प्रयत्न करेन.
हे ज्ञान प्रकाशात आणणारा खालील लेख मला व्हाट्सअप्प वर मिळाला, तुम्हा सगळ्यांसाठी मी तो इकडे शेअर करते आहे. तुम्हाला काय वाटते ते जरूर खाली लिहा.
आयुर्वेदाच्या पद्धतीने भात करण्याची पद्धत :-
भात कसा पिकवायचा आणि भात कसा खायचा हे ज्ञान सुमारे २५०० वर्षांपूर्वी भारताने जगाला दिले. एवढी वर्ष भात खाऊनही भारतीयांना डायबेटीस होत नव्हता आणि आज तोच भारत मधुमेहाची राजधानी झालाय. हे कसं काय ? भात बनवण्याच्या पद्धतीतील बदल याला कारणीभूत आहे.
भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असल्यामुळे त्याच्याने डायबेटीस होऊ शकतो असे आधुनिक विज्ञान सांगते. गंमत म्हणजे भाताच्या काही विशिष्ट जाती खाल्ल्याने किंवा भातापासून बनवलेले खीर, खिचडी यासारखे काही पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने प्रमेह हा डायबेटीसशी साम्य दाखवणारा 'प्रमेह' हा आजार होऊ शकतो असे आयुर्वेद सांगतो. आयुर्वेदानुसार द्रवरूप कफाला वाढवणारा कोणताही पदार्थ प्रमेह निर्माण करू शकतो. थोडक्यात आधुनिक शास्रानुसार ज्या भाताचा GI जास्त त्याने डायबेटीस होण्याची शक्यता अधिक तर आयुर्वेदानुसार जो भात कफाला वाढवतो त्याच्याने डायबेटीस होण्याची शक्यता जास्त. म्हणजेच आपण भाताची कफ वाढवण्याची प्रवृत्ती कमी करू शकलो तर डायबेटीसला घाबरण्याची गरज नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला ‘दहा कलमी’ कार्यक्रम वापरला पाहिजे. यातील पाच नियम तांदळाच्या निवडीसंदर्भात आहेत तर पाच नियम भात शिजवण्यासंबंधी आहेत.
भाताची निवडणूक
ज्या तांदळाचा दाणा लांब असतो आणि ज्याला सुगंध असतो तो डायबेटीसचे कारण ठरतो असे चरक संहितेत सांगितले आहे. त्यामुळे बासमती, आंबेमोहोर स्पर्धेतून बाद होतात. सुगंध असलेला तांदूळ कधीतरी सणाच्या दिवशीच खावा. International Rice Research Institute आणि University of Queensland यांनी जगातील २३३ तांदळाच्या जातींवर संशोधन केले आहे. या रिसर्चचे प्रमुख डॉ. फिट्सगेराल्ड यांच्या म्हणण्यानुसार “भारतातील सुवर्ण आणि मसुरी तांदळाचा GI ५५ पेक्षा कमी आहे; तर बासमती तांदळाचा GI ६८ आहे असे सांगितले आहे. आयुर्वेदानुसार जे धान्य तुम्ही राहत असलेल्या प्रदेशात तयार होते ते तुमच्यासाठी योग्य असते. म्हणून आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागात तयार होणारा तांदूळ खाण्यास योग्य.
ज्या तांदळाचे पीक कमी दिवसात तयार होते तो पचायला हलका असतो. पूर्वी कोकणात साठ दिवसात तयार होणारा साठेसाळीचा भात मिळत असे. पण आता तो क्वचितच बघायला मिळतो. जागतिकीकरणाच्या उत्साहात आपण आपल्या बऱ्याच देशी गोष्टी गमावून बसलो ही त्यातलीच एक.
तांदळावरील आवरण काढण्यासाठी त्याच्यावर जितक्या अधिक प्रक्रिया केल्या जातात तेवढा तो शुभ्र बनतो आणि पचायला जड होतो. म्हणूनच कमी प्रोसेस केलेल्या ब्राऊन राईसची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ब्राऊन राईस खाल्ल्याने तांदळाच्या वरच्या कवचात असणारे पोषक घटक टिकून राहतात. जास्त पॉलिश केल्याने ते निघून जातात.
पूर्वीच्या काळी धान्य घरात साठवून ठेऊन मग वापरण्याची पद्धत होती. साठवून ठेवलेल्या तांदळातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तो कफ वाढवत नाही. नवीन तांदळाचा भात चिकट होतो आणि जुन्या तांदळाचा भात मोकळा होतो हे आपण पाहतोच. हल्ली धान्य साठवून ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. “महिन्याचे रेशन महिन्याला भरा” अशी कामचलाऊ व्यवस्था उदयास आली आहे. या गोष्टीचा फायदा घेऊनच आता दोन वर्ष ‘एज’ (Aged) केलेला महाग तांदूळ काही कंपन्यानी विकायला आणला आहे. याला पर्याय म्हणून भात करण्यापूर्वी तांदूळ थोडे भाजून घेतल्यास त्याच्यातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि तो पचायला हलका होतो.
म्हणजेच सुगंध नसलेला, आपण राहत असलेल्या प्रदेशात तयार होणारा, कमी दिवसात तयार होणारा, कमी प्रक्रिया केलेला, एक वर्ष साठवून ठेवलेला किंवा भाजून घेतलेला तांदूळ भात करण्यासाठी योग्य आहे.
ऑपरेशन राईस
आता आपण प्रत्यक्ष भात बनवण्याची कृती म्हणजे 'ऑपरेशन राईस'ला सुरुवात करूया. ‘अष्टांगहृदय’ या ग्रंथात चांगल्या भाताचे गुणवर्णन पुढीलप्रकारे केले आहे.
सुधौत: प्रस्रुत: स्विन्नोऽत्यक्तोष्मा च ओदनो लघुः I
यश्चाग्नेय औषध क्वाथसाधितो भृष्टतण्डुल: II
सुधौत म्हणजे व्यवस्थित धवून घेतलेला, प्रस्रुत म्हणजे पेज काढून घेतलेला, पूर्ण शिजलेला आणि खाताना गरम असलेला भात पचायला हलका असतो. त्याचबरोबर पचनाला मदत करणाऱ्या औषधांनी सिद्ध केलेला आणि भाजून घेतलेल्या तांदळाचा भात पचायला हलका असतो. आता यातील प्रत्येक मुद्द्याचा विचार करू.
सुधौत – भात शिजवण्यापूर्वी तांदूळ दोन वेळा व्यवस्थित धुवून घेणे आवश्यक आहे. असा धुतलेला तांदूळ १५ ते २० मिनिट तसाच ठेवल्यास भात लवकर शिजतो.
प्रस्रुत, स्विन्न – याचा अर्थ पेज काढून घेतलेला आणि पूर्ण शिजलेला. आयुर्वेदातल्या ‘भावप्रकाश’ या ग्रंथात भात शिजवण्याची प्रक्रिया सविस्तर वर्णन केली आहे. कोणताही पदार्थ चांगला शिजण्याकरिता त्याला सर्व बाजूने समान उष्णता मिळणे आवश्यक असते. हे काम मातीच्या भांड्यात उत्तम प्रकारे होते. हल्ली चीनी मातीपासून बनवलेली भांडी मिळतात त्यामध्ये भात बनवल्यास ते सर्वात उत्तम. हे शक्य नसेल तर बुडाशी जाड असलेले पितळेचे पातेले वापरावे.
भात शिजवण्यासाठी प्रथम तांदळाच्या पाच पट पाणी घेऊन ते उकळू द्यावे. त्यानंतर अगोदर धुवून ठेवलेला तांदूळ त्यात घालावा. थोडा वेळ भात शिजू द्यावा. तांदळापासून भात करत असताना त्यातील स्टार्चमध्ये ‘जिलेटिनायझेशन’नावाची प्रक्रिया घडते आणि या जिलेटिनायझेशनमुळे भाताचा GI वाढतो. त्यामुळे भात जितका अधिक शिजेल तितका त्याचा GI जास्त. आयुर्वेदाने सांगितलेल्या पद्धतीत पाणी अगोदर उकळून घेतलेलं असल्याने भात लवकर शिजतो. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करून झाली की जास्तीचे पाणी म्हणजे पेज बाजूला काढून घ्यावी आणि भात झाकून ठेवावा. आत कोंडून राहिलेल्या वाफेमुळे भाताची शितं मोकळी होतात. बाजूला काढून ठेवलेली पेजेत जास्तीचे स्टार्च बाहेर पडून जाते. त्यामुळे भाताचा चिवटपणा कमी होतो म्हणजेच त्याचा GI कमी होतो. ही पेज घरातल्या लहान मुलांना द्यायला हरकत नाही. गेल्या २५ – ३० वर्षात आपण भात शिजवायला कुकर वापरायला लागलो त्यामुळे पेज वेगळे काढण्याची पद्धत बंद झाली आणि त्यामुळे डायबेटीसचे पेशंट वाढायला सुरुवात झाली. कुकरमध्ये भात लवकर शिजतो पण पचायला जड होतो.
भाताची कफ निर्माण करण्याची प्रवृत्ती कमी करण्याचा अजून एक उपाय आहे; तो म्हणजे पचनाला मदत करणाऱ्या औषधांसोबत भात शिजवणे. यासाठी मिरे, दालचिनी, हळद यासारख्या मसाल्याच्या पदार्थांचा वापर होतो. यातही भात खाऊन पोट जड होते त्यासाठी मिरे, छातीत कफ साठतो त्यांच्यासाठी दालचिनी आणि ज्यांच्या घरात डायबेटीसची हिस्ट्री आहे त्यांनी हळकुंड घालून भात करावा. दक्षिण भारतात अनेक राज्यात भात हेच दोन्ही वेळचा आहार असतो म्हणून तिथे इडलीतही मिरे घालण्याची प्रथा दिसते ती यामुळेच.
अशा पद्धतीने केलेला भात हा गरम असतानाच खाल्ला पाहिजे असे आयुर्वेद सांगतो.
जे लोक तांदूळ निवडताना आणि भात शिजवताना आयुर्वेदाचा ‘दहा कलमी’ कार्यक्रम पाळतील त्यांनी डायबेटीसला घाबरण्याची आजिबात गरज नाही. या 'तांदूळ आख्यान' ऐकूल्याने तणाव निवळून दोघेही मोकळे झाल्यासारखे वाटले.
मोकळी झालेली माणसं आणि मोकळा झालेला भात दोन्ही मला आवडतात आणि तुम्हाला ?
.
हे आयुर्वेदाच्या कुठल्या
हे आयुर्वेदाच्या कुठल्या पुस्तकात / संदर्भ ग्रंथात लिहिलंय ते कळू शकेल का?
भरतीच्यावेळी उघड्यावर बसलं
भरतीच्यावेळी उघड्यावर बसलं तरच त्याचा फायदा होतो. कारण चंद्राची किरणं महत्वाचा रोल प्ले करत असल्याने ती डायरेक्ट अंगावर घेतली की दुग्धशर्करा योग जुळून येतो त्यामुळे शेत किंवा मुंबईत असाल तर रेल्वे पटरी.
बोकलात,
बोकलात,
ओहोटीच्या वेळी "जायला" हवे. भरतीच्या वेळी जलतत्व खेचले जाते, मलतत्व नव्हे.
तेव्हा भरतीचा उपयोग प्रोस्टेट विकारासाठी. मालावरोधासाठी ओहोटीची वेळ गाठली पाहिजे.
यावर आयआयटी वाराणसी इथे रिसर्च सुरु आहे. पतंजली विद्यापीठाचे अनुदान त्याला प्राप्त आहे.
अजुन एक -
अजुन एक -
भरतीच्या वेळी आलेल्या प्रोडक्टपासून जो बायो गॅस बायप्रोडक्ट बनेल त्याच्या वापराने कुठलीही गाड़ी cng पेक्षा जास्त माइलेज देईल
स्लोगन -
मिले कुछ ज्यादा
है हमारा वादा
@ रोणी, चरक संहितेत आहे. थोडं
@ रोणी, चरक संहितेत आहे. थोडं सँस्कृत येत असेल तर समजेल. पुस्तक गुगल बुक्स वर उपलब्ध आहे, लिंक देतो, विकत मागावा हि विनंती. आपल्या वेदांना आपणच पैसे खर्चून वर आणले पाहिजे. नाही का?
मागे मी वाचलं होतं की सरकार
मागे मी वाचलं होतं की सरकार लवकरच नकली पटरी टाकणार आहे मुंबईत म्हणजे जीवाला धोका नाही राहणार आणि आनंदपण मिळेल.
लेखात लिहिलेल्या पद्धतीशिवाय
लेखात लिहिलेल्या पद्धतीशिवाय भाताचा जी आय इंडेक्स कमी करता येण्याची काही अजुन पद्धती आहेत का? व त्याचा उपयोग किती?
अमेरिकेच्या फॉरेनात
अमेरिकेच्या फॉरेनात कॉलिफ्लॉवर राईस मिळतो. त्याचा कमी असेल इंडेक्स.
पण सध्या ते वेदात लिहिणे चालू आहे, लिहुन झाले किंवा एखादी बादरायण साम्यवाली रुचा सापडली की व्हॉट्सअॅप वर जाहिर करतीलच.
केलंय ते. आवडलं नव्हतं.
केलंय ते. आवडलं नव्हतं. (बहुतेक मीच चांगले केले नसेल).
आरारा
आरारा
नाही येत संस्कृत! बट इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये असलं काही वरवरच्या गुगल सर्च मध्ये सापडलं नाही!
उलट मस्त मासभात (बिर्याणी पुलाव टाइप) ची रेसिपी सापडली!!
अमिताव, वरच्या लेखात दिलेली
बादरायण साम्यवाली रुचा
<<
अमितव, वरच्या लेखात दिलेली ऋचा मूळ साम्यवेदातली आहे हिचे कर्ता मार्क्ष कुलीन कारल ऋषी असावेत असा कयास आहे, कारण साम्यवेद त्यांनीच प्रसावला असा प्रवाद आहे..
वरवरच्या गुगल सर्च मध्ये
वरवरच्या गुगल सर्च मध्ये सापडलं नाही!
<<
खालखालचा सर्च करून पहा. धीर सोडू नका. यश आपलेच आहे.
सध्यातरी मासभात बनवेल!! दुधात
सध्यातरी मासभात बनवेल!! दुधात भात भिजवून झ्याकपैकी
त्या कारल ऋषींनी लिहिलेल्या
त्या कारल ऋषींनी लिहिलेल्या साम्यवेदाची कडू फळं मिळणार हे आपल्याकडे आधीच माहित होतं. म्हणूनच तर कडू फळभाजीला कारलं नाव पडलं.
असं चिंतन करत बसलं ना की आपल्या संस्कृती बद्दल एकदम भारी वाटू लागतं. सगळं कसं काय लिहून ठेवलं असेल नाही!
<आत कोंडून राहिलेल्या
<आत कोंडून राहिलेल्या वाफेमुळे भाताची शितं मोकळी होतात. बाजूला काढून ठेवलेली पेजेत जास्तीचे स्टार्च बाहेर पडून जाते. त्यामुळे भाताचा चिवटपणा कमी होतो म्हणजेच त्याचा GI कमी होतो.>
यात गडबड आहे. जास्तीचा स्टार्च म्हणजे काय? Gelatinizationच्या विरुद्ध क्रिया म्हणजे retrogradation. स्टार्च थंड होताना amylose आणि amylopectin पुन्हा आपल्या मूळ रूपात येऊ लागतात. जितका अधिक वेळ स्टार्च थंड होईल, तितका GI कमी होईल.
सगळा लेख वाचला नाही, पण 'डायबेटिस'बद्दल चुकीच्या कल्पना आहेत, हे जाणवलं. उदा., जीआय आणि 'डायबेटिस' यांचा संबंध.
दक्षिणेत इडलीत मिरी घालतात ही नवी माहिती मिळाली.
>>जितका अधिक वेळ स्टार्च थंड
>>जितका अधिक वेळ स्टार्च थंड होईल, तितका GI कमी होईल.
म्हणजे ह्या क्लेममध्ये पण गडबड आहे "भात हा गरम असतानाच खाल्ला पाहिजे"
भले गरम असताना खाल्ला तरी
भले गरम असताना खाल्ला तरी पोटात गेल्यावर गपगार झाला की?
भारतीय दुकानात मधुमेहींसाठी
भारतीय दुकानात मधुमेहींसाठी म्हणुन जीआय कमी असलेला तांदुळ सर्रास मिळतो. ते काय आहे? चुकीचे आहे का? (अजुन वापरला नाही, खरंतर भातच खात नाही. पण कधीतरी खुपच इच्छा होते. मी अजुनतरी मधुमेही नाही. पण काळजी घेणे चालुये).
नुसतीच नावे ठेऊ नका किंवा कुजकट बोलु नका रे. उपयोगी असे काही माहीत असेल याबद्दल तर लिहा की. याला काय अर्थ आहे?
एका द्रव्याचा जी आय किती,
एका द्रव्याचा जी आय किती, याची आकडेवारी काढून बीपी वाढवून घेण्यापेक्षा आहारात सॅलड वाढवावे, म्हणजे पूर्ण ताटाचा जी आय कमी होतो.
आपले जेवण हे गठबंधन सरकार असते
कांचीपुरम इडलीत जिरंमिरं आणि
कांचीपुरम इडलीत जिरंमिरं आणि सुंठ घालतात.
<< एका द्रव्याचा जी आय किती,
<< एका द्रव्याचा जी आय किती, याची आकडेवारी काढून बीपी वाढवून घेण्यापेक्षा आहारात सॅलड वाढवावे, म्हणजे पूर्ण ताटाचा जी आय कमी होतो >>
-------- ब्लॅककॅट तुम्हाला आयुर्वेदिक सॅलड असे म्हणायचे आहे का ?
जिरं मिरं, सुंठ पाचकता
जिरं मिरं, सुंठ पाचकता वाढवतात.
भारतातील जून्या चालीरीती या कशा अव्वल आहेत हे सांगण्यासाठी पाश्र्चात्य विज्ञान संशोधनातील निष्कर्षांचा आधार घेतल्याशिवाय लोकांचं पोट भरत नाही.
आज भरती किती वाजता आहे?
आज भरती किती वाजता आहे?
शास्त्र काही माहीत नाही पण
शास्त्र काही माहीत नाही पण पाणी काढून टाकलेला भात पचायला सोपा असतो, गॅस होतं नाही. आपल्याला कुकरमध्ये केलेल्या भाताची सवय असते त्यामुळे बाहेर शिजवून पाणी काढलेला भात बेचव लागतो. सतत खात राहिलं तर सवय होते.
भात शिजवताना काही वैदिक,
भात शिजवताना काही वैदिक, पौराणिक मंत्र, अन्नपुर्णा मातेचे स्तोत्रं वगैरे म्हणावेत काय.? सात्त्विक भात तयार होईल. खाणाराला विकार सतावणार नाहीत असे काही संशोधन झाले आहे का?
पुढील लेख आता भरती ओहोटीवर
पुढील लेख आता भरती ओहोटीवर आधारित व्यंधत्वावर शास्त्रीय / खात्रीशीर / वैदिक उपचार असे काही असेल का ?

:उगीच तर्क लढवणारी बाहुली:
बरोबर पुसंवन, गर्भादान की काय
बरोबर पुसंवन, गर्भादान की काय सारखे विधी विचार/ संशोधन करून परंपरेत आले असतील मुहूर्त पाहताना भरती ओहोटी पाहून ठरवत असतील.
संत श्री आसाराम बापु यांनी
संत श्री आसाराम बापु यांनी त्यांच्या एका पुस्तकात पौर्णिमेला पती-पत्नींनी शरीरसंबंध ठेवल्यास हमखास अपत्यप्राप्ती होईल असे म्हटले आहे.
बबोउ, भलतीच गम्मत आहे इकडे,
बबोउ, भलतीच गम्मत आहे इकडे,
अरे कोणीतरी विषयाला धरून बोला रे...
आयूर्वेदीक भात खाल्ला तर
आयूर्वेदीक भात खाल्ला तर बुध्दी तल्लख होते.
Pages