तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आशुचॅम्प आणि ऋन्मेष यांना एकत्र भेटायला आवडेल...
नवीन Submitted by च्रप्स on 4 August, 2020 - 17:10
>>>>>

एकतर तुम्ही मद्यप्राशन करू नका
किंवा केल्यास मला पोटभर चिकन फिश चखण्याची सोय करा..
मग मी कुठेही केव्हाही कसेही... अंगावरचे वस्त्र न बदलता हजर होईन

अंगावरचे वस्त्र न बदलता हजर होईन>>>>>

तुमचे तुम्हीच करा मग पार्टी, हे काहीतरी विचित्र सुरु आहे Happy

बाकीच्यांना भेटू शकतो

अंगावरचे वस्त्र न बदलता हजर होईन>>>>>
तुमचे तुम्हीच करा मग पार्टी, हे काहीतरी विचित्र सुरु आहे Happy>>> पार्टीला जाण्याआधीच दोन चार पेग मारून जा..मग नाही फरक पडायचा

अंगावरचे वस्त्र न बदलता हजर होईन>>
वा भाऊ! ऑरकुट वरच्या मुलीला भेटायला जातांना नट्टापट्टा आणि माबोकरांना भेटतांना कसही. मानलं तुम्हाला. Happy

माझा कोटा लिमिटेड आहे हो, दोन पेग नंतर गाडी चालवत नाही
तिसऱ्यानंतर मग मी झोपतोच पार
>>> माझाही... तीन नव्वद चे मारले की झोपतो...

वा भाऊ! ऑरकुट वरच्या मुलीला भेटायला जातांना नट्टापट्टा
>>>>>
ती गुज्जू पोरगी होती ओ..
मराठमोळ्या मध्यमवर्गीय सरळसाध्या मायबोलीकरांना भेटायला कश्याला अंगावर फुसफुस मारून येऊ..

सांगायचा हेतू असा की नट्टापट्टा करण्यात फारसा वेळ न दवडता येईल. आहे तसेच येणे अवघड आहे कारण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरात उघडेच फिरायची सवय झालीय. शेवटची बनियान मार्च महिन्यातच घातली होती. चला तुम्हाला भेटायला खास ती घालून येईन. मग तर झालं !

धागा काढून १ वर्ष २ महिने अधिक काही दिवस झाले. या धाग्यामुळे कोण कोण मायबोलीकर एकमेकांना भेटले?

किल्ली आणि मी भेटलो, कारण आम्हांला खरंच भेटावेसे वाटले. Happy
बाकीचे अजून ठरवतच आहेत, त्यात हे अवांतर! चालू द्या

हेच हवं होतं. पण धागा त्यांनीच काढलाय. धागा न काढताही भेटता येतं .

आशुचँपसाठी -"आमच्यकडे मला बायकोचे कपडे घालून घरात फिरायची सवय आहे. कारण मुलीला माझे तसे रुप आवडते. नाचायचा मूड झाला की आमचा हाच पोशाख असतो. आणि खोटे का बोला, नाचून झाल्यावरही घरात बराच वेळ मी नकळत त्याच कपड्यात वावरतो कारण ते कम्फर्टेबल वाटते. हल्ली तर लॉकडाऊनने वाढलेल्या केसांमुळे जोडीला हेअरबॅंडही असतो त्यामुळे तर आणखी कमाल दिसते Happy "

पैचान कौन?

पैचान कौन?
>>>>

रणवीर सिंग किंवा ऋन्मेष ?

या धाग्यामुळे कोण कोण मायबोलीकर एकमेकांना भेटले
>>>>

भेटणे हा धाग्याचा एकमेव उद्देश नाहीये
आपल्याला कोणाला भेटायला आवडेल हे सांगणे आणि ऐकणे यातून मनाला एक आनंद मिळतो Happy

धाग्यात ईतकी छान चर्चा आणि गप्पाटप्पा सुरू आहे. कसलेही राजकीय वाद आणि वैयक्तिक चिखलफेक न होता हि सुद्धा या धाग्याची जमेची बाजू आहे. अश्या गप्पा देखील मला वा कित्येकांना आनंद देतात Happy

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल

हेडरमधून

भेटणे हा धाग्याचा एकमेव उद्देश नाहीये

एकमेव Happy

माझ्या पोस्टमधील शब्दाचा अर्थ तुम्हालही माहीत आहेच

आणि सिरीअसली एक वैयक्तिक मत
जर कोणाला माबोवरची खेळीमेळीची चर्चा आवडत नसेल, आणि राजकीय चिखलफेक, वैयक्तिक टिका टोमणे, यातच मजा येत असेल तर अश्यांनी भेटण्यातही काय मजा आहे Sad

आधी माबोवर चांगला बॉन्ड डेव्हलप करावे मग भेटावे. उगाच भेटून ऑकवर्ड व्हायचे यालाही अर्थ नाही.

रच्याकाने:

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.>>>
हा धागा कोणता?

मुख्य उद्देश साध्य झाला का ते बघायचंय.
>>>>

धाग्याचे अनेक उद्देश आहेत
त्यातला कोणाला काय मुख्य हे ज्याचे त्याने ठरवावे.
माझ्यासाठी मुख्य जे माझ्या पोस्टमध्ये लिहिले आहे ते.

रच्याकाने:
म्हणजे?

भरत तुम्हाला अर्थ माहीत आहे का याचा? Happy

Pages