Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27
पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.
ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
महागाई कमी झाली.
महागाई कमी झाली.
काय स्वस्त झाले ? घर , दूध की शाळेची फी ?
महागाई कमी झाली. >>
महागाई कमी झाली. >>
Blackcat कृपया बुद्धीचा वापर करावा... महागाई कमी होणे आणि किमती कमी होणे या दोन गोष्टींत फरक आहे. महागाई कमी होणे म्हणजे वस्तूंच्या किमती स्थिर राहणे किंवा किमतीतील वाढीचा वेग मंदावणे.
मार्मिक, पूर्ण बातम्या वाचा.
मार्मिक, पूर्ण बातम्या वाचा. 2000 ची नोट phased manner ने रिजर्व बँक काढून घेत आहे.
Nmate नोटा बंदी का करावी
Nmate नोटा बंदी का करावी लागली? यशस्वी झाली की अयशस्वी झाली ? ह्यावर अगोदर बरीच चर्चा होऊन गेली आहे. अधिक मूल्याच्या नोटांमुळे काळा पैसा बाळगणे सोपे होते त्यामुळे नोटाबंदित १००० ची नोट बाद केली गेली,आणि तात्पुरत्या सोईसाठी २००० ची नोट आणली गेली. सरकार म्हणतेय सगळा काळा पैसा बँकेत जमा झाला, आता चोर सापडणे सोपे झाले. ठीक आहे, इतके सगळे आलबेल असताना नोटा बंदी नंतर money in circulation चे प्रमाण का वाढले? इथे नोटा बंदी समर्थक २००० च्या नोटा हळूहळू चलनातून काढून घेणार आहे असं बिनधास्त ठोकून देत आहे. तशी अधिकृत घोषणा सरकारने केलेली माझ्या माहितीत नाही. नोटा बंदी यशस्वी झाली असे मानल्यास आता २००० च्या नोटे चे काय काम आहे ? हा माझा साधा प्रश्न आहे? जमेल का उत्तर द्यायला?
सरप्लस कॅश , इन्फ्लेशन, शे.मार्केट ई. मुद्यांकडे येऊच आपण. काठिण्य पातळी वाढत जाणार आहे,तयारीत रहा.
वस्तूंच्या किमती स्थिर राहणे
वस्तूंच्या किमती स्थिर राहणे किंवा किमतीतील वाढीचा वेग मंदावणे.
काशाबाबत झाले हे ?
आमदारांचा पगार 50 ह वरून दीड लाख झाला, स्वतः आमदार 200 % महाग झाले , अन मग बाकी सुया टाचण्या अन शेंगदाणे सिमेंट स्वस्त कसे राहील ?

<<< महागाई कमी होणे म्हणजे
<<< महागाई कमी होणे म्हणजे वस्तूंच्या किमती स्थिर राहणे किंवा किमतीतील वाढीचा वेग मंदावणे. >>
------ छान विचार...
<< 2000 ची नोट phased manner ने रिजर्व बँक काढून घेत आहे. >>
------ म्हणजे आली लहर असा प्रकार नाही होणार तर....
किंवा दोन हजाराची आणि पाचशेची नोट बंद करुन हजार आणि पाच हजाराच्या नव्या नोटा बाजारात आणतील. मागच्या अनुभवातुन काही शहाणपण शिकले असतील तर सर्वात आधी ATM मशीनच्या चाचण्या घेतील.
<< आमदारांचा पगार 50 ह वरून
<< आमदारांचा पगार 50 ह वरून दीड लाख झाला, स्वतः आमदार 200 % महाग झाले , अन मग बाकी सुया टाचण्या अन शेंगदाणे सिमेंट स्वस्त कसे राहील ? >>
------- ब्लॅक कॅट...
५० हजारावरुन दोन लाख व्हायला हवे होते... झाले किती तर केवळ दीड लाख... म्हणजे वाढीचा वेग मंद झाला... असे लॉजिक वाचायची तयारी ठेवा.
काश्मीरसाठी भाजपाने पूर्ण
काश्मीरसाठी भाजपाने पूर्ण हिरव्या रंगात जाहिरात छापल्या आहेत, ते 370 की काय , त्याचा उल्लेखच नाही म्हणे
महागाई कमी होणे म्हणजे
महागाई कमी होणे म्हणजे वस्तूंच्या किमती स्थिर राहणे किंवा किमतीतील वाढीचा वेग मंदावणे.
>>
कॅशलेस म्हणजे लेस कॅश बरं का.
<< आमदारांचा पगार 50 ह वरून
<< आमदारांचा पगार 50 ह वरून दीड लाख झाला, स्वतः आमदार 200 % महाग झाले , अन मग बाकी सुया टाचण्या अन शेंगदाणे सिमेंट स्वस्त कसे राहील ? >>
------- ब्लॅक कॅट...
५० हजारावरुन दोन लाख व्हायला हवे होते... झाले किती तर केवळ दीड लाख... म्हणजे वाढीचा वेग मंद झाला... असे लॉजिक वाचायची तयारी ठेवा. <>>>
बरं झालं उदय भाऊ तुम्हीच लिहिलं ते, तसे लिहिण्याचा मूर्खपणा निदान मी तरी कधीच करणार नाही.
इंदिरा गांधींची गाडी किरण
इंदिरा गांधींची गाडी किरण बेदीच्या ऑफिसरने रॉनग पार्किंग म्हणून ओढून नेली होती , त्यांचे कौतुक झाले होते.
मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली तर पोलीस अधिकारी सस्पेंड झाला.
मेरा हाथ सबसे मजबूत.
देश चाहे सुरक्षित हात
हेलिकॉप्टरची तपासणी केली तर
हेलिकॉप्टरची तपासणी केली तर पोलीस अधिकारी सस्पेंड झाला.>>
त्याचे विशिष्ट नाव देखील विशिष्ट कारण असू शकेल काय
नावाचा संबंध नसेल कदाचित.
नावाचा संबंध नसेल कदाचित. तिथं दुसरं कोणीही असतं तरीही सस्पेंड झालं असतं
खरं आहे, पाताळयंत्री माणसे
खरं आहे, पाताळयंत्री माणसे आहेत ही , गुन्हे दाबण्यासाठी ह्यांना जाती धर्म आड येत नाही, त्या बाबतीत ये सेक्युलर आहेत.
मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी
मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली तर पोलीस अधिकारी सस्पेंड झाला. >>>
ते प्रोटोकॉल तोडले वगैरे कारणे बाजूला ठेवू. त्या अधिकाऱ्याने बरीच वर्षे प्रोटोकॉलचे पुस्तक वाचले नसावे असे समजू.
मग त्या तपासणीत काय सापडलं बरं?
Black Box
Black Box
[https://www.loksatta.com
[https://www.loksatta.com/elections-news/watch-video-sadhvi-pragya-contro...
Shared by Loksatta android app
click here to download
https://www.loksatta.com/]
ही बातमी वाचा आणि तुमचा तुम्ही निष्कर्ष काढा!!
घृणास्पद प्रकार चाललेत देशात.
विनीता करकरे या जगात नाहीत हे खरंच बरंय, किती वाईट वाटलं असतं त्यांना!
असाच एखादा श्राप पाकिस्तानला
असाच एखादा श्राप पाकिस्तानला द्याना, वाटटोळे करून टाका पाकीस्नानचे .
ही बातमी वाचा आणि तुमचा
ही बातमी वाचा आणि तुमचा तुम्ही निष्कर्ष काढा!!
घृणास्पद प्रकार चाललेत देशात.
विनीता करकरे या जगात नाहीत हे खरंच बरंय, किती वाईट वाटलं असतं त्यांना! >>>
तिने केलेले वक्तव्य तुम्हाला नक्की का घृणास्पद वाटले?
काश्मीरसाठी भाजपाने पूर्ण
काश्मीरसाठी भाजपाने पूर्ण हिरव्या रंगात जाहिरात छापल्या आहेत, ते 370 की काय , त्याचा उल्लेखच नाही म्हणे >>>
३७० कलम लोकसभा व राज्यसभेत रद्द झाले तर काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासाठी काश्मीर विधानसभेत ठराव मांडण्याची व तो पास करण्याची औपचारिकता बाकी राहील. त्याऐवजी ३५ अ रद्द करून काश्मिरींची आर्थीक नाकेबंदी केली तर त्यांना कलम ३७० रद्द करण्याचा ठराव विधानसभेत मांडावा लागेल. त्यामुळेच ३५ अ रद्द करण्याच्या आश्वासनाचा भाजपाने जाहीरनाम्यात समावेश केलाय.
इतके सगळे आलबेल असताना नोटा
इतके सगळे आलबेल असताना नोटा बंदी नंतर money in circulation चे प्रमाण का वाढले? इथे नोटा बंदी समर्थक २००० च्या नोटा हळूहळू चलनातून काढून घेणार आहे असं बिनधास्त ठोकून देत आहे. >>>
मार्मिक, तुमच्या प्रश्नांची उत्तरे RBI च्या वेबसाईट वर तुम्ही स्वतःच का शोधत नाही? तिथे सगळे रिपोर्ट्स ठेवलेले आहेत.
मी त्या रिपोर्ट्सच्या जोरावरच वरील गोष्ट सांगितली, तुम्ही (स्वतः अभ्यास न करता) त्या वस्तुस्थितीला थाप म्हणताय. असो , तुम्हाला शिकवायची मला काही इच्छा नाही आणि तेव्हढा वेळही नाही.
जमलं तर RBI चे रिपोर्ट्स वाचा नि २००० च्या नोटेबद्धल माहिती मिळवा..
ShashankP भाऊ , तुम्ही दिलेली
ShashankP भाऊ , तुम्ही दिलेली लिंक हि बिजीनेस टुडे ची आहे , ज्यात २००० च्या नोटा हळूहळू चलनातून काढून टाकले जाणार असे आरबीआय कडून अधिकृतपणे जाहीर झालेले नाही असा स्पष्ट उल्लेख आहे . आणि आरबीआयच्या अधिकृत संकेत स्थळावरही अशी माहिती नाही . तुमच्या आयटी सेललाही मी कामाला लावले आहे . त्यांनीही अद्याप उत्तर दिले नाही .
<< तुम्ही दिलेली लिंक हि
<< तुम्ही दिलेली लिंक हि बिजीनेस टुडे ची आहे , ज्यात २००० च्या नोटा हळूहळू चलनातून काढून टाकले जाणार असे आरबीआय कडून अधिकृतपणे जाहीर झालेले नाही असा स्पष्ट उल्लेख आहे . आणि आरबीआयच्या अधिकृत संकेत स्थळावरही अशी माहिती नाही . तुमच्या आयटी सेललाही मी कामाला लावले आहे . त्यांनीही अद्याप उत्तर दिले नाही . >>
------ म्हणजे हे न वाचताच कट अँड पेस्ट करत आहेत का ?
RBI ला आदेश देण्याअगोदर यांना माहिती असेल.
तो व्हिडीओ धक्कादायक आहे. १:९० नंतर पुढे शिक्षा केली... म्हणजे कसाबला उच्च स्थान दिले आहे. कसाब हा देव होता, त्याने शिक्षा केली.
दु:खाची बाब म्हणजे हत्या झाल्या नंतरच्या वाक्याला टाळ्या मिळत आहेत.... विनाशकाले विपरीत बुद्धी.
हेमंत करकरे, विलास सालसकर,
हेमंत करकरे, विजय सालसकर, अशोक कामटे देशाचे हिरो होते.... आणि रहातिल.
देशाच्या शहिदांबद्दल असे उद्गार काढले जात असतील, आणि त्याला टाळ्या मिळणार असतील तर हल्ला कुणी केला याची पुन्हा चौकशी व्हायला हवी.
विजय की विलास ?
विजय की विलास ?
Thanks black cat
Thanks black cat
हेमंत करकरे, विजय सालसकर,
हेमंत करकरे, विजय सालसकर, अशोक कामटे देशाचे हिरो होते.... आणि रहातिल. >>
नक्कीच ,
पण तिने करकरेंचे नाव घेतले, तुम्ही कामटे व साळस्करांना कशाला मध्ये आणताय?
अफजल गुरूला समर्थन करणाऱ्यांना किंवा देशाच्या पंतप्रधानांना कुठल्याही पुराव्याशिवाय चोर म्हणणाऱ्यांना जेव्हढं अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे तेव्हढंच त्या साध्वीलाहि आहे. तिने तिचा राग व्यक्त केलाय आणि भाजपने तिच्या मतांपासून ते वैयक्तिक मत असल्याचे म्हणून हात झटकलेत.
आता या तिघांची नावे एकत्र आलीत त्यामुळे मला बऱ्याच वर्षांपासून पडलेला प्रश्न पुन्हा सतावू लागलाय. अजूनही उत्तर मिळालेले नाही.
काँग्रेस सरकारातील वा त्यांच्या हाताखालील प्रशासनातील कुठल्या व्यक्तीने हेमंत करकरे, विजय साळसकर व अशोक कामटे या तिघांना एकत्र आणि तेही चिलखत न नेसता मोहिमेवर जाण्यास सांगितले? आणि का? याच उत्तर कुणाकडे आहे का? कृपया भाजपने याची चौकशी का केली नाही वगैरे प्रश्न विचारू नका, कारण याबाबतीत खटला सुरु होता.
------ म्हणजे हे न वाचताच कट
------ म्हणजे हे न वाचताच कट अँड पेस्ट करत आहेत का ?
RBI ला आदेश देण्याअगोदर यांना माहिती असेल. >>>
याचं उत्तर मी देतो. मी पूर्ण वाचूनच लिहितोय. मी बिझिनेस टुडे च्या बातमीसह rbi चे रिपोर्टसदेखील पाहिलेत, तेव्हाच ते लिहिलं.
तुम्हीही स्वतः रिसर्च करा.
<< आर बी आय कडे सरप्लेस केश
<< आर बी आय कडे सरप्लेस केश आली. >>
------ मुक्ताफळे एकण्याची तयारी ठेवा "सरप्लस कॅश म्हणजे अपेक्षित कॅश पेक्षा जास्त कॅश जमा झाली असा अर्थ होतो "
अपेक्षित कॅश = ?
अशाच अर्थाचे लॉजिक परवा येथेच वाचायला मिळाले... लॉजिक ने चर्चा करता येतच नाही. इकडले तिकडले ढापायचे. न वाचताच कट- पेस्ट होतात.... ते तोरसेकर थांबले मग हे पण थांबतात... स्वत: चे विचार नसतील तर प्रश्न विचारल्यावर उत्तरे देताना सगळीकडे त त प प होते आहे...
चार वाक्य लिहीता येत नाही. मग राफूल राफूल भूंकायचे.... समोरच्याला मुर्ख, निर्बुद्ध अशी हेटाळणी करत चर्चेमधे खोडा आणायचा. त्याच भाषेत उत्तरे मिळायला लागलीच तर पळ काढतात मग अधुन मधुन १-२ ब्रेन आहेत ते मदतीला धावतात.... पण शेवटी धाव कुंपणापर्यंतच...
खोट्या आकडेवारी शिवाय हे काहीच विकास दाखवू शकत नाही.... नसेल झाला विकास तर दाखवणार काय ? हरकत नाही... खोटे बोलण्यापेक्षा अपेक्षित विकास नाही साधता आला हे उत्तर कधीही चांगले.
पुलवामाची चौकशी होत नाही तर हल्ला जैश ने केला ? कशाच्या आधारावर ? नसलेला कणखरपणा दाखवाण्याचा अट्टाहास कशासाठी? तुमच्या सत्ता स्वार्थासाठी देशाला युद्धाच्या उंबरठ्यावर कशाला ढकलत आहात? युद्धामधे कुणाचाही फायदा होत नाही. होते ते केवळ नुकसानच...
या सरकारच्या गणिता मधे अभिनव लवकर परत यावा हे अपेक्षित नव्हते. तो आला नसता तर यथेच्छ वातावरण तापवता आले असते... पण मुत्सद्दी इम्रान यांनी यॉर्कर टाकला.
१:४० नंतर सुरेख यॉर्कर. पट्टीच्या खेळणार्याला अगदी कळाले पण नाही. लाजबाब !
https://www.youtube.com/watch?v=PKXQl3AGIaQ
नवी दिल्ली :
नवी दिल्ली :
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने वादाला तोंड फुटले असताना पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'टाइम्स नाऊ'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीचे स्पष्ट शब्दांत समर्थन केले आहे. साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जो वाद निर्माण केला जात आहे, तो काँग्रेसला महागात पडेल, असा इशाराच पंतप्रधान मोदी यांनी मुलाखतीतून दिला.
Pages