पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मित्रां ना मदत
स र्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जाऊन अदानी पॉवरला दर वाढवायला परवानगी दिली.
. पॉवर से झ साठीचे नियम शिथील झाले आणि अदानी ग्रुपच्या प्रकल्पाला परवानगी मिळाली.

दुर्घटना म्हणजे वाईट घटना येवढाच अर्थ होतो, त्यात अपघात कुठं म्हणलेत डीग्गीराजा? हिंदी न समजले की असं होत.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/80-bombs-hit-target-iaf-gives-...

सरकारने आता पुरावे सादर करावेच. बाकी सोशल मिडीयावर जो दोन्ही बाजूने धुमाकूळ चालू आहे, तो मजेशीर आहे. सरकारकडील लोक आणी विरोधी पक्षाकडील लोक जाम विनोद करत असतात. विनोदाचे महामेरु बहुजंनाचे हास्यात्कारु भाजपा आणी कॉन्ग्रेस दोघां कडे आहेत. किंबहुना आपल्या देशवासीयांचा ह्युमर सेन्स वाढत चाल्लाय.

आत्ता ज्यांनी पुरावे मागितलेत ते देशद्रोही आहेत. सैन्य बॉर्डरवर लढत असताना तुम्ही पुरावे मागता ? तुमच्या घरातले कुणी कधी सैन्यात गेले होते का ? तुमच्या खानदानात कुणी बॅट हातात धरली होती का ?
तुमच्या खानदानात कुणी कष्टाने एव्हढ्या मोठ्या पदाला पोहोचले होते का ?

हे बघा, राफेल प्रकरणी सरकारने न्यायालयात सांगितलंय की कागदपत्रांचा स्रोत महत्त्वाचा असतो. हाच नियम आपण माहितीलाही लावूया. गोपनीय सूत्रांक डून मिळालेल्या माहितीवर अजिबात विश्वास ठेवायला नको. सरकारला अधिकृतरीत्या काय ते सांगू दे. लीक झालेल्या कागदपत्रांबद्दल एकीकडे अ‍ॅक्शन घेणार म्हणतात आणि बाला कोटप्रकरणी स्वतःच सोयीची माहिती लीक करतात.

मित्रों
राफेल के बारे मे विरोधी ठगबंधन पाकिस्तान के साथ अपप्रचार कर रहे है | हम सच्चे है इसका सबूत चाहीये क्या ? मै तो फकीर आदमी हूं | झोला उठा के चल दिया | एक बूढी मां और एक पाच सौ स्क्वेअर फूट का झोपडा है | मुझे क्या मिलेगा ?
मुझे पता है की आपको भी पूरा यकीन है की यह सरकार सच्ची है | इसके इरादे नेक है | इसीलिये तो हमारी वायूसेना के लिए हमने राफेल हवाई जहाज खरीदे |
अब विरोधी दल पाकिस्तान के साथ मिलकर घिनौनी चाल चल रहा है |

हमारी सच्चाई का सबूत, वो राफेल की फाईल, वही किसीने चुरा ली है | मुझे यकीन है की ये काम पाकिस्तान का है | क्युं की पाकिस्तान हमसे डरता है | वो नही चाहता की मोदी दुबारा भारत का वजीर ए आझम बने |
और इस देश मे कुछ लोग बिल्कुल पाकिस्तान की तरह सोच रखते है ... वो सोचते है की मोदी फिरसे आग गया तो ?
तो हमारी खैर नही !

इसीलिए मित्रों,
इन लोगोंने साजिश करके फाईल गायब कर दी है | लेकीन मै आपको यकीन दिलाता हू की अगर आपने मुझे फिरसे मौका दिया तो मै वह फाईल पाताल मे से भी ढूंढके लाऊंगा | घर मे घुसके लाऊंगा | और जो भी इस चोरी के लिए जिम्मेदार है उनको सजा दिलवाउंगा | किसी क्प भी नही छोडूंगा | ये मोदी है | चोर उचक्कों की सरकार नही है | मजाक लगा के रख्खा है क्या ?

जे शहीद झाले त्यांच्या पत्नीला ( कुटुंबीयांना पण ) पुरावे मागण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणी योग्य त्या व्यक्तीकडे त्यांनी तो मागावा, त्यांच्या पाठिशी लोक उभे राहतीलच. कारण त्यांनी देशाकरता जे केले आहे, त्याची भरपाई करावी तितकी कमीच आहे.

जर पेपर मध्ये हवाई दल प्रमुख भरोस देत आहेत, तर त्यांनी ते पुरावे लोकांसमोर आणावेतच. काय माहीत इंडिया टुडे वाले कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात?

रश्मी मॅडम
शहीद मांडवगण यांच्या पत्नीला देशद्रोही ठरवले गेलेले आहे.

अहो मुर्ख असतात असे लोक. हे नुसते सोशल मिडीयावर हंगामा करुन स्वतःच्या देशभक्तीचे गोडवे गात असतात. प्रत्यक्षात घराजवळ बिबट्या आला आहे हे कळले तरी घर कायमचे बंद करुन बसतील. अशांना किंमत द्यायची नसतेच, मग ते प्रत्यक्ष सरकारी मंत्री संत्री का असेनात. जो त्या परीस्थितीतुन जातोय त्यालाच ते दु:ख कळणार.

तो बॉर्डर पिक्चर आला तेव्हा सारे लोक असेच देशभक्तीने झपाटले होते, काही दिवसांनी विसरतात. पुलावामा घटना जर झाली नसती तर लोक आज उरीला पण विसरले असते.

पुलवामा दुर्घटना टाळता येण्यासारखी होती. परंतु ती टळली असती तर मग सरकारला पुढची प्रसिद्धी कॅश करता आली नसती.

शिवाय भारतिय नागरीकांची मेमरी अगदी अलगद्पणे पुसुन त्याजागी नवीन डेटा एंट्री करता येते हे सरकारला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे आपले ४४+७ जवान मारले गेले हे सोयिस्कर विसरुन १२ फायटर विमानांनी जसे काय पाकिस्तान उध्वस्त झाल्याच्या अविर्भावात सगळीकडे आनंदोत्सव सुरु आहे.

अशा मूर्खांची इंडस्ट्री अत्यंत गंभीरतेने चालवली जाते. गोरक्षेच्या नावाखाली फटके , हत्या. त्याच्याकडे ही दुर्लक्षच करायचे आणि काय !

अशा मूर्खांची इंडस्ट्री अत्यंत गंभीरतेने चालवली जाते. गोरक्षेच्या नावाखाली फटके , हत्या.>>>> ११११ Rofl

राफेलची कागदपत्रे हरवली ही बातमी एक आज्जी देशभक्तांना ( मूर्ख हा शब्द मी नाही वापरलेला, प्लीज नोट) सांगताना..
54372034_1974247536018173_6630677078293348352_n.jpg

'राफेल असते तर' ची कुरकुर करणारे आपल्याकडे असलेले 249 सुखोई फायटर जेट्स विसरलेत वाटतं... त्यांची क्षमता राफेल पेक्षा बरीच उत्तम आहे. राफेल खरेच गरजेचे होते का हा प्रश्न विचारला पाहिजे, काँग्रेस आणि भाजप दोघांनाही..

सुखोई तांत्रिक दृष्ट्या उत्तम आहे. पण वजन आणि बल या रेशोमधे राफेल सरस आहे. सुखोईचा भारतीय अवतार ( एच ए एल ) हा मूळ सुखोई ३० पेक्षा खूपच सुपिरीयर आहे. त्यावरचं रडार अत्याधुनिक आहे. भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र त्यावरून डागता येतात. मात्र राफेल वर इलेक्ट्रॉनिक रडार आहे. ज्याचा वापर कसाही आणि वेगाने करता येतो.

मात्र एका रफाल च्या किंमतीत दोन सुखोई येतात.

रॉयटर या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेने दावा केला आहे की हवाई हल्ल्यामधे जैश ए महंमद चा तळ उद्ध्वस्त झालेला नाही. यासाठी त्यांनी सॅटेलाईट इमेजेसचा आधार घेतलेला आहे. आधीच्या इमेजेस आणि हवाई हल्ल्याच्या नंतरच्या इमेजेस यांची तुलना केल्यावर तळ जसा आहे तसाच दिसला. छताला छिद्र पडल्याचेही दिसलेले नाही. संपूर्ण रिपोर्ट झालील लिंक वर.

https://in.reuters.com/article/uk-india-kashmir-pakistan-airstrike-insi/...

दरम्याने आसाम भाजपने पोस्ट केलेला आणि वुई सपोर्ट योगी आदित्यनाथ आणि मोदी या पेजेसने शेअर केलेला एअर स्ट्राईकचा व्हिडीओ खोटा असल्याचे बीबीसीच्या फॅक्ट चेक मधे आढळून आलेले आहे. या व्हिडीओत जैश ए महंमद च्या अड्ढ्यात मिसाईल डागले जाते आणि क्षणार्धात तळ उद्ध्वस्त होताना दिसतो.

प्रत्यक्षात हा व्हिडीओ एका व्हिडीओ गेम मधील आहे. २०१५ साली एका मुलाने त्यातला काही भाग युट्यूबवर अपलोड केला होता.

एअर स्ट्राईक च पुरावा पाहिजे बोलणाऱ्यांनी जरा आपल्या लष्करावर विश्वास ठेवा ..
https://www.indiatoday.in/india/story/indian-air-force-balakot-airstrike...
नाही तर स्वतः जाऊन खात्री करा, कारण पाकिस्तान चा खोटारडे पण कधीच उघड पडला आहे जेंव्हा ते म्हणाले कि आम्ही मीडिया ला तिथे नेऊन दाखवतो पण अजून तिथले एकहि विडिओ फुटेज आले नाही आहे . अगदी कपिल सिब्बल ह्यांनी जी लिस्ट दिली आहे त्यांनी सुद्धा फुटेज दाखवले नाही .
इथे काही जण म्हणत आहेत कि राफेल का घेतले जर आपल्याकडे सुखोई आहे तर, त्यांनी थोडा अभ्यास करावा कि हि दोन्ही विमाने वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जातात आणि आपल्या काँग्रेस च्या पार्टी वर विश्वास ठेवावा, कारण सुखोई असताना हि राफेल ची डील मनासारखी झाली नाही म्हणून डील केली नाही. ज्या प्रमाणे त्यांना ऑगस्टा वेस्टलँड मध्ये मिळाली होती , जर सुखोई होते तर मग राफेल च्या डील ची गरजच काय होती .

काही जण तर काँग्रेस प्रेमात हे बोलून गेले कि २६/११ ला सुद्धा सैन्य कारवाई केली होती, हो का मग त्याचे पुरावे द्या मग जनतेला निदान बातमी तरी दखवा कि लष्कराने हे पुरावे दिले .
https://en.wikipedia.org/wiki/Aftermath_of_the_2008_Mumbai_attacks
On 19 December, private intelligence agency Stratfor, in its latest report, said, "Indian military operations against targets in Pakistan have in fact been prepared, and await the signal to go forward". On 25 December, however, the ruling UPA government in India played down apprehensions of an imminent military conflagration. The Indian Prime Minister made it clear that "nobody wanted war". The Indian Air Force also downplayed the sorties by PAF fighter jets, saying it was an air defense exercise. Officials in New Delhi were amused at Pakistan air force's attempt to create war hysteria in the region.

कपिल सिब्बल , दिग्विजय , ममता, शरद पवार सारखे महा आघाडीतले सगळे जण एकाच पद्धतिने ज्या प्रमाणे बोलत आहेत त्यावरून कळून येते कि किती गोची झाली आहे . आधीच एकही भ्रष्टाचाराचं प्रकरण प्रूव्ह करता आला नाही, ना डेव्हलोपमेंट च्या विषयी त्यांच्याकडे काही मुद्दा आहे , ना सरकारच्या कारभार बद्दल काही बोलता येत. ना ह्यांना नोटबंदी मध्ये काही सापडलं , ना जीएसटी च्या मुद्यात काही सापडले ,त्यांना माहित आहे कि राफेल सारख्या डील ची सगळी डिटेल्स उघड करता येत नाही मग हाच एक काय तो मुद्दा पकडा.

खर तर ह्या लेखाचा मुद्दा हा पुलवामा हमला नंतर भारत आणि पाकिस्तान चे संबंध हा होता, ते ताणले तर जाणारच होते फक्त भारताने बदला घेऊन पाकिस्तान ला त्यांची जागा दाखवून दिली. २६/११ च्या वेळेस आपण डिफेन्स मोड मध्ये होतो आणि ह्या वेळेस आपण अटॅक मोड मध्ये आहोत ज्या मुळे पाकिस्तान ला बॅकफूट वर जावा लागले , आता इथून पुढे कुठलेही सरकार आले तरी लोक अशीच अपेक्षा ठेवणार आहेत, हेच पाकिस्तान ला नको आहे म्हणून ते त्यांच्या भारतातील हस्तकांना नक्कीच कामाला लावणार. बघू हे द्वंद्व कसे होणार ते ..

जगातील सर्वोततम एजन्सी सुधा पाणी काम चाय आहेत असे अतिशय शोधक वृत्तीची लोक आपल्या कडे आहेत .
कसले भन्नाट तर्क आणि अप्रतिम लॉजिक इथे वाचायला भेटते आहे .
कसले कसले नवीन शोध पण लावले जात आहेत ते जगात konhich लावू शकत नाही
Great

शब्द फिरवणे यांच्याकडून शिका.
काही लोक तीनशे जण मारले गेले याचा पुरावा काय असे विचारत आहेत, कारण सरकारनेच हे आकडे सूत्रांमार्फत पेरलेत.
यांनी त्याला एअर स्ट्राइकचा पुरावा असे बदलले.
खोटारडेपणा वरपासून खालपर्यंत भिनला आहे.
पुढची सगळी अर्थहीन पोपटपंची.

१. मायबोलीवर एअर स्ट्राईकचे पुरावे कोणी मागितले ते दाखवा? मायबोलीवर लिहिणे सोडून देईल. लिहायला मिळते म्हणून काहिहि लिहत सुटायचे का? दहशतवादी मेल्याचे पुरावे नाहीत, वायुदल म्हणते कोण काय मेले नहि मेले ते आम्हि सांगू शकत नहई सरकार सांगेल. कोणात कसलीच एकवाक्यता नाही. हे सरकारचे जनतेला गुंडाळ ण्याचे धंदे कळत नाही होय आम्हाला?
२. २६/११ ला सुद्धा सैन्य कारवाई केली होती, हो का मग त्याचे पुरावे द्या मग जनतेला निदान बातमी तरी दखवा कि लष्कराने हे पुरावे दिले .>> का का का? आता तुमचा तुमच्या सरकार आणि सैन्यावर भरवसा नाही? हेच का तुम्चे देशप्रेम आणि निष्ठा?
३. भ्रष्टाचार च्या नावाने इतकी बदनामी केली आधीच्या सरकारची, मागच्या पाच वर्षात एकाला तरी आत टाकलं का?
४. भारताची नाचक्की होत आहे तर भक्ताड लोक मेरी मुर्गी कि एकिच टां ग्करत आहेत. कुठल्या दिवास्वप्नात असतात काय माहित. कोंबडं झाकल्याने सुर्य उगवायचा राहत नाही. सगळ्या दुनियेचि मिडिया विकत घेता येत नाही.

भन्नाट तर्क आणि लॉजिकचं एक सुंदर उदाहरण बंद पडलेल्या धाग्यात आहे.
–--------
पाकिस्तानचे हस्तक तर भाजपच्या आयटीसेलमध्येच भरलेत.
यांच्या डीएन एतच खोटारडेपणा आहे.

कागदपत्रे चोरी चौथ्या स्तंभासाठी धोकादायक!
(सौजन्य : बिगूल)

भारताच्या सध्याच्या सरकारला सगळीच माध्यमे आपल्या तालावर नाचणारी हवी आहेत. सरकारला हवं तेच माध्यमांनी छापावं, दाखवावं, असा सरकारचा आग्रह आहे. बहुतांश माध्यमजगतही (अपवाद वगळता) सरकारला शरण जाऊन लाभ पदरात पाडून घेताना दिसतंय. अंबानी, अदानी आणि RS MP सुभाष चंद्रा यांच्या अखत्यारित माध्यम जगत बऱ्यापैकी केंद्रीत झाले आहे. सरकारला शरण न गेलेल्या अपवादातील काही माध्यमे पत्रकारिता धर्माला जागून स्वत्व, बाणा आणि पेशाचे पावित्र्य टिकवून आहेत. दी हिंदू, IE, NDTV, टेलिग्राफ, प्रभात खबर, गुजरात समाचार ही या अपवादातीलच काही नावे. नुसतं Free N Fair, नि:पक्ष न निर्भीड व पत्रकारिता धर्माचा कागदोपत्री जाहिरातीत टिमकी वाजवून उपयोग नाही. ते प्रत्यक्ष कृतीत आणावं लागतं; वाचकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं लागतं. असं करणारी, जनतेसमोर सत्य मांडणारी माध्यमे आता सरकारला अडचणीची ठरू लागली आहेत. सरकारला नागडे करणाऱ्यांत अग्रस्थानी आहे ते ‘दी हिंदू’! या भारतातील सर्वात जुन्या व सर्वाधिक विश्वार्साह वृत्तपत्राने ‘राफेल’मध्ये अंबानींना फायदा पोहोचविल्याची गोष्ट सर्व पुराव्यांसहित चव्हाट्यावर आणून मोदी सरकारचा खोटारडेपणा उघड केला. सरकारची त्यामुळे भलतीच गोची आणि नाचक्की झालीय. त्यामुळेच ‘राफेल’ची कागदपत्रे हरविल्याचा सुप्रीम कोर्टातील सरकारचा तथाकथित पवित्रा हा दूरगामी धोक्याचा आहे. कागदपत्रे हरविली, असे सांगून सरकार स्वतःची तात्पुरती सुटका करून निवडणुकीत वेळ मारून नेईल.

दुसरीकडे, ‘ऑफिशिअल सिक्रेट एक्ट’च्या नावाखाली गुन्हे दाखल करून ‘दी हिंदू’वैगेरे सरकारची पोलखोल करणाऱ्या माध्यमाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा वृत्तपत्र स्वातंत्र्याला फार मोठा धोका आहे. आज ‘दी हिंदू’ आहे, उद्या आपल्यापैकी कुणाचीही वेळ येऊ शकते. त्यामुळे पत्रकार, माध्यमे यांनी एकत्र येऊन ही सरकारी कायदेशीर दहशतवाद (Legal Terrorism) मोडून काढणे गरजेचे आहे. नाहीतर सत्तेचा हा गैरवापर माध्यमांच्या जीवावर उठेल. देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा तर आधीच घोटला जात आहे. ‘राफेल’ची कागदपत्रे चोरीला गेलीच असतील तर त्यासंदर्भात आधी तात्काळ FIR का दाखल केली गेली नाही? जर, देशाच्या संरक्षण मंत्रालयातच चोरी होत असेल तर, मग कसला हा देश सुरक्षित हातात? एव्हढी मोठी चोरी होत असताना आणि राष्ट्रीय गुपिते चोरीला जात असताना

चौकीदार काय झोपा काढत होते?

चौकीदारीच्या काळात या देशात काहीही मुमकीन आहे, १९४७ पासून जे कधी झाले नव्हते ते मुमकीन झाले, चोरांनी सरंक्षण मंत्रालयात घुसून चोरी केली. भारताच्या अब्रूची लक्तरे आज नक्कीच वेशीला टांगली जातील. राष्ट्रीय प्रतिभेला इतकी भयंकर ठेच आजवर कधी लागली नव्हती. आज सारे जग आपल्यावर हसत असेल. या चोरीला जबाबदार नेमके कोण? एरव्ही श्रेयवादात सारे 56 इंच छाती फुगवून पुढे येतात. आज देशाची इभ्रत व पत घालविण्याला जबाबदार कोण? की मुद्दाम ही चोरी होऊ दिली गेली आणि दुसरी ‘चोरी’ सुप्रीम कोर्टात उघड होऊ नये, अशी व्यवस्था केली गेलीय? प्रश्न अनेक आहेत; *’देशभक्ती’च्या धुंदीतील जनतेच्या डोळ्यावरची झापडं* उतरत नाहीत, तोवर ‘राफेल’च्या कागदपत्रांची चोरी होऊ देणाऱ्यांना फिकीर करण्याची गरज नाही. मात्र, आता खरी काळजी आहे ती ‘झापडपंथी’ मंडळींच्या दारात रोज सकाळी ‘सत्य’ पोहोचविण्यासाठी सर्वस्व पणाला लावून लढत असलेल्या पत्रकारिता धर्माला जागणाऱ्या व्रतस्थांची!! या ‘सत्याच्या चौकीदारां’चे दुर्दैव असे की, ज्यांच्यासाठी ते झटताहेत ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्णन केल्यानुसार, एका चाकोरीत चालणारे झापडे लावलेली बैले आहेत. ईश्वर, या देशाचं भलं करो, इथल्या मुर्दाड पत्रकारितेतल्या शिलेदारांचे लढण्याचे बळ कायम ठेवो! आमेन…

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

http://bigul.co.in/vikrant-patil-writes-blog-about-missing-rafale-deal-p...

<< 'राफेल असते तर' ची कुरकुर करणारे आपल्याकडे असलेले 249 सुखोई फायटर जेट्स विसरलेत वाटतं... त्यांची क्षमता राफेल पेक्षा बरीच उत्तम आहे. राफेल खरेच गरजेचे होते का हा प्रश्न विचारला पाहिजे, काँग्रेस आणि भाजप दोघांनाही.. >>

------ राफेल असते तर पुलवामा टळले असते का ? 'मार्केटिंग' चा जमाना आहे, राफेल देशाला किती गरजेचे आहे हे समजण्यासाठी तर युद्ध नकोच नको.

४० जवानांची हत्या घडली त्यासाठी कुणा कुणाला दोषी धरले आहे ? देशांतर्गत असंतोष खदखदत आहे, सर्वच आघाड्यांवर अपयश आलेले आहे आणि अशा परिस्थितीत जनतेचे लक्ष दुसरी कडे वळवण्यासाठी देशावर कशाला युद्ध लादत आहात?

देशात अनेक ठिकाणी काश्मीरी बांधवांवर हल्ले झाले. दोन काश्मिरी फळविक्रेत्यांना लखनौ येथे मारहाण करण्यात आली. निरपराधी लोकांवर हल्ला करणार्‍या राक्षसी प्रवृत्तीचा निषेध.

https://www.youtube.com/watch?v=Y9XtC7wzWtw

कायदा आणि सुव्यावस्था राखण्याचे काम कुणाचे आहे ? अशा मारहाणीने आपण शांतताप्रिय काश्मीरी जनतेला आपलेसे करत आहोत का? पुलवामा येथे जैश ने हल्ला केला म्हणुन त्या हल्ल्याची शिक्षा या निरपराधी लोकांना करायची हा कुठला न्याय आहे ? अच्छे दिन यालाच म्हणायचे का ?

सारे भारतीय माझे बांधव आहेत.... अशी प्रतिज्ञा शाळेत केवळ म्हणण्यासाठी आहे.

Pages