पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वेळ निवडणुकीची आहे आणि पुरावे कधी जाहीर करायचे हा मोदींचा निर्णय आहे. लोकशाहीची निवडणूक ही एक अपरिहार्यता आहे आणि योग्य वेळ साधण्याला महत्व आहे. योग्य वेळी ते पुरावे वा रिपोर्ट्स समोर ठेवले जातील. तोपर्यंत मोदी/भाजप समर्थकांनी पालथ्या घड्यावर पाणी घालण्यापेक्षा थोडा काळ धीर धरावा. बाकीच्यांना सांगून उपयोग नाही, कारण प्रत्यक्ष हल्ल्याच्या ठिकाणी न गेलेल्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय सूत्रांच्या मते एअर स्त्राईक यशस्वी झालेला नाहीय. त्यामुळे उद्या मोदींनी पुरावे वा रिपोर्ट्स जाहीर केले किंवा प्रत्यक्ष देव जरी सांगायला आला तरीही या लोकांचा विश्वास बसणार नाही.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एअर स्ट्राइक केला. सैनि कांच्या जिवावर आम्ही निवडणुका जिंकणार.

धन्य ते राजकारण आणि आणि धन्य तो राष्ट्रवाद.

सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही असे कुणी म्हटलेले आहे कळेल का ? कॉपी पेस्ट केले तर आभारी राहीन.>>>>>>>>> तसं नाही ओ. पण सगळे पुरावे मागताहेत असं वाचलं म्हणुन विचारलं.
मी राजकारणाचे धागे वाचत नाही कधी. पण पुलवामा आणि सर्जिकल स्ट्राईक मुळे हा आणि एक तो दुसरा धागा वाचला.

जर वायुसेना प्रमुख म्हणताहेत की किती मेले हे सांगणे अशक्य आहे, तर ३०० चे दावे करणार्‍यांनी ते कसे केले हा प्रश्न आहे. यात लेटेस्ट अमित शहा आहेत. ते देशात ले नंबर २ चे पॉवरफुल व्यक्तिमत्त्व आहे.
याबाब्त आंतरराष्ट्रीय मीडिया पाकिस्तानच्या बोळ्याने दूध का पिते हा दुसरा प्रश्न.

<< योग्य वेळी ते पुरावे वा रिपोर्ट्स समोर ठेवले जातील. >>

------ ज्यांना मानायचेच आहे त्यांना भूकंपामुळे जमीनदोस्त झालेले फोटो पण चालतील.... आपली फोटोशॉपची फौज कामाला लावायची... पण त्या सॅटेलाईटसना आपण विसरलोच.... oops

हे म्हणजे नव्या नोटा छापायच्या पण ATM मशीन त्या स्विकारतील का याचा जराही विचार करायचा नाही.... सापडले कारण, या सर्व ATM मशीन्स काँग्रेस काळातल्या आहेत. अर्थात खुप खोलवर विचार करुन नोटा बदलायचा निर्णय घेतला होता...

खरं तर राजेश १८८ यांच्याशी चर्चा करू शकेल अशी मायबोलीवर एकच व्यक्ती आहे. सचिन पगारे. अन्य कोणी याशिवधनुष्याला बोटही लावू नये.>>>> Rofl माफ करा, पण खरच हसू आवरले नाही.

खरं तर राजेश १८८ यांच्याशी चर्चा करू शकेल अशी मायबोलीवर एकच व्यक्ती आहे. सचिन पगारे. अन्य कोणी याशिवधनुष्याला बोटही लावू नये.>>>> Rofl माफ करा, पण खरच हसू आवरले नाही.
तुम्हाला हसू येते आहे पण इंदिराजी नी लोकशाही चा गळा घोटून देशात आणीबाणी लागू केली त्या मुळे त्या १९७७ चे इलेक्शन हरल्या हे उत्तर देणे टाळण्ाकरिता तशी पोस्ट त्यांनी केलीय हे तुमच्या ध्यानात आले का

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एअर स्ट्राइक केला. सैनि कांच्या जिवावर आम्ही निवडणुका जिंकणार.
धन्य ते राजकारण आणि आणि धन्य तो राष्ट्रवाद.
Submitted by भरत. on 8 March, 2019 - 10:05
<<

मिस्टर भरतजी,
या देशात निवडणुका कधी नसतात, हे सांगणार का जरा ?

मिस्टर अनिरुद्ध.. निवडनु़क प्रचारात सेनेच्या पराक्रमाचे भांडवल या आधी कधी केले होते ते सांगणार का जरा?

<तुम्हाला हसू येते आहे पण इंदिराजी नी लोकशाही चा गळा घोटून देशात आणीबाणी लागू केली त्या मुळे त्या १९७७ चे इलेक्शन हरल्या हे उत्तर देणे टाळण्ाकरिता तशी पोस्ट त्यांनी केलीय हे तुमच्या ध्यानात आले का>

सचिन पगारेंना पण जमणार नाही.

<< निवडनु़क प्रचारात सेनेच्या पराक्रमाचे भांडवल या आधी कधी केले होते ते सांगणार का जरा? >>

------------- मित्रो, देशके इतिहासमे ये पहिली बार हो रहा है....

<< निवडनु़क प्रचारात सेनेच्या पराक्रमाचे भांडवल या आधी कधी केले होते ते सांगणार का जरा? >>
सैन्याच्या पराक्रमाचे भांडवल नाही केले पाहिजे ह्या तुमच्या मताशी सहमत .
पण आदर्श प्रचार करूनच निवडणूक लढवली जावी ह्या साठी जनतेने राजकीय पक्षांवर दबाव आणला पाहिजे

राजेश, तुम्ही प्रत्येक वेळी एक चूक झाकायला दुसऱ्या चार चुकीच्या गोष्टी आणणार ना?
आधी काश्मिरींवर हल्ला. आता हे.

राजेश, तुम्ही प्रत्येक वेळी एक चूक झाकायला दुसऱ्या चार चुकीच्या गोष्टी आणणार ना?
आधी काश्मिरींवर हल्ला. आता हे.
माझी कमेंट मी बदली आहे आता

सकाळी सकाळी उठायचं, शाळेत जाणाऱ्या पोराची खाकी हाल्फ चड्डी आणि पांढरा शर्ट अंगात चढवायचा, आणि कुठल्याशा मैदानात एकत्र जमून सदमा पिक्चरमधल्या कमल हसनच्या माकडलीला करायच्या. नंतर फावल्या वेळात सोशल मीडियावर रावणाच्या बाता मारायच्या

बोकलत भाऊ, तुमच्या दिनाचर्येबद्धल चर्चा करायला कृपया दुसरा धागा काढावा ही विनंती. इथे चर्चा पुलवामा हल्ला, त्यानंतरचे एअर स्त्राईक, त्याचे पुरावे व वाजपेयी, इंदिराजींसारख्या सध्या हयात नसलेल्या ऐतिहासिक नेत्यांवर चाललीय.

भारतात आसलेल्या दोन अंधश्रद्धा .
खाकी हाफ चड्डी घातली की माणूस आपोआप देशप्रेमी होतो .
आणि दुसरी गांधी टोपी वापरली की सर्व सर्व पाप टोपी खाली झाकलं जात

जावो रे.. पहिले आपल्या ह्याक झालेल्या वेबसाईट ला सांभाळा. तीन दिवस झाले अजून 'मेंटेनन्स' संपला नाहीये. आपली वेबसाईट वाचवू शकत नाहीत. देशाची काय सुरक्षा करणार?

sarv shejari desh shantata priy aahet deshala bilkul dhoka nahi.

मीडियाने सरकारला प्रश्न का विचारावेत याविषयी आजच्या 'लोकसत्ता'च्या संपादकीयामध्ये अप्रतिम विवेचन आहे. पूर्वीच्या मीडियाने प्रश्न लावून धरल्यामुळे किती गैरव्यवहार उघडकीला आले, त्यावर किती मुख्यमंत्री/मंत्र्यांनी राजीनामे दिले, कोणाकोणाला पायउतार व्हावे लागले याचा हिशोब आहे. जरूर वाचण्याजोगा अग्रलेख. 'द हिंदू'वर सरकारी कारवाई झाली तर सगळा मीडिया एकत्र येणार हे नक्की.

लोकसत्ता लेखाची लिंक द्या.

सरकारच्या अन्यायाविरुद्ध लिहिणे , हे भारतीय पेपर नी स्वातंत्र्यकालापासून केले आहे,

भाजपे , संघी स्वातंत्र्यलढ्यात नसल्याने त्यांना हे ठाऊक नाही

त्या लोकसत्ताच्या अग्रलेखात , भाजपा नेते व समर्थकांबद्दल जी भाषा वापरण्यात आलेय ती पाहाता तो लेख एकाद्या निष्ठावान कॉंग्रेसी भाटांने लिहिलाय हे लगेच ओळखू येते.

संघोट्यांचे हात कुणी धरलेत का..? आपलेच सरकार आहे.. धाक-दपटशा दाखवुन मनाचे श्लोक्स छापुन आणु शकतात ना..??

बादवे, लोकसत्त वाचावेच का..? वाचक मिळत नसल्या कारणाने तरुण भारत निवर्तले की काय..?? Proud

Pages