पुलवामा हल्ला आणि भारत पाकिस्तान संबंध

Submitted by हेला on 27 February, 2019 - 10:27

पुलवामा हल्ल्यात आपले ४४ जवान हकनाक मारले गेले. जैश-ए-मोहम्मद ह्या अतिरेकी संघटनेच्या एका आत्मघाती सदस्याने स्फोटकांचा वापर करून crpf च्या ताफ्यावर हल्ला केला. त्यानंतरच्या घडामोडी व त्यानुषंगाने अनेक बातम्या खऱ्या खोट्या येत आहेत. पाकिस्तानी व भारतीय माध्यमे, दोन्ही देशाचे अधिकारी, दोन्ही देशाचे नेते हे काय करत आहेत हे दिसत आहे. सोशल मिडीयावर युद्धज्वर ओसंडून वाहत आहे. ह्या सर्व घटनांचा येत्या निवडणुकांवर परिणाम होणार आहेच.

ह्या सर्व प्रश्नांवर एकत्रित एका ठिकाणी चर्चा करायला हा धागा काढत आहे. मायबोलीच्या नियमात राहून चर्चा करा हि विनंती... वेबमास्टर ह्या धाग्याला कुलूप घालणार नाहीत अशी अपेक्षाही आहेच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शांततेची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या सीमेवरती नापाक कारवाया थांबलेल्या नाहीत. सलग आठव्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. नियंत्रण रेषेवर पूँछ आणि राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून तुफान गोळीबार सुरु आहे.
- ह्याला काय अर्थ आहे.? इम्रान खान चे कौतुक करायची काही गरज नाही वाटत..

कोलकाताः पुलवामा हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने कारवाईत ३०० दहशतवादी मारले गेल्याची आकडेवारी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही, असं केंद्रीयमंत्री एसएस अहलुवालिया यांनी सांगितलं. सिलिगुडी येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

पुलवामा हल्ल्याला देण्यात आलेल्या प्रत्युत्तरावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर बोलताना अहलुवालिया म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा कोणत्याही सरकारी प्रवक्त्यांनी भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांची नेमकी आकडेवारी जाहीर केलेली नाही. अमुक इतके दहशतवादी मारले गेल्याची चर्चा सोशल मीडिया आणि काही प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होती. भारतीय प्रसारमाध्यमे आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे दोन्हींवरील चर्चा आम्ही पाहात होतो. भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित केले. तेव्हाही मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकडेवारीबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही, असं अहलुवालिया यांनी नमूद केलं.
शत्रूच्या घरात शिरून अनुचित गोष्टींवर प्रहार करण्याची ताकद भारतात आहे, असा संदेश देण्यासाठी भारतीय हवाई दलाने कारवाई केली. यामागे कोणत्याही स्थानिक नागरिकांना लक्ष्य करणे किंवा स्थानिकांचे नुकसान करण्याचा अजिबात हेतू नव्हता, असं सांगत या कारवाईनंतर पंतप्रधान मोदी किंवा कोणत्याही अधिकृत सरकारी प्रवक्त्यांकडून मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची आकडेवारी सांगण्यात आली का, असा प्रश्न अहलुवालिया यांनी उपस्थित केला.

आता खरी अहलुवालियाची अंडी पिल्ली बाहेर निघतील.

त्याची आजी कशी अ‍ॅक्चुअली मुसलमान होती, किंवा त्याच्या खापरपणजोबाने कसा मुसलमान धर्म स्वीकारला होता, अन कोणत्या गुरूने त्यांना कसे सिख करुन घेतले, तरीही मुसलमान धर्म कसा त्यांच्या घरात मूळ धरून आहे, हे बरोब्बर बाहेर निघेल बघा.

नाही निघणार. भाजप चा हाच गेम प्लान आहे. त्याचे वक्तव्य येणे हा योजनेचा भाग आहे.>>

चला म्हणजे एकंदरीत तुम्हाला भविष्यासुद्धा कळतंय की. आता सगळं माहितीच आहे म्हटल्यावर धाग्याची गरज काय? तोही बंद करा म्हणजे तुमच्याबरोबर आमच्या डोक्याचा पण ताप वाचेल.

हल्ली सुशिक्षित लोकही एव्हढे अडाणी झालेत कि वृत्तनिवेदकांच्या आकड्याला खरं मानून त्यावर चर्चा करत बसतात, पण सरकारी संस्थांच्या आकड्यांची वाट बघत नाहीत. त्यांना आता विचारलं तर त्या वृत्त निवेदकाचं आणि वाहिनीचं नावही सांगता येणार नाही, पण आकडा मात्र आठवणीत आहे !

भारतीय हवाई दलाने बालकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेली कारवाई कितपत परिणामकारक ठरली त्यावर काहीजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यावर हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी लक्ष्यावर अचूक प्रहार केल्यानंतर किती जण ठार झाले ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही. ते सरकारचे काम आहे असे सांगितले.

Proud

जाऊन मोजून या आता.

हल्ली सुशिक्षित लोकही एव्हढे अडाणी झालेत कि वृत्तनिवेदकांच्या आकड्याला खरं मानून त्यावर चर्चा करत बसतात, पण सरकारी संस्थांच्या आकड्यांची वाट बघत नाहीत. त्यांना आता विचारलं तर त्या वृत्त निवेदकाचं आणि वाहिनीचं नावही सांगता येणार नाही, पण आकडा मात्र आठवणीत आहे !

--- ह्या सगळ्या भाजपच्या करामती आता सवयीच्या झाल्यात. लोकांना अडाणि समजणे सोडून द्या.

भक्तांसाठी युनिफॉर्म आलेला आहे. तरी सर्व भक्त स्त्री पुरूषांनी अंमलात आणावा ही विनंती.
53065778_2775811442459131_1636156366798192640_n (1).jpg

--- ह्या सगळ्या भाजपच्या करामती आता सवयीच्या झाल्यात. लोकांना अडाणि समजणे सोडून द्या. >>

यात कसली करामत दिसतेय तुम्हाला?

इंदिराबाईंनी 90000 पाकडे पकडून मोजून दाखवले होते >>>

नक्कीच. पण कशाला उगाच किड्यांचा डबा उघडताय भाऊ? त्यावरुन बरेच प्रश्न निर्माण झालेत जे अजून अनुत्तरित आहेत.

@किरणुद्दीन , जग विचित्रतेने भरलेले आहे याची तुमची प्रतिक्रिया पाहून खात्री पटली.. तुमच्यात पुरुषही असले कपडे नेसतात हे खरच माहीत नव्हतं.
तुमच्या कबील्यावर एक धागा काढून समस्त मायबोलीकरांच्या ज्ञानात भर टाकावी हि नम्र विनंती.

झाले वैयक्तिक हल्ले सुरू झाले. म्हणजे बाण निशाण्यावर लागलेला दिसतो. फोटो कुणाचा, नेसतंय कोण... बोल कुणाला .. कशाचा कशाला पत्ता नाही !

हेच जर दुस-या कुठल्या पक्षाच्या नेत्याने केलं असतं तर आत्तापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप ओसंडून वाहू लागलं असतं.

पुन्हा एकदा - मानसिक वय लिहीण्याची सक्ती असायला हवीच.

पुन्हा एकदा - मानसिक वय लिहीण्याची सक्ती असायला हवीच. >> करा सुरुवात तुमच्यापासुन.

बाकी अशी कोणती वैयक्तिक टिप्पणी मी केली जी तुम्ही केली नाही ते मला कळलं नाही अजून. तुम्ही कुठल्यातरी भक्त समुदायातील पुरुषांना साडी नेसण्याची सूचना केली. पण मी आजपर्यंत असा प्रकार पहिला नसल्यामुळे तुमच्या समुदायात तसं काही चालत असेल असं मला वाटलं.. पण तुम्हाला एव्हढी मिरची का लागली भाऊ?

अहो दादा, तुमच्या कबिल्यात नेत्याची छायाचित्र असलेली साडी असते म्हतल्यावर तुमच्याच कबिल्यातले पुरूष ती नेसणार ना ? तुमच्या नेत्याच्या छायाचित्राच्या साड्या दुसरे कशाला नेसतील ? साधं लॉजिक आहे. तुमचंच घ्या की !! ( तुमच्या मते हा वैयक्तिक प्रतिसाद नाही )

(एकंदर तुमची समज पाहून तुम्हाला एंटरटेन करणे थांबवीत आहे. तुमचे चालू राहू द्या)

@किरणुद्दीन , तुमच्या समजेप्रमाणेच प्रतिक्रिया लिहितोय मी.. त्यात राग येण्यासारखं किंवा हतबल होण्यासारखं काय ते मला समजत नाहीय. ... तुम्ही टीशर्ट शोधली असती तर त्याचे फोटो मिळाले असते.. साड्या शोधण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच तुमच्या कबिल्यासाठी केला असला पाहिजे. पुढच्यावेळी नीट समज वापरून सर्च करा भाऊ. हवं तर सॅम्पल म्हणून खालील लिंकवर विक्रीला असलेले टीशर्ट पाहून घ्या, नि तुमच्या कबिल्यातील पुरुषांना टी-शर्ट सारखे कपडे वापरायला सांगा.

https://teezbro.com/product/namo-again-modi-tshirt/

मोदीफोबिया ग्रस्त मित्रांनो, मायबोलीवर कुणी आंतराष्ट्रीय मोबाईल सिग्नल्सना कसे ओळखायचे नि मोबाईल सिग्नलवरून एखाद्या ठिकाणी किती लोक जमलेत हे कसे जाणायचे हे समजणारे जाणकार आहेत काय? अशा जाणकारांची लवकरच गरज पडणार आहे.

@किरणुद्दीन , जग विचित्रतेने भरलेले आहे याची तुमची प्रतिक्रिया पाहून खात्री पटली.. तुमच्यात पुरुषही असले कपडे नेसतात हे खरच माहीत नव्हतं.
तुमच्या कबील्यावर एक धागा काढून समस्त मायबोलीकरांच्या ज्ञानात भर टाकावी हि नम्र विनंती.
नवीन Submitted by ShashankP on 4 March, 2019 - 17:41
<<

@शशांक,
जबरी . Lol

Over 8,500 Suspicious Transactions: FATF Warns Pakistan On Terror Funding

https://www.ndtv.com/india-news/over-8-500-suspicious-transactions-fatf-...

भारत मिळेल त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उठवत आला आहे. Paris-based Financial Action Task Force ने पाकिस्तानला दहशतवाद्यांना केल्या जाणाऱ्या वित्तपुरवठ्यावर कंट्रोल ठेवायला सांगितला होता आणि काही टास्क दिले होते, काही action plan दिला होता. त्याप्रमाणे करण्यास पाकिस्तान खूप कमी पडला आहे. तसं केलं तर दहशतवाद्यांना पैसे कसे पुरवणार म्हणा! पाकिस्तानातून मोठ्याप्रमाणावर संशयास्पद आर्थिक उलाढाली होत असल्याचे reports आहेत आणि जानेवारी/फेब्रूवारी २०१९ मध्ये तर प्रमाण प्रचंड होते असा report आहे. एकूण पाकिस्तानची दहशतवाद्यांना पैसे पुरवले जाऊ नयेत म्हणून ठोस पावलं उचलण्याबद्दलची उदासीनता आणि नुकता झालेला पुलवामा हल्ला ह्या पार्श्वभूमीवर FATF ने पाकिस्तानला लवकर पावले उचलली नाहीत तर सप्टेंबरमध्ये blacklist मध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे.

IPC ची काश्मीर बाबत भूमिका काय आहे? स्वराज तिकडे गेल्या होत्या आणि पाकिस्तान नव्हतं

मी दुसर्‍या धाग्यावरएल्क प्रश्न उप्स्थीत केला होता. तो धगा मला सापडत नाहिये.
पुलवामा हल्ला झालाच कसा? ह्या अर्थी responsibility fix झालि क?
भारतातील कुठल्या agency चे ते अपयश होते?

Pages