पुडचटणी

Submitted by किल्ली on 9 December, 2018 - 14:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हरभरा डाळ १ पेला
उडीद डाळ १/२ पेला
तीळ १/२ पेला
तांदुळ १/२ वाटी
गुळ १/४ किलो
मोहोरी २ छोटे चमचे
जिरे २ छोटे चमचे
मेथी दाणे २ छोटे चमचे
हिंग चवीनुसार
मीठ चवीनुसार
लाल तिखटाची पूड १ वाटी
सुके खोबरे बारिक किसून अथवा पुड करून
हळद १/२ छोटा चमचा
तेल भाजण्यासाठी व फोडणीसाठी

क्रमवार पाककृती: 

१ - तांदूळ, तीळ व डाळी तेलावर खमंग भाजुन घ्याव्यात.
(भाजण्याची क्रिया करत असताना जितकी आच कमी ठेवाल तितके चान्गले भाजले जाईल)
२ - डाळी, तांदूळ, तीळ (वेगवेगळे) बारिक वाटून घ्यावे
३ - चिंच तेलावर परतुन घ्यावी व बारिक करुन घ्यावी
४ - तिखटाची पूड, सुके खोबरे तेलावर परतून घ्यावे
५ - गूळ बारीक किसून घ्यावा

- तेलात मोहरी, जिरे ,हिन्ग, मेथी दाणे व किन्चित हळद घालून फोडणी करावी
- फोडणी गार झाल्यावर वरील जिन्नस (क्र. २.३.४.५) क्रमाने एकानन्तर एक फोडणीत घालावे आणि मिक्स करावे.
- चवीनुसार मीठ घालावे आणि मिक्स करावे

प्रकाश चित्रे:
तयार पुडचटणी २
pud1.jpg
तयार पुडचटणी १
pud2.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

- महिनाभ/वर्षभर टिकते बहुतेक. जास्त ही टिकत असेल. कारण हा मुरवून पुरवून खाण्याचा पदार्थ आहे, ताजा कधी खाल्ला नाही
- ही पुडचटणी विशेषकरून लग्नकार्य असेल तर केली जाते.
- चिवडा लाडूच्या पाकिटात मेतकूटाबरोबर पुडचटणी सुद्धा आवर्जून उपस्थितांमध्ये वाटली जाते.

माहितीचा स्रोत: 
आई , आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण करते अशीच त्यात थोडा बदल म्हणजे अजून जास्त पौष्टीक .... जवस १ कप, अर्धाकप ह.डाळ , पावकप उ डाळ भरपूर कढीलिंब. चिंचेच्या ऐवजी अंबाडी पावडर.
सोनाली, लिंबा ऐवढी पुरेल चिंच ती तेलात तळून घ्यायची म्हणजे डाळींबरोबर वाटल्या जाते.

छान पाकृ.
पण फोटो टाकला नाही तर करून पाहणार नाही.

फोटो टाका ना.>> टाकला आहे फोटो Happy
कशाकशाशी खातात ही चटणी?>>> कोरडी अस्ते,
कशाशी ही खाऊ शकतो, फिकी भाजी असेल तर पोळी भाजी चटणी, पराठे, साधं वरण भात चटणी... असं काहीही कोम्बो करते मी तरी
कोरडीच खायची का>>> हो
सोनाली, लिंबा ऐवढी पुरेल चिंच ती तेलात तळून घ्यायची म्हणजे डाळींबरोबर वाटल्या जाते.>>> बरोबर
सुक्या खोबर्‍याचं प्रमाण द्यायचं राहिलंय.>>> घ्या कितीही चवीनुसार Proud
१/२ वाटी Happy
पण फोटो टाकला नाही तर करून पाहणार नाही.>>> टाकला आहे फोटो Happy

पुड चटणी खूप आवडते. तिखट , आंबट -गोड अशी मस्त चव येते. तोंडीलावणे म्हणून छान लागते.
मी बऱ्याचदा पुडचटणी तेलात कालवून घेते खाताना. मिनी इडल्या तुपात तळून पुडचटणीमध्ये घोळून मस्त लागतात. दडपे पोहे किंवा तिखटामिठाचे लावलेले पोहे बनवताना त्यात मेतकूट आणि पुडचटणी छान लागते.

दडपे पोहे किंवा तिखटामिठाचे लावलेले पोहे बनवताना त्यात मेतकूट आणि पुडचटणी छान लागते.>> लावलेले पोहे चटणी टाकुन खावे म्हणून लिहायला आलेच होते अन तुमचा प्रतिसाद आला Happy
धन्यवाद रश्मी.. , अल्पना , जागू-प्राजक्ता-..., भरत, DShraddha, shital Pawar, मंजूताई, sonalisl,मानव पृथ्वीकर Happy Happy

इतक्या सामानाची किती चटणी होते ? थोड्या प्रमाणात करायची असेल तर सामानाचे प्रमाण?
बाकी चटणी दिसतेय भारीच एकदम. वाद आहे काय? Happy

धन्यवाद शाली, दक्षिणा Happy
तू करुन पाठवलीस तर नक्की खाईन>>> घरी यावं लागेल, नो पाठवणे सर्विस
थोड्या प्रमाणात करायची असेल तर सामानाचे प्रमाण>> पेल्याऐवजी वाटी चे प्रमाण घ्यावे, रेशो तोच

अग मस्तय हे. फोटोच एकदम यम्मी दिसतो आहे. कमी प्रमाणात करून बघेन आधी. तू दिलेल्या प्रमाणाच्या अर्धे प्रमाण घेऊन बघेन. खोबऱ्याचे पण प्रमाण लिही ना.
माटुंग्याला चटणीपुडी मिळते तसाच प्रकार वाटतोय

मस्त दिसतेय. तू करुन पाठवली तर नक्की खाईन >> +११११११११११११११११११११११११
रेसिपीचे नाव खूप आवडले आणि फोटो तर खूप सुंदर.

धन्यवाद सामी Happy
वरच्या प्रतिसादात तुमचे आभार मानायचे राहुन गेले

आज ही चटणी करून पाहिली. दुसरा स्वयंपाक करायचा नव्हता म्हणून भाजायला हौस आली. Wink पेल्याऐवजी सगळंच वाटीच्य्ा अंदाजाने घेतलं आणि ब्राउन राइस एवढाच बदल. ताजी पण चांगली लागते. मुरवायला फ्रीजमध्ये ठेवायची का?
मस्त रेसिपी दिल्याबद्द्ल आभार. घरात तिखट खाणारा मेंबर खूश होईल. Happy

म्हणजे कायम फ्रीजबाहेरच ठेवू म्हणतेस. हे घे फोटो. थोडा गूळ छान चिरला नाही आणि चिंच पण कशी बारीक होते ते जमलं नाही त्याचे तुकडे दिसतील. चव अफाट आहे.

Chutney.jpg

Pages