पुडचटणी

Submitted by किल्ली on 9 December, 2018 - 14:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हरभरा डाळ १ पेला
उडीद डाळ १/२ पेला
तीळ १/२ पेला
तांदुळ १/२ वाटी
गुळ १/४ किलो
मोहोरी २ छोटे चमचे
जिरे २ छोटे चमचे
मेथी दाणे २ छोटे चमचे
हिंग चवीनुसार
मीठ चवीनुसार
लाल तिखटाची पूड १ वाटी
सुके खोबरे बारिक किसून अथवा पुड करून
हळद १/२ छोटा चमचा
तेल भाजण्यासाठी व फोडणीसाठी

क्रमवार पाककृती: 

१ - तांदूळ, तीळ व डाळी तेलावर खमंग भाजुन घ्याव्यात.
(भाजण्याची क्रिया करत असताना जितकी आच कमी ठेवाल तितके चान्गले भाजले जाईल)
२ - डाळी, तांदूळ, तीळ (वेगवेगळे) बारिक वाटून घ्यावे
३ - चिंच तेलावर परतुन घ्यावी व बारिक करुन घ्यावी
४ - तिखटाची पूड, सुके खोबरे तेलावर परतून घ्यावे
५ - गूळ बारीक किसून घ्यावा

- तेलात मोहरी, जिरे ,हिन्ग, मेथी दाणे व किन्चित हळद घालून फोडणी करावी
- फोडणी गार झाल्यावर वरील जिन्नस (क्र. २.३.४.५) क्रमाने एकानन्तर एक फोडणीत घालावे आणि मिक्स करावे.
- चवीनुसार मीठ घालावे आणि मिक्स करावे

प्रकाश चित्रे:
तयार पुडचटणी २
pud1.jpg
तयार पुडचटणी १
pud2.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

- महिनाभ/वर्षभर टिकते बहुतेक. जास्त ही टिकत असेल. कारण हा मुरवून पुरवून खाण्याचा पदार्थ आहे, ताजा कधी खाल्ला नाही
- ही पुडचटणी विशेषकरून लग्नकार्य असेल तर केली जाते.
- चिवडा लाडूच्या पाकिटात मेतकूटाबरोबर पुडचटणी सुद्धा आवर्जून उपस्थितांमध्ये वाटली जाते.

माहितीचा स्रोत: 
आई , आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण आज केली. ही चटणी फ्रीजमधे ठेवायची गरज नाही. डब्ब्यात भरून ठेवली तरी वर्षभर टिकते.

मी पण आज केली>> अरे वा, चव आवडली का? फोटु ?

धन्यवाद राजकूमारी Happy

ही चटणी फ्रीजमधे ठेवायची गरज नाही. डब्ब्यात भरून ठेवली तरी वर्षभर टिकते.++१११११
********************************
https://www.killicorner.in/
********************************

Pages