दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रवु, हो लताच आहे. मला बघावे लागले कारण लता आणि सुमन कल्याणपूर कधी कधी जाम सेम वाटतात. (आता पब्लिक मारेल पण आहेत माझे गाढवाचे कान त्याला काय करणार....)

सासरा-जावई यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं, दोघेहि आपापल्या काळांत लोकप्रिय विनोदि अभिनेते. चित्रपटाचं नांव अपेक्षित आहे. सोप्पा क्लु दिला आहे...

सासरा-जावई यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं, दोघेहि आपापल्या काळांत लोकप्रिय विनोदि अभिनेते. चित्रपटाचं नांव अपेक्षित आहे. सोप्पा क्लु दिला आहे... >> खट्टामिठा. देवेन वर्मा- अशोक कुमार जोडी माहिती होती, खट्टामिठा माहिती होतं. पण सिनेमातील नक्की कुठले गाणे ते मात्र बघावे लागले यूट्यूबवर - रोल रोल माकोनिसा दोबारा गाणे आहे. Happy

सीमंतिनीचा आतोबा - भाचा प्रश्न.
रणवीर सिंग (भवनानी) भाचा आणि अनिल कपूर - आतोबा.
गाणे - 'दिल धडकने दो' मधले 'गल्लां गूडीयां'.. त्यात प्रिचो ही ब्युटीक्वीन पण आहे.

हे भारी आहे. श्रद्धाने पुढचा प्रश्न न लिहील्याने मी घुसडतोय एक.

पूर्वीच्या एका भारी पिक्चर मधले अतिशय फेमस गाणे. तीस वर्षांनी तेच गाणे एका फेमस चित्रपटात इन्फॉर्मली म्हंटले गेले. तेव्हा ते मूळ गाणे जिला उद्देशून म्हंटले गेले, तीच अभिनेत्री त्या सीन मधेही होती (पण आता ते गाणे तिला उद्देशून नव्हते) Happy

बघूया काहीही हिंट न देता उत्तर येते का लौकर. नाहीतर हिंट देईन. इथे एकदम दिग्गज आहेत.

साथिया तूने क्या किया???? रेवती. नंतर टूस्टेट्स मध्ये तिनेच ते म्हणले... पण नक्की तीस वर्ष का ते गणित कॅल्क्युलेटर लागेल...

ऐ मेरी जोहराजबी.

वक्त मध्ये अचला सचदेव साठी म्हटले होते बलराज सहानी ने. तेच पुढे डीडी एल जे मध्ये इंफॉर्मली अमरीश पुरी फरीदा जलाल साठी म्हणतो 'मेहंदी लगा के रखना' गाणे संपल्यावर. अर्थात सीनमध्ये त्याची आई, काजोलची आजी म्हणून अचला सचदेव ही आहे.
Happy Happy

>>खट्टामिठा. देवेन वर्मा- अशोक कुमार <<
बरोबर. प्रिती गांगुली पण आहे त्यात. टायटल साँगमधे आहेत; गाणं दोघांच्या तोंडी नाहि म्हणुन फक्त चित्रपटाचं नांव द्या असं म्हणालो... Proud

आमचं जीके हुकलं की पाच वर्षाने >>> पण ते उदाहरणही इतके क्लोज असेल हे माहीत नव्हते. ते ही ऑल्मोस्ट बरोबर उत्तर आहे म्हणजे. पण माझ्या डोक्यात जोहराजबी गाणे होते.

आता शेवटचा सोपा प्रश्न (मग एक आठवडा काही विचारणार नाही Wink ) - सावत्रबहिणभावावर चित्रित गाणे....

फारेंड, पाच वर्षानी परत हाच प्रश्न टाका Wink सध्या काळाच्या पुढे आहे इ इ चांगलं चांगलं म्हणून सोडून द्या... Biggrin

पण ते उदाहरणही इतके क्लोज >> कांटोंसे खींच के ले आंचल पण आहे. १९६५ मध्ये गाईड आणि नंतर लम्हे १९९१ आहे. वहिदा एका पॅरडी मध्ये श्रीदेवी व अनुपम खेरबरोबर गाते. पण ते पण २६ वर्ष भरतात. अजून ४ वर्षाने विचारा Happy

सावत्रबहिणभावावर चित्रित गाणे....<<<< खरेखुरे सावत्र की सिनेमातले?
सिनेमातले असतील तर 'सासरला ही बहीण निघाली... (नेसली माहेरची साडी)' का?

खरेखुरे सावत्र भाऊ-बहिण.
सिनेमातले असतील तर 'सासरला ही बहीण निघाली... (नेसली माहेरची साडी)' का? >> हे आठवलं म्हणजे दंडवतच माझा Happy काय पीळ होता हा सिनेमा....

Pages