खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.

Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दरम्यान हे घ्या

- - - / - - - / - - (३, ३, ,२ )
चित्रपट, दमदार नायक दमदार राजकीय भूमिकेत

हिंट = संकेत चालावा, हर्पेन >> हे हर्पेन ऐवजी भा ने दिलेले कोडे नव्हते का?
मी ते कोडे समजून 'केला इशारा जाता जाता' उत्तर लिहीले आहे Lol

एका प्राध्यापकांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित नाटक, यात जी नायिका होती तिची मुलगी आता मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.
-म- - / - - - व -

Pages