खेळ शब्दांचा -४- मराठी चित्रपट व नाटक.

Submitted by संयोजक on 18 September, 2018 - 22:29

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र ४ :- मराठी चित्रपट, नाटक.
याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला.
_ न _ _ _ वी (६ अक्षरी, सिनेमा)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

द्या द्या मराठीतच द्या हिंट..

अकाली गेलेल्या मराठी अभिनेत्री हिंदीत प्रसिद्ध स्मिता पाटील, रीमा लागु, भक्ती बर्वे

मानव हा क्ल्यु नाही, नावात नसले तरी चित्रपटात माणसे आहेत.

ह्या चित्रपटाच्या नांवात पक्षी असले तरी अभिनेत्रीच्या दुसर्‍या एका चित्रपटाला प्राण्याचे नांव आहे. तमाशाप्रधान चित्रपटांचा दिग्दर्शक.

अहो ते मानव यांच्या टाइमपासच्या कोड्याबद्दल लिहिलेलं मी.
असो
तुम्ही अजुन क्ल्यु द्या कायतरी

तमाशाप्रधान चित्रपटांचा दिग्दर्शक... या क्ल्यू ने काम केल.... नाहीतर असला पिक्चर कसला येतोय ओळखायला!

तमाशाप्रधान चित्रपटांचा दिग्दर्शक... या क्ल्यू ने काम केल.... नाहीतर असला पिक्चर कसला येतोय ओळखायला!>>>>>>>>> हो.
पहिले जयश्री गडकरच्या दोन तीन सिनेम्याचे दिग्द कोण आहे ते पाहिलं. ते अनंत माने. मग त्यांनी दिग्द केलेले सिनेमे पाहिले. Happy

पाच रंगाची पाच पाखरे

पाच जणांनी ओळखे पर्यंत पुढचा क्लू नाही द्यायचा असे काही आहे का? Wink

लंपन परतेपर्यंत पुढचा क्ल्यू मी देतो

पहिला उरला नाहीस तू.....असा कसा बदललास तू
वेगळाच माणूस झालायस तू ...... दूर कोठे गेलायस तू

Google न करता चित्रपट ओळखा (सोप्पाय अगदी)

Pages