झब्बू क्र. २ - विविध रंगाची फुले

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 23:43

विषय क्र ४ - विविध रंगांची फुलं
तसं पाहिलं तर फुल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ही आणि नाहीही. पण साधारण सजावट हा प्रकार जिथे जिथे म्हणून येतो तिथे फुलं लागतात. प्रत्येक फुलाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहेत. जास्वंदीला गणपती समोर तर बेल शंकरा जवळ असते. मोगरा गजरा बनून स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलवतं तर दुसरीकडे गुलाब प्रेमाचं प्रतिक आहे. प्रत्येकाचा रंग वेगळा, आकार वेगळा, गुणधर्म वेगळा पण काम एकच समोरच्याला आनंद देणे.
मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय चवथा झब्बू विविध रंगाची फुलं.
Screenshot_20180915_080803.png

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण पायेथे पहा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

IMG-20180916-WA0001.jpg

माझा मामेभाऊ अमित याने काढलेला फोटो

Nira, हा वरचा फोटो नागचाफ्याचा आहे का??
तसंच दिसतंय फूल.

@ निधी
या फ़ुलाचे नाव आठवत नाहीये.
डॉ मुखर्जी उद्यान, एरंडवणे येथे आहे हे झाड. कमला नेहरु पार्क मधे पण आहे. चांगले बुंध्याचे झाड आहे.

चांगले बुंध्याचे झाड आहे.>> मग बहुतेक नागचाफाच असणार त्याचंही झाड मजबूत बुंध्याचं असतं, असं ऐकलंय.
पाहिलं नाही कधी.

Pages