झब्बू क्र. २ - विविध रंगाची फुले

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 23:43

विषय क्र ४ - विविध रंगांची फुलं
तसं पाहिलं तर फुल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ही आणि नाहीही. पण साधारण सजावट हा प्रकार जिथे जिथे म्हणून येतो तिथे फुलं लागतात. प्रत्येक फुलाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहेत. जास्वंदीला गणपती समोर तर बेल शंकरा जवळ असते. मोगरा गजरा बनून स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलवतं तर दुसरीकडे गुलाब प्रेमाचं प्रतिक आहे. प्रत्येकाचा रंग वेगळा, आकार वेगळा, गुणधर्म वेगळा पण काम एकच समोरच्याला आनंद देणे.
मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय चवथा झब्बू विविध रंगाची फुलं.
Screenshot_20180915_080803.png

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण पायेथे पहा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

IMAG1011.jpg

IMAG0973.jpg

किती छान छान फुलं आहेत सगळीच. काही तर कधीच न बघितलेली आणि काही कितीतरी वर्षांनी बघायला मिळालेली...उदा. कवठी चाफा आणि कृष्णकमळ. Happy मस्तच.

मैत्रेयीच्या लाल रंगाचे फुलांचे नाव काय ? पिवळा रंगाचे फुल मला चाफा वाटते

छान वाटते या बाफवर येऊन

ते पिवळं बर्ड ऑफ पॅरडाईज आहे. लाल मलाही कळत नाहीये. बहुधा अल्पिनिया. हवाईमधलं फुल आहे का मै?

सगळेच फोटो खूप प्रसन्न आहेत Happy

जाई आणि मॅगी- हो हवाईमधल्या रेन फोरेस्ट भागातली फुले आहेत.
हे वरचे लाल आता गुगल इमेज सर्च केले. Costus barbatus - ( Spiral ginger) असे दाखवत आहे.

bradford_pear.jpg

ब्रॅडफर्ड पेअर्स आणि उजवीकडे प्लम

ट्युलिप्स चा फोटो टाकलाय कुणीतरी आधी. पण मोह आवरत नाही. हा पोर्टलँड जवळच्या एका ट्युलिप फील्ड मधला आहे.

DSCN2821.JPG

Pages