झब्बू क्र. २ - विविध रंगाची फुले

Submitted by संयोजक on 14 September, 2018 - 23:43

विषय क्र ४ - विविध रंगांची फुलं
तसं पाहिलं तर फुल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे ही आणि नाहीही. पण साधारण सजावट हा प्रकार जिथे जिथे म्हणून येतो तिथे फुलं लागतात. प्रत्येक फुलाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहेत. जास्वंदीला गणपती समोर तर बेल शंकरा जवळ असते. मोगरा गजरा बनून स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलवतं तर दुसरीकडे गुलाब प्रेमाचं प्रतिक आहे. प्रत्येकाचा रंग वेगळा, आकार वेगळा, गुणधर्म वेगळा पण काम एकच समोरच्याला आनंद देणे.
मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय चवथा झब्बू विविध रंगाची फुलं.
Screenshot_20180915_080803.png

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण पायेथे पहा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाजार फुलांचा भरला!
वाह! नयनरम्य फोटो आहेत सगळ्यांचे. माझाही छोटासा प्रयत्न.
87DF7889-6EF1-46F2-8350-D83772BEC8FC.jpeg

IMAG0486-001.jpg

जाई, हायड्रेनजीया आहे ह्या फुलाचं नाव अस वाटतय. ह्यात निळा आणि गुलाबी रंग पण असतो. माझ्याकडे गुलाबी रंगाचा आहे फोटो .

DSCN2707-1.jpg

सगळेच फोटो सु...रे...ख...!

निरु, शंकासुराचा दुसरा फोटो पाहतांना मला प्रथम इंक स्प्लॅशचा फोटो आहे की काय असं वाटलं! मस्तच फोटो.

<<<निरु, शंकासुराचा दुसरा फोटो पाहतांना मला प्रथम इंक स्प्लॅशचा फोटो आहे की काय असं वाटलं! मस्तच फोटो.>>>
@ शाली,
पहिला फोटो शंकासूराचा आहे, या पावसाळ्यातल्या, आरण्यक मधला...
आणि दुसरा फोटो मात्र गुलमोहोराचा आहे, कुडाळच्या..
खूप उंचावरचं एकटं फुल आहे.. Zoom करुन काढलेलं.
मला कॅप्चर करतानाच आवडलेला..
तुमच्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप आभार.. _/\_

आणि दुसरा फोटो मात्र गुलमोहोराचा आहे, कुडाळच्या..>> निरू, मला तो गुलमोहोरपन शंकासुर वाटतोय.
त्या लाल रंगात मिसळलेलं पिवळ्या पाकळ्यांच फुल अन त्याचे पराग शंकासुर असल्याचा भास (?) निर्माण करत आहे.
एकदाच्या पाकळ्या सोडून द्या पण गुलमोहराचे पराग चांगले बडिशेपेच्या दाण्याएवढे असतात ना तसेच पाकळ्याच्या तुलनेत खुजे असतात, अधिक कॅलिक्स सुद्धा हिरवकंच अन लांब निमुळत्या पाकळ्या असणारं असत. जोडीला कळ्या टप्पोर्‍या अन जाडजुड असतात, प्रचित दिसताय त्यापे़क्षा लांबड्या सुद्धा..

Pages