माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राधिका पैसे काढून घेते गुरु चे अस प्रोमोत दाखवलय। >>>>> वॉव!

ते गुरूबाळ आणि त्याची बच्चा आॅफीसमध्ये बोलण्यासाठी कागद का वाया घालवतात?
व्हाॅट्सअॅप वगैरे नाहीये का त्यांच्याकडे ?
इथे जग इकोफ्रेंडली होत चाललंय आणि हे नमुने कागद वाया घालवतात... >>>> त्यान्नी श्रीबाळाकडून आदर्श घ्यायला हवा होता.

Happy आता त्या शनायाची कोण फ्रेंड फिलॉसॉफर गाईड आहे तेच समजण्यात पाच सहा एपिसोड्स घालवतील. काल आनंद चा वाढदिवस तर एकदम टाईम पास..नुसती गॅपफील अ‍ॅरेंज मेंट! हा पूर्ण एपिसोड कुठेही फीट झाला असता...आय मीन कथानकाच्या कुठल्याही वळणावर!
आणि उगीचच जेनी व आनंद च्या (भावी!) रिलेशनशिप ची हिंट देताहेत!!! कैच्या कैच ! पण ही शनाया काही केल्या अपील होत नाही!
कुठल्या कुठे चाललीये मालिका....राधिका ही गुरवाच्या बाबतीत सॉफ्ट होत चाललीय. काल तर चक्क दोघं बोलताना दिसत होते...कॅमेरा त्यांच्यावर नव्हता तेव्हा!!! Angry

कुणी तरी इथे मागे भगवी वस्त्रे धारण करून हिमालयी जाण्याचा निश्चय केलेला ना? ओर्डर दिली का नाही भगव्या कपड्यांची..
Wink

४-५ दिवसापुर्वीच्या एका शॉटमधे राधाक्का आणि सौमित्रची जोडी छान दिसेल... अस कैत्री सौमित्रच्या मनात भरवुन दिग्दर्शकाने भावी एपिसोडचे सुतोवाच केले की काय? Uhoh

राधाक्का, गुरवाचे पैसे काढुन घेउन, आप्ली पर्स सारखी त्या दारातल्या शु रॅकमधे का ठेवत असते... काही कळले नाही.
श्या, नेमके सौमित्र शनायाच्या मागावर असताना अपघात होउन राधिकाच्या घरी रहाय्ला आलाय. ! ...
ओता पाणी अजुन.

त्या केड्याला एखादी केडीण आणुन द्या म्हणजे ती त्याचे डोके खाईल. तिकडुन मावशी बोचकारेल, मग केड्या भोचकपणा करणे बंद करेल.

आणि उगीचच जेनी व आनंद च्या (भावी!) रिलेशनशिप ची हिंट देताहेत!! >>>> आगो, ती हिंट तर सिरियलमध्ये आधीपासूनच देत होते, म्हणजे राधिकाला गुरु-शनायाच अफेअर कळल्यापासून. मुळात स्त्री-पुरुष एकमेकान्चे चान्गले मित्र असू शकतात हेच पचत नसाव सिरियलवाल्यान्ना. पटापट जोडया जुळवत चाललेयत एकेकान्च्या.

आणि कोण आहे का बाकी? >>> बकुळाची मुलगी, इशा, श्रेयस, भक्ती.

पण काल तो जानुबाईंचा मित्र नाराज झाला ना >>>> का?

जेनी - आनंद >>> इतकी काय वाईट जोडी नाहीये ही.

पण ही शनाया काही केल्या अपील होत नाही! >>>> ++++१११११११

तुला पाहते रे बघताना एक प्रोमो बघितला. राधिकाचा पुन्हा एकदा अ‍ॅक्सिडेन्ट होताना दाखवलाय.

बड्डे बॉयने जेनीला आधी केक भरवला त्यामुळे श्रेयस ( मघाशी नाव आठवत नव्हतं) झाला.
त्याला दोस्ताना हवा असेल.
त्याचा आणि गुरूचा असा एक track दाखवलाय ना आधी?
तेव्हा मी मालिका पाहत नसे. इथे वाचल्याचं आठवतंय.

त्याला दोस्ताना हवा असेल. >>>> Rofl

त्याचा आणि गुरूचा असा एक track दाखवलाय ना आधी? >>>> हो. श्रेयस गुरुला त्याच अफेयर घरच्यान्पासून लपवण्याचा प्रयत्न करतो. सो गुरुच्या घरच्यान्ना (राधिकालाही) त्या दोघान्च 'काहीतरी' आहे असा डाउट येतो. Biggrin

असलं काहीतरी दाखवलं होतं?? बॉप्रे बराच फॉरवर्ड आहे की खेड्या।। >>>> काही फॉरवर्ड बिरवर्ड नाही. आमची सिरियल 'मागासलेली' नाही हा, हे सान्गण्यासाठी केलेली खटपट होती ही.

मला ती राधिका ची ऑफिसमधली कलीग (तिला अ‍ॅम्ब्युलन्स ने नेणारी) आणि ही नवीन शनाया यांच्यात अजूनही गोंधळ होतो. राधिका ओरडली तर ती शनाया, आणि नीट बोलली तर ती कलीग असे लॉजिक लावून ओळखतो कोण कोण आहे.

एकच ऑफिस सारखी वाटणारी रूम नेपथ्य बदलून आलटूनपालटून ही सिरीज व तुपारे करता वापरत असावेत का?

हो, आणि तो गुरु केड्याजवळ बसलेल्या खोट्या सह्या करण्याची प्रॅक्टीस करणार्या मुलान्ना फटकारताना दाखवला.
आता याच गुरवाने त्या मुलाना हाताशी धरुन.... राधाक्काच्या खोट्या सह्या करुन कम्पनी स्वत:च्या नावावर नाही केली म्हण्जे मिळवली. Angry
त्यात राधाक्काला मेन्दुला जबर मार बसलाय अस दाखवलेय... म्हण्जे याददाश्त जाणार काय ? Uhoh

धनश्री... Biggrin
याददाश्त जाणार? ..... न ही.......!!!!!!!
प्लीजच!!
जान्हवी सारखी पार्शल याददाश्त नको जायला....!
प्रेक्षकांची याददाश्त जाण्याचे काही उपाय नाहीत का? या सिरीयल ने केलेले आधीचे सगळे अत्याचार तरी विसरले गेले असते.....

<<राधिका तोंडात लाल रंगाची गुळणी धरून गाडीवर आपटली असं स्पष्ट दिसलं <<
हो हो अगदी! कारच्या बॉनेटवर आपटली तेव्हा दिसले. Proud

प्रेक्षकांची याददाश्त जाण्याचे काही उपाय नाहीत का? या सिरीयल ने केलेले आधीचे सगळे अत्याचार तरी विसरले गेले असते.....>>>> Lol
तरीही काही वायरस जात नाहीतच हो. एकेक प्रकार असले दाखवलेत सिरियलमधे की विसरणे शक्य नाहीच. "अचाट" Lol

मला फायनली बोअर झाली ही सीरीअल. सवयीने बघते. पण चार्म नाही. राधिका स्टुपिडला शनाया करत रोड वर पळत कशाला जायला हवे?
परत ते बिन्डोक कलीग चला चला जाउया करतात. एक दिवसाचे ऑनेस्ट काम काही कोणी करताना दिसत नाही. तीनशे कोटीची कंपनी म्हणे.

नवीन प्रोमोमध्ये राधिका कोमात गेलेली दाखवलीये.

जान्हवी सारखी पार्शल याददाश्त नको जायला....! >>>>+++++१११११११ नाहीतर पुन्हा ८ वर्षापुर्वीची राधिका बघायला लागेल. गुरु पुन्हा मागल्या पानावरुन पुढे करत शनायाशी अफेअर कन्टिन्यू करेल.

गुरुमाता आणि अर्थवला आनन्द होईल, राधिकाच ऑफिस कायमच सुटल आणि मनासारख जेवण मिळत म्हणून.

राधिका तोंडात लाल रंगाची गुळणी धरून गाडीवर आपटली असं स्पष्ट दिसलं >>>> इथे रक्त तरी दिसतय. जान्हवीचा अ‍ॅक्सिडेन्ट आठवा, रक्ताचा एक थेम्ब सुद्दा पडला नाही, बाईसाहेब स्मूदली पडल्या रस्त्यावर, आणि म्हणे याददाश्त गेली. Lol

राधिका स्टुपिडला शनाया करत रोड वर पळत कशाला जायला हवे? >>>>> नैतर काय.

गुरुमाता आणि अर्थवला आनन्द होईल, राधिकाच ऑफिस कायमच सुटल आणि मनासारख जेवण मिळत म्हणून. >>>> तो अथर्व आहे कुठे?
मुम्बईत की नागपूरात ?

Pages