माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रश्मी!
सिरियल बघितली नाही ते बरंच आहे असं वाटतंय Happy

शनाया आरजे बनली का? चान्गलच आहे, काही न करण्यापेक्षा हे बर आहे उलट. शेवटी मार्गाला लागली म्हणायची. फक्त तिने आता राधिका मसाले सोडून दयाव.

शनाया श्रेयसमध्ये तेवढी इण्टरेस्टेड नाहीये अस दाखवलय. पण ती राधिका तिच्या मानगुटीवरच बसेल ' श्रेयसशी लग्न कर, श्रेयसशी लग्न कर' म्हणत. नाहीतरी तिला हौसच आहे दुसर्यान्च्या पर्सनल आयुष्यात घुसण्याची.

श्रेयस शनायाला मुळीच शोभत नाही. तिला तिच्या लाईफस्टाईलला शोभेलसा मुलगा आणायला हवा सिरियलमध्ये.

ही सिरीयल चार दिवस सासूचेचा रेकॉर्ड मोडेपर्यंत चालवणार आहेत की काय, संपतच नाहीये Lol

चालुद्या चालुद्या, चिरंजीवी आहे.

शनाया फार गोड दिसत होती लग्नात...आणि कुणाल शोभतो तिला सुलू....... अगदी स्मार्ट, उंचनिंच, राजबिंडा आहे.

शनया आणि बोक्या उर्फ सौमित्र यांचे जरा जास्तच गूळपीठ झालेले दाखविले आहे.
एव्हरी थिंग इज टू मच टू टॉलरेट एनी वे.......................................

सिरीयल संपली नाही बहुतेक.. पुढचा भाग दाखवला ..गुरु मायाला परत घोळात घेतो असे काहीतरी होते. पण वेळ बदलली वाटते..

शनाया पुन्हा अमेरिकेत येणार आहे म्हणे .. असं वाचलं कुठेतरी त्यामुळे कुणाल सोबत लग्न करून ती गायब होणारे असं दिसतंय... आता माया आणि राधाक्का मिळून गुरु ला धडा शिकवणारेत... हाहाहाहा

जेनीच्या डिलिव्हरी ला बराच वेळ आहे

राधक्का आता ऑफिस मधल्या सहकाऱ्यांना घेऊन जाऊन गाव-खेड्यातील बायकांच्या अडचणी सोडवणार आहे म्हणे,तिला या समाजचं देणं वगैरे फेडण्यासाठी इथून पुढचं आयुष्य खर्च करायचं आहे ...असं मायाला सांगून म्हणते की गुरुनाथ ला धडा शिकवणे,बदला वगैरे मध्ये मला इंटरेस्ट नाही
So आता माया,सौमित्र, शनायाची आई, केड्या असे सगळे मिळून गुरूला धडा शिकवण्याचा plan करत आहेत

6:30

थोडासा भाग बघितला होता ह्याचा रविवारी. शनाया होती काही सिन्ससाठी. थोडी जाड झालीये आणि मॅच्युअर्ड वाटत होती.

बादवे रसिकाच खरच लग्न झालय का? तुनळीवर तिचे कुणा आदित्य बिलगी नावाच्या मुलाबरोबरचे व्हिडिओज दिसतायेत.

हो.. तिचं लग्न झालंय बहुतेक..

एकदा का झीची सिरियल संपली की हीरॉईनच्या नशिबी तरी वनवासच येतो.. एखादीच शेवंता लगोलग दुसरी सिरियल पटकावून हातपाय मारू शकते.

2 तासाच्या महा(बोअर)एपी मध्ये...
राधक्का चा सत्कार समारंभ, त्यात 5-6 स्त्रिया(कामवाली,शेजारण्या,जेनी,बोर्ड ऑफ directer पोस्ट च्या मॅडम) राधक्का चं खूप खूप खूप खूप कौतुक करतात, एकूण तिचा प्रवास ...ती माणूस म्हणून कित्ती चांगली आहे, अडचणी वर मात केली, समाजसेवा करते वगैरे या साठी 1 तास
आणि
शण्या, माया,आणि गुरुनाथ च्या कॉलेज मधील 10 पोरी(ज्यांच्याशी गुरू ने पैसा, अभ्यास,नोट्स वगैरे साठी लफडी केली होती) त्या सगळ्या मिळून त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून द्यायचा अत्यंत बालिश अन हास्यास्पद प्रयत्न करतात यात 1 तास
असे प्रेक्षकांचे हाल करून..
असे दाखवून शेवटच्या एक मिनिटात, ह्याच शेवटा साठी केला होता अट्टाहास असं वाटणारा सिन दाखवला
तर तो असा..
सगळ्या बायकांनी अपमान केला की गुरू वैतागून रस्त्यावर बडबडत फिरत असतो की नको ह्या बायका आता आयुष्यात, आणि अचानक कॅब वाल्याने चुकीच्या ठिकाणी सोडलं,जरा पत्ता सांगता का म्हणत 'श्रुती मराठे' गुरूच्या आयुष्यात येते..
और हमरा हिरो उसके साथ निकल पडा...

@स्वस्ति- जेनी प्रेग्नंट असतानाच सत्कार समारंभात भाषण करते इतकंच दाखवलंय,

ते मूल वगैरे पार्ट 2 मध्ये दाखवतील Uhoh

तेजो........ Happy अरे बापरे........ म्हणजे सिझन २ येणारे का...?

नको नको...........................!!!!
पण थँक्स फॉर द अपडेट! बरं झालं एपिसोड नाही पाहीला.....! आणि सासू सासरे, अथर्व, रेवती, महाजनीकाका, सासू सासरे क्र २.....वगैरे कुणीच नाही दाखविले का?
श्रुती मराठे गोड दिसते अगदी.....!! आणि गुरवाला सगळ्या जणी (माया अपवाद) थोराडच मिळतात का? का?
Lol

ऑफिस मधला सगळा स्टाफ(पुरुष),महाजनी काकू, बकुळा मावशी, सासू-सासरे क्र-1, जेनी, साठे मॅडम, शेवटी ज्या गावात कारखाना उभा करणार असते त्या गावातील सरपंच बाई आणि एक कामगार महिला एवढे जण होते
अथर्व आधीच्या एका भागात दाखवला होता,शेवटच्या भागात नव्हता
आदर्श नवरा-सौमित्र हवाच.. कौतुक करायला अन करवून घ्यायला

म्हणजे सिझन २ येणारे का...?

नको नको...........................!!!! >>>>>>>>> अगदी अगदी

श्रुती मराठे गोड दिसते अगदी... >>>>>>>>> हो. हिला स्टार प्लसच्या 'रुद्रकाल' सिरियलमध्ये बघितलय. बरीच बारिक झालीये. आणि गुरवाला सगळ्या जणी (माया अपवाद) थोराडच मिळतात का? का? >>>>>>>> शनाया आधी बारीकच होती, आता थोराड झाली असेल.

गुरुनाथ च्या कॉलेज मधील 10 पोरी(ज्यांच्याशी गुरू ने पैसा, अभ्यास,नोट्स वगैरे साठी लफडी केली होती) >>>>>>> हे राधिकाला माहित नव्हत इतकी वर्ष? ती तर त्याच्याच कॉलेजमध्ये होती ना. धन्य!!!!

Pages