माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके. पण तिने तर हॉस्पिटल मधे नेले आहे सांगितलेले असते ना? आणि अथर्व सुखरूप आहे हे राधिकाला नंतर कळते.

हॉस्पिठलमध्ये नेले हे सांगितले का आठवत नाही.
अथर्व आजोबांसोबत असल्याचा फोन तिला त्या स्पॉटवर असतानाच येतो.
फारेण्ड, लॉजिक शोधू नका.
केस गळतील.
या मालिकेत किमान पाच लेखक दिग्दर्शक अभिनय करताहेत.
रोहिणी निनावे, अभिजीत गुरू, अद्वैत दादरकर, आनंद झालेला राजदा आणि किरण माने( राधिकाचा भाऊ)
शेवटच्या तिघांची नाटकं आहेत.
आणि सोनी मराठी आली तेव्हा हे लोक म्हणत होते मराठी मालिका लेखकावर आता कामाचा आणखी ताण येणार.

केस गळतील Proud सोनीच्या मालिका सध्यातरी चांगल्या आहेत, त्यांनी या पाणी घालू निष्णात मंडळींना न बोलवलेलं बरं.

राधिकाला दिव्यद्रुश्टी असल्याने निनावी फोनवाल्याने पत्ता न सान्गता ती बरोबर अ‍ॅक्सीडेन्ट स्पॉट वर जाते तेव्हा तिला शनाया पण दिसते ना? तिला बघुन ही बया मागचा पुढचा विचार न करता तोन्डात गुळणि धरुन रस्ता क्रॉस करते..

अरेरे. वाईट बातमी. राधिका शुद्धीवर आलीय.
शनायाने तिच्यासमोर दिलेलं कन्फेशन आणि गुरूने सांगितलेला प्लान तिने ऐकलाय आणि ती बेशुद्ध असण्याचं नाटक करणार आहे.

शनायाने तिच्यासमोर दिलेलं कन्फेशन >>>>>> शनाया कधीपासून सुधारली एवढी, कन्फेशन देण्याइतकी? Uhoh

ती बेशुद्ध असण्याचं नाटक करणार आहे. >>>>> गुड, आतातरी तिला चान्गली अक्कल येऊन योग्य निर्णय घे म्हणाव. निदान प्रेक्षक तरी सुटतील कायमचे.

पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी वर खोटी सही घेउन मालकी मिळवणार म्हणे तो गुरू. ही काही कोटींची कंपनी फॉर्म केली तेव्हा काही लीगल डॉक्युमेण्ट्स, रजिस्ट्रेशन, संचालकांच्या जबाबदार्‍या, राधिका उपलब्ध नसेल तर कोणाकडे निर्णय घेण्याचे हक्क आहेत वगैरे केलेले नसावे असे दिसते.

एकूणच कितीही मोठी कंपनी व तिचे ऑफिस म्हणजे एक मोठी रूम, काही डेस्क्स, एक दोन कॉम्प्युटर्स, एक शिपाई, आणि सेमी-फॉर्मल कपड्यांतले लोक. काही फाइल्स, काही फाइल्स आणि मीटिंग ची चर्चा असलेले संवाद. कंपनीच्या अधिकार्‍यांच्या कामापेक्षा त्यांच्या भूतदयेची जास्त चर्चा - इतकेच असते असे दिसते. तुपारे मधेही तेच. बाकी सगळे घरगुती राजकारण.

मग? मराठी कंपन्यांत सुद्धा कौटुंबिक जिव्हाळ्याचं वातावरण असतं.
हे ऑफिस तरी बरं आहे. आधीच्या ऑफिसात पानवलकर, आनंद आणि श्रेयस व्हिजिटर्ससाठीच्या वेटिंग एरियात बसून काम करायचे.
काम म्हणजे राधिका वहिनी किती ग्रेट आणि आज आपण कशाबद्दल पार्टी करायची यावर चर्चा Wink

तेव्हा मी दोनदा बघितलं सर्फिंग करताना तर फाफडा, जलेबी, समोसा असं काय काय आनंदने मागवलेलं. मला दोन्ही वेळा समोसे उचलून खावेसे वाटले. अशा ऑफीसमधे काम करायला कीत्ती मज्जा असं वाटलं, खातंच रहा Lol

हो ना!
या ऑफिसमध्ये बाहेरचं खाणं मागवण्यावर बंदी आहे म्हणे.

हो तो एपिसोड आख्खा बघितला होता, वडापाव आणतो गुरु शनायासाठी गुपचूप.

पण आधी मध्ये दोनदा मला नेमके खाण्याचे पदार्थ दिसले होते जुन्या ऑफिसमधले तेव्हा बरं वाटलं. चला बाकी काही बघण्यापेक्षा चरुया आनंदसारखं Lol

फारेण्ड, मराठी मालिकालेखकांच्या डोक्यातलं उद्योगविश्व कसं असतं हे बघायचं असेल, तर तुम्ही राधिकाने ए एल एफ साठी ऑक्शनमध्ये विनिंग बिड केली तो एपिसोड शोधून बघा. परत कसलेही प्रश्न पडणार नाहीत.

हे घ्या. तुमच्यासाठी कायपन

भरत - धन्यवाद Happy पण आमाला पावर नाय. म्हणजे इथे उसगावात अ‍ॅक्सेस नाही. मी शोधतो तो भाग कोठे मिळतो का Happy त्या अ‍ॅप बद्दल नुकतेच वाचले. ते फोन वर डाउनलोड केले तर त्यातून मिळेल बहुधा.

काल श्रेयस म्हणत होता आपल्या इतर बॅन्चेस मधुन पण फोन आले राधिका मॅमच्या तब्यतेतिची चौकशी करायला.... या सगळ्या पारब्या कधी फुटल्या म्हणे राधिला मसालेला?

काल श्रेयस म्हणत होता आपल्या इतर बॅन्चेस मधुन पण फोन आले राधिका मॅमच्या तब्यतेतिची चौकशी करायला.... >>> अंहं मॅम नाही. राधिका वहिनी. 300 cr ची कंपनी, पण ओनर वहिनी आणि तो कोणी VP की डायरेक्टर आहे तो मिटिंग मध्ये सुद्धा आंनद भावजी. आणि इटर्नल मिटिंग नाही हा, बाहेर कुणा समोर प्रेझेंटेशन देत होते वहिनी आणि भावजी.

हे आधीपासून चालले आहे. हाफीसात काम न करता गुरू च्या पर्सनल लाईफ बद्धल डिस्कशन. आनंद , पानवलकर वगैरे जेंव्हा बघेल तेंव्हा ऑफिसात राधिका कौतुक सोहळा सुरू करायचे, गुरूला दोष द्यायचे.

सगळ्या कमेंट्स.. भारी! Biggrin
मीही तोच विचार करत होते की राधिका मसाले च्या ब्रँचेस ही निघाल्या? कधी?
मग वाटलं की बहुतेक ए एल एफ च्या असतील!
केड्या ला दोन दोन मालीकांची जबाबदारी पेलेत नाहीसं दिसतंय...इल्लॉजिकल पणा वाढत चाल्लाय ना!

केड्या ला दोन दोन मालीकांची जबाबदारी पेलेत नाहीसं दिसतंय...इल्लॉजिकल पणा वाढत चाल्लाय ना!>> Lol केडया सकट गॅरी ला पकडण्यासाठी नवा प्लान आहे बहुतेक

आनंद आणि सौमित्र हे गुरू आणि राधिका चे बॅचमेट्स ना ? मग एक सौमित्रा (आणि राधा ) , आणि एक भावजी (आणि वहिनी ) कसं काय ?

सौमित्र कॉलेजात असताना एकतर्फी प्रेम करत असतो राधावर. पण गुरु आणी राधिकाची जोडी जमते मग तो बाजुला होतो.

ते आजच्या कोर्टाच्या निकालाचा 'विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही: सर्वोच्च न्यायालय' काही परिणाम आता राधिका आणि गॅरी च्या केसवर? केड्याला पाणी घालायला अजून स्कोप दिला बघा न्यायालयाने! Wink

Pages