Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13
दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च
तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अच्छा , धन्स .
अच्छा , धन्स .
ती नविन शनाया आल्यापासून काही राम राहिला नाही .
सगळेच पाट्या टाकतायेत वाटतं .
तो राधाक्काच्या अॅक्सिडेन्टचा एपिसोड बघितला. जेनीचा अभिनय आवडला . राधाने गुळणी धरली होती ते कळलं .
पण राधिकाने ते कागद फाडले
पण राधिकाने ते कागद फाडले कशाला?
पोलिसात देता आलं असतं. >>>
कागद म्हणजे खोटं अॅग्रीमेंट वगैरे का, ते गॅरीने केलं असेल तर राधिका अतिआगाऊ. नव-याला वाचवते नेहेमीच. ते तिला घटस्फोट घ्यायला पण तिला उपयोगी पडलं असतं. कमीतकमी सासूला तरी दाखवायचं. माह्या लेकरु कसं आहे ते कळलं असतं.
काल मी थोडा पाहिला, पण त्यात
काल मी थोडा पाहिला, पण त्यात राधिका हॉस्पिटल मधे नर्सेस ना गिफ्ट देत अस्ते तेवढ पाहिल . मी पहाते तेव्हा हा आहेर प्रकार चालूच अस्तो राधाकांचा. मागच्या वेळीही एकदा `आई , तुमच्यासाठी साडी आणल्ये' ', त्याच्या आधी एकदा नाना-नानी, बकुळा इ. ना गिफ्ट्स! एकदा सौमित्र बरोबर गाडीत कोणाला काय घ्यायच याची लिस्ट !
सुलु कळलं .
सुलु कळलं .
मी मस्करी केली ओ >>>>>
अन आता काय राधाक्का शनायाबरोबर हातमिळवणी करणार म्हणे. >>>>> काल प्रोमो पाहिला. राधिका शनाया हातमिळवणी करणार आहे गुरु विरोधात. आपल्या दोघीन्चा गुरुनाथने वापर केला आहे असे काहीतरी म्हणत होती राधाक्का.
ती नवीन शनाया कित्ती डोळे मोठ्ठे करुन बोलते!
नविन सिरीयल प्रोमो दिसला आणि ती त्या जागी असेल तर आणि तरंच ह्या मालिकेचा शेवटचा एपिसोड येईल >>>>> नवीन सिरियलचा प्रोमो आला? कधी? मला नाही दिसला तो.
राधिका शनाया आता गुरु विरोधात जात आहेत, तर शनाया राधिकाबरोबर राहून सुधारते, दोन्ही बायका गुरुवाला सोडतात, आणि सिरियल सम्पते अस दाखवल तर बेस्टच होईल. पण केडयाकडून तशी आशा ठेवणे म्हणजे महामुर्खपणाच! 
काल शनाया पिऊन जरा सा झूमलू मैं वर नाचली रस्त्यावर >>>> जुनी शनाया हवी होती. मजा आली असती.
बघतोय.. बघतोय! आता येणारा
बघतोय.. बघतोय! आता येणारा एपिसोड तरी शेवटचा असेल ... या अपेक्षेने बघतोय. >>>>>;)

इथे वाचून इंटरेस्टिंग वाटलं
इथे वाचून इंटरेस्टिंग वाटलं म्हणून आत्ता एपिसोड बघितला मी, तो गुरु कसला आहे. सॉलिड डाव उलटवला त्याने. राधिकाने तरी फाडण्याआधी वाचायचं ना, आईला मस्त घोळात घेतलं, तिचं माह्या मुलगा महान सुरूच राहणार. गुरु सॉलिड पोचलेला आहे, सिरीयल अनंत काळापर्यंत चालवायची आहे, हे ही सिद्ध झालं.
हो ना. माती खाल्ली शेवटी
हो ना. माती खाल्ली शेवटी राधिकाने.
ताणायला काहीही फिरवतात. मी आता टाटा करणार मालिकेला. बाबांना बघायचीय, त्यांना एकट्यांनाच बघू देत.
ती नवीन शनाया कित्ती डोळे
ती नवीन शनाया कित्ती डोळे मोठ्ठे करुन बोलते! >>> ती वेडसर वाटते त्यामुळे
आता पुन्हा राधाक्का गुरवाला
आता पुन्हा राधाक्का गुरवाला एक चान्स देणार. पुन्हा कुरघोड्या... चालु द्या!
गुरूने आता राधिकाला पूर्ण
गुरूने आता राधिकाला पूर्ण नेस्तनाभूत का काय म्हणतात ना ते करून टाकावं आणि मोकळं व्हावं.
एवढी मोठी कंपनी सांभाळण्याची कुवत नाहीच राधिकामधे. घरचा माणूस कंपनी हडपायला बसलाय तो सावरता येत नाही तिला...मग मार्केटमधे अजून हजारो कंपन्या असतील ज्या एएलफ हडपायच्या मार्गावर असतील, त्यांना काय अडवणार ही.
सासू तर बाई महान. पोरगा लाथ मारून घरातून हाकलून देईल ना तरी ही बाई म्हणेल " मा पोट्टा जे करीतो ते आपल्या चांगल्यासाठीच ना ओ...मारू दे की लाथ...काय होते त्याने"...
ती नवीन शनाया कित्ती डोळे
ती नवीन शनाया कित्ती डोळे मोठ्ठे करुन बोलते! >>>> ति त्या मल्हार मध्ये सुद्धा अशिच विचीत्र वाटायची, आधीच मोठे असलेले डोळे अजुन वटारुन, त्यात भर ओव्हरअॅक्टींगची त्यामुळे बघवत नाही
तिच्यावर काल उगाच मधेच कॅमेरा
तिच्यावर काल उगाच मधेच कॅमेरा न्यायचे. ती मला मल्हार मध्ये पण अजिबात आवडली नव्हती, इथे पण नाही आवडली. पण मला आवडणारा ऋषी सक्सेना तिच्या प्रेमात आहे.
ही नविन शनाया तर पुरती मॅडच
ही नविन शनाया तर पुरती मॅडच दिसायला लागलीय. डोळे विचित्रच फिरवते ती.
Latest news :TRP मध्ये मानबा
Latest news :TRP मध्ये मानबा 1 नम्बर !!!!अजून बघा ही मालिका आणि चिरायू बनवा या मालिकेला ......टाईम स्लॉट भारी भेटला आहे लोक दमून घरी येतात आणि टीवी वर हे लोक अवतरतात ..
कुठे त्या zee च्या आधिच्या मालिका आणि आताच्या !!!!गेल्या 2 3 वर्षात पुर्ण दर्जा गेलाय
नवीन प्रोमो बघितला. त्यात
नवीन प्रोमो बघितला. त्यात अर्थव राधिका आणि गुरुला घराच मॉडेल दाखवत होता. राधिका गुरुला ' मी तुम्हाला तुमची कम्पनी देऊन टाकते, मला नकोय ती.' अस काहीस म्हणाली. गुरु आता तिला घरातूनही हाकलण्याचा विचार करतोय अस दाखवलय प्रोमोत.
छान. असंचं दाखवतील, नाहीतर
छान. असंचं दाखवतील, नाहीतर पाच दहा वर्ष चालणार कशी.
कैच्या कैच!
कैच्या कैच!
राधिका आणि सौमित्र कुठे भेटतात नेहमी त्या निर्जन तलावाकाठी? ते ठिकाण नक्कीच दूर असणार घरा- गावापासून...कसे काय जातात ऑफन ? त्यातून ही तर इतकी पेशंट! हे नाही वाटतं कुणाच्या डोळ्यावर येत...?
अगदी सासरे, ती बकुळा मावशी, नानी, जेनी...कुण्णालाच काही वाटत नाही?
बाकी कुणीही राधा म्हणात नसताना...त्यानेच एकट्याने राधा म्हणणं......मला तर वाटला असता बुआ संशय....!
आणि आता तर काय राधम्मांना विरक्तीच आलीये..................................!!
मला बोअर झाली आता सिरीयल..................!!
कंपनी आहे की खेळणंं. तीनशे
कंपनी आहे की खेळणंं. तीनशे कोटी परत दिले की नाही काही पत्ता नाही आणि चालली त्याग करायला. लोकांची हयात जाते कंपनी मोठी करण्यात.
राधिका आणि सौमित्र कुठे
राधिका आणि सौमित्र कुठे भेटतात नेहमी त्या निर्जन तलावाकाठी? ते ठिकाण नक्कीच दूर असणार घरा- गावापासून...कसे काय जातात ऑफन ? त्यातून ही तर इतकी पेशंट! हे नाही वाटतं कुणाच्या डोळ्यावर येत...? >>>> मग काय झाल? गुरुने केल तर चालत. मग राधिकाने का करु नये?
कंपनी आहे की खेळणंं. तीनशे कोटी परत दिले की नाही काही पत्ता नाही आणि चालली त्याग करायला. लोकांची हयात जाते कंपनी मोठी करण्यात. >>>>>>> ++++++११११११११११
राधाक्का च काय काम असेल
राधाक्का च काय काम असेल तुंबाड मधे..??
तसं नाही सुलू.....! गुरवाने
तसं नाही सुलू.....! गुरवाने शेण खाल्लं म्हणून राधिकाने खायचं का? गुरवाचं योग्य नाहीच..पण म्हणून त्याला धडा शिकवायला इ इ......रधिकाचं ही योग्य ठरेल का?
आय मीन........... सिरीयलच्या लोकांच्या मानसिकतेतून विचार करुन बघ.
अर्थात राधिकाच्या बाजूने सौमित्र बद्दल तिच्या मनात काहीच नाहीये.
मागे कधीतरी गुरु जाम जळतो
मागे कधीतरी गुरु जाम जळतो राधिका सौमित्र मैत्रीवर हे बघितलं होतं, म्हणजे स्वतः अफेअर करायचं आणि बायकोने मैत्रीही नाही करायची ही कित्ती बेकार मानसिकता आहे त्याची.
गुरवाने शेण खाल्लं म्हणून
गुरवाने शेण खाल्लं म्हणून राधिकाने खायचं का? गुरवाचं योग्य नाहीच..पण म्हणून त्याला धडा शिकवायला इ इ......रधिकाचं ही योग्य ठरेल का?
आय मीन........... सिरीयलच्या लोकांच्या मानसिकतेतून विचार करुन बघ. >>>>>>> इतके वर्ष शनाया गुरु एकत्र लग्नाशिवाय सोसायटीत राहत होते तेव्हा सिरियलच्या लोकान्ना काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त नावे ठेवण्यापलीकडे सोसायटीने काहीच अॅक्शन घेतली नाही त्यान्च्या विरुद्द. राधिका सौमित्रला सोसायटीबाहेर फक्त भेटते, त्यात आक्षेपार्ह काही नाहीये. विवाहबाहय सम्बध हे वाईटच, मग ते स्त्री ने केले किव्वा पुरुषाने. पण तिने गुरुला धडा शिकवण्यासाठी जर अस पाउल उचलल असेल तर तो तिचा चॉईस, सोसायटीने मध्ये पडू नये. गुरुने अफेयर करताना घेतली होती का सिरियलच्या लोकान्ची, सोसायटीची परवानगी?
पण म्हणून त्याला धडा शिकवायला >>>>>> बाकी गुरुला धडा शिकवायला तिने काहीही केल, अगदी सौमित्रशी प्रेमाच नाटक केल तरीही गुरु काही सुधारणारा नाही हि काळया दगडावरची पान्ढरी रेघ आहे.
मागे कधीतरी गुरु जाम जळतो
मागे कधीतरी गुरु जाम जळतो राधिका सौमित्र मैत्रीवर हे बघितलं होतं, म्हणजे स्वतः अफेअर करायचं आणि बायकोने मैत्रीही नाही करायची ही कित्ती बेकार मानसिकता आहे त्याची. >>>>>> अगदी अगदी
आता गुरु आईकडुन सौमित्र आणि
आता गुरु आईकडुन सौमित्र आणि राधाक्का मधे फुट पाडणार आहे.
कथक चं काय काढलं आता मधेच?
कथक चं काय काढलं आता मधेच?
कथक चं काय काढलं आता मधेच? >>
कथक चं काय काढलं आता मधेच? >>>>> कोण करत कथक? गुरु? की शनाया?
राधाक्का अजुन कोण असेल?
राधाक्का अजुन कोण असेल? मागच्यावेळी नेहाला नाचाच्या शिकवणीसाठी सोडायला जाते तेव्हा तीच तिथे नाचते.
सगळ्या जोड्या जोडायच्या आणि तोडायच्या......राधाक्का-गुरु, मग रा विरुद्ध गनाया, राधा-सासू सासरे, राधाक्का-शनाया, गुरु-सासू, राधाक्का-सौमित्र, राधाक्का-रेवती.
कोण करत कथक? गुरु? की शनाया?
कोण करत कथक? गुरु? की शनाया? >>
फायनली राधाक्का भानावर आल्या.
फायनली राधाक्का भानावर आल्या. आता ऑफीस जॉईन कराय्चे म्हणत आहेत.
Pages