माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या ही पेक्षा भंगार नवीन पोस्टर आहे....एक शनाया काय गेली इतकं काय बदलून टाकलं...नशिब इशा तिचेच कपडे घालतेय (किंवा मायरा चे Lol )

शांतपणे निरोप द्यायला हवा होता मालिकेला शनाया नवीन न आणता, ती सोडून गेली आई बाबांकडे आणि नवीन शिकायला US ला गेली तिथून.

इथे राधिकाने पण हद्दपार करायचे गुरूला मग मालिका संपवायची होती.

राधिका, गुरू, शनाया तिन्ही chara करणारे कलाकार ती ती भूमिका उत्तम करत असल्याने, नवीन रिप्लेसमेंट कोणाचीही खरं म्हणजे योग्य नव्हतं. +++++११११११

बादवे, तो गुरु सुधारला का?

बादवे, तो गुरु सुधारला का? >>> अजून तरी नाही .
राधिका सौमित्रला सांगत होती , माणूस नेहमीस चुकतो असं नाही .
त्याला सुधरता येतं . आणि मला यांना सुधरलेलं बघायचयं वगैरे असचं काहीतरी .

रच्याकने , नाना-नानी आता दादा-दादी झाले हं .

त्याला सुधरता येतं . आणि मला यांना सुधरलेलं बघायचयं वगैरे असचं काहीतरी . >>>> राधिकाने गुरुला वठणीवर आणायच आय मीन सुधारण्याच चान्गलच मनावर घेतलय अस खालच्या लिन्कवरुन वाटतय. Lol

https://www.youtube.com/watch?v=JaUYqBJvgp4

काल गुरुमातेने मुलाला सुनेच्या पदरात घातलंच शेवटी.
तिनेही वचन दिलं, मी त्याचं काहीही वाईट होऊ देणार नाही.
बरं नव्या शनायाचा नवा फ्रे़ंंड कोण असेल गेस करूया.
मोनिकाचा तो लबाड मित्र येईल का इथे?

बरं नव्या शनायाचा नवा फ्रे़ंंड कोण असेल गेस करूया...>>>>>> मला वटतय की ती कोणीतरी मैत्रिण आहे, करण शन्याने राधक्कासमोर चुकून अस म्हणलेल दखवलय "पैसे transfer केले तिने " .... Lol
किन्वा बनी असु शकतो...

छे! भक्ती मिस इतकी हुशार अन कावेबाज नाहीए.
मे बी...नवीनच पात्र घुसवतील...किंवा मग ती एक राधाक्का ला खुन्नस देणारी होती ना...तिच्या खाली हिचं मसाल्यांचं दुकान होतं आणि पाणी ओतलेलं तिने.... ती.... असेल!

राधिका सौमित्रला सांगत होती , माणूस नेहमीस चुकतो असं नाही .
त्याला सुधरता येतं . आणि मला यांना सुधरलेलं बघायचयं वगैरे असचं काहीतरी . > बापरे !

हो न.....हे भयावह आहे.
समहाऊ राधिका कधीच गुरवाला राँग म्हणालेली नाही....... नेहमी शन्याच वाईट. आत्ता अगदी कालही ती आई ऑफीस मधे आलेली तर शनायाला म्हणे...,"ए, तू गप बस गं बह्यताड!.."
का ? असं का?
एक कानफटीत मारुन हाकलून द्यावा ह्या योग्यतेचा तो गुरु.... त्याला काय पाठीशी घालायल्यात सासवा सुना...

त्या शनायाचा काही कोणी नवीन मित्र वा मैत्रिण नसावा बहुतेक, ती राधिकाला तसेच हॅरॅस करायला बघतीय. जेणे करुन राधाक्का सतत विचार करत राहील, तिचे कामात लक्ष रहाणार नाही, मग धंद्यात नुकसान होईल. नवा डाव खेळतेय शन्या. मी मालिका बघणे सोडुन दिले, पण हे लोक सारखे नवीन भागाची झलक दाखवतात तेव्हा पाहीले.

मे बी...नवीनच पात्र घुसवतील...किंवा मग ती एक राधाक्का ला खुन्नस देणारी होती ना...तिच्या खाली हिचं मसाल्यांचं दुकान होतं आणि पाणी ओतलेलं तिने.... ती.... असेल! >>>>+++११११

परवा झी ५ वर नविन शनाया बघुया म्हणून लावलं, एक सीन बघितला आणि काय ती रसिकाची कॉपी करायला गेली पण रसिकाला शोभायचे ते चेहरा हावभाव, ही ओढुनताणून करते. फार विचित्र. अजिबात बघू शकले नाही इशा केसकरला. होप सो, की आता तरी टीआरपी कमी होईल सिरीयलचा.

समहाऊ राधिका कधीच गुरवाला राँग म्हणालेली नाही...
>>>
झी कॅफेवरच्या डॉक्टर फॉस्टर मालिकेतली बायको नवर्‍याने दुसरं लग्न केल्यामुळे हादरून जाते; मात्र तिचा सर्व फोकस नवर्‍याला हरतर्‍हेने जाब विचारण्यावर, त्याची चूक दाखवून देण्यावर असतो. त्या दुसर्‍या बायकोला तिच्या लेखी शून्य किंमत असते. तिच्या मानसिक आंदोलनांमधले बारकावे इतके छान घेतलेत, की त्यामुळे मालिका बघाविशी वाटते.

ते पाहताना मला ही मालिका आठवली...

झी २४ तासवाल्यांनी रसिकाची मुलाखत घेतली होती, ती अमेरीकेला जाण्यापूर्वी. त्यात तिला प्रश्न विचारला गेला की समजा एखाद्या बाईच्या आयुष्यात एखादी शनाया जर खरच आली तर तिने काय करावे? तर रसिका म्हणाली, राधिकाने जसा निर्णय घ्यायला खूप वेळ लावला तसा त्या बाईने करु नये.

वुमन ऑफ डिग्निटी नावाची कोरियन सिरियल (इन्ग्लिश सबटायटल्समध्ये ) बघितली होती. त्यात नायिकेला तिचा बाहेरख्याली नवरा तिच्या मित्राबरोबरच्या फिरायला जाण्यावरुन तिला सुनावतो, तेव्हा ती त्याला अशी कानफटात मारते की बस्स!

तशी कानफटात ठेवायचा सिन झी मराठीवर कधीही बघायला मिळणार नाही कितीही इच्छा असली तरी Lol भंपक सीन दाखवण्यात झी चा हात कोणीही धरू शकणार नाही.
ती मावशी आणि खेड्या खरंच भुक्कड आहेत. काय वचावचा खात होते हॉटेलमध्ये!

आणि चांगला गुरवाला खड्ड्यात पाडायचा चांस होता तर केड्याने परत राधिकाला तिथे पाठविलंच (हॉटेलात!)........का ही ही करुन राधाक्का गुरवाला वाचवणारच! :रागः:

ते गुरूबाळ आणि त्याची बच्चा आॅफीसमध्ये बोलण्यासाठी कागद का वाया घालवतात?
व्हाॅट्सअॅप वगैरे नाहीये का त्यांच्याकडे ?
इथे जग इकोफ्रेंडली होत चाललंय आणि हे नमुने कागद वाया घालवतात...
झीवाले खरंच डोक्यावर पडलेत!
तो केड्या आणि मावशी (रोहिणी निनावे तर जामच) डोक्यात जातात

Pages