माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो अथर्व आहे कुठे?
मुम्बईत की नागपूरात ? >>>>> त्या अ‍ॅक्सिडेन्टच्या प्रोमोमध्ये तो गुरुच्या वडिलान्बरोबर दाखवलाय शाळेच्या युनिफॉर्ममध्ये म्हणजे तो मुम्बईत आहे.

बादवे, आता सगळे (गुरु, शनाया आणि केडी सोडून) गणपतीची प्रार्थना करताना दाखवतील, तेव्हा कुठे राधिका कोमातून बाहेर येईल Proud

अरे
डाॅक्टर तपासतात की तपास करतात ??
आणि डोक्याला मार लागला की स्कॅन करतात की एक्स रे काढतात?? कोण लिहीतं हे भैताड संवाद????

जबर मार जबर मार जबर मार। एवढेच संवाद डॉ.ला!! अरे कोणीही डॉ. असले बाळबोध वाक्य म्हणतील का! तेही तीनदा Rofl

अरे कुणीतरी आवरा या केड्याला....मेमरी लॉस नको हा.... उलट आधी भैताड राधक्का आणि त्या खादाड सौमित्र च्या जोडीची हिंट दिलीच आहे म्हणून आता बहुतेक हा ऐक्सीडेंट असावा..वातावरण निर्मिती राधक्का ला सौम्या च्या प्रेमात पाडायला...मग आता सौमि तिची शेवा शुश्रूषा करणार...तिच्या सो कॉल्ड सगळ्या घरच्यांची ,कामाची अति काळजी घेणार... मग हळूहळू प्रेम ..मग गॅरी जळणार.. बच्चा कडे जाणार... बच्चूला आधीपासूनच दया येतीये गॅरीची...पण शेवटी त्याच्याकडे जाता जाता त्याला सोडून त्याच्या पेक्षा रिच कुणीतरी भेटेल मग त्या माणसासोबत जाईल...मग गॅरोबा एकटे... आणि मग तिकडे ऑरेंजेस,भैताड बायको ,खादाड आगाऊ मित्र आणि बोबड कांदा सुखाने राहतील... मालिका सुफळ संपूर्ण समाप्त...

काल सौमित्र ला खूपच वाईट वाटत होतं...!! अगदी डोळे मिटून घेऊन दु:ख करीत होता. ................ डोळे कशासाठी...? .. "तुला साठवून मिटून घेण्यासाठी...." मोड मधे!
आणि गुरवाला पण वाईट वाटत होतं....काये नक्की केड्याच्या मनात? Uhoh
प्लीजच हं...आता पॅच अप नका दाखवू.
नाहीतर माझ्या बायकोचा नवरा असं रुपांतर नका करु शिरेलीचं!

राधिका बरी होईपर्यंत गुरु कंपनी सांभाळेल. तिला टोपवर पोचवेल. शनायाला टाटा करेल.

राधाबाई बर्या झाल्या की गरवाला माफ करतील Angry आणि मालीका संपेल.

आणि ह्या सगळ्याला अनेक महिने किंवा वर्षही लागतील

<<राधिका बरी होईपर्यंत गुरु कंपनी सांभाळेल.<<< +१००००००
पश्चातापदग्ध गुरु आता कम्पनीची सुत्रे हातात घेइल.

ही मालिका अजून चालू असल्यास ती अद्याप पाहणा-या सर्व प्रेक्षकवर्गाचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन ! दाद द्यायला हवी आपल्या सहनशक्तीला...

त्यासाठीच आपला सर्वांचा सत्कार शनिवारवाड्यावर करावा अशी योजना मनी आलेली आहे.

त्यासाठीच आपला सर्वांचा सत्कार शनिवारवाड्यावर करावा अशी योजना मनी आलेली आहे.>> राधिका मसालेच्या हापिसात करा.

बाय द वे, जरा पाहताना लक्षात आले नाही. शनाया राधिकाला तो अ‍ॅक्सिडेण्ट वाला फोन कशाकरता करते? तिची कोणतीतरी मीटिंग हुकावी म्हणून? असे काहीतरी ऐकले.
मग नंतर तिने जेथून फोन केला त्या स्पेसिफिक जागी राधिका कशाकरता येते?

डोळे कशासाठी...? .. "तुला साठवून मिटून घेण्यासाठी.... >>>>> मस्त.

माझ्या बायकोचा नवरा >>>>> Rofl

पश्चातापदग्ध गुरु आता कम्पनीची सुत्रे हातात घेइल. >>>>> आ, इतक्या लवकर पश्चाताप झाला सुद्दा गुरुवाला? Uhoh

फारएण्ड, तुम्ही इथे सुद्दा?

बाय द वे, आजच्या भागात ती त्या केड्याची मावशी भर दिवाणखान्यातील मधल्या टेबलवर कापडी टेबलक्लॉथ वर खाली काहीही न घेता टोमॅटो चिरताना पाहिले!

काहीही न घेता टोमॅटो चिरताना पाहिले!>>नाही. खाली पांढरा कटींग बोर्ड होता. पांढर्यावर पांढरे म्हणून लगेच लक्षात येत नाही.

फारएंड मलापण सेम अस्सच वाटत होतं.. की आताही टोमॅटो चिरते व डाग पडतो !...............पण समहाऊ तिने टोमॅटो चिरलाच नाही.....नुसतीच बोलत बसली.
शनाया इतकी का घाबरली आहे? तिने थोडीच गाडी पाठवली होती...राधिकाला उडवायला......

केड्या आणि मावशी कायम त्या टेबल खुर्चीवर बसलेले दिसतात. बहुतेक स्टुडीओ सेट आहे तो.
खुप कमी वेळा त्यान्चे किचन, बेडरुम , हॉल दाखवलेत... ते ही तुटक तुटक!

गणपती विसर्जनामुळे कालचा भाग मिळाला नाही. कुणितरी गोषवारा द्या प्लिज!

गॅरॅ 'नीच' च राहणार. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे खोट्या सह्या करून ALF हडपायचा प्लान आहे. श्श्शी...

Lol
असेल... नाहीतरी केड्याकडे ओरिजिनल आइडिया नाहीचेत ना. इकडून तिकडून ढापूनच चालू आहे सगळं.

आंबट-गोड Happy

एकदम सिरीज ने सेन्सिबल टर्न घेतला की काय? बराच वेळ कोणाचीच पोस्ट नाही? Happy

अजिबातच बघावाशी वाटत नाही. आठला तर बघतच नाही पण ईतरवेळीही चुकून नजरेस पडली तर चॅनेल लगेच बदललं जातं.

आता राधाक्का बरी व्हावी म्हणून सगळ्यांनी गणपतीकडे साकडे घातले असेल. रडून वैताग आणला असेल.
ती राधाक्काची सासू नक्की कुठली भाषा बोलते?

गुरोबा आलेच वळणावर. खोट्या सह्या करुन मालक होणार.
वाटले होते,अथर्वचा आवाज ऐकल्यावर/ स्पर्श झाल्यावर बाई कोमातुन बाहेर येतील. पण ती ही शक्यता नाही दिसली काल.

आज तो फौजदार त्या ऑफिसच्या एका खोलीइतक्याच ओपन भागात सर्वांसमोर चौकशी सुरू करतो तो अफलातून सीन पाहिला. "मला या ऑफिस मधे त्यांच्या वाईटावर कोण आहेत याची माहिती हवी आहे" वगैरे. अरे काय जरा एच आर ला घेउन एका कॉन्फ रूम मधे जाउन चौकशी करा वगैरे भानगड नाही. गब्बर सिंग मै सबको चुन चुन के मारूंगा स्टाइल आधी अनाउन्स करतोय. म्हणजे वाईटावर असलेले लोक सावध होतील आधीच.

दुसरे म्हणजे आयकार्ड्स मागतो. का ते माहीत नाही.

तिसरे म्हणजे ती शनाया पोलिस चौकशीला घाबरत आहे तो तिचा बिनडोकपणा धरू. तिने केले ते वाईट केले. पण राधिकाला झालेला अपघात हा घातपात नव्हता हे पोलिसांना कळायला त्या गाडीवाल्याची चौकशी पुरेशी आहे. यांच्या ऑफिस मधे येउन चौकशी करण्याचे कारण अगम्य आहे.

मुळात राधिका जेथून फोन आला तेथे कशाला खाली उतरली हा सस्पेन्स कोणीतरी क्लिअर करा.

राधिकाला खोटा फोन करून बोलवलेलं त्या जागी.
शनायाने पीसीओवरून आवाज बदलून राधिकाला कळवलं की अर्थवला अपघात झालाय.
राधिका फोन आला तिथे नाही, तर अपघाताच्या जागी गेली.
दोन्ही जागा एकच असू शकतात.
त्यामुळे घातपाताच्या संशयाला जागा आहे.

Pages