तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

ईशाच्या परीक्षेच काय झाल?विक्रांत सर अभ्यास घेणार आहेत का?कारण ही कधीच करताना दिसत नाही.☺️ >>> आता गरजच नाहीना अभ्यास, परीक्षेची वगैरे. आता आख्ख्या सरंजामे उद्योगाची मालकीण होणार लवकरंच. बाकी सर्वांची परीक्षा घ्यायला मोकळी Wink .

ग्लोबल झाल्यात बाई. एकदम सर्व जगातल्या मध्यम वर्गीय स्त्रिया कधीच स्वतः ला मिळालेली गिफ्ट आनंदाने स्वीकारत नाहीत वगैरे.
फायनल परीक्षा फेब मार्च एप्रिल मध्ये असतात ना मग हॉल तिकेट कुठले आले? आत्ताच? हाफ यीअर्लीचे?

ह्या सिरीयलची स्टोरी समजा मागे कोणीतरी लिहिल्याप्रमाणे, सु भा ने बायकोचा खून केलाय आणि ही बदला घ्यायला आली आहे अशी असली तर मात्र अति होईल, इशा म्हणजे गायत्री त्या भूमिकेला न्याय देऊ शकणार नाही.

नवरा असावा तर अस्सा मधे सुबोधची बायको (विनोदाने) म्हणते की पैसे मिळाले तरच तो रोमान्स करतो हल्ली.

फायनल परीक्षा फेब मार्च एप्रिल मध्ये असतात ना मग हॉल तिकेट कुठले आले? आत्ताच? हाफ यीअर्लीचे?>>
सेमिस्टर पॅटर्न असेल हो..

सुभा एका मुलाखतीत म्हणाले की, हिंदीचे मराठीवर आक्रमण खपवून घेणार नाही.
मराठी साहित्य, मराठी भाषेला प्राधान्य द्या आणि मराठीत बोलण्याची लाज बाळगू नका, असा सल्लाही त्यांनी दिला म्हणे.

त्यांना सांगायचे आहे की, आधी तुमच्या "तुला पाहते रे" मालिकेकडे बघा. हिंदी बॉलिवूडचे टुकार फिल्मी सीन्स चोरले आहेत. (त्या सीन्सची आधीपासून जाहिरातही करतात ते बेशरम निर्माते लोक.) जेव्हा तेव्हा बॅकग्राऊंडला हिंदी फिल्मी गाणी लावतात. खुळचट ओव्हरॲक्टिंगचे विद्रूप चाळे करणाऱ्या एस.आर.के सारख्या टिनपाट नटांचे उल्लेख हिरवीण आणि तिच्या मैत्रिणीच्या तोंडी नेहमी असतात.
ही उसनेबाजी कशाला करता? मराठी दरिद्री झाली का? हे तुमच्या उसनेबाज मालिकावाल्यांना विचारा. मराठीचा अभिमान नसलेले फालतू लेखक आहेत या मालिकेचे.

सुभा एका मुलाखतीत म्हणाले की, हिंदीचे मराठीवर आक्रमण खपवून घेणार नाही. >>> या सिरीज मधल्या अफलातून मराठी ची उदाहरणे इथे अनेकांनी आधीच दिलेली आहेत. ती जरा दाखवा म्हणावं त्याला Happy

<<सुभा एका मुलाखतीत म्हणाले की, हिंदीचे मराठीवर आक्रमण खपवून घेणार नाही.<< अस म्हटला सुभा? Uhoh
अन मग ' दो रुपये भी बहोत बडी चिज होती है बाबु' म्हणणार्या इशाच्या कसा काय प्रेमात पडला. Lol

खरोखर इशाबाई, म्हणजे डोक्याला शॉट आहे. ऑफीसमधे कधीही पिसीवर काम करताना दिसत नाही. सदा न कदा पीसीसमोर बसली की सरान्ना फराळ कसा पाठवु यंव अन त्यंव !
त्या लॅप्टॉप वरुन सुभाला विचारताना पण सर तुम्ही कोणाला मिस करता ... श्या!

सव्वा कोटी रुपये कमावले पन्नास हजार कॅलेंडर विकून म्हणजे एक कॅलेंडर 250 रुपयांना. प्ले स्टोर वर कालनिर्णय फुकट मिळत असताना 250 रुपये ज्यांनी ईशाच्या फडतूस कन्सेप्टवर उधळले त्यांचा नारळ शाल देऊन सत्कार करणार आहेत पुढच्या भागात

साड्यांचा खप वाढावा म्हणून कॅलेंडरं गिफ्ट द्यायची, असं लिहायचं ठरलं होतं. मग त्यातच इशाला पण हरब-यावर चढवावं असं ठरलं.. चाप्टर लिहून, पहीला लेखकू शिफ्ट संपवून घरी गेला. पुढच्या शिफ्टच्या लेखकूला आधी ठरलेली कॅलेंडरं दिसली. मग त्याने दीड लाख काॅपीज छापल्या काढल्या व विकल्या...मग ते सगळे आणि आपण सगळे विसरूनच गेलो की दुकान साड्यांचं होतं... आता लवकरच कॅलेंडरांबरोबर चकल्यांचं पण दुकान सुरु होतंय बहुतेक Happy

मी खूप दिवस झाले पाहू शकत नाहीये हि मालिका .. पण एकंदरीत इथल्या कंमेंट्स वाचून फार काही मिस केलंय असं वाटत नाही .. Wink
तसही सुभा नाहीये ना रोज? मा जाऊदेत खूप दुःख नको वाटायला ...

आज जयदीप काँँनफरन्स रूम मध्ये असा काही फिरत होता की मला वाटल ,हा आता म्हणेल"अरे ओ मायरा,कितने आदमी थे"
आणि आज चक्क ईशा बाळने भोकाड नही पसरल.कदाचित विक्रांत सरांसमोर पसरायचे असेल.लई चँप्टर हाय पोरगी.

खरोखर इशाबाई, म्हणजे डोक्याला शॉट आहे. ऑफीसमधे कधीही पिसीवर काम करताना दिसत नाही. सदा न कदा पीसीसमोर बसली की सरान्ना फराळ कसा पाठवु यंव अन त्यंव ! >>> Lol

मी सलग बरीच बघितली. सुबोध भावे चे सीन्स जनरली चांगले आहेत. इव्हन निमकर व त्या घरातील सीन्स ओके. पण ईशाचे एकदा "पण सर तुम्ही का सांगत नाही तुमच्या मनात काय आहे ते?" छाप संवाद सुरू झाले की जाम पकाउ होते ही सिरीज.

ईशाने काय घोळ घातला टेंडरचा. बिचारे निमकर. आधी साड्यांच्या दुकानातून धक्का देऊन काढले आणि आता ईशाच्या हापिसातून. आधी धक्का मारला तेव्हा दुकान त्यांचे झाले तसेच आता हे हापिसही लवकरच त्यांचे होईल. ईशा महानौटंकी कशी मिठी मारते सुभाला.

इबाळाने आज टेंडरची फाईल घरी नेली. एका रातीत त्यातला मजकूर चोरीला जाऊन दुसरे त्यापेक्शा १₹ ने कमी टेंडर भरून लगेच दुसर्या दिवशी त्याबद्दल बोंबाबोंब!!

अकलेचे तारे तोडतोय केड्या!! एवढं १७६० वेळा confidential confidential असं हापिसातून सांगितलं असताना कुठली पापभिरू मध्यमवर्गीय मुलगी फाईल अशी घरातल्या टेबलावर ठेवेल??

"पण सर तुम्ही का सांगत नाही तुमच्या मनात काय आहे ते?" छाप संवाद सुरू झाले की जाम पकाउ होते ही सिरीज.<<,
अगदी अगदी... आता नुसते वाचताना सुद्धा भिन्तीवर ओरखडे मारल्यासारखा इशाचा आवाज कानात घुमतोय! Proud

Happy

आत्ता तो ईशा जयदीपला चहा करून देतानाचा सनसनाटी सीन पाहिला. बॅकग्राउण्ड म्युझिकवरून असे वाटले की नॉर्मण्डी ला दोस्त राष्ट्रांच्या फौजा उतरत आहेत. समोर बघतो, तर ईशाचे डिपडिप सुरू आहे. त्याही सीनला जयदीप "एक्स्प्रेशन्स" देतोय काही कारण नसताना. एक डिप जास्त केला असता तर नोकरी गेली असती म्हणे.

मग चकल्यांची ऑर्डर झाली. ४-५ नोटा आधी दिल्या, "बाकी, काम होने के बाद". टोटल बजेट किती माहीत नाही. त्यावर निमकर लोक वर्ल्ड टूर ला जाणार. अराइन्ड द वर्ल्ड इन ८ डॉलर सारखे.

मग सरंजामे ग्रूप ऑफ इण्डस्ट्रीज मधल्या इतरांनी यांनी कॅलेण्डर चे डिझाइनची तारीफ केली. मात्र ईशा ला न राहवल्यामुळे मग कॉन्फरन्स रूम मधे कंपनी हेड, मुख्य एसव्हीपी आणि सिक्युरीटी हेड हे लोक कॅलेण्डर फायनल करत असताना ईशा जाउन पचकते. तेव्हाच्या ईशा-मायरा जुगलबंदी मधे जयदीप टेनिस ची मॅच पाहिल्यासारखा एकदा इकडे, आणि एकदा तिकडे माना हलवत "मला हिचेही पटते, आणि तिचेही" म्हणत असावा.

ईशा चहा घेउन का आली माहीत नाही. त्या आधीचा भाग आता इथे उपलब्ध नाही. अर्थात या ऑफिस मधे कोणीही काहीही करते. उद्या विक्रांत चहाचा ट्रे घेउन एफएम कडे गेला व मायरा गन घेउन प्रवेशद्वाराजवळ उभी राहिली तरी आश्चर्य वाटणार नाही.

<<अर्थात या ऑफिस मधे कोणीही काहीही करते. उद्या विक्रांत चहाचा ट्रे घेउन एफएम कडे गेला व मायरा गन घेउन प्रवेशद्वाराजवळ उभी राहिली तरी आश्चर्य वाटणार नाही.<< Rofl

इतर वेळी जयदिपचे डोळे मिश्किल दिसतात पण! त्याच्या रागापेक्षा त्या रागाला घाबरुन त्याचा बाऊ करणारे अधिक आहेत असे वाटले.

अर्थात या ऑफिस मधे कोणीही काहीही करते. उद्या विक्रांत चहाचा ट्रे घेउन एफएम कडे गेला व मायरा गन घेउन प्रवेशद्वाराजवळ उभी राहिली तरी आश्चर्य वाटणार नाही. >>> हे लिहीपर्यंत पुढच्या भागात मार्केटिंग वाल्याचे काम झेंडे करतोय. कॅलेण्डर वरच्या मॉडेल्स ना न वापरण्याचा निर्णय "त्या एजन्सीला कळवा" - यावर हो सर म्हणून तो जातो कळवायला.

Pages