अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..
आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.
त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .
हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.
सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.
खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...
बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..
सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा
वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032
स्वप्नात दंग दोन जीव
स्वप्नात दंग दोन जीव

आमच्या आवारात बागडणारी
आमच्या आवारात बागडणारी फुलपाखरे.

सुंदर फ़ुलपाखरे
सुंदर फ़ुलपाखरे
मम्या, किती गोड फोटो गं,
मम्या, किती गोड फोटो गं, तुझ्या घरचे का ग
हो ताई. माझ्या घरचीच आहे
हो ताई. माझ्या घरचीच आहे शेवन्ताबाई
खूप महिन्याने आले. दोन तास
खूप महिन्याने आले. दोन तास सगळे फोटो, आणि प्रतिसाद वाचतेय. छान वाटले. मला एकदम पूर्वीचे दिवस आठवले. दिनेशदा, जिप्सी, शंकली, शशांक जी असे सर्व असायचे. सर्वांचे फोटो फार सुंदर आहेत . आता इथे रोज यायचं अस ठरवते, आणि परत खंड पडतो.
ह्या वर्षी मी भाजी लावायची
ह्या वर्षी मी भाजी लावायची मनावर घेतल आणि निसर्गानेही चांगली साथ दिली. सध्या घरी छान भाज्या निघत आहेत.

वा!! सुंदर फुलपाखरू! टणटणी
वा!! सुंदर फुलपाखरू! टणटणी(घाणेरी) ची फुलांवर तिव्र गंधामुळे बरीच फुलपाखरे कायम असतात!
आणि ताज्या ताज्या भाज्या सुरेख अगदी! मुळा नुसता जेवताना तोंडी लावावा असा!
हा भोपळा कालच काढला.. एकच
हा भोपळा कालच काढला.. एकच लागला होता.
मी भाजीला फक्त जीवामृत वापरतेय. बाकी कोणतही रासायनिक खत नाही. औषधही ऑर्ग्यानिक मारते गरज पडल्यास प्रहार म्हणून.
ताज्या ताज्या भाज्या सुरेख
ताज्या ताज्या भाज्या सुरेख अगदी! >>>>> खरंय!
मी आलो होतो तेंव्हा भोपळा
मी आलो होतो तेंव्हा भोपळा बारीक होता. मस्त दिसतोय.
वा जागुताई घरच्या भाज्या,
वा जागुताई घरच्या भाज्या, ताज्या ताज्या मस्तच.
बाकी सगळे प्रचि पण सुंदर .
सुप्रभात.
सुप्रभात.

खुप सुन्दर!!
खुप सुन्दर!!
अगदीच अनुपस्थिती नको म्हणून..
अगदीच अनुपस्थिती नको म्हणून...

आणि हे भंडारदऱ्याचे फोटो. १ २
आणि हे भंडारदऱ्याचे फोटो.


१
२
वा भंडारदर्याचे फोटो मस्तच
वा भंडारदर्याचे फोटो मस्तच आहेत.
फळांचा राजा बाळसं धरत आहे.

सर्व फोटो अप्रतिम.
सर्व फोटो अप्रतिम.
जागू जेलस मी, सॉलिड भाज्या, सुरेख ताज्या ताज्या तजेलदार.
अरे वा, इतक्या लवकर कै-या.
अरे वा, इतक्या लवकर कै-या.
सर्व फोटो अप्रतिम....+१.
सर्व फोटो अप्रतिम....+१.
हे अजुन काही या पंधरा
हे अजुन काही या पंधरा दिवसातले क्लिक्स.






१
२
३
४
५
६
वा !
वा !
मस्तच.
मस्तच.
मस्त फोटो शालीदा आणि बाकीचेपण
मस्त फोटो शालीदा आणि बाकीचेपण! कैऱ्या पाहून तोंडाला पाणी सुटले
सर्व निसर्गप्रेमिंना नविन
सर्व निसर्गप्रेमिंना नविन वर्षाच्या हार्दिक शुबेच्छा. तुम्हा सगळ्यांच्या हातून ह्या वर्षात भरपूर झाडांची लागवड होवो.
१)

२)

मस्त शुभेच्छा जागू.
मस्त शुभेच्छा जागू.
Happy new year.
(No subject)
कविता खुप सुंदर रंग आहे
कविता खुप सुंदर रंग आहे जास्वंदीचा.
धन्यवाद अन्जू
सगळेच फोटो अप्रतिम..
सगळेच फोटो अप्रतिम..
वाघेश्वराच्या तळ्यातलं धुणं धुण कधी बंद होईल कुणास ठाऊक..
(No subject)
Pages