तुमचा रात्रीचा मेन्यु काय असतो?

Submitted by रश्मी. on 2 July, 2018 - 06:43

दररोज रात्री जेवायला काय करावे हा नेहेमी प्रश्न असतो. जनरली, दुपारची भाजी सगळे खातीलच असेही नसते. सकाळी सगळे नाश्ता करतात, दुपार च्या जेवणासाठी सुकी किंवा पातळ भाजी किंवा उसळ, फुलके / पोळ्या, वरण/ फोडणीचे / आमटी/ सार/ कढी असते. हे तर पोटभर होते, पण प्रश्न येतो रात्रीचा. त्यात घरात जर वाढत्या वयाची मुले / मुली असतील तर आणखीन प्रश्न असतो.

माझ्या कडे आठवड्यात आलटुन पालटुन रात्री थालिपीठ / फुलके + भाजी / तव्यावरचे किंवा पातळ पिठले+ पोळ्या किंवा भात/ खिचडी / चायनीज फ्राईड राईस ( मुलगी व नवरा खातो ) / चिकोले म्हणजे वरणफळे हे मी व सासुबाईच खातो, नवरा व मुलगी या चिकोल्यांचे नाव काढले की पळतात. मग त्यांच्यासाठी परत काहीतरी वेगळे बनवा.

तुम्ही सर्व काय करता? कोणता मेन्यु असतो? वर मी जे लिहीले आहे ते होत असेलच पण तुमचेही प्रतीसाद स्वागतार्ह आहेत. तेव्हा प्लीज सुचवा.

जर आधी कोणी असा धागा विणला असेल तर मला सांगा, म्हणजे मा. अ‍ॅडमीन हा धागा उडवु शकतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजू, स्टफ्ड गार्लिक ब्रेड म्हणजे साधारण एक मोठ्या पराठ्याचा ऐवज आहे. आत मक्याचे दाणे हालापिनो पेपर्स व काही बटर वगैरे असते. खरपूस भाजून देतात. ऑर्डर दिल्यावर फ्रेश करतात. एका वेळी एक भरपूर होतो मला. वरोबर चीजी डिप घे. बरोबर मसाल्याची पाकिटे येतात ती हवी तेव्ढी वापरायची. >>> thank u अमा.

अमा, वाचुन मला पण आता गार्लिक ब्रेड खावासा वाटतोय Sad कुठे मिळणार पण इथे Sad इथलं सगळं मिळ्मिळीत असतं, मला आजिबात बाहेर खायला आवात नाही

मेथीच्या खुड्यात मेथी कच्ची च असते तर कडू नाही का लागत???? मी कधी खाल्लं नाहीय हे >>> अने नाही, थोडी साखर घालायची. मी टीव्ही वर बघून दोन प्रकार शिकले एक आदिती सारंगधर आणि एक सारिका चितळे जी सारेगम जिंकलेली ती.

चितळे यांचा साधा आहे खूप मेथीची पाने, कच्चे तेल, तिखट मीठ, साखर, मेतकुट, दही. कदाचित काही missed असेल माझ्याकडून, खूप वर्ष झाली.

आदितीने दाखवले त्यात मेथी, कांदा, गोडा मसाला, दही, मेतकुट, साखर, मीठ, लाल मिरच्यांची फोडणी वरून. हे पण अगदी परफेक्ट नसेलही कारण लिहून नव्हतं ठेवलं.

मी करते ते मेथी पाने देठासकट वरची वरची त्यात कांदा, मेतकुट, दही, साखर, तिखट मीठ, ओवा, मिरपूड वरून फोडणी लाल मिरच्या किंवा सांडगी मिरच्यांची आणि कधी त्यात ओले खोबरे, दाणे कुट पण टाकते. गोडा मसाला टाकत नाही मी. कधी त्यात मुळा पाला, मुळा, कोथिंबीर, पालक मिक्सही करते पण जास्त नुसत्या मेथीची. पातीचा कांदा जास्त चांगला लागतो, नुसत्या कांद्याऐवजी.

बाय द वे लसूण पण टाकते फोडणीत, आल्याचे तुकडे मला सगळ्यात आवडतात म्हणून तेही घालते.

प्राजक्ताच्या रेसिपीत पापड दिलाय, तो घालून करेन एकदा. प्राजक्ताची जास्त ओरिजिनल असावी असं वाचून वाटतय. काहीजण शेतातून मेथी खुडून आणून ताजा ताजा करतात असंही वाचलेलं.

प्राजक्ताची जास्त ओरिजिनल असावी असं वाचून वाटतय. >> वहिनी खान्देशातली आहे त्यामुळे जर रेसिपीचा उगम तिकडचा मानला तर येस!

>>आमच्या खानदेशात बहुतेक घरांत रात्रीचं जेवण म्हणजे खिचडी. अगदी रोज केली तरी चालते.
आम्ही लहानपणी एका लग्नाला धुळ्याला गेलो होतो. २ आठवडे वगैरे असेल. तिथे ज्या नातेवाईकांकडे जाऊ तिथे रोज रात्री फक्त खिचडीच होती. अगदी रोज! प्रत्येक घरी! हा आम्हाला एक कल्चरल शॉकच होता असं म्हणता येईल Wink माझ्या कसल्याही खायच्या प्यायच्या आवडी निवडी नव्हत्या आणि माझ्या भावाची एकच नावड होती, ती म्हणजे खिचडी! त्या दोन आठवड्यांनंतर तर कायमचीच नावड डेव्हलप झाली त्याची Happy

बाकी हा धागा चांगला आहे. पटकन "आता काय करू" ला उत्तर मिळायला उपयोगी आहे.

आमच्या खानदेशात बहुतेक घरांत रात्रीचं जेवण म्हणजे खिचडी. अगदी रोज केली तरी चालते. << येस्स्स.
आमच्या कडे पण आठवड्यातुन ३/४ वेळा असायचीच.
आता
१. पोळी+ कोणतीही फळ्/पाले भाजी/पिठलं
२. वरण+ भात+ एखादी सुकी भाजी
३. खिचडी + पापड+ लोणच+ दही+वेळ असेल तर सुकी भाजी/फ्राईड फिश वैगरे
४. कढी भात
मला काकडी आवडते त्यामुळे मी रोज एक अशी मोजुन काकडी आणुन ठेवते.बरोबर गाजर, टमाटा, बीट अस काहीही चालत.

आरारा, आर्या,
उडदाच्या डाळीची रेसिपी माहीत आहे का? आई असतांना मसाला वाटुन करायची पण आता अज्जिबात आठवत नाहीये.

मेथीच्या खुड्यात मेथी कच्ची च असते तर कडू नाही का लागत???? >>>

अजिबात नाही लागत! तेल तिखट मीठ थोडा बारीक कांदा चिरुन घालायचा. आवडत असल्यास खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट. एकदम भारी लागते भाकरीसोबत!

मेथीच्या खुड्यात मेथी कच्ची च असते तर कडू नाही का लागत???? >>

वाटली तर कोथिंबीर कापून मिक्स करा.

कच्चा खुडा व्हेरिएशन म्हणजे तेल कच्चं न घालता वरून तेल तिखट लसणाची कडकडीत फोडणी घालायची.

नवीन Submitted by रीया on 5 July, 2018 - 05:18
मेथीच्या खुड्यात मेथी कच्ची च असते तर कडू नाही का लागत???? मी कधी खाल्लं नाहीय हे >>> अने नाही, थोडी साखर घालायची. मी टीव्ही वर बघून दोन प्रकार शिकले एक आदिती सारंगधर आणि एक सारिका चितळे जी सारेगम जिंकलेली ती.

अन्जु, नकाहो असा अत्याचार करु साखर टाकुन !!!!!!!!! तो खुडा कच्चा खाल्ला ना तरी कडु लागत नाही. त्याची कडवट चव, थोडं कच्च शेंगदाणा तेल, मीठ आणी मिरची पुडने बॅलन्स होते

अजिबात कडु लागत नाही मेथी!
आणि आम्ही खुड्यात इतके प्रकार घालतही नाही. तिखट, मीठ, कच्चे तेल असले तरी खुप होते. वाटल्यास कधीतरी कच्चा लसुण बारीक कापुन.

दुपारच्या भाकरीबरोबर 'मिरचीचे पाणी' हा देखिल प्रकार भारी लागतो. Happy

<<उडदाच्या डाळीची रेसिपी माहीत आहे का? आई असतांना मसाला वाटुन करायची पण आता अज्जिबात आठवत नाहीये.<< नाही ग! फार कमी करतो हा प्रकार. नॉर्मली वाटलेला मसाला तेलात परतुन त्यात कच्ची पक्की शिजवलेली उडीद दाळ्+ थोडी तुरदाळ+ हरभरा दाळ अश्या मिक्स दाळी टाकतो.
पण मला उडदाची घोटलेली दाळच आवडते... भाकरीसोबत खायला.

संध्याकाळचा मेन्यु साधारण पणे असा......
१. फिकी खिचडी (हिरवी मिरची टाकली कि एक अजुन व्हेरीएशन), मुगडाळीची पण खाताना त्यावर साजुक तुप टाकुन किंवा शेंगदाणा तेल टाकुन किंवा खान्देशी तिखट ( हा एक चटणीचा सुका प्रकार असतो) टाकुन किंवा हिरवी मिरची तळुन थोडं मीठ टाकुन, याबरोबर भाजलेला पापड (उडीद, चिकनी, बिबड्या वगैरे)
२. खिचडी (ही मसाला टाकुन बनवलेली) साधारणतः रेशनदुकानावर मिळणार्‍या जाड तांदळापासुन बनवलेली (लैच भारी लागते) ही बनवताना शक्यतो तुरडाळीचा वापर होतो. ही बनवताना आपापल्या आवडीनुसार त्यात बटाटे, फ्लॉवर, सोयाबीन वड्या, शेंगदाणे, खोबरं, वांगे, हिरवे ओले वाटाणे, सुरण, अंबाडी सुकट, सोडे, बोंबील इ. इ. काहीही. परत याबरोबर तोंडी लावायला हिरवी मिरची तळुन थोडं मीठ टाकुन, याबरोबर भाजलेला पापड (उडीद, चिकनी, बिबड्या वगैरे), यात जो चिकनीचा पापड आहे नां तो चुलीवर भाजलेला असेल आणी त्यावर कच्च शेंगदाणा
तेल टाकलेल असेल नी वर थोडं खान्देशी तिखट टाकलेलं असेल तर मग................
३. कळण्याची भाकर आणी वल्ल तिखट ( वल्ल = ओलं) शेंगदाणे आणी लाल मिरच्या पाट्यावर वाटुन थोडं मीठ आणी लसुण,
४. दादर ची भाकर (दादर=शाळु ज्वारी) आणी खुड मिरचीचं पाणी किंवा मेथीची पाण्याची भाजी, भाकरी कुस्करुन खायला,
५ भेंडीची भाजी नी दादरची भाकर किंवा चपाती.
६. गवारीची सुकी भाजी नी भाकर किंवा चपाती.
७. कधी कधी मुड असलाच तर तिख-मिखं पोळी दुधात खायला (तिखं-मिखं = गुळ आणी काळी मिरी वाटलेली किंचीत घेवुन स्ट्फ केलेली चपाती)
८. वांग्याच भरीत आणी चपाती किंवा भाकरी (भाकरी ही ज्वारी, दादर, बाजरी किंवा कळणे असु शकते.)
९. वांग्याची बटाट टाकुन केलेली सुकी भाजी आणी चपाती किंवा भाकरी
१०. वेळ असल्यास भरली वांगी आणी चपाती किंवा भाकरी,
११. काळ्या मसाल्याची उडदाची डाळ (सालंवाली) याच्याबरोबर बाजरीची भाकर मस्ट,
१२. गिलक्याची नुसत्या तेलावर पाणीवाली भाजी, ज्वारी भाकर (गिलके=घोसाळे) किंवा गिलक्याचे भरीत.
१३. दोडक्याची चणाडाळ्/मुगडाळ टाकुन केलेली सुकी भाजी आणी चपाती किंवा भाकरी, (दोडके=शिराळे)
१४. सुक्या बोंबलाच बट्ट आणी बाजरी भाकर,
१५. मासे आणी चपाती किंवा भाकर, भात
१६. चिकन आणी चपाती किंवा भाकर, भात
१७. मटण आणी चपाती किंवा भाकरी, भात
१८. बाजरीच्या वड्या नी चपाती. (बाजरीच्या वड्या= बाजरीचे सांडगे प्रकार सुकी भाजी बनवुन)
१९. मठ-मुगाच्या वड्या नी भाकर (मठमुगाच्या वड्या= मठ आणी मुगाचे सांडगे प्रकार सुकी भाजी बनवुन)
२०. पाटोळ्यांची भाजी आणी चपाती, भात (पाटोळ्या=बेसन भिजवुन त्याची चपाती लाटुन त्याचे छोटे छोटे तुकडे वाटण लावलेल्या ग्रेव्हीत शिजवायचे.

बस बाकीचे आठवेल तसे आणी बाकीचे घरी विचारुन सांगेंगे.

अहाहा.. जेम्स बॉन्ड काय आठवण करुन दिलीत. चिकनीचे पापड मागवावेच लागतिल आता.
खुड मिरचीच पाणी माझे फेवरेट.
<< खिचडी (ही मसाला टाकुन बनवलेली) साधारणतः रेशनदुकानावर मिळणार्‍या जाड तांदळापासुन बनवलेली (लैच भारी लागते) ही बनवताना शक्यतो तुरडाळीचा वापर होतो<< अगदी अगदी... ती खिचडी वेगळीच लागते.
गावाकडे या खिचडीत इतका फाफट पसारा टाकतच नाही. अगदी शेन्गदाणे सुद्धा नसतात. धुळ्याला आम्च्या काकान्कडची खिचडी अशी फेमस होती. फक्त लाल तिखट, कान्दा, लसुण ची फोडणी. तरीही सगळीकडचे नातेवाईक आले की खिचडीच करा म्हणायचे जेवणाला.
इतकी वर्षे झाली अजुनही तिच चव! तेवढेच पाणी घालणार .. त्यामुळे तितकीच मोकळी .. !गिच्च गचका अशी नाहीच.
बेसनच्या पातोड्यान्ची मसाल्याची आमटी नाही हो रात्री. ती रविवारी दुपारी व्हेजीन्साठी होते. Happy

खुड मिरचीचे पाणी म्हणजे सुक्या लाल मिरच्या तोडुन थोड्या तेलात नुसती राई लसुण मीठ टाकुन त्यात त्या उकळुन घ्यायच्या नी भाकरी बरोबर हाणायच्या.

खुड मिरचीचे पाणी म्हणजे सुक्या लाल मिरच्या तोडुन थोड्या तेलात नुसती राई लसुण मीठ टाकुन त्यात त्या उकळुन घ्यायच्या नी भाकरी बरोबर हाणायच्या.> खरंच मिरचीचं पाणी आहे म्हणजे आणि डोळ्यातही येत असणार! आर्या , जेम्स बॉन्ड जमेल तेव्हा या सर्वांचे फोटो पण टाका नक्की.

आई शप्पथ !! काय एकेक मेनू आहेत! सगळे अगदी तों पा सु !
मला बाई फार कंटाळा आहे जेवण बनवण्याचा .. हापिसातून घरी यायला उशीर झाला कि मग तर हा कंटाळा पथ्यावरच पडतो ..
इथे अगदी मोजक्या आणि त्याही फार्फार बेचव / जून भाज्या मिळत असल्याने मी बऱ्याचदा शॉर्टकट.कॉम कडेच वळते ...
म्हणजे
१)ग्रिल्ड सँडविच ,कधी नुसतंच टोमॅटो काकडी केचप भरून सँडविच
२)पोहे/तिखटामिठाचा सांजा/उपमा , ब्रेड ची भाजी (काही जण याला ब्रेड चा चुरा /चिवडा म्हणतात )
३)भेळेचे प्रकार : नेहेमीची चुरमुरे फरसाण ची ओली किंवा सुकी भेळ किंवा मग मटकी/मूग भेळ; छोले भेळ ; खाकरा चाट
४)फोडणीची पोळी
५)पालक बाकी इथे १२ महिने ३२ काळ मिळतो त्यामुळे पालक पराठे
६) उन्हाळ्यात हमखास बाउल भरून सॅलड (सगळ्या रंगीत भोपळी मिरच्या ,काकडी , टोमॅटो ,मूठभर पास्ता आणि मॉझरेला चीझ ,मीठ ,मिरपूड, ऑलिव्ह तेल आणि लिंबूरस घालून )
९) वरण भात ; नाहीतर मग आहेच एम डी के !!(mdk म्हणजे मोदक नाही हं.. ! mdk = मूग डाळ खिचडी )

आमच्याकडेही माहेरी रात्री खिचडी असते.!
पण खिचडी म्हणजे..तुरीचीच.! कधी साधी, कधी फोडणीची...कधी तरी बदल म्हणून मुगाची.. खिचडी सोबत कढी, पापड, लोण्चं..ई. अगदी आवडीचा बेत..
आता सासरी पण सवय लावलीये सगळ्यांना..खिचडीची.
ईकडे रात्री काय स्वयंपाक करायचा असा प्रश्न न विचारता.. आता कोण्ती भाजी करायची असं विचारत..! म्हणजे भाजी पोळी फिक्स..!

जेम्स दादास्नू काहूंन इतल्या रेसिपी टाइपि रहायनत. घरनी आठवण येस मंग.
एकच भाजी पण आजीकडे खाल्ली की आईला म्हणायचे आजीकडे असते तशी नाही झालीय आता मी करते तर अस वाटत आई सारखी नाही झालीय. बहुतेक वातावरणाचा ही फरक असावा.
खुडी मिरचीच पाणी माझही आवडत. बोकडकाला तर केलाच नाहीय कित्येक महिन्यात.

आरारा... यावरुन लोणच्याचा खार पाहिजेच आणि उडदाचा/ नागलीचा पापड चुरुन.

मला फोडणी देउनपेक्षा कान्दा कच्चाच ठेवलेला आवडतो आणी भाकरी बाजरीची हवी.

बाजरीच्या भाकरी कुस्करुन मस्त सायीसह दूध. सोबत खोबर्‍याची चटणी.
बाजरीच्या भाकरीचा कुस्करा फोडणीचा हिरव्या मिरच्या कांदा वैगेरे ची फोडणी आणि सोबत दही.
बाजरीची खिचडी सोबात ताजे ताक
सकाळच्या भाताला शेंगदाणे कांदा वैगेरे घालून फोडणी
सकाळच्या पोळीच्या चिकुल्या (चिकुल्या कोणत्याही असोत आमसूल हवेच)
पाण्यातला बटाटा पोळी ( नुसते तिखट मीठ हळद काळा मसाला थोडा आणि कढीपत्त्याची फोडणी पाणी )

अन्जु, नकाहो असा अत्याचार करु साखर टाकुन !!!!!!!!! तो खुडा कच्चा खाल्ला ना तरी कडु लागत नाही. त्याची कडवट चव, थोडं कच्च शेंगदाणा तेल, मीठ आणी मिरची पुडने बॅलन्स होते >>> Lol मला नाहीच आवडत साखर टाकायला, मी कुठल्याही कोशिंबिरीत पण टाकत नाही पण मेथी जास्त कडू असली तर नवऱ्याला हवी असते साखर त्यात.

ते चितळे यांनी दाखवलेला त्यात दही, मेतकुट नव्हतं, आत्ता आठवलं नीट, ओरिजिनल होता तसंही करते मी पण क्वचित. जास्त सारंगधरने दाखवलेलं तसा करते दही मेतकुट घालून.

खानदेशातले जेवण फार चवदार असते. तसेच मला सातार्‍याकडचे पण आवडते. पण खानदेशात व्हरायटी जास्त आहे. पेंडपाला ही सोलापूरकडली खासीयत आहे असे मला वाटले पण खानदेशातली कृती पण आहे. सापडली की लिहीते, किंवा कोणाला माहीत असल्यास जरुर लिहा. दोन किंवा तीन पालेभाज्या ( बहुतेक मेथी यात नसावी) घेऊन त्या धुऊन, चिरुन लसणाच्या फोडणीत घालतात असे आठवते आहे. तसेच खानदेशातले फुंदके/ फुणके पण प्रसिद्ध आहेत. गंमत म्हणजे खानदेशातच मिळणारी पोकळा ही पालेभाजी मला आणी माझ्या शेजारणीला बाजारात दिसल्यावर अक्षरशः पळत गेलो होतो. पण पुणेकर या भाज्या फारश्या खात नाहीत. पुण्यात मेथी, पालक, चाकवत्,अंबाडी, चूका, शेपू जास्त चालत्तात.

पोकळा इकडे दिसतच नाही. कधितरी कटुरले दिसतात... पण फार मोठे असतात हायब्रिड वाटतात.
गावाकडुन येताना पोकळा, आणि पोपटी जाड मिरच्या ठरलेल्याच.
घोळूची भाजी दिसली की घेतेच. .. फुन्दक्यासाठी

अंजू, तुरीची ( तुरडाळ+ तांदूळ ) खिचडी खरच चवीला वेगळी आणी छान लागते. माझ्या मुलीला ही फार आवडते. त्यात मग मी गाजर, शेंगदाणे , कांदा, बटाटा आणी मटार घालते. वर तसे आरारांनी लिहीले आहेच.

हो आर्या, माझ्या शेजारणीने घोळुची भाजी घातलेले फुणके दिले होते. तसे नुसत्या डाळींचे पण करतात की.

हो! नुसती हरबर दाळ भिजवुन केलेले ही चान्गले लागतात.व्हेरियेशन म्हणुन मेथी, पालक टाकुन करतो आम्ही.

रश्मी तुरीची डाळ खूप वर्ष आम्ही वापरत नाही, कोणी पाहुणे आले तर आणतो पण आई गुजराथची असल्याने लहानपणी तुरडाळ खिचडी खाल्लीय बरेचदा. मी मात्र पतंजली पुष्टिहार भाज्या घालून, कधी कण्या मुगडाळ, कधी मसूर डाळ अशी करते. तुरीच्या शेंगा येतात तेव्हा ते आणि मटार घालून पण करते.

आठवड्यातून एकदा चालते खिचडी. रोज नाही. मला चालेल पण घरी नाही चालत Lol

मी कधी कधी वरण भा मिक्स करून खाते. एक बारके पातेले आहे. त्यात दोन मुठी तांदूळ थोडी तूर डाळ व हळद हिंग मीठ एक थोडे तूप घालून शिजवते. गरगट करून माबो सर्फ करत करत खाते. जोडीला फार वाटले तर एक मोठ्ठा पोह्याचा पापड पिझ्हा सारखे सहा तुकडे करून तळून घेते. लहान पणीतर ताकभात. थोडी भेंडीची भाजी. आमटी दोन चमचे असले काय काय असे.

आज आता मटार पोहे केलेत.

दायगंडोरीनी रेसिपी शे का कोणपा? गंजकच दिन व्हई ग्यात खाईशीन! पन जेवण करो तं लेवा पाटील लोकेसना घरमा, मी मराठवाडाना उपरा, जयगावले ऱ्हायेल.. शेजारन्या लेवापाटील समाजन्या काकुना घरतुन ताट उनं का कोणलेच हात लावू दे नहीं त्या ताटले! फक्त मन्हा एकलाना अधिकार त्येन्हावर..

ओरिजिनल खुडा मेथी किंवा कुठलाही असेल तर कोणीतरी वेगळा धागा काढून लिहा ना. इथे हरवणार. आम्ही काय tv वर कोणी दाखवलेलं बघून करणारे, तिथे बघेपर्यंत हा प्रकार माहिती नव्हता.

वाफावलेल्या उसळी >>> हे कडधान्ये भिजवून नुसती शिजवून घेऊन टिपिकल उसळ न करता पाणी काढून सौम्य कळण (कढण) करून, उरलेल्या उसळीत सलाड मिक्स करायचं. साधारण कांदा, टोमाटो, काकडी, गाजर बाकी चाट मसाला, मिरपूड, आलं लसूण मिरची ठेचा किंवा तुकडे, कोथिंबीर, जरासे हिंग, मीठ, ओवा, लाल तिखट हवं असल्यास. फोडणी वगैरे नाही करायची. कधीतरी छान वाटते असं नुसते खायला आणि सोबत थोडा कळण भात, भात नसला तरी चालतो.

रात्री खाकरा सलाड पण करते कधीतरी. हवी ती कोशिंबीर करायची दही न घालता आणि खाकरा दोन तुकडे करून त्यावर ठेऊन खायचं. नवरा सॉस पण लावतो कधी, मग वर कोशिंबीर. मला तसं नाही आवडत. ह्यात पण जास्त करून कांदा टोमाटो काकडी गाजर छान लागतं. बारीक शेव वरतून छान लागते.

मी पण खान्देशी आहे. मलाही खिचडि खुप आवडते. अगदी रोज दिली तरीही. बट्ट आणि खुडा ऐकुण छान वाटल. खिचडि बद्दल एक किस्सा आहे लिहिले तर चालेल का ?

खिचडि बद्दल एक किस्सा आहे लिहिले तर चालेल का ?
<<
बिनधास्त लिहा. मायबोली लिहिण्या वाचण्यासाठीच तर आहे.

काल रात्री चिकन केलं नवऱ्याने. कोकोनट मिल्क चिकन करी म्हणे. बरोबर भात. खायला घेतलं.. आणि अगगगग ...चिकन पाक होता तो. ते स्वीट कोकोनट मिल्क होतं. असंही मिळतं हेच आम्हाला माहित नव्हतं . गोड चिकन भात होता ताटात. इतका वाईट प्रकार आयुष्यात खाल्ला नव्हता.

Lol ट्युलिप

मी आज व्हेज, चीज मॅक्रोनी केलेलं रात्रीचं जेवण.

Pages