तुमचा रात्रीचा मेन्यु काय असतो?

Submitted by रश्मी. on 2 July, 2018 - 06:43

दररोज रात्री जेवायला काय करावे हा नेहेमी प्रश्न असतो. जनरली, दुपारची भाजी सगळे खातीलच असेही नसते. सकाळी सगळे नाश्ता करतात, दुपार च्या जेवणासाठी सुकी किंवा पातळ भाजी किंवा उसळ, फुलके / पोळ्या, वरण/ फोडणीचे / आमटी/ सार/ कढी असते. हे तर पोटभर होते, पण प्रश्न येतो रात्रीचा. त्यात घरात जर वाढत्या वयाची मुले / मुली असतील तर आणखीन प्रश्न असतो.

माझ्या कडे आठवड्यात आलटुन पालटुन रात्री थालिपीठ / फुलके + भाजी / तव्यावरचे किंवा पातळ पिठले+ पोळ्या किंवा भात/ खिचडी / चायनीज फ्राईड राईस ( मुलगी व नवरा खातो ) / चिकोले म्हणजे वरणफळे हे मी व सासुबाईच खातो, नवरा व मुलगी या चिकोल्यांचे नाव काढले की पळतात. मग त्यांच्यासाठी परत काहीतरी वेगळे बनवा.

तुम्ही सर्व काय करता? कोणता मेन्यु असतो? वर मी जे लिहीले आहे ते होत असेलच पण तुमचेही प्रतीसाद स्वागतार्ह आहेत. तेव्हा प्लीज सुचवा.

जर आधी कोणी असा धागा विणला असेल तर मला सांगा, म्हणजे मा. अ‍ॅडमीन हा धागा उडवु शकतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्रीचं भात, भाजी,खातात, चपाती इतकं आजही खातात?>>> इतकचं नाही तर व्हेज खाणाच्या दिवशी भजी/को.वडी/अळूवडी वै. तसेच पापड/मिरगुंड तर नेहमीच सोबत असतात. आणि नाॕनव्हेज खाण्यादिवशी भाकरी/चपाती, चिकन/मटण/तळलेले मासे, भात हे पण खातात. हे आमच्याकडे तर असतेच पण आमच्या सोसायटीत, वाडीत(मी कोणाच्या घरी टोकायला जात नाही Proud पण बोलण्यात समजले आहे) , माझ्या मित्र मैत्रीणींकडे, नातेवाईकांकडे असे बरेचसे लोक रात्रीचे संपूर्ण जेवण जेवतात.
सरसकटीकरण करत नाही पण मला वाटते गरीब/lower middle class (जे दोन्ही वेळी स्वयंपाक करु शकतात) हे लोक दोन्ही वेळेस पूर्ण स्वयंपाक करतात. उलट रात्रीच्या जेवणात भजी वैगरे प्रकार जास्तच असतात कारण रात्री जेवायला सगळे सदस्य असतात (कामावरुन येणारे).

ट्युलिप, आगागा गोड चिकन.

(जे दोन्ही वेळी स्वयंपाक करु शकतात) हे लोक दोन्ही वेळेस पूर्ण स्वयंपाक करतात. उलट रात्रीच्या जेवणात भजी वैगरे प्रकार जास्तच असतात कारण रात्री जेवायला सगळे सदस्य असतात (कामावरुन येणारे).>>>>+१११११

आमच्या कडे पण पूर्ण जेवण असते,

सकाळी चपात्या तर रात्री शक्यतो भाकरी असते. अन तोंडलावणी ला, पापड , भजी , लोणचे यातील काहीतरी असतेच

आज जवळपास १२ वर्षे झाली रात्री फक्त फलाहार. एक किंवा दोन फळे फक्त, पपई-कलिंगड-खरबूज वगैरे असलं तर दोन सर्व्हिंग (100 ग्रॅम इच) खातो. पण रात्री अन्न सहसा खातच नाही. पोट हलकं राहतं सकाळी मोशन्स नीट होतात, ब्रेकफास्ट अगदी होलसम होतो अन पर्यायाने लंच पण लिमिटेड तरी सकस खाल्लं जातं. फळांचा चॉईस नाही अगदी एक्झॉटिक फळेच पक्षी ड्रॅगनफ्रुटच पाहिजे, किवीजच पाहिजेत, असे नाही , आंबट फळे टाळतो, पण फायबर्स असणारी आंबट फळे खातो पक्षी संत्र गोड असलं तर किंवा मोसंबी चोथ्या सहित चावून खातो. काहीच नसलं तर आकारमानाप्रमाणे दोन किंवा तीन केळी खातो, ह्यामुळे प्रवासात पण खास त्रास होत नाही.

तसं पाहिलं तर रात्री मी काहीच खात नाही. मी माझा वर दिलेला आहार हा संध्याकाळी ६ - ६-३० चा आहे.
सकाळी ११ ला लचं. नो ब्रेकफास्ट, मध्ये काही खाणं नाही.

बिनधास्त लिहा. मायबोली लिहिण्या वाचण्यासाठीच तर आहे.

Submitted by आ.रा.रा. on 8 August, 2018 - 11:09
धन्यवाद
लहान पणी दुपारी जेऊन खुप खेळुन झाल्यान्नतर मी घरी आली त्या दिवशी घरी खिचडी बनवली होती आणि मोठी बहिण बाहेर भान्डी घासत होती... अर्थात खिचडी सम्पली होती. मी ओरडायला लागली मी घरात सगळ्यात लहान आणि मस्तीखोर मी ओरड्त असताना बाजुच्या मुलाने ऐकल जो माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीचा वयाचा होता. त्या दिवसा पासुन तो मला खिचडी म्हणुन चिड्वायचा हळु ह्ळु सगळी मुले चिड्वायला लागली खुप राग यायचा किती जणाना मी मारले होते तेव्हा. खिचडी शब्द ऐकुण आठवणी जाग्या झाल्या आता हसायला येतय खुप पण तेव्हा अस वाटायच कि एक एकाला पकडून खुप मारावे.....

रात्रीचं भात, भाजी,खातात, चपाती इतकं आजही खातात? > हे इनोसन्टली विचारले आहे कि sarcastically ? Happy

रात्रीचं भात, भाजी,खातात, चपाती इतकं आजही खातात? > इतकं ??? हे तर बेसिक आहे. त्याशिवाय सोबत सूप , कोशिंबीर , भजी किंवा अजून खूप काही असू शकते. रात्रीच्या वेळीच घरात पूर्ण फॅमिली जेवायला एकत्र असते त्यामुळे ब हुतेक वेळा पूर्ण जेवण असतेच आणि तसेही गरमागरम जेवण त्याच वेळी सगळे एकत्र जेवू शकतात Happy

सरसकटीकरण करत नाही पण मला वाटते गरीब/lower middle class (जे दोन्ही वेळी स्वयंपाक करु शकतात) हे लोक दोन्ही वेळेस पूर्ण स्वयंपाक करतात. उलट रात्रीच्या जेवणात भजी वैगरे प्रकार जास्तच असतात कारण रात्री जेवायला सगळे सदस्य असतात (कामावरुन येणारे). >>>>
रात्री घरी सगळे एकत्र बसून जेवतात म्हणून पूर्ण जेवण बनवले जाते.>>>>> याच्याशी सहमत.

पण गरीब/lower middle class (जे दोन्ही वेळी स्वयंपाक करु शकतात) हे लोक दोन्ही वेळेस पूर्ण स्वयंपाक करतात.>>>>हे नाही कळले .

हो च्रप्स तसे म्हणता येईल. पण मी कॅलोरीज मोजत नाही, ते आपसूक मॅच होत असावेत. बिन साखरेचा काळा चहा मी खूप वर्षांपासून घेतो आवड म्हणून, आता जास्वंद फुलांचा घेतो, कधी काळा चहा. हे आवड म्हणून पण तेही ईंफा ला आपसूक सूट होते.

पण गरीब/lower middle class (जे दोन्ही वेळी स्वयंपाक करु शकतात) हे लोक दोन्ही वेळेस पूर्ण स्वयंपाक करतात.>>>>हे नाही कळले .

आपल्याकडे बरेचसे class आहेत, त्यात असे काही गरीब आहेत ज्यांना दोन्ही वेळेस जेवायला मिळणे पण कठीण असते. तर काहींना शक्य असले तरी त्यात संपूर्ण जेवण मिळेलच असे नाही मग तेव्हा दुपारच्या जेवणात फक्त पोळी भाजी व रात्री पूर्ण जेवण असते.
गेल्या काही वर्षात रात्री जास्त खाणे शरीरासाठी कसे अपायकारक आहे याचा भरपूर प्रचार झाला आहे परंतु त्याचे पालन शक्यतो श्रीमंतवर्ग व उच्च मध्यमवर्गीयांकडून होत आहे. कष्टकरीवर्ग व निम्न मध्यमवर्ग अजूनही रात्री संपूर्ण जेवण करणे पसंत करतो. उलट पाणीपुरी असो वा पिझ्झा असे काहीही खाल्ले तरी मला वरणभात लागतोच असा सुर असतो बर्याचजणांचा Proud
पुन्हा सांगते सरसकटीकरण करत नाही पण जे पाहिले, अनुभवले आहे त्यातून बनविलेले हे माझे वैयक्तिक मत आहे.

पुन्हा सांगते सरसकटीकरण करत नाही पण जे पाहिले, अनुभवले आहे त्यातून बनविलेले हे माझे वैयक्तिक मत आहे>>>>> हो निल्सन हे खरे आहे. माझा नवरा व सासु डायबेटीस मुळे रात्री जास्त खाणे पसंत करत नाहीत. नवरा तर म्हणतो की दिवसभर बैठे काम असल्याने रात्री जड जेवण नकोच. पण मला रात्री निदान पोळी किंवा भाकरी लागतेच. कारण त्या शिवाय पोट भरले आहे असे वाटतच नाही. पण कधी कंटाळा आला की ज्वारीच्या पीठाची उकड ( कांदा न घालता फोडणीत नुसती हि. मिर्ची, कढीपत्ता घालुन ) करते.

कष्टकरी लोकांना रात्री नीट जेवण लागतेच. आमच्या कॉलनीत बहुतेक जण डब्याला नुसतीच सुकी परतलेली पालेभाजी ( मेथी वगैरे) व पोळ्या घेऊन जातात. मग रात्री मात्र भात- वरण- पातळ भाजी-पोळी असे सगळे असते.

मुगाची खिचडी (साला सकट मुग अस्तील तर क्या केहने...!)... ऑल टाइम हिट , वरुन फोड्णीचं तेल त्यात कढि पत्ता लसुण आणि लाल मिर्च्या

सोबत दही, लोणचं, पापड, कुरडई , पिठ्लं , कोशिम्बिर , सलाद, अम्सुलाची कढी, साधी कढी, सोल कढी , तळलेल्या हिरव्या मिर्च्या(ह्यात हळद, गरम मसाला, चाट मसाला, लिम्बु हे सर्व घालायचं)
वरील पैकि कुठ्लेही १-२ पदार्थ .
वरण - भात ,
चिकोले (दाल ढोकली गुज्जु स्टाईल)
कधी कधी - "इन्द्र -सभा" - म्हन्जे फकस्त ज्युस किन्वा फळे अथवा - बदाम मिश्रित दुध. दुपार चे जेवण उशिराने झाल असेल तर हमखास इन्द्र सभा भरतेच Proud

माहेरचा ऑगस्टचा अंक अन्नपूर्णा विशेषांक आहे.
रात्रीच्या जेवणाचं तीस दिवसांचं क्यालेंडर छापल़य.
स्पर्धेची थीमही रात्रीचं पौष्टिक पण कमी जेवण अशी होती.
दोहोंत तीन तीन पदार्थ आहेत.

हा धागा हरवून गेला आणि हरवून जातो याच साठी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला आहे.
https://chat.whatsapp.com/GY4e7xEtq3J7t40KOQAADo

या आणि सामील व्हा!
ग्रुप नियम
आज काय बेत असेल तो जरूर द्या. साधासुधा सोप्पा असेल तर उत्तमच!
पाककृती असतील तर द्या. फोटो सहीत दिल्या तर अजून चांगले.
कोशिंबीरी व इतर पदार्थ पण द्या.
काही वेळा सणासुदीला खास बेत असतो तो ही दिला तरी चालेल.
विशेष कार्य प्रसंगासाठी साठी काय बेत करावा याची विचारणा करता येईल.
येथे पाककृती, अन्न हे पूर्णब्रह्म अशा जेवणाच्या बेताशिवाय इतर काहीही विषय नकोत. अन्यथा येथून नारळ दिला जाईल याची नोंद घ्यावी!
(अ‍ॅडमिनकडे खरोखर नारळ मागू नये! नारळ दिला जाईल म्हणजे काढून टाकले जाईल.)

https://chat.whatsapp.com/GY4e7xEtq3J7t40KOQAADo

Pages