तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेफ Lol

असाम्या, बॉस्टन सोडून टेकर झालास ना. आता भोआकफ. बारातिओंका स्वागत कोकम सरबतसे करो.. नो थंडी नो बिन्नेस ... आपलं दारू.

Why are you pushing food on them? If they want it, they will ask for it.
Can you imagine my facial reaction? <<< Lol Lol Lol . समजू शकते.

कोकम सरबत अजून उत्तम. >> तुम्ही अमेरिकेत कोकम सरबताची एजन्सी घेऊन टाका एक<<<< पटेल ब्रदर्स कडे चांगले कोकम सरबत मिळते Bw

“उन्हातान्हातून थकून आलेल्यांना चिल्ड बीयर देणे हिच खरी उच्च संस्कृती रे.” - सद्गदित झालोय मी. ‘अथा तो ब्रह्मजिज्ञासा‘ म्हणणार्या ‘पानवाल्या’तल्या ऋषी-मुनींमधे असामीची गणना करण्याचा मोह फेसाळणार्या बीअरप्रमाणे अनावर होतोय. Happy Happy

पटेल ब्रदर्स कडे चांगले कोकम सरबत मिळते >> त्यातल पहिला घटक बघा काय असतो ते.

‘अथा तो ब्रह्मजिज्ञासा‘ म्हणणार्या ‘पानवाल्या’तल्या ऋषी-मुनींमधे असामीची गणना करण्याचा मोह >> नशिब अप्सरांवर घसरून ३ पीक्स वगैरे ठिकाणी नाही पाठवलस Wink

उन्हातान्हातून थकून आलेल्यांना चिल्ड बीयर देणे हिच खरी उच्च संस्कृती >> प्रत्येक शाळेतल्या वर्गावर्गात हा सुविचार लावणेत यावा ही मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे.

अच्छा. ते तिथे सूट होत असेल कदाचित. आपल्याकडे मनुष्यबळ जास्त असल्याने ते वापरले जात असावे. तितकाच रोजगार निघतो >>

रोजगार बिजगार नाही, अमेरिकेत शक्यतो आलेलीच वस्तू परत करतात. आपल्या इथे माणूस चेक करतो की घेतलेली वस्तूच परत करत आहेत, ती वापरलेली नाहीये (labels and original packaging should be intact).

Culturally different.
असलेली लोक एकत्र आली अचानक काही कारणाने तर शॉक वर शॉक बसतात.
तसेच.
Wealthy - poor
लोक पण अशी अचानक एकत्र आली की शॉक वर शॉक बसतोच.

आता आम्ही सातारी माणसं भाकरी कुस्करून खातो.
ते पुणेरी व्यक्ती नी बघितले तर त्याला नक्कीच शॉक बसेल.
एकाच टेबल वर दोघांस जेवायला बसवले तर अजून मोठा शॉक बसेल.
भूक च उडून जाईल त्याची

नवीनच एक पुण्याचा मित्र झाला होता.
मित्राचा मित्र.
त्याच्या कडे आणि पुण्यात पण प्रथमच आलो होतो.
जेवायला बसलो आम्ही आम्ही सर्व त्याच्या घरी.
वहिनी वाढत होत्या.
घालू का पोळी असा आग्रह प्रतेक पोळी च्या वेळेस .
आणि ती पोळी आम्ही एकाच घासात sampvaycho.
शेवटी तो मित्र च बोलला त्यांच्या समोर सर्व पोळ्या ठेव ते घेतील हाताने.
कुस्करून दोन तीन भाकरी खाणारे आम्ही त्या लहान पोळी नी काय होतंय
तेव्हा वाहिनाना नक्कीच शॉक बसला असणार
.

आमच्याकडे भारतातून पाहुणेआले होते. मीत्यांना आग्रह करत होते. हे वाढू का. ते वाढू. माझा मुलगा तिथेच बसला होता. शेवटी माझ्या आग्रहाला कंटाळून म्हणाला,
Why are you pushing food on them? If they want it, they will ask for it.
Can you imagine my facial reaction?
>>

हे माझी मुलगी मला नेहेमी करते.

इचीभन,

काई अब्यास गिब्यास केला असता त लेक आमी बी अस्मानातून पळणारा बर्फ पायला असता राजे हो, पर आमी बर्फ पायतो फक्त लादी ते बी केला प्लॉटच्या बर्फ कारखान्यातून निंगेल.

बाकी तापमानाचा काई संबंध नसाव हे मले बी शंभर हिश्शे पटू रायले हो ! दारूचे काई कौतुकच नाई, आमाले अकोल्याच्या गर्मीत बी भायरून आल्यावर कोनी मले फुकट दारू पाजतो म्हनलं तर मी काहाले नाई म्हनतो बावा...

अमेरिकेत शक्यतो आलेलीच वस्तू परत करतात. आपल्या इथे माणूस चेक करतो की घेतलेली वस्तूच परत करत आहेत, ती वापरलेली नाहीये (labels and original packaging should be intact).
>>>>

माझ्या एका अमेरीकेतील भारतीय मित्राने दिलेल्या माहितीनुसार तिथे काही भारतीय फिरायला जाताना थंडीचे जाडजूड कपडे, जॅकेटस वगैरे ऑर्डर करतात. लेबल्स न लावता वापरतात. आणि फिरून आल्यावर रिटर्न करतात. आता असे करणारे कमीही असतील. पण एखाद्या पॉलिसीचा फायदा कसा उचलता येईल ही वृत्ती आपल्या अंगात भिनलेलीच असते.

>>>> फिरून आल्यावर रिटर्न करतात.
मी ही हे ऐकले आहे. अनुभवलेले आहे. सासूबाईच नणंदेला सांगताना ऐकलेल आहे - रिटर्न कर आता. आता एकदम पुढच्या वर्षी लागेला हालोवीनचा कॉश्च्युम. मग कशाला ठेवायचा.
सौ मे से नब्बे बेईमान फिर भी मेरा भारत महान!!!

सौ मे से नब्बे बेईमान फिर भी मेरा भारत महान!!!>>> इकडचे लोकं पण करतात. आपल्याला फक्त भारतीय लोकांचं कळत म्हणून.

एक मला आठवत मिस्टिक पिझ्झा , जुलिया रॉबर्ट्स चा मूवी आहे त्यात तिला एका श्रीमंत मूलाच्या घरी जायचं असत तर तिचा प्लॅन असतो त्या दिवसापुरता ड्रेस आणून वापरून दुसऱ्या दिवशी परत करायचा. आणि हा खूप जुना मूवी आहे म्हणजे तेव्हापासून हे चालत आलय

costco मध्ये मला वाटत गेल्याच्या गेल्या वर्षी , एका बाईने ३ का ५ जानेवारीला क्रिसमस ट्री रिटर्न करायला आणलेला. चक्क बातमी आलेली. त्यावरून सगळे कॉस्टको भक्त वैतागलेले. वगैरे वगैरे

हालोवीनचा कॉश्च्युम>>> ते रिटर्न नाही घेत, पार्टी सिटी त बोर्ड लागलेले असतात नो रिटर्न चे

आमच्या एका सहकार्‍याचे लग्न ठरले आहे. तो हनीमून ला इटली ला जाणार आहे. जावो बापडा. पण तो प्रत्येक मीटींग मध्ये, स्लॅक वर , 'मी दोन आठवडे इटली ला हनीमून ला जाणार आहे. डेटाबेस इस्शू साठी अमक्याला गाठा, मार्केट डेटा साठी तमक्याला .. ' वगैरे सांगत आहे. भारतात ( निदान मी भारत सोडला तेव्हा तरी) नवविवाहीत लोक 'आम्ही हनीमून ला महाबळेश्वर ला जात आहोत' असे सांगत नसत. फार तर 'महाबळेश्वर ला जात आहोत' इतकेच मोघम बोलत असत.

तो आकुकाक करते बघत असेल. त्यातलं ४५+ वयात लग्न केलेलं जोडपं वाटेत भेटलेल्या अनोळखी तरुणीला आम्ही हनिमूनला जातोय असं सांगतं. जोडपं म्हणजे त्यातला नवरा सांगतो. बायको इश्श करते.

एकाच आठवड्यात धाग्या मागून धागे अचानक गायब होऊ लागणे हां मायबोली कल्चर साठी सर्वात मोठा कल्चरल शॉक आहे.

Pages