तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्याचं नाव बदलून कल्चरल धक्क्या ऐवजी " मला खटकणार्‍या गोष्टी" असे न ठेवल्याने मोठाच कल्चरल धक्का बसला.

मराठी लोकांच्या लग्नात .
विचित्र प्रकार सध्या सुरू आहेत.
लग्नं अगोदर फोटो शूट.
जेवणात नको ते पदार्थ.>> साखरपुड्या च्या दिवशी केक कापणे,प्रपोज करणे ,डान्स हे राहिलेच
(धाग्याचा विषय वेगळा आहे,तरी असंच)

हो
मराठी लग्नातले मराठीपण हरवत चाललेय
योगायोगाने कालच हा विषय आमच्या घरी आला
नवीन धागा काढायला हवा यावर

हो
मराठी लग्नातले मराठीपण हरवत चाललेय
योगायोगाने कालच हा विषय आमच्या घरी आला
नवीन धागा काढायला हवा यावर

मराठी लग्नातले मराठीपण हरवत चाललेय
योगायोगाने कालच हा विषय आमच्या घरी आला >>> आमच्याकडेही आजच हा विषय निघालेला खास जेवणासाठी. गावाकडची लग्नातील खास ती चवळीबटाटा, वांगंबटाटा भाजी मिस करते. आता गावी पण पनीर, चायनीजचा शिरकाव झाला आहे.

किती किती दिवस झाले पंगतीतला चवळी बटाटा खाऊन...

पत्रावळ त्यावर भात, गरमागरम वाफाळते वरण/डाळ, चवळी बटाट्याची भाजी, कोबी डाळीची भाजी, घरी केलेले पापड, लोणचं असेल/नसेल... आहाहा...

मराठी लग्नातले मराठीपण हरवत चाललेय
योगायोगाने कालच हा विषय आमच्या घरी आला
नवीन धागा काढायला हवा यावर
>>>>

काढला
मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?
https://www.maayboli.com/node/82748

आत्ताच ऑनलाईन खरेदीच्या धाग्यावर वाचलं कि भारतात ऑनलाईन शॉपिंगमधे घेतलेली गोष्ट परत करायची असेल, तर ती गोष्ट परत न्यायला माणूस येतो. शॉक वगैरे नाही पण गंमत वाटली.

पोस्टाने/कुरिअरने पाठवून द्यायचे = परत करायचे अशी पद्धत आहे. बरेचदा साईटवरती जाउन ते प्रॉडकक्ट्निवडले की प्रिपेड लेबल तयार होते. बस्स ते लेबल चिकटवुन, आलेल्याच बॉक्समधुनच परत करायचे. काहीही खर्च नाही.

अच्छा. ते तिथे सूट होत असेल कदाचित. आपल्याकडे मनुष्यबळ जास्त असल्याने ते वापरले जात असावे. तितकाच रोजगार निघतो.
ग्राहकाच्या दृष्टीने हे बेस्ट आहे मात्र. दारात माणूस येऊन घेऊन जातो. त्यामुळे आमच्याकडे नेहमीच एकापेक्षा जास्त वस्तू स्पेशली कपडे मागवणे आणि त्यातील एक निवडून शिल्लक परत करणे हे कॉमन आहे.

अम्राविकेतही माणूस येतो (येऊ शकतो.. परवडत असेल तर ती सेवा मिळते) की. फेडेक्सचा येऊ शकतो माणूस... वजन करुन, ट्रॅकिंग लेबल जनरेट करुन ठेवून द्यायचा बॉक्स बाहेर. फेडेक्स अर्थात रिटर्नला नाही येत कारण सेलरला परवडत नाही. अ‍ॅमेझॉनही पूर्वी रिटर्नला माणसाला पाठवत असे. घराबाहेर लेबल लावून बॉक्स ठेवून द्यायचा. डिलिवरी करणारा माणूसच घेऊन जातो. बे-एरियात तरी ही सर्विस उपलब्ध होती.

मी तर एकदा कॉम्प्युटरचा टेबल परत केलेला. ड्रॉव्हर, कीबोर्डची फळी, वायर घुसवायचे होल्स, पाय ठेवायचा दांडा वगैरे फुल्ल साईजचा होता. तुकड्यात आलेला तो खाच्यात अडकवून आणि सोबत आलेले स्क्रू वापरून जोडला. पण मग तो फिल आला नाही म्हणून पुन्हा उघडला आणि पॅक केला.

छान पावसाळ्याचे दिवस होते. रिटर्न स्विकारणारा माणूस ओलाचिंब होऊन भिजत भिजत आला होता. आम्ही केलेली तोडकीमोडकी पॅकिंग बघून म्हणाला की ईतके पावसात कसा घेऊन जाणार. मग आम्हाला अजून छान पॅकिंग करा, मी उद्या परत येतो म्हणून निघून गेला. दुसर्‍या दिवशी खरेच परत आला. आम्ही त्याच्या समाधानासाठी चार सेलोटेप आणखी मारून ठेवलेल्या. पण दुसर्‍या दिवशी पाऊस नसल्याने हसत हसत घेऊन गेला.

मी सुद्धा मग सरळ एपीएमसी मार्केटला जाऊन पोरीसाठी स्टडीटेबल घेऊन आलो. तोच आम्ही आलटून पालटून वापरू लागलो.

पण एक बरे आहे ईथले. पैसे लागलीच रिटर्न होतात. माणूस मग कधी येईल तेव्हा येईल. आपल्याला टेंशन ऊरत नाही Happy

आमच्याकडे सालाबादप्रमाणे यंदाही होली चा सण हपिसात साजरा झाला. फार कोणी भारतीय नसताना हा जण साजरा करण्याचा उत्साह गोऱ्यानाच खूप असतो.
यावेळी मात्र एचआरने इमेलमध्ये स्पष्टच लिहिलं होतं की ठेवणीतले पांढरे कपडे घालून कृपा करून येऊ नका. आदल्या दिवशी रिमाईंड करायला परत मेल होती त्यातही लिहिलं होतं की छान छान पांढरे कपडे घालून यायचं नाहीये. तुम्ही तुमचं घर स्वतः रंगवायला काढता तेव्हा जसे कपडे घालता तसेच जुने कपडे घाला. यावर्षीच्या मेल मध्ये चक्क हा हिंदू सण आहे असाही उल्लेख होता. मागच्या वर्षी होलीला पारच सेक्युलर करून टाकलं होतं. मी wfh असल्यामुळे जायचा आळस केला. तरी सकाळच्या कॉलमध्ये डिस्कशन लवकर आटपलं तेव्हा थोडक्यात हिरण्यकश्यपू प्रल्हाद होलिका अशी गोष्ट सांगितली. मुलाला थेट जाळू पाहणारा बाप आणि त्यासाठी मदत करणारी आत्या वगैरे ऐकून भारतीय कल्चरचा धसका घेऊन मंडळी गप्प झाली. मग 'all this just mythology' असं सांगून मी विषय संपवला. Biggrin

मुलीचा आणि तिच्या आई चा एक च बॉय फ्रेंड असतो. >> हे काटकसरीच्या धाग्यावर हलवा.
( ते लपून कुठं बसायचं तेव्हढं संपर्कातून कळवा)

WHITEHAT, धमाल!

मुलाला थेट जाळू पाहणारा बाप आणि त्यासाठी मदत करणारी आत्या >> हे सांगून म्हणायचं, बुरा मत मानो होली है

Pages