तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलाला थेट जाळू पाहणारा बाप आणि त्यासाठी मदत करणारी आत्या वगैरे ऐकून भारतीय कल्चरचा धसका घेऊन मंडळी गप्प झाली. मग 'all this just mythology' असं सांगून मी विषय संपवला >>> Lol Lol

एका पार्टीत एक चिलम तोंड पोट्ट रोडग्या संग पनीरची भाजी खाताना बघतलं लेक, निस्ता हुलावला महा जीव, मले लेकाचा त्यानंतर घास गोळ ना लागे. काईच्या काही खाते लेकरं आजकालचे.

खास करून अमेरिकेत सापडणाऱ्या बहुतांशी थाई रेस्टॉरंट मधल जेवण सारख असल्याचे कारण म्हणजे त्यांचा मेनू हा थाई सरकार ने डिझाईन केलेला असतो आणि त्यांचे शेफ हि सरकारने ट्रेन केलेले असतात.

अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे थाई सरकार अशी रेस्टॉरंट उघडण्यासाठी स्टार्टींग कॅपिटल हि पुरवते.

गेल्या रविवारी इथे कॅनडा मध्ये एका फॅमिली फ्रेंड ला आणि त्याच्या कुटुंबाला घरी जेवायला बोलावले, गुढी पाडव्या च्या निमित्ताने श्रीखंड पुरीचा बेत केला. आम्ही पुण्यात असताना सुद्धा आणि आता इथे जमिनीवर चटई अंथरून जेवायला बसतो (डाईनिंग टेबल वापरात नाही), मित्रा सोबत त्याची मुलगी होती. आम्ही चटई अंथरली आणि जेवायला बसायाला सांगितले. छोट्या मुलीचा एवढा गोंधळ झाला कि तिला कळेच ना कि चटईवर आपण बसायचे कि ताट ठेवायचे. मग तिला बायकोने समजावले, तिचा गोधळ दूर झाला, पाने वाढली आणि जेवायला सुरुवात केली. ती पहिल्यांदा श्रीखंड पुरी खात होती, तिचा पुन्हा गोंधळ झाला कि पुरी खायची तरी कश्या सोबत.

अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे थाई सरकार अशी रेस्टॉरंट उघडण्यासाठी स्टार्टींग कॅपिटल हि पुरवते. >>> हे टोटली शक्य आहे. कारण प्रत्येक थाई रेस्टॉ मधे त्यांचे कोण ते राजे वगैरे आहेत त्यांचा फोटो हमखास असतो Happy हे बाकी कुझिन्सच्या रेस्टॉ मधे फारसे दिसत नाही.

हे बाकी कुझिन्सच्या रेस्टॉ मधे फारसे दिसत नाही.
बाकी कुझिन्सच्या हाटेलात थाई राजाचा फोटो का ठेवतील बरे? <<<<< बेश्ट Lol Lol Lol

ईथे इंग्लंडात कोणाच्या घरी जेवायला गेल्यावर पहिले ड्रिंक्स (alocoholic ) विचारतात.. किमानcoke तरी प्या असा आग्रह असतो. पाणी मागितलं की ऑफेंड च होतात असं वाटलं. Lol

हपा Lol

ते राजे वगैरे आहेत त्यांचा फोटो हमखास असतो

त्यांच्या सध्याच्या राजाचे नाव महावज्रलंगकोर्न होय, थायलंड मदी म्हनतेत बुआ का बा राजावर कॉमेंट करने हा दखलपात्र गुन्हा होय अन् अशे काई केले तर मानुस लंबा जायते बिनभाड्याच्या खोलीत.

खखोदेजा

ईथे इंग्लंडात कोणाच्या घरी जेवायला गेल्यावर पहिले ड्रिंक्स (alocoholic ) विचारतात.. किमानcoke तरी प्या असा आग्रह असतो. <<< इकडे अमेरिकेत सुध्दा.

माझा आते भाऊ आमच्या जवळ राहतो, माझ्यापेक्षा बराच लहान आहे. त्याच्याकडे पहिल्यांदाच गेल्यावर त्याने आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ड्रिंक (alcoholic ) विचारले. आमच्या कडची कुटुंबे एकदम बाळबोध वळणाची ... त्यामुळे त्याने मला असे विचारणे एक कल्चरल शॉक होता माझ्यासाठी .
मी पण लगेच ताईगिरी करून, "अरे तुमच्याकडे सतत पाहुणे आणि प्रत्येकाला तुझी आजी आणि आई चहा विचारायच्या .. "
आता तू विचारायची परंपरा कायम राखलीयेस. पण काय विचारायचं (?) त्यात १८० अंश फिरलायस." << Lol Lol Lol

England आणि अमेरिका खूप च मागास आहे असे वाटते.
जे आल्यावर पहिले ड्रिंक ऑफर करतात.
दारू किंवा सॉफ्ट ड्रिंक.
दोन्ही शरीरासाठी अत्यंत घातक.
खुप च अडाणी लोक आहेत ती .
लिंबू सरबत हे आल्यावर दिले तर उत्तम.
कोकम सरबत अजून उत्तम.

लिंबू सरबत हे आल्यावर दिले तर उत्तम.
कोकम सरबत अजून उत्तम. >> ऊणे वीस डीग्री तापमानातून भेटायला आलेल्या पाहुण्याल गोठलेला घसा शेकायला लिंबू सरबत दिल्यावर येणारा पाहुणा फायरप्लेस मधलं जळकं लाकूड घेऊन यजमानाच्या पाठीत घालतांना दिसला तर हेमंत सर म्हणतील बघा मी म्हंटलं नव्हतं हे अमेरिकन्स किती मागासलेले आहेत.

Soft drinks
मला वाटतं चील च सर्व्ह केले जाते..
ते चालते तर निंबु सरबत,कोकम सरबत का चालू नये.

उणे वीस तापमानातून (कार पार्क केल्यापासून घराची बेल दाबून आता येईतो जो सब मिनिट वेळ लागतो तो का असेना) आल्यावर अल्कोहोल विचारतात त्याचा थंडी घालवण्याशी खरंच संबंध असतो? असं कुणाला खरंच वाटतं का?
म्हणजे ते विचारण्याला माझी काहीच हरकत नाही, बिअर विचारा की स्कॉच विचारा की अजुन काही. मी होच म्हणेन.
फक्त त्याचा तापमानाशी संबंध जोडून त्याचं भारतीय भंपक अध्यात्मिकरण करू नका इतकंच! Happy

अल्कोहोलिक पेय का विचारतात?

आपल्याकडे बाहेरुन येणारा पाहुणा हवामान व आपल्याकडिल सार्वजनिक सोयीण्चा अभाव यामुळे तहानलेला असतो, त्यामुळे आल्यावर लगेच पाणी समोर केले जाते. परदेशात अल्कोहोलिक पेय समोर करण्यामागे काय कारण असावे?

प्रथा पडली तेव्हा लोक हॉर्स कॅरिएजमधून यायचे आणि घरातही सेन्ट्रल हीटिंग नसायचं. तसं काय मुंबईतही एसी कारने येऊन एसी असलेल्या घरात शिरणारा माणूस तहानतो का? पण रीत पडली ती पडली. Happy

(पुढे टॉयलेट पेपर व्हर्सेस पाणी आणि हवामान वगैरे उदाहरण देणार होते, पण राहू दे. शिवाय आधीच्या पोस्ट्स वाचलेल्या नाहीत, तेव्हा ते येऊन गेलेलं असण्याची शक्यता आहे.) Proud

थायलंड मदी म्हनतेत बुआ का बा राजावर कॉमेंट करने हा दखलपात्र गुन्हा होय अन् अशे काई केले तर मानुस लंबा जायते बिनभाड्याच्या खोलीत. >>>

होय, खरं आहे. राजे साहेब बरेच रंगेल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बऱ्याच टीका होत असतात.

सध्या त्यांनी ऑफिशिअल राणी (चौथी बायको) सोबत घटनेत फेरफार करून एक ऑफिशिअल कॉनक्यूबायीन हि नेमली आहे.

प्रथा आहे तिकडे .
आल्यावर alcoholic drinks विचारायची हे योग्य वाटत.
पण त्याची तुलना पाण्याशी करता येणार नाही.
पाणी पिणे ही शरीराची गरज आहे .
एसी car नी या किंवा एसी घरात या.
पाणी काही वेळाने प्यावेच लागते.
प्रवसात दोनतीन तास जातात च असे गृहीत धरा.
पाणी देणे हे योग्य च आहे.

मी काही तापमानवरून अमेरिकन संस्कृती जोडत नाहीये. ईथल्या म्हणजे शिकागोतल्या हिवाळ्यात कोणी लिंबू सरबत ऑफर केले तर एखाद्याचा वैतागाने किती तळतळाट होईल असा एक प्रसंग डोळ्यासमोर आला तो लिहिला.

पण एखाद्या संस्कृतीचे खाण्या पिण्याचे कल्चर तयार व्हायला त्या प्रदेशाचे भौगोलिक वैशिष्ट्य ऊदा. तापमान महत्वाचे कारण का असणार नाही? हीटेड कार, डीयुआय वगैरे मागच्या पन्नास साठ वर्षातल्या डेवलपमेंट आहेत. पेय्/अपेय पानाचे सोशल नॉर्म्स अनेक शतकांपासून डिवेलप झाले आहेत... होत आहेत.

आमच्याकडे भारतातून पाहुणेआले होते. मीत्यांना आग्रह करत होते. हे वाढू का. ते वाढू. माझा मुलगा तिथेच बसला होता. शेवटी माझ्या आग्रहाला कंटाळून म्हणाला,
Why are you pushing food on them? If they want it, they will ask for it.
Can you imagine my facial reaction?

Pages