वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला बघायचा आहे हाही सिझन उमेशसाठी.

सध्या त्याला सोनीच्या सिरीयल मध्ये बघतेय, कसला सॉलिड दिसतोय. तो आणि मुक्ता सहजसुंदर अभिनय.

Apple tv + वर The mosquito coast सिजन 1 नुकताच संपवला एक अमेरिकेन परिवार ज्याच्या मागे पोलीस व एफबीआय लागली आहे म्हणून एली ,पत्नी मार्गो व दोन मुलं गेली नऊ वर्षे ते नाव बदलून इकडे तिकडे राहत असतात पण ऐके दिवशी त्यांचा ठावठिकाणा यंत्रणेला लागतो व मग येथून सुरू होतो पाठलाग व एक रोमांचकारी प्रवास .तर हे कुटुंब येणार्या वेगवेगळ्या समस्यांना कसे सामोरे जातं व त्यातून कसे सही सलामत बाहेर पडतं हे बघण्या सारखं आहे( Everything is complicated but there's always a solution.)..जबरदस्त सीरीज शेवटच्या ऐपिसोड पर्यंत खिळवून ठेवणारी वेगवान कथानक तितकंच सुदंर छायाचित्रण... सर्व कुटुंबासोबत बघण्यासारखी एक सुंदर सिरीज

मी क्वीन ऑफ साउथ बघते आहे सध्या, नेटफ्लिक्स च्या सजेशन्स मधे आली म्हणून प्रोमो पाहिला, बरी वाटली आणि चालू केली पहायला.
मेक्सिकन ड्रग कार्टेल्स, कोलम्बियन ड्रग लॉर्ड्स , इ. इ मालमसाला आहे. मुख्य सगळे बहुधा मेक्सिकन अ‍ॅक्टर्स आहेत.

क्वीन ऑफ साउथ मी पूर्ण बघितली आहे. मेक्सिकन ड्रग कार्टेल वर असली तरीही स्त्री माफिया हा मुख्य फोकस आहे. साधीसुधी असणारी तेरेसा अपघाताने या क्षेत्रात येते आणि तिचं लाईफ कस बदलत जातं हा गाभा. काही ठिकाणी अंगावर येते ही सिरीज.

हो का, मी अजून पहिल्याच सीझन वर आहे. साधीसुधी म्हणजे रेलेटिव्ह टर्म असेच म्हणावे लागेल कारण तेरेसा तिच्या बॉयफ्रेन्ड ला भेटायच्या आधीही ड्रग डील करत असतेच फक्त लहान स्केल वर, स्ट्रीट सेलरसाठी काम करत असते इतकेच.

पुढे जाऊन तेरेसा ड्रग माफिया बनते , गोळ्या बिळ्या झाडते. त्या तुलनेत आधीच लाईफ साधेसुधे म्हणावे लागेल.
मला त्यातील ड्रगच वाइनमध्ये रूपांतरण करून विकायची कल्पना अभिनव वाटली ( कोणाच काय तर कोणाचे काय ! Wink )
आता जास्त स्पॉयलर लिहीत नाही . नहितर मजा निघून जाईल .

@फारएण्ड walking dead चे 10 सिजन आहेतच ऑलरेडी. 11वा येत आहे 22 ऑगस्ट ला. माझे 9 झालेत. 1 ते 6 आणि 9 मस्त आहेत. 7आणि 8 लय बोर झाले. 10 वा बघेन आता. स्ट्रेंजर थिंग्स कधी येत आहे कुणास ठाऊक. अगदीच उत्सुकता आहे.

लंपन - मी नेफिवर बघतोय. तेथे दहावा सीझन आत्ता काही दिवसांपूर्वी उपलब्ध झाला. मूळ टीव्ही चॅनेल वर ११ वा येणार होता ते वाचले होते. मला ७ आणि ८ ही आवडले. सहाव्या सीझनच्या शेवटी नीगन ची एण्ट्री आहे ना? एण्ट्री नसली तर किमान संदर्भ आहे. त्याच्या आउटपोस्ट चे सीन्स आहेत बहुधा.

यातील अनेक लोकांच्या भाषेचे उच्चार, बोलायची पद्धत यातील विविधता खूप आहे. नीगन, युजीन, अल्फा, डॅरिल, मॅगी, किंग इझीकिएल. युजीन तर सर्वात भन्नाट!

ओह आता आलाय का 10 वा सिजन मला वाटलं की आधीपासूनच होता अवेलेबल. हो निगन 6 च्या शेवटी येतो बहुदा. अल्फा मला निगन पेक्षा जास्त डेंजर वाटली. डेरील पण भारी आहे , त्या मानाने रिक अगदी ओके ओके आहे . पहिल्या सिजन मध्ये तर तो अगदीच यथातथा आहे. त्याचा मित्र शेनच जास्त भाव खातो. ग्लेन मेला तेंव्हा एकदमच वाईट वाटलं होतं. कॅरोल पण आवडते मला , आधी काही काम नव्हते नन्तर मस्त रोल डेव्हलप झाला तिचा. जेडीस पण चांगली आहे. तो म्हातारा हर्षेल पण छान होता. किती मेहेनत घेतात हे लोक्स पूर्ण कलाकृती वर. स्ट्रेंजर आणि डार्क पेक्षा ह्याचा बॅकग्राउंड स्कोर एकदम अति साधारण आहे.

हॉलीवूड म्हणून एक मिनिसिरीज आहे . बरीच न्यूडीटी आहे आणि 1950 चं हॉलिवूड दाखवलं आहे. प्लॉट पण फार सरळसोट आहे नन्तर नन्तर. सर्वांनी उत्तम अभिनय केलाय. कोणी पाहिली आहे का?

आश्रम 3 बघतोय. पहिल्या 2 भागासारखी ग्रीप घेत नाही. सपक वाटतेय. वेगवेगळ्या कथेचे तुकडे जोडून कडबोळी बनवल्या सारखं... पूर्वीसारखा "फील" येत नाही बघताना खूप विस्कळीत पणा आहे.

आश्रम 3 पूर्ण केला. हाती काहीच लागलं नाही असं वाटलं.अनेक दोरे चालू केलेत, बाबा ची एकंदर शक्ती आणि वशिला माहीत असूनही लोक परत त्याच चुका करताना दाखवलेत.थोडक्यात भरपूर पाणी घालून घालून आता लोकांना 2023 पर्यंत पुढचा सिझन येईपर्यंत तंगवणार.
अनेक प्लॉट चुका आहेत.सुरुवातीला तोंड लपवून जिवाच्या भीतीने वावरणारे,खाणं औषध विकत न घेता येणार लोक नंतर उजळ माथ्याने सगळीकडे फिरतात.पम्मी ने वडील आणि भावाचा खून कसा केला याबद्दल कुठे चर्चा चौकशी पुरावे नाहीतच.
त्या ईशा गुप्ता ला 1 गाणं टाकून नुसतंच शोभेची बाहुली बनवलंय.
त्यातला न्यूज चॅनल कडे जाऊन त्यांनी नाटयीकरण करण्याचा प्रसंग प्रभावी आहे.
बबिता काहीही न करताना, इतके पहारे असताना उजळ माथ्याने पळालेल्या दोघांना भेटताना दाखवलीय.बॉबी देओल नैसर्गिक वाटत नाहीये. एकतर ओव्हर ऍक्ट किंवा नाहीतर जुन्या हिंदीचा बाज सोडून तो सोल्जर किंवा अजनबी पिक्चर मध्ये काम करत असल्या सारखा मॉडर्न हिंदी बोलतोय.
आणि शेवट? इतके 2 सिझन तुम्ही ज्याची शक्ती, दरारा बघताय तो इतक्या सोपेपणी, इतक्या पांचट वकिलांकडून हरेल?ते युक्तिवाद करतानाही दिसत नाहीत.एक एक मुद्दा कसातरी मांडून संपून जातात.झा कडून यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू शकतो ना?की सेटवर काही निदर्शने झाल्याने घाबरून कथा आणि सेट गुंडाळला?

मी_अनु, अरेरे... मला फार अपेक्षा होत्या आश्रम-३ कडून... आता प्रश्न पडलाय बघू की नको? Sad

बघायला हरकत नाही.
पण इतकं की कथा फार पुढे सरकत नाही.
कविता, सनोबर,बबिता यांनी अजून थोडे कथेला पुढे नेणारे रोल करणं अपेक्षित आहे.
मागच्या वेळी काहीतरी जुन्या बाबाचं रहस्य सांगायला चालू केलं होतं.तो थ्रेड पुढे नेणं अपेक्षित आहे.बाबा आणि आश्रम म्हणजे नुसतं बाबांची हवस आणि बायका असं नाहीये. तो इतरही काळे धंदे करतो.लोकांना जातीचं राजकारण करून स्वतःच्या वश करतो.हे सारब भोपाच करताना दाखवलाय.बाबा नुसताच बाई बाई करतोय.(म्हणजे तो एक भाग दुष्ट असण्याचा हे मान्य.पण तो इतका पुढे आलाय तो अजूनही बरेच डावपेच टाकून.ते येतच नाहीये सिझन 3 मध्ये .)

अ‍ॅपल टीव्ही प्लस वर "We Crashed" नावाची सिरीज आहे - "WeWork" ़़कंपनीचा सीईओ व त्याची बायको यांच्या स्टोरीवर आधारित. एक दोन वर्षांपूर्वी ही कंपनी आयपीओ होणार म्हणून व $४७ बिलियन्स इतके व्हॅल्युएशन वगैरे गाजावाजा होत असताना सीईओ चे कंपनीमधलेच काही आर्थिक व्यवहार पुढे आले व नंतर त्याला राजीनामा द्यावा लागला व आयपीओ पुढे ढकलला इतपत लक्षात आहे. यात त्या पॉइंटपर्यंत कथा आहे असे दिसते. एक भाग पाहिला आहे. इंटरेस्टिंग आहे. नंतर मागच्या वर्षी ही कंपनी पब्लिक झाली.

विवर्क्स म्हणजे कम्युनिटी ऑफिसस्पेस टाईप काही तरी कन्सेप्ट होता तीच ना? >>> हो. "विवर्क्स" हे मराठीतून रिलेट करायला पाच मिनीटे लागली Happy

कुणी हसन मिनहाजचे चाहते असल्यास The king's Jester हा नवीन एपिसोड बघा. जबरदस्त आहे. The patriot act ह्या नावा मागची पूर्ण कथा सांगितली आहे. शिवाय अनेक रिलेटेबल- सटायर -चावट -भारतीय अमेरिकन जोक्स आहेत. धमाल तरी थोडं गंभीर आहे.

Pages