वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी प्रॅन्क एन्काउन्टर्स पाहिली का नेफिवर? काही एपिसोड्स जबरी आहेत. दोन मिनीटांच्या पे ऑफ करता इतकी सगळी तयारी जरा जास्तच होते पण प्रेक्षकांकरता तो सगळा भाग उत्कंठावर्धक असतो त्यामुळे केले असेल.

मी जे भाग पाहिले त्यात तो टेडी बेअरचा भाग सर्वात भारी आहे.

मनी हाईस्ट चा दुसराच भाग कंटाळवाणा झाला. असं नाही की पहिली हाईस्ट फार जस्टीफाईड होती, पण दुसर्या सीझनचं काहीच पटण्यासारखं नव्हतं.सद्ध्या मला ‘मिससॉमर मर्डर्स‘ परत सापडल्यामुळे ‘सुशेगात’ आहे.

The good Doctor (CBS, HULU) पण चांगली आहे.. << डॉ शॉनची ना ? मला आवडली. मेडीकल ड्रामा असला तरी ग्रेज आणि हाऊस पेक्षा वेगळी आहे. प्राईमवर २ च सीजन आहेत अजून. तिसरा आला नाही.
ओरीजनल कोरीयन कोणती आहे ?

The Good Place बघत आहोत. छान हलकीफुलकी आहे. मुलीलाही आवडली. @Netflix , PG13 आहे पण फारच सभ्य आहे. What the fork? Bullshirt ! करून भाषा पण गमतीदारपणे manage केली आहे.
मुलं समोर असलीकी The Good Place , मुलं त्यांच्या कामात असलीकी मिर्झापुर 2 असे चाललेय.

The Good Place चा पहिला सीझन इंट्रेस्टिंग वाटला पण नंतर सेम कॉन्सेप्ट फारच स्ट्रेच केली त्यांनी.

The good Doctor आता हुलू वर आहे... (३ सीझन)...
The Good Place पहिल सीझन मस्त , नंतर गेली..
The good Wife पण छान होती.. (आता आहे की नाही माहित नाही)..

"लव्ह डेथ अँड रोबोट्स" चा "झिमा ब्लू" आवर्जून पहा.
नेटफ्लिक्स वर आहे, लहान एपिसोड आहे, 15 मिनिट्सचा, स्वतंत्र गोष्ट आहे, इतर भागांसारखीच.

Dice media ची वॉट द फोक्स (what the folks) नावाची सिरीज पाहिली परवा (जुनी आहे, मी आता पाहिली).. तीन सिजन आहेत.. मस्त हलकी फुलकी ..न्यु एज कौटुंबिक सिरीज..पण अजिबात रटाळ आणि क्लिशे नाही..
रेणुका शहाणे च पात्र फारच मस्त घेतलय.

Dice media ची वॉट द फोक्स (what the folks) नावाची सिरीज पाहिली परवा (जुनी आहे, मी आता पाहिली).. तीन सिजन आहेत.. मस्त हलकी फुलकी ..न्यु एज कौटुंबिक सिरीज..पण अजिबात रटाळ आणि क्लिशे नाही..
रेणुका शहाणे च पात्र फारच मस्त घेतलय.>>>>> +1

The Good Place बघत आहोत. छान हलकीफुलकी आहे. मुलीलाही आवडली. @Netflix , PG13 आहे पण फारच सभ्य आहे. >> अजुन कोणत्या PG13 चांगल्या सिरीज असतील तर सांगा प्लिज

scam पाहिली का कुणी?
खूप मस्त आहे.
पण एक सांगा.. .इनकम टॉक्स वाल्यांना काहीही सापडत नाही. . ईथेच शेवटचा भाग संपतो का? त्यापुढे काही आहे?

‘Scam 1992’ ही हर्षद मेहताने नव्वदीच्या दशकात केलेल्या प्रचंड घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज काल एका दिवसात पाहून संपवली. मला ही सिरीज अतिशय आवडली. सादरीकरण, अभिनय, दिग्दर्शन उत्तम आहे, संवाद देखील छान लिहिले आहेत. मुख्य म्हणजे शेअर बाजार आणि मनी मार्केटशी संबंधित डिटेलिंगचा अभ्यास चांगला केलेला आहे. ही सिरीज पाहिल्यावर मला याबद्दल थोडेसे लिहावेसे वाटले कारण बराच काळ (जवळपास १८ वर्षे) माझा शेअर बाजाराशी फार जवळून म्हणजे इंग्लिश मध्ये ज्याला ‘Right in the eye of the storm’ म्हणतात त्या प्रकारचा संबंध आला आहे. अर्थात इथल्या अनेक जाणकारांना असेल तेवढी माहिती मला निश्चितच नाही, परंतू त्या खवळत्या समुद्रात थोडेफार हातपाय माझेही मारून झालेले आहेत. माझ्याही नाकातोंडात वेळप्रसंगी भरपूर पाणी शिरलेले आहे. आता या विषयावर मी जी काही मते मांडणार आहे ती माझी वैयक्तिक आहेत आणि ती पूर्णपणे चुकीचीही असू शकतात. अनेक वाचकांची मते माझ्या मताच्या विरोधी देखील असतील. त्यांचा तो हक्क मला मान्य आहे.

मुळात शेअर बाजाराशी संबंधित कुठलाही घोटाळा झाला की आपल्या देशात सामान्य गुंतवणूकदाराच्या नावाने गळे काढले जातात. माझा पहिला आक्षेप यालाच आहे. एकीकडे शेअर बाजाराची सट्टा बाजार म्हणून संभावना करायची आणि जास्त पैसे कमावण्यासाठी तिथेच धावायचे ही टिपिकल भारतीय (की जागतिक?) मध्यमवर्गीय हिपॉक्रसी आहे. जास्त पैसे आले की तेवढीच मोठी रिस्क आली. ती घेण्याची कुवत असेल तरच मार्केटात यायचे. सेफ गेमच खेळायचा असेल तर राष्ट्रीयीकृत बँकांची फिक्स्ड डीपॉझीट, सरकारी रोखे, सोने, चांदी वगैरे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मार्केट कुणाला हळदकुंकू घेऊन आमत्रण द्यायला येत नाही. तुमच्या गांडीला जास्त पैसा कमावण्याची खाज असते म्हणून तुम्ही तिथे जाता.

या घोटाळ्याला हर्षद मेहता जेवढा जबाबदार होता तेवढीच जबाबदार तेव्हाची बँकिंग सिस्टीम होती हे मान्य करावेच लागेल. एकीकडे साध्या एक लाखाच्या कर्जावर चार चार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या सह्या लागत असतांना शेकडो कोटींचे व्यवहार इतक्या सहजतेने कसे काय घडू शकतात? त्या काळात मनी मार्केट मध्ये लाखो कोटींचे व्यवहार झाले परंतू एकाही बँकेच्या एकाही अधिकाऱ्याला बँक रसीट (BR) इश्यू करणाऱ्या बँकेत फोन करून BR ची सत्यासत्यता पडताळण्याची गरज वाटली नाही? सामान्य खातेदाराला पन्नास हजारांचा ओव्हरड्राफ्ट देतांना शंभर गोष्टी विचारणारे अतिहुषार बँक अधिकारी मनी मार्केटच्या व्यवहाराचा चेक थेट त्या बँकेच्या नावाने न काढता वर्षानुवर्षे दलालाच्या नावाने काढून त्याच्या खात्यात जमा करत होते. अशा चुत्याटिक व्यवस्थेचा फायदा हर्षद मेहता आणि इतर दलालांनी घेतला नाही तरच नवल. हल्लीच्या काळात निरव मोदी, मेहुल चोक्सी वगैरेंनी केलेल्या LC घोटाळ्याचा उगम देखील या अशा भोंगळ सिस्टीम मधेच आहे.

हर्षदच्या काळात देखील SEBI अस्तित्वात आलेली होती. एकूण व्यवहाराला शिस्त लावणे तसेच बाजारावर आणि दलालांच्या गैरव्यवहारांवर नजर ठेवणे हे तिचे कागदोपत्री काम आहे. प्रत्यक्षात ती काय करते? तिला किती अधिकार आहेत? इनसायडर ट्रेडिंगचे, शेअर रिगिंगचे अनेक प्रकार आजही रोजच्यारोज बाजारात घडतायत. काय उपटते ही एवढी मोठी सरकारी संस्था? प्रीमियम घेऊन IPO काढायचा आणि कालांतराने कंपनीचे दिवाळे काढून शेअर डीलिस्ट करायचा या उद्योगात आजवर किती कंपन्यांनी किती लाख कोटी रुपयांना चुना लावला असेल ते देवच जाणे. यातल्या किती प्रवर्तकांवर किंवा मर्चंट बँकर्स वर कारवाई झाली?

असो, लिहायचे असेल तर या विषयावर मी एक मोठे पाचशे पानी पुस्तक अधिकाराने लिहू शकेन. पण आज थोडक्यात आटोपते घेतो. आता जाता जाता काही सल्ले देतोय. हे अनेक वर्षांच्या अनुभवाचे बोल आहेत. पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या. मार्केट मध्ये पैसे घालायचे असतील तर Stop Loss चे तत्व जीवाच्या कराराने पाळा. Volume नसलेल्या शेअर मध्ये शिरू नका. असले शेअर पडायला लागले की लागोपाठ सर्किट लागतात आणि ते विकले जात नाहीत. एखादा शेअर घेण्याची टीप आपल्या सख्ख्या आईच्या भावाने दिली असली तरी आपले अंथरूण पाहूनच पाय पसरा आणि तिथेही Stop Loss ठेवा. मोठी पोझिशन असल्यास समोर काहीतरी हेजिंग करा.

उदय जोशी fb

उदय जोशींच्या सेबी विषयक समजुतीत घोटाळे आहेत . तसे त्यांना प्रत्यक्ष सांगितले देखील आहे
बाकी चालू देत.

>>स्कॅम १९९२ आवडली. मस्त आहे.<<
हर्षद मेहताच्या आधी आणि नंतरहि सिस्टममधल्या लूपहोल्सचा वापर आपल्या फायद्यासाठी करुन घेणारे (राजकिय वरदहस्ता सहित) आले आणि तरुन गेले. हर्षद मेहता तेव्हढा भाग्यवान किंवा शातीर खिलाडी नव्हता, एव्हढाच फरक...

Emily in Paris पाहिली. रंगीबेरंगी आणि डोक्याला शॉट न लावणारी Happy
मिथिला पालकर च्या Girl in the city सारखीच वाटली अगदी..

हो मला पण त्याचीच आठवण आली
पण ती आधी आलीय त्यामुळे दोन्ही एकमेकांच्या कॉपी नसाव्यात.अगदी ती बॉस, सेलेब्रिटी क्लायंट असे खूप समान मुद्दे आहेत

जाई +११११ .. माझा दुसरा जॉब असेल. listed कम्पनी होती. आणि पूर्वीचा टेकोव्हर कोड होता प्रचलित. गुज्जू कम्पनी त्यामुळं प्रमोटरना इनसायदरमध्ये भारी इंटरेस्ट. सेबीने असा इंगा दावला की बास. सेबीचे फाईन इतके जबरदस्त आहेत. त्यावेळी क्रिपिंग acquisition चे पण खूप तिरपांगडे नियम होते. तो कोड आठवला तरी काटा येतो अंगावर.. फ्लॉप्या मध्ये डेटा द्यावा लागे तेंव्हा Happy

म्हणून तर म्हटलं लंपन . आपण त्या क्षेत्रात आहोत म्हणून आपल्याला कळतात ते बारकावे. खर सांगायच तर या सिरीजवरून हर्षद मेहताची जी रंगसफेदि करायचा प्रयत्न केलाय तो रुचलेला नाही. पण असो.

हर्षद मेहताच्या काळात सेबी अस्तित्वात होती तरीही तिला व्यापक अधिकार नव्हते. त्याकाळी controller of capital market नावाची संस्था शेअर मार्केटच नियंत्रण करायची ।
हर्षद मेहता घोटाळा झाल्यावर गुंतवणूकदारांचा शेअर मार्केटवर असलेल्या विश्वास उडू लागला तेव्हा सेबी ऍक्ट १९९२ या कायद्यानव्ये सरकारने सेबीला अधिकार दिले. आणि तेव्हापासून सेबी मेन वॉचडॉग बनली.. त्यामुळे सेबीने काय केलं हा मुद्दा चुकीचा आहे.
सेबी बरच काही करते पण शेवटी तिलाही मर्यादा आहेत. माणसाने फसवायचं म्हटलं तर फसवलं जातंच. ह्यात कायदाचे लूपहोल्स , वकिली डोकं , भ्रष्ट माणस हे सगळे फॅक्टर महत्वाचे आहेत.
एकाच वेळी भरमसाठ रेग्युलेशन लादून ब्रोकरन काढता पाय घेऊ नये आणि त्याचवेळेस गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये ह्या दोन्ही भूमिका सेबीला पार पाडाव्या लागतात.
जाता जाता : बाजारात लागणार अपर सर्किट लोअर सर्किट हे सेबीच योगदान आहे. परदेशी बाजारात ही संकल्पना अस्तित्वात नव्हती . सेबीमुळे आज अमेरिकी बाजारात ही संकल्पना अस्तित्वात आहे पण त्याच क्रेडिट सेबीला मिळालेलं नाही.

जाई सहमत फार कमी सरकारी संस्था आहेत की ज्या बऱ्यापैकी प्रामाणिक आहेत त्यात सेबी नक्कीच आहे.

Pages