वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिर्झापुर 2 आली आहे. गरजूंनी लााभ घ्यावा >>> मी आजच हापिसात सुरु करणार होतो पण पलंगावर उताणा होऊन होम थेटरावर बिंजायची मजा नाही येत त्यात.उद्यापर्यंत दम धरतो.

कोरियन सिरिअल्स ची मी पण फॅन आहे..... नुकतीच my love eun dong बघून संपवली.... मस्त आहे...अजून एक vagabond म्हणून पहिली होती ..action thriller ... शेवट गंडलाय... squeal काढायच्या नादात.. पण छान आणि फास्ट आहे.
जास्तीत जास्त २० ते २६ एपिसोड असतात. उगीचच वाढवत बसत नाहीत.
कोरियन सिरीयल she was pretty काहीतरी २० का २५ भागांची आहे. त्याचं सिरीअल ची कॉपी तुर्की मध्ये seviyor sevmiyor नावाने आहे.. छान आहे पण अशक्य ताणलीये...

आश्रम चे सीझन १ पूर्ण ९ भाग संपवले. भयंकर परिणामकारक आहे.शिव्या आणि हॉट सीन्स पण बरेच आहेत.(म्हणून परीणामकाकरक आहे असे नाही, इन जनरल कथाच सॉलिड ग्रिपिंग आणि परीणामकारक आहे.) सीझन २ मार्च २०२१ मध्ये येईल म्हणतायत. तो ट्रेलर वरुन अजून जास्त ग्रुसम असेल असं वाटतं. पण अर्थातच बघणार.

समांतर सीझन २ पण येईल ना?>>> कधी येईल माहीत नाही पण स्वजो स्वतः बोललाय डिसेंबर जानेवारीत यायला हवा.

नेटफ्लिक्सवर "a queen's gambit" म्हणून छोटीसी सिरीज आहे. बुद्धिबळावर आहे. छान आहे.

बरेच स्मोकिंग, ड्रींकी़ग सीन्स आहेत. सब्स्टन्स अब्यूजदेखिल. बुद्धिबळ थोडसं बॅकग्राऊंडला आहे म्हटलं तरी चालेल. its about a chess prodigy struggling with drug addiction.

कोणी NCIS बघतेय / बघितली आहे का ?
सुरुवातीला दोन एपिसोड जरा कंटाळा आहे पण नंतर मस्त आहेत
माझा दुसरा सीझन चालू आहे

कोणी NCIS बघतेय / बघितली आहे का ? <<<<<< ही १८ सिझन चाललेली सिरीज आहे.. आता बंद होणार आहे बहुतेक..

>>कोणी NCIS बघतेय / बघितली आहे का ?
सुरुवातीला दोन एपिसोड जरा कंटाळा आहे पण नंतर मस्त आहेत

NCIS grows on you.
मी सर्व १८ सिजन पाहून सम्पवले. १८ वा सिजन थोडा बोर झाला. बहुतेक १९ वा सिजन येणार नाही. पण एकदा पहायला लागलात तर कमीत कमी १० सिजन तरी पाहालच.

अजून एक आवडलेली सिरिज म्हणजे Person Of Interest...

NCIS मस्त आहे. टोनी, जीवा.. सगळ्याच व्यक्तिरेखा छान डेवलप टरत नेल्या आहेत.

सध्या The Money Heist बघतेय.
खरंतर अडीच सीजननंतर मला कंटाळा आला. ( म्हणजे कधीपासून ते ज्यांनी आधी पाहिली आहे त्यांना कळेल बहुतेक. जास्त लिहिले तर स्पॉयलर होईल)
शिवाय स त त शिव्या अगदी अंगावर आल्या. चार शब्दांचं वाक्य बोलताना त्यात तीन वेळा xxxx चा जप. नको झाले अगदी.
चौथा सीजन तसाच रडतखडत बघतेय, संपत आला.

NCIS grows on you. >>>> सही पकडे है

पर्सन ऑफ इंटरेस्ट मलाही आवडलेली. इथे लिहिलेलं त्याबद्दल Happy

Haunting of hill house>> रटाळ आहे..हॉन्टिंग ऑफ हील हाऊस च्या समोर अगदीच फिकी आहे. मला बघताना वाटायला लागलं ह्यात भूत,आत्मे,प्रेतात्मे काही आहेत कि नाहीत. घरातली लोकं मेंटल पेशण्ट असतात असा शेवट करतील की काय असं वाटायला लागलं. हॉन्टिंग/हॉरर काही बघतोय असं वाटतच नाही.

+१. मनी हाईस्ट उत्तरोत्तर बोर होत जाते. शेवटचा सिझन रकेल त्या प्रोफेसराला मिळाल्यावरच तर आवरा! आहे. सोडून दिला बघणं.

हो ललिता-प्रीति.

जाई, अमितव, हुश्श वाटलं अगदी. जरा भीतभीतच लिहिले होते मी. Proud
कारण, बरंच ऐकलं होतं या सीरिजबद्दल.

मनी हाईस्ट दुसऱ्या सीझननंतर बघायला कंटाळवाणी वाटली . मला तरी. >>> हो दुसरा सुद्धा कसाबसा पाहिला मी. पहिला मात्र भन्नाट होता.

The good Doctor (CBS, HULU) पण चांगली आहे.. आधी कोरियन मधे आणि आता अमेरिकेत.. अर्थात कोरीय १६ भागात संपली.
ही चालू आहे..

Pages