वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हॉस्टेजेस बघत होतो हॉटस्टारवर पण पृथ्वी सिंग लास्टला मरतो समजल्यावर बघायची बंद केली. >>> बोकलत Sad
का उघड केलात शेवट Sad मला बघायची होती ना!

अभिषेक ची ब्रीद इन शॅडोज पाहिली. पहिल्या भागातच शेवट प्रेडिक्ट केला.
आता इतके थ्रिलर्स बघुन सवय झालीय.

Expiry Date बघा . चांगला टाईमपास आहे . थ्रिलर आहे .
forbidden love पण बघितली . ४ स्टोरीज आहे . एक फक्त अनामिका सस्पेन्स वाटली.

बोकलत Sad
का उघड केलात शेवट Sad मला बघायची होती ना!>>> म्हणजे मी कन्फर्म नाही अजून. बायको जवळ बसलेली असते आणि त्याला गोळी लागते म्हणून मला वाटलं. तिसरा सिझन येईल कदाचित त्यात परत बरा होऊन परत लीड रोल करेल.
कोणी केलीय हि भूमिका.>>> रोनीत रॉय

वकालत From Home (अमेझॉन प्राईम) .. टाईमपास आहे.... मस्त आहे एपिसोड्स..

एमिली इन पॅरिस बघितली नेफ्लिवर.. ओके आहे, फील गुड. सध्या haunting of bly manor बघत आहे नेफ्लिवर. Haunting of hill house प्रचंड आवडली होती ही सुद्धा छान वाटत आहे.

haunting of bly manor बघत आहे नेफ्लिवर.>>>>>>>>>> येस्स सुरू केली मी पण.

Haunting of hill house >> हि नंतर फास्ट आहे का ? आई इन जनरल कशी आहे ? पहिलाच एपिसोड स्टार्ट केलाय फार फार स्लो वाटली ..
एमिली इन पॅरिस मला आवडली हलकी फुलकी ..

हि नंतर फास्ट आहे का ? आई इन जनरल कशी आहे ? पहिलाच एपिसोड स्टार्ट केलाय फार फार स्लो वाटली ..>> फास्ट अशी नाही .. ती पोर / भावंडे मोठी होतात आणि मग पुढची गोष्ट आहे. वातावरण निर्मिती अप्रतिम आहे. अजून काही लिहीत नाही, हायली रेकमेंड करेन मात्र.

ब्रिटिश टेलिव्हिजन ची "The Widow" series ऍमेझॉन
प्राईम वर आहे.
नेटफलिक्स वर "Alias Grace" आणि
Netflix वर "20 Dakika" Turkish web series आहे
या वेब सिरीज साठी Subtitles बघावे लागतात
या तिन्ही चांगल्या आहेत

Haunting of hill house>> अजून काही लिहीत नाही, हायली रेकमेंड करेन मात्र.>> okay !!
मी एकीकडे haunting of bly manor हि पण सुरु केलीये.. आत्ताशी २ च एपिसोड पाहिलेत .. स्लो च वाटत आहे.. पण जरा इंटरेस्ट वाटतोय

एमिली इन पॅरिस बघतोय. सिट कॉम म्हणून बरी आहे, पण स्टोरीत फारसा दम नाही. तिच्या हापिसातले प्रसंग छान आहेत, पण स्टोरी अगदीच घिसिपिटी आणि प्रेडिक्टेबल आहे. १० च एपिसोड आहेत, सो पटकन संपेल.

हो मी पण पहातेय एमिली.. हो अगदी टिपिकल स्टोरी आहे. पण टाइम पास चांगलाय. पॅरीस मस्त दाखवलं आहे. एमिली ला सगळे बिग शॉट क्लायन्ट्स सहज भेटतात, ईझिली डील्स होतात ते फार फेच्ड वाटतं पण अर्थात लाइट सीरीज म्हणून दुर्लक्ष केले. पॅरीस ऑफिस मधली केरेक्टर्स भारी आहेत. त्यांचे कल्चरल डिफरन्सेस, अप्रोप्रिएट/ इनप्रोप्रिएट /पोलिटिकल करेक्टनेस च्या कॉन्सेप्ट्स वगैरे मजेशीर आहे. ते जास्त बघायला आवडले. (पर्सनल स्टोरी, लव इंटरेस्ट्स इ. पेक्षा )

Pages