वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Chikatgunde pahili ka koni ? Sundar aahe... 4 episodes aahet.. Nakki paha... BHA DI PA chi aahe

The Mentalist चे पंखे आहेत का कोणी इथे? मी सध्या सायमन बेकरच्या प्रेमात आहे. मस्त आहे सिरीज

थांब धनुडी थांब Lol

मी youtube वर कोरियन बघणार होते पण थांबले.

पियु गुल्लक कुठे आहे. आर्या समजा बघितली तर त्यावर उतारा म्हणून बघायला हवी.

>>Chikatgunde pahili ka koni ? Sundar aahe... 4 episodes aahet.. Nakki paha... BHA DI PA chi aahe
ओह चांगली आहे का?
चिकट्गुंडे हे नाव ऐकून पहावीशी वाटली नव्हती.

पियु thank u.

धनुडी जाऊदे बघ तू.

हो . रेड जॉन मृत्यूनंतर तोच तो पणा येतो खरा. म्हणून सातव्या सीझनमध्ये 13 एपिसोडमध्येच गुंडाळली आहे

JL50 नाही पाहिली कोणी? अभय देओल, पन्कज कपूर, पियुश मिश्रा , रजेश शर्मा अशी तगडी कास्ट आहे. ४ च भाग आहेत. मला लवकर सम्पवल्यासरखी वाटली.

Chikatgunde pahili ka koni ? Sundar aahe... 4 episodes aahet.. Nakki paha... BHA DI PA chi aahe>>>हो चिकटगुंडे बघितली YouTube वर छान असते. अत्ताचा लेटेस्ट ेपिसोड (४था) आवडला. नाजूक विषय छान हाताळला आहे

मीरा मला वाटतं अॅमेझॉन वर असेल ad बघितल्या सारखी वाटतेय

>>धनुडी जाऊदे बघ तू.>>> अन्जू असं ढिलं नको सोडूस गं मला.

काल 'होस्टेजेस २' बघितली. अतिशय सुंदर. वेगवान. रोचक. 'पुढे काय' ची उत्सुकता शेवटपर्यंत कायम ठेवणारी.
नक्की बघा. फक्त मला पर्सनली अंधारातील चित्रण फार आवडत नाही जे इथे त्या गढीत अपरीहार्य असल्याने कसेतरी बघितले.
काही गोष्टी इंग्रजी वेबसिरीज / क्राईम सिरीज बघणार्‍यांना अगदीच कैच्याकै वाटू शकतात. पण मी सिनेमॅटिक लिबर्टी नावाखाली त्याकडे कानाडोळा केला. इतर कोणी बघितली असल्यास स्पॉयलर अलर्ट देऊन बोलुयात.

तुलनेने शिव्या आणि बेडसिन्स कमी आहेत ही एक जमेची बाजू.

मी हॉस्टेजेस 2 पाहिली. बंs ड s ल वाटली.

अगदीच काहींच्या काही illogical कथा आहे. म्हणजे हिंदी सीरिजच्या बऱ्याचदा असतात पण इथे म्हणजे काहीच्या काही. रोहित रॉय आवडतो म्हणून पाहिली.
तू म्हणतेस ते खरं आहे. सेक्स, शिव्या, ड्रग्ज, व्हायोलन्स खूपच कमी आहे. त्यात मी तर मिर्झापुर नन्तर पाहिली त्यामुळे मला अगदीच फरक जाणवला.

Expiry Date बघतय का कुणी ? Zee5
पहिला भाग जरा कंटाळवाणा झालाय.
नंतर मस्त पकड घेतलीय.
Plot नेहमीचा . "Perfect murder" चा .
पण बरेच twist n turns आहेत.
ईतकी वर्षे झाली त्या स्नेहा उल्लालची acting तितकीच माठ आहे.
हिरो चे south indian उच्चार सुरवातीला रटाळ वाटतात पण हळूहळू सवय होते. तो बदला मधला तापसीचा boyfriend आहे.
सुनिता खूप क्यूट आहे.

त्या अगोदर lobdon confidential बघितली. अतिशय बाळबोध. कैच्याकै

The playbook.. documentry aahe 4 episodes chi.. 4 coach ani tyanchi mulakhat.. nakki paha

त्या अगोदर lobdon confidential बघितली. अतिशय बाळबोध. कैच्याकै >> सहमत. असले पिक्चर काढायचा confidence कुठुन आणतात हे लोक...

प्राईम व्हिडीओ / डिस्ने हॉटस्टार यावर असणाऱ्या चांगल्या वेबसिरीज /चित्रपट कोणते?. थ्रिलर, पिरियड, क्राईम अथवा आर्किओलॉजी, उत्क्रांती या विषयावर असतील तर उत्तमच.
Money Heist, The Last Ship, Game of thrones या पाहिल्यात.

मी हॉस्टेजेस बघत होतो हॉटस्टारवर पण पृथ्वी सिंग लास्टला मरतो समजल्यावर बघायची बंद केली.

मी लिहून घेतलय, शॉकर्स. पण अजून ही kdrama मधून सुटले नाहीये मी.
Oh my venus (so ji sub ची फॅन झाले मी)
Suspicious partner
आता my secret Tarrius बघतेय पण ती यु ट्युब वर कारण नेटफ्लिक्स वरून आणि अॅमेझॉन वरून काडून टाकली आहे.

शॉकर्स स्पॉयलर
मी अजून तरी फक्त पहिले चार भाग बघितलेत. पहिला ओके ओके वाटला. दुसऱ्या पार्टमधली ती भूतनी लयच डेंजर, याला मारून लगेच लॅपटॉप मधून तिच्या घरात जाऊन तिचा पण खात्मा. बघतच बसलो मी. होम डिलिव्हरी पण ओके. सेल्फी मध्ये कैच्याकै दाखवलं आहे.

Pages