Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पूर्वी गावचा माणूस मुंबईला
पूर्वी गावचा माणूस मुंबईला आला की भामटे त्याला लुबाडायचे असे सिनेमात दाखवित. आता हे मुंबईचं क्रेडिट गेलं का? पाचगणीचा मुलगा पुण्यात येतो तर त्याला पाच महिला आणि चार पुरुष लुबाडतात असे दाखविले आहे. हे पाहिलं तर लोक पुण्यात यायची हिंमत करतील का?
लव्ह स्लीप रिपीट - झी ५
Sweet Magnolias -
Sweet Magnolias - नेटफ्लिक्सवर सिझन 1 आला आहे. एकदम क्युट वाटली सिरीयल. (पण मला वाटतं बायकानाच जास्त आवडेल.)
तीन घट्ट मैत्रिणी. त्यांच्या आयुष्यातले चढ उतार, संसार, करियर्स, तिघींच्या टिनएजर मुलांच्या शाळा, त्या मुलांचे टिपिकल टीएनेजर्स प्रोब्लेम्स, त्यांची तिघींची अफेअर्स इ इ रुटीनच गोष्टी. त्या तिघी रहातात ते छोटंसं सुंदर टाऊन 'सेरेनिटी' मला खुप आवडलं आणि त्या तिघीनी चालु केलेला स्पा, त्यांच्या विकली मार्टिनी नाईट्स, त्यांच्या क्लोज इमोशनल गप्पा सगळं बदल म्हणुन पहायला छान वाटले. एकदा पहायला हरकत नाही.
कोणीतरी पाहिली की अजुन बोलता / लिहिता येईल.
@मीरा .. याचा प्रोमो पहिला
@मीरा .. याचा प्रोमो पहिला होता .. आवडला पण पाहायची कि नाही या dilemma मध्ये राहूनच गेलं ...
पंचायत खूप दिवसांपासून बघायची राहिली होती . आज संपवली . खूपच आवडली . नायकाची मॉनिटर चोरी गेल्यानंतरची एकटेपणाची घुसमट अगदी मनापासून व्यक्त झाली आहे . पदोपदी विकासाचे नायकाला साथ देणे , पंचायतीची मीटिंग असताना प्लेटमध्ये ठेवलेले बत्ताशे , अभिषेक ला दूध हवे असते तेव्हा म्हेशींच्या जातींचा उल्लेख , अगदी बारीक सारीक गोष्टी छान जमल्या आहेत .
नीना गुप्ता मस्त एकदम !!!
व्हर्जिन रिव्हर नेटप्लिक्स वर
व्हर्जिन रिव्हर नेटप्लिक्स वर पाहिली, सुंदर !!!
व्हर्जिन रिव्हर नेटप्लिक्स वर
व्हर्जिन रिव्हर नेटप्लिक्स वर पाहिली, सुंदर !!! >>> दोनही सिझन्स पाहिले का? ते टाऊन एवढं सुंदर आहे. व्हिज्युअल ट्रीट आहे.
Best Director (Series):
Best Director (Series): Avinash Arun and Prosit Roy (Paatal Lok)
Best Series (Critics): The Family Man
Best Director (Critics): Krishna DK and Raj Nidimoru (The Family Man)
Best Actor in a Drama Series (Male): Jaideep Ahlawat (Paatal Lok)
Best Actor in a Drama Series (Female): Sushmita Sen (Aarya)
Best Actor in a Drama Series (Critics): Manoj Bajpayee (The Family Man)
Best Actress in a Drama Series (Critics): Priyamani (The Family Man)
Best Actor in a Comedy Series (Male): Jitendra Kumar (Panchayat)
Best Actor in a Comedy Series (Female): Mithila Palkar (Little Things Season 3)
Best Actor in a Comedy Series (Critics): Dhruv Sehgal (Little Things Season 3)
Best Actress in a Comedy Series (Critics): Sumukhi Suresh (Pushpavali Season 2)
Best Actor in A Supporting Role in a Drama Series (Male): Amit Sadh (Breathe: Into The Shadows)
Best Actor in A Supporting Role in a Drama Series (Female): Divya Dutta (Special OPS)
Best Actor in A Supporting Role in a Comedy Series (Male): Raghubir Yadav (Panchayat)
Best Actor in A Supporting Role in a Comedy Series (Female): Neena Gupta (Panchayat)
Best Non-Fiction Original (Series/Special): Times of Music
Best Comedy (Series/Specials): Panchayat
Best Film (Web Original): Raat Akeli Hai
हे फिल्मफेअर ने पहिल्यांदाच
हे फिल्मफेअर ने पहिल्यांदाच यावर्षी जाहीर केलेले ओटीटी प्लँटफॉर्मसाठीचे अँवॉर्ड्स
आश्रम ला काही नाही???
आश्रम ला काही नाही???
जपनाम जपनाम.अनर्थ.
Best Actor in a Drama Series
Best Actor in a Drama Series (Male): Jaideep Ahlawat (Paatal Lok) >>> आवडली होती ह्याची acting. आधी तो ह्याच्या हाताखालचा आवडला, मग शेवटचे काही भाग मात्र हा सुपर्ब.
आश्रम बघितली नाही म्हणून काही लिहू शकत नाही.
आर्या सध्या बघतेय म्हणजे चार बघून झालेले, नंतर पाचवा, सहावा बघितला. चांगलं करतेय पण अजून सुपर्ब केलं असं वाटलं नाही सुश्मिताबद्दल.
पंचायतला बरेच awards मिळाले हे मस्त झालं पण माझ्या आवडत्या साईड रोलवाल्याला नाही मिळालं का, तो asst. मला सर्वात आवडला होता.
Btw आर्यामध्ये पाचवा भाग बघितल्यावर मला तिच्या बाबांवर संशय येतोय, सर्व तेच घडवून आणतात की काय.
ही सिरीयल बघताना माझ्या मध्यमवर्गीय विचारसरणीला अनेक धक्के बसतायेत, पचवतेय. तसं वेबसिरीज बघताना मनाची तयारी करूनच बघायला हवी म्हणा.
पंचायतला मिळाले अवॉर्डस मस्तच
पंचायतला मिळाले अवॉर्डस मस्तच. पण आश्रमला ही हवा होता.
स्पेशल ऑपस ला पण काही नाही, का ती मागच्या वर्षीची होती .
मी_अनु ने इथे केलेल्या
मी_अनु ने इथे केलेल्या जबरदस्त कौतुकामुळे एका दिवसात आश्रमचे दोन्ही सिझन बघितले. मस्त. खिळवून ठेवलं एकदम.
मागे सिमरन वाचताना मला ते त्यातल्या नायिकेचं नाव वाटलं होतं. आता बघून झाल्यावर सिमरन चा अर्थ कळतोय.
मला स्पॉयलर्स वाचून काही फरक पडत नाही म्हणून आधीच सगळ्या पोस्ट्स वाचल्या होत्या. तरीही आवडली.
फक्त एका बाबतीत मी अनु शी अजिबात सहमत नाही ते म्हणजे बॉबी देओलचा अभिनय. स्पेशली मुद्राभिनय.
मला तरी त्याच्या चेहर्यावर वासना / क्रोर्य / मोह अश्या कुठल्याच छटा दिसल्या नाहीत. सगळ्या भावना दाखवताना सेमच एक्सप्रेशन्स.
पण हेच त्याच्या बाबा या रोलला सूट होण्याचे कारण असावे. मनातल्या भावना चेहेर्यावर उमटत नसल्याने चेहरा स्थितप्रज्ञ / शांत दिसणे / दाखवणे ला उपयोग झाला.
मलापण आधी सिमरन तेच वाटलं
मलापण आधी सिमरन तेच वाटलं होतं.
बॉबी चे डोळे बोलतात.
कथानकात युपीचाच उल्लेख आहे. पण सर्व बोलीभाषा हरयाणवी वाटते.
कोर्ट केसेस मध्ये अडकू नये म्हणून नामस्मरण, आश्रम लोगो कश्यातही कोणतेही धार्मिक चिन्ह नाही. तसेच आश्रम कँपस इमारतीला रंग देताना कोणताही विशीष्ठ रंग उठून दिसू नये अशी व्यवस्था आहे.
बॉबी देओल चे पगडी उपरणे कलेक्शन पण बरेच आहे.
मला त्याचा वेष पाहून सारखा बिरबल आठवतो.
शिट्स क्रीक बघून संपवली. मस्त
शिट्स क्रीक बघून संपवली. मस्त आहे.. छोटे छोटे प्रसंग, आणि मजेशीर आहे.. बाप , मुलगा (डेविड), आणि मुलगी (ट्वायला) आहेत.....
बाप आणि मुलगा यानी मिळून सिरीज तयार केली आहे (कथा , संवाद वगैरे).
दुसर्या एका कॅनेडियन सिरीज मधले काही कलाकारही दिसले यात.. (किम्स कन्व्हिनियंस)...
ओळखीचे एकजण म्हणाले की आश्रम
ओळखीचे एकजण म्हणाले की आश्रम anti hindu आहे.
म्हणजे इतर कुठल्याही धर्मात असे प्रकार घडत असतीलही तरी ते दाखवत नाहीत....
पण मला काही असे वाटत नाही.....त्यांचा मंत्र सुद्धा 'जपनाम' असा आहे..कुठल्याही particular देवाचा नाही....
बाबाजी की सदा ही जय. जपनाम जपनाम !
आश्रम हा हिंदू धर्माला
आश्रम हा हिंदू धर्माला अप्रत्यक्ष रेफरन्स आहे.पण हे कोणत्याही कचाट्यात येऊ नये अश्या पॉलिटिकल करेक्ट ली केलं आहे.आरती, कपाळावर गंध वगैरे बरेच रिवाज मुख्यतः हिंदू धर्माची आठवण देतात.
मासेस चा धर्म, आणि त्या धर्माचा फायदा घेऊन लोकांचं आयुष्य वाऱ्यावर आणणारे साधू बुवा.
इथे हिंदू सदृश धर्म दाखवला म्हणून बाकी धर्मातले असे धार्मिक लोक साधे सरळ असं समजणारा प्रेक्षक अत्यंत नाईव्ह असेल(असं कोणी नसेल अशी आशा.)
'याच धर्माचं का' च्या पुढे जाऊन हे सर्व कोणीतरी दाखवायला हवं आहे.प्रत्येक शक्य तितक्या धर्माचं.या बुरख्याला फसणाऱ्या पैकी 10 टक्के जनता जरी सावध झाली तरी सीरिअल चं यश.
मला मध्येमध्ये रिव्हरडेल मधला एडगर आणि त्याचा कल्ट पण आठवत होता.
क्राऊनचे आधीचे 3 सीझन पूर्ण न
क्राऊनचे आधीचे 3 सीझन पूर्ण न बघता सरळ चौथा सीझन सुरू केला कारण मला डायना आणि मॅगी फार आवडतात. एकूण रॉयल्सबद्दल फारच निगेटिव्ह मत होतंय माझं. मी युकेत असते तर abolitionist असते!डायनाला तर याच लोकांनी मारून टाकलं असणार. कारण तिचं मरण फारच पथ्यावर पडलं चार्ल्सच्या.
एकूण डोक्यात जातेय सिरीज पण तरी बघून पूर्ण करणार आहे. तो intruder चा एपिसोड आवडला.
So far सगळ्यात आवडलेला डायलॉग- two menopausal women, that'll be a smooth ride!
अमरीकेत आश्रम मालिका कुठे
अमरीकेत आश्रम मालिका कुठे पहाता येयिल?
क्राऊन सगळी संपवली.
क्राऊन सगळी संपवली.
रॉयल्स बद्द्ल चांगलं मत न्हवतंच. एडवर्ड, मार्गारेट, सुरुवातीला चार्ल्स आणि डायना सगळ्यांना जातीत लग्न करायच्या सक्तीने किंवा मनासारख्या जोडीदाराशी लग्न करू न दिल्याने किंवा एडवर्डच्या बाबतीत केल्याने त्रास दिला आणि आयुष्याची लक्तरं निघाली. का? तर त्या क्विनला घोडेस्वारी करता यावी! डू नथिंग क्विन म्हणून रहाता यावं आणि मोनार्की टिकुन रहावी.
मेगनमुळे हॅरी सुटला. त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्याबद्द्ल प्रेम वाटायचंच आता आदरही वाटतो.
पण या सगळ्याचे बिल त्या रॉयल
पण या सगळ्याचे बिल त्या फक्त त्या रॉयल फॅमिलीवर फाडता येणार नाही. इंग्लिश लोक परंपरावादी. त्यांची राज्यघटनाही म्हणे एकदा बसून अशी लिहीली गेलेली नसून बरीचशी प्रीसीडन्सेसवरच चालते. या सिरीज मधल्या प्रत्येक निर्णयाचे अधिकार अनेकदा राणीकडेही नसतात. चर्च ऑफ इंग्लंड, पंतप्रधान व संसद, राजघराण्यातील परंपरा ई मुळे ते एकत्रित फोर्स केले जातात व राजघराण्यातील लोकांनाही ते पाळावे लागतात - असे चित्र मला दिसले. लग्न, घटस्फोट वगैरेंशी संबंधित नियम बहुधा चर्च ऑफ इंग्लंडच्या प्रेशरने घेतले जात असावेत. मोनार्क जेव्हा नामधारी केला गेला तेव्हा चर्च ऑफ इंग्लंडपासूनही का वेगळा केला गेला नाही माहीत नाही. नाहीतर या भानगडी आल्या नसत्या. अर्थात आधी मुळात पार्लमेण्ट व चर्च हे सोडवण्यापासून सुरूवात झाली होती.
या सगळ्याचा इतिहास म्हंटले तर खूप मनोरंजक आहे, नाहीतर फार बोअर. ऑलिव्हर क्रॉमवेल पासून ते या सिरीज मधल्या काळापर्यंत.
मनासारख्या जोडीदाराशी लग्न
मनासारख्या जोडीदाराशी लग्न करता न येणं हे रॉयल्स काय किंवा सामान्य लोक काय- कोणाहीसोबत होऊ शकतं. अशावेळी मग ज्या व्यक्तीशी लग्न झालंय तिचा मानसिक छळ करणं, प्रतारणा करणं आणि कदाचित खून करणं हे बरोबर नाही. डायनाची अवस्था बघून फार वाईट वाटलं.
मला राजघराण्याचं एक कौतुक मात्र वाटलं की त्यांनी अशी मालिका बनवू दिली. भारतातली राजघराणी किंवा इव्हन पॉलिटिकल dynasties नी लगेच धमक्या, आपलं सरकार असल्यास मेकर्सचं घर पाडणं/जेलमध्ये टाकणं, इव्हन दंगल घडवून आणणे वगैरे केलं असतं.
@फारएन्ड, have you read wolf hall trilogy? पुस्तकं माझ्या लिस्टित आहेत. सिरीज पण आहे बहुतेक त्यावर.
नेफि वरील फार्गो चे कोणी फॅन
नेफि वरील फार्गो चे कोणी फॅन आहेत का?
दि फ्लाइट अटेंडंट - प्लेझंट
**** लाइट स्पॉयलर ****
दि फ्लाइट अटेंडंट - ए प्लेझंट सर्प्राय्ज. एयर्लाइन क्रुजच्या लाइफ स्टाइलवर असेल हा पुर्वाग्रह धरुन बघायचं टाळलं होतं, बट इट्स ए मर्डर मिस्टरी. मस्त प्लॉट आहे, कन्विंसिंग आणि सादरीकरण तर आउटस्टँडिंग. वन नाइट स्टँड आणि त्यानंतर येणारा अनएक्स्पेक्टेड टर्ब्युलंस. केसी बोडेन जस्ट गेट्स सक्ड इन्टु द ड्राफ्ट. केली क्वकोचं काम ठिक आहे, अल्कहॉलिक, धांदरट मुलीचं; पण तीची अॅक्टिंग (मला तरी) बर्याचदा लाउड, इरिटेटिंग्/अनॉइंग वाटली. लास्ट एपिसोडमधे शेनचा ट्विस्ट पुढच्या सिझनची हिंट आहे...
अन्डुइंग पेक्षा सरस आहे. अन्डुइंगचा फायनल एपिसोड फंडिंग संपलं म्हणुन आवरल्या सारखा वाटला. दोन्हि एचबिओवर आहेत...
गेम ऑफ वर एखादा धागा आहे का?
गेम ऑफ थ्रोन्सवर एखादा धागा आहे का?
आहेत कि..... हे घ्या....
आहेत कि..... हे घ्या.....
https://www.maayboli.com/node/44773
https://www.maayboli.com/node/69748
https://www.maayboli.com/node/69964
https://www.maayboli.com/node/71543
The Mentalist चा शेवट जवळ
The Mentalist चा शेवट जवळ आलाय . शेवटच्या सीजन पर्यंत पोचलेय .
रेड जॉन मेला. पण त्याला शोधण्यात आणि nail down करण्यात जितका थरार होता त्यामानाने त्याचा शेवट अगदिच साधा झाला .
पण जेन च्या मनाला शांती तर आपण खुश !
पॅट्रिक आणि टेरेसा , यांच्यातलं नातं मला फार आवडलं . त्यांची शाब्दिक चकमक बघायला मजा येते .
पूर्ण सिरिजमध्ये ५-६ सीन्स असतील त्यात चो हसताना दाखवला आहे . बाकी तो ईतका सिरियस चेहरा ठेउन बोलतो.
त्याची आणि रिग्स्बी ची बड्बड मजा आणते.
Rigsby: so what do you think , should I get married ?
Cho : Do you want to make it my fault later?
Teresa Lisbon is one of the best bosses. ती दिसायला नाजूक वगैरे असली तरी एक्दम धाकड आहे . नुसती नावाला बॉस नाही आहे ती. एका एपि मध्ये संशयित गुन्हेगाराला पळून जाताना पाठलाग करून , त्याच्या अंगावर झेपावते आणि खाली पाडून हातकड्या लावते , एक्दम भारी वाटते. किम्बल पण एक्दम कौतुकाने बघतो.
तिचे रिग्स्बी आणि चो सोबत दोन वेगवेगळे प्रसंग आहेत. ते तिच्या केबिनमध्ये काहितरी कबुली द्यायला येतात , त्या सीन्समध्ये ती बॉस म्हणून ईतकी आश्वासक वाटते . एक दोन सीन्स मध्ये टीम कामाकडे लक्श देत नाही म्हणून खरडपट्टी काढते .
ग्रेस चा पण प्रवास पण छान दाखवला आहे . कामावर रुजु झालेली नविन ट्रेनी हळूहळू टीममध्ये रूळते . ( पहिल्या एपि मध्ये टेरेसा ,ग्रेसची खरडपट्टी काढते , सामान चेक-ईन केलं म्हणून
) पहिली संधी मिळतात , फिल्ड वर जायला तयार होते . नोकरीला प्राधान्य देणारी . मग आयुश्यात मोठा धक्का बसल्यावर एक्दम रफ-न-टफ होते . मग परत एक नॉर्मल आयुश्य जगायला सुरुवात करते .
आता ही सिरिज संपल्यावर काय बघू हा विचार करतेय .
NCIS बघ स्वस्ति . मस्त आहे
NCIS बघ स्वस्ति . मस्त आहे सिरीज . मी सध्या तीच बघतेय. टोनी मला सगळ्यात आवडतोय. बिंज वॉच आहे.
मेंटलिस्टचे शेवटचे 4 ते 5 एपिसोड राहिलेत. बघेन लवकरच
हाय २०२० - MX Player वर .
हाय २०२० - MX Player वर . मस्त आहे. आवडली.
नेफि वरील फार्गो चे कोणी फॅन
नेफि वरील फार्गो चे कोणी फॅन आहेत का?
हो मी आत्ताच पहिला सीझन संपवला ... ग्रिपिन्ग ड्रामा ... आवडली आहे
JL 50 Sony Liv चे रिव्ह्यु
JL 50 Sony Liv चे रिव्ह्यु चांगले आहेत ... बर्याच मित्रानी रेकमेन्ड केली आहे म्हणून बघणार आहे !
NCIS बघ स्वस्ति . मस्त आहे
NCIS बघ स्वस्ति . मस्त आहे सिरीज . >>>> okkkie . एक एपि बघितला होता, आता नेटाने बघायला लागेल.
मेंटलिस्टचे शेवटचे 4 ते 5 एपिसोड राहिलेत. बघेन लवकरच >>>> माझे पण. तितकी मजा येत नाहीए. पण closure साठी बघून टाकेन.
Pages