वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hotstar वर ती स्पेशल OPS म्हणून सिरीज आलीये ती बघताय का कोणी? >>> नवर्याने बघायला सुरुवात केली आहे . अजून पूर्ण नाही झाली . छान आहे म्हणाला . मी मधेच डोकावले जरा वेळ , मलाही चांगली वाटली . शेवटापर्यन्त अजून पोचलो नाही , नक्कीए सांगता येणार नाही .

वोडाफोन च सिम कार्ड असेल तर वोडाफोन प्ले ऑप आहे. त्यावर बर्याच वेबसिरीज बघता येतात.
प्राईम वर काही वेबसिरीज चे भाग २ येणार असं मागच्या महिन्यापासून वाचलं होतं. पण अजून काही भाग २ आले नाहीत.
प्राईम वर काही चांगल्या ईंग्लीश वेबसिरीज सुचवा प्लीज.. हाणामारी च्या सोडून..!

समांतर मलाही आवडली.
पण काही लूप होल्स आहेत..
दुसरा भाग कधी येतो याची वाट बघणं आलं..

Hotstar वर ती स्पेशल OPS म्हणून सिरीज आलीये >> काल मी पहिल्यापासून बघायला सुरुवात केली . बरीच स्लो आहे. रेन्गाळतेय तिथे फाफॉ करून पहातेय .
केके मेनन फार म्हणजे फार म्हणजे आवडला. आताचा मिडलएज , फॅश्ब्लॅकमधला तरूण , दोन्ही रूप छान वाटतात .
गौतमीला फार दिवसानी पाहिलं . तो फारूख , (करण थाकर (??)) आपल्या चिन्मय उदगीरकरचा दूरचा भाउ वाटतो

येस्स स्वस्ति यु आर राईट.. खूप साम्य आहे Happy गौतमी पण तशीच दिसतेय इतकी वर्ष.
मी पण स्पेशल ऑप्स बघाय्ला सुरू केली आहे. आवडतेय. के के बेस्ट.

अंजली Happy .
बघून झाली की कळवं . काही बेसिक प्रश्न पडलेत. चर्चा करायचीय Biggrin

स्वस्ति, माझी बघून झाली.

स्पेशल ऑप्स खूप खूप आवडली. मी तर म्हणेन की माझे वर्षभराच्या सबस्क्रिप्शन चे पैसे या एका वेबसिरीज मध्ये पूर्ण वसूल झाले. आता बाकी सगळा मिळेल तो बोनस.

क्षणाक्षणाला थरार, उत्कंठा, नाट्यमयता, पुढे काय होईल याची लागलेली प्रचंड धाकधूक, अफलातून आयडियाज, अंडर कव्हर एजंटच्या आयुष्यातली घालमेल.. किती लिहू आणि किती नाही.

एकाही एपिसोडमधला एकही मिनिट मिस करू नका.
अफलातून वेबसिरीज.
जियो केके.. जियो hotstar.

ओके पियु . Happy
माझ सबस्क्रिप्शन उद्या संपतय . शेवटचे दोन एपि राहिलेत . आज नाईट मारावी लागेल Happy
केके अफलातून आहे . कसला गेटप केलाय त्याला . खरोखर एका तरूण मुलीचा बाप वाटतोय -- नंदू Biggrin
बाकी सगळी लोक त्यांच्या त्यांच्या जागी एक्दम फिट्ट्ट आहेत .
ईस्माईल आणि हाफिज पण सही घेतले आहेत .
तो टॅक्सी किती क्युट आहे . फारूख टोटल डोळ्यात बदाम वाटला . मी या अगोदर त्याची एकही सिरियल बघितली नव्हती . ईथे फार आवडला .
आणि स्पेशल मेन्शन फॉर सूर्य कुमार Happy . तो तर फेमिली मॅनपासून डोळ्यात बदामच आहे .
पूढच्या आठवड्यात सविस्तर बोलु . तोपर्यन्त अंजलीचे पण बघून होतील बहुतेक Happy

माझ सबस्क्रिप्शन उद्या संपतय . शेवटचे दोन एपि राहिलेत. आज नाईट मारावी लागेल

>> असेही लॉक आउट आहे आज मध्यरात्रीपासून. तर नक्की बघून घ्या ते दोन एपिसोडस. You will surely thank me later. फुल पैसे वसूल.

इथे स्पॉयलर होईल म्हणून फार लिहिता येत नाही. पण.. परदेशातील केवढं चित्रीकरण आहे ना? वेबसिरीज वाल्यांना पण परवडतो का एवढा खर्च सिनेमा वाल्यांसारखा?? प्रत्येक नवीन देशातील नवीन लोकेशन बघताना मला ऑ असं होत होतं.

स्वस्ति झाले गं बघून कालच सगळे एपि. जबरदस्त आहे खरंच. ती सोनिया ओळखली का कोण ते? कुछ कुछ होता है मधली छोटी अंजली.
हाफिझ आणि इस्माईल दुबई मधले लोकल कलाकार वाटले भाषेवरून.
बाला एजंट काहीही वेपन न घेता का पकडायला गेला हाफिजला. किती मुर्खपणा
अजून एक क्रश वाढला लिस्टीत Wink फारूक
तो इकडे गणेशोत्सव मधे आला होता न्यू जर्सीत तेव्हाच आवडला होता. Happy

आणि काय हवं बघितली. छान आहे. उमेश कामतचा अभिनय आणि प्रियाचा कपडेपट आवडला. शेवटचा भाग रटाळ वाटला मोकळं मन नावाचा. वजन कमी या भागात भाडीपा मधली आई आहे अगदी काही सेकंद पण धमाल आहे.

>>काही बेसिक प्रश्न पडलेत. चर्चा करायचीय<<
नविन धागा काढा. मी दोन एपिसोड पाहिले, अजुन पर्यंत तरी ग्रिपिंग आहे. केके ऐवजी इर्फान खान शोभला असता असं (उगीच) वाटतंय... Wink

प्राईमवर अफसोस बघितली. >>हो मी कालच पाहून संपवली. मला पण आवडली. ब्लॅक कॉमेडी आवडत असेल तर नक्की पहाण्यासारखी आहे. अर्थात लॉजिक बाजूला ठेवून
अंजली पाटीलचं काम पहिल्यांदा बघितलं, सर्व साधारण मुलगी वाटते हाच प्लस आहे. >>> पण काहीतरी खूप attractive आहे तिच्यात. मी पण पहिल्यांदाच तिला पाहिले छान वाटली.
season २ येईल का ? फारशी चालली नाही वाटते series

मी हाॅटस्टारची प्रिमिअम मेंबरशीप घेतलीये काल स्पेशल ops बघायला. लॅपटाॅपवर दिसतेय. पण फ्लॅश प्लेअरवरून टिव्हिवर कशी बघावी समजत नाहीये. तिथे मला लाॅगिन करायला काही दिसत नाहीये. माझा टीव्हि स्मार्ट नाहीये.
शेवटी आता मी लॅपटाॅप hdmi नं टिव्हीला जोडून बघतेय.

केके ऐवजी इर्फान खान शोभला असता असं (उगीच) वाटतंय

>> मला खात्री आहे शेवटच्या एपी पर्यंत तुम्हाला असं वाटणं पूर्ण संपेल. Happy केके ने खरंच काही गोष्टी अगदी परफेक्ट पकडल्या आहेत.

मी हाॅटस्टारची प्रिमिअम मेंबरशीप घेतलीये काल स्पेशल ops बघायला.

>> Wow. बादवे VIP मेम्बरशीप पण चालली असती. आता प्रीमियम मेम्बरशीप घेतलीच आहे तर भरपूर काय काय बघता येईल. Disney चे मुव्हीज पण बघा मुलांना सोबत घेऊन. एन्जॉय माडी Happy

केके ऐवजी इर्फान खान शोभला असता असं (उगीच) वाटतंय. >>> अजिबात नाही. उलट इरफानची dialogue delivery फार एकसूरी झाली असती.

SHE नवीन इम्तियाझ अली production ची वेब्सएरिएस आलीये नेटफ्लिक्स वर. आदिती पोहनकर आणि अजून मराठी कलाकार आहेत. अदितीने माध्यम वर्गीय लो कॉन्फिडन्स असलेली पोलीस कॉन्स्टेबल मस्त उभी केलीये

केके ने खरंच काही गोष्टी अगदी परफेक्ट पकडल्या आहेत. >>>> सूर्य कुमार बरोबरच्या पहिल्या मीटीन्ग मध्ये , त्याला काही जुन्या गोष्टी आठवतात तेन्व्हा आणि त्याच लक्ष नसत तेन्व्हा सूर्यकुमार विचारतो तर तो म्हणतो , काल रात्रभर काम करत होतो म्हणून थकलोय . " अ‍ॅक्च्युली , अब मेरी उमर हो गयी है " .. काय सही शॉट आहे तो एक मिनिटाचा . त्याच्याकडे बघून खरचं असं वाटत आता हा म्हातारा झालाय. त्याच्या बारीक गळ्यावर सुरुकुत्याही दिसतात , हाडं दिसतात .
खरतरं सगळीच लोक काळानुसार बदलेली दिसतात , १९ वर्शात . कॉलेजमधला फारूख , दुबईत पहिल्यांदा आलेला फारूख , सुरुवातीचा अस्लम , ईकलाख खान , अगोदरचा हिम्मत सिन्ग आणि आताची कॅरेक्टर्स मध्ये व्यवस्थित फरक दिसतो .

प्राईमवर अफसोस बघितली>>>>>
SHE नवीन इम्तियाझ अली production ची वेब्सएरिएस आलीये नेटफ्लिक्स वर>>>>>>>>>>>> अरे किती बघू टीव्ही Proud

काल मी युट्यूब वर डाईस मिडीयाची ऑपरेशन एमबीबीएस नावाची वेबसिरिज पाहीली. ५ एपिसोड्सची लहानशी आहे. स्टोरी वगैरे ठिकठिकच आहे.. 'सिली' प्रकारातली वाटली. काही काही आचरट विनोदांचं टायमिंग भारी आहे. काही हलकंफुलकं डोक्याला फार चालना नको असलेलं बघायचं असेल तर बघा.

अंजली_१२ -> हा हा .. खूप कन्टेन्ट आहे खरा .. कधी कधी काळात नाही काय बघायचं ते आणि कधी कधी अति होत . मग थोडा ब्रेक घ्यायचा .

SHE नवीन इम्तियाझ अली production ची वेब्सएरिएस आलीये नेटफ्लिक्स वर>>>>>>>>>>> याचे २ एपिसोडस पाहिले. अंगावर येणारी वाटतेय.

Pages