वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी 5 वर रंगबाज फिरसे ( सीझन 2) पाहिली. राजस्थान मधील राजकारणी लोकांच्या खेळात एक भावी आयपीएस अमरपाल अडकतो अन gangster होतो. कथा चांगली आहे पण मांडताना थोडा गोंधळ झालाय. बऱ्याच वेळा आधी मेलेली कॅरेक्टर पुन्हा दिसतात फ्लॅशबॅक मध्ये. बाकी ठाकठीक. जिमी शेरगील अन मराठमोळ्या स्पृहा जोशी चे काम चांगले आहे.
***

हॉटस्टार (आणि बहुधा स्टार प्लस वर ही) मास्टर शेफ इंडिया ६ सुरु झाले आहे! मला जरा उशीराच कळले. मग एकदम ६-७ भाग कॅच अप केले. मजा येतेय या ही सीझन ला. शेफ विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि नव्यानेच आलेले शेफ विनीत हे जजेस आहेत. शेफ विनीत विशेष आवडले मला. मस्त कमेन्ट्स देतात. शनि. - रवि. रात्री ९ की साडे नऊ टायमिंग आहे. जरूर बघा.

यूट्यूबवर होम स्वीट ऑफिस ही डाइस मिडीयाची पाच भागांची वेबसिरिज बघितली. >>> इण्टरेस्टिंग दिसते कथानक. धन्यवाद.

हॉटस्टार (आणि बहुधा स्टार प्लस वर ही) मास्टर शेफ इंडिया ६ सुरु झाले आहे>>>>>>>>>>> हो मी पण बघतेय. मस्त आहे.

Netflix - the witcher- विचका !
Netflix - घोस्ट स्टोरीज - ठीक , बघितले नाही बघितलं तरी सारखच !
Netflix - Lost in space s2- उत्तम ग्राफीक्स , आवडली , पण स3 येणार त्यामुळे शेवट झाला नाही

Imdb ला।सुरुवातीचे रेटिंग मॅनेज केले जातात हा अनुभव आहे. थोडा काळ जाऊ द्या मग ।बघा , नाहीतर सिरीज बघा, tumache mat wagle asu shakte

फ्रेन्ड्स , टू अ‍ॅण्ड हाफ मॅन, मोडर्न फॅमिलि , हाउ आय मेट यूवर मदर , बिग बँग थियरि या सारख्य लोकप्रीय सिट कॉम सुचवा

या सर्व पाहिल्या आहेत

यंग शेल्डन पहा. माझी आवडती सीरीज आहे ही. लहान शेल्डन आणि त्याच्या जुळ्या बहिणीचे काम केलेली मुलं सॉलिड भारी आहेत.
जुन्या पैकी ऑफीस, साइनफिल्ड, एवरीबडी लव्ज रेमंड, किंग ऑफ क्वीन्स मस्त आहेत पण कदाचित तुम्ही पाहिले असतील.

शिकागो मेड चे चार सीझन्स गेल्या वर्षी पाहिले होते . आत्ता पाचवा बघतोय . ग्रिपिंग मेडिकल ड्रामा !

हॉटस्टार वर साराभाई सिजन २ चे १०च भाग दिसले. तितकेच आहेत की अजुनही त्या पुढील भाग आहेत? कारण त्यातली घटना पुर्ण झालेली नाही.

फॅमिली मॅन .. अ‍ॅमॅझॉन प्राइम वर.. खुप आवडली सिरीज... मनोज वाजपेयी व बहुतेक सगळे कलाकार.. खरे वाटतात.. सहज अभिनय.. जमल्यास बघा.. लहान मुले जवळ घेउन बघु नका..

13 रीझन्स व्हाय आजपासून सुरू केली. चांगली वाटतीये पण संथ आहे जरा, माहीत नाही नंतर पकड घेईल कदाचित, कुणी पहिली आहे का?

Ozark - Netflix अत्यंत उत्कंठावर्धक सिरीज आहे. मी गेल्या आठवड्यात काहीच नव्हतं म्हणून बघायला घेतली आणि अक्षरशः दोन्ही सिझन खाऊन टाकले. जेव्हा सुरू होणार होती तेव्हा trailer बघितल्याचे आठवतं आहे पण तेव्हा काही कारणाने बघावीशी वाटली नव्हती. नक्की बघा, पहिल्या भागाच्या अखेर समजा ग्रीप आली नाही तर मग अजून एक-दोन भाग बघावे लागतील.
आता रिकामेपण आलंय. (Red Sparrow विसरायला झाला होता म्हणून परत बघितला)

Younger नावाची serial hotstar वर आहे romcom types मस्त आहे. Last man standing परत आलीये पण मला बोर झाले. Mandy मला आवडायची ती नाहीये Sad Eve ची Unbelievable नावाची drama serial आली आहे बहुतेक netflix, एकदम gripping. जरा sad आहे .
अमेरिकन्स नावाची serial पण खाऊन एकदम बिंज watch. - Hotstar

वेबसिरीज नाही पण रंगपंढरीच्या मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी घेतलेल्या नीना कुलकर्णी, सुहास जोशी, स्वाती चिटणीस इ. प्रदीर्घ मुलाखती आवडल्या. अजून बर्याच जणांच्या बघायच्यात...रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर, अमोल पालेकर, मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे इ. बर्‍याच आहेत.

मुक्ता बर्वेचे दोन्ही भाग बघितले आहेत, तिचीच पहिली मुलाखत घेतली होती. मुक्ता प्रचंड आवडते त्यामुळे बघितले, बाकी कोणाची एक तास मुलाखत बघायचं जीवावर येतं. स्वाती चिटणीस पण आवडते खूप, तिची मुलाखत बघेन. स्वाती फक्त नाटकात आवडली आहे, मुक्ता तीनही माध्यमातून सारखाच सशक्त अभिनय करते. अर्थात स्वातीला तशा भूमिका मिळाल्या नसतील आणि ती मुंबईत राहायची सुद्धा नाही, नाहीतर स्वाती उत्कृष्ट अभिनेत्री आहे.

13 रीझन्स व्हाय स्लो पॉयझन आहे , चांगली सीरिज आहे पण सायकॉलॉजीकल इफेक्ट होतो ! मनोरंजन होण्यापेक्षा निराश वाटते . काहीसे unbelievable सारखे.

रंगपंढरी मधे सर्वात बेस्ट मुक्ता बर्वेची मुलाखत आहे, त्या खालोखाल रोहिणी हत्तंगडी, सुहास जोशींच्याही मुलाखती आवडल्या !

Hotstar स्पेशल्स वर हॉस्टेजेस / होस्टेजेस बघितली. अतिशय अप्रतिम धक्कातंत्र. टोटल अनप्रेडिक्टेबल. नक्की बघा.

Pages