वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Inside edge 2 - फारएण्ड नी लिहिलेले perfect आहे
Unbelivable - खुप मस्त series. Taking फार आवडलं. त्या तली Detective Duvall ( Merritt Carmen Wever ) फारच सही वाटली. कसली calm & cool दाखवली आहे.

मलाही आवडली इनसाइड एज , आयपीएल पूर्ण स्टेज्ड पैसे कमवायचा मसालेदार ड्रामा आहे हे माझं फस्ट इंप्रेशन होतं, तेच सतत इथेही जाणवत रहातं.
अ‍ॅक्टर्स खरेच प्लेयर्स वाटतात यालाही अनुमोदन, सेकन्ड सिझनला तर माझा नवरा खर्याच मॅचेस चालु आहेत समजून बघत होता Happy
Btw तो भाईसाहब म्हणजे शरद पवार का ? Happy

unbelievable सारख्या सिरीज मध्ये त्यां पात्रांची मानसिकता दाखवायची असते + ११११११
Prime वर the widow बघितली नाही. आता पहाते.
आणि hotstar वर Homeland कोणी पाहिली आहे का.. 8 seasons आहेत. सुरुवात केली आहे, gripping वाटतीये. कोणी पाहिली असेल पुर्ण तर साधारण review द्या

The Handmaid's tale केवळ, निव्वळ महान आहे.
अजिबात चुकवू नका, त्याच्या स्लो पेसला कंटाळून मधेच थांबवू नका. Absolutely heart in mouth, mind numbing yet thought provoking.
मुख्य कलाकार एलिझबेथ मॉस ग्रेट आहेच पण इतर सगळेच थोर.

जामतारा...... खूप भन्नाट आहे?
अत्यंत उथळ वाटली . खरे स्कॅम कसे होते दाखवले नाहीच

ढापलेले कॅरकटर आहेत.

खरे स्कॅम कसे होते दाखवले नाहीच->+१ ...मला वाटले की डाक्यूमेंट्री टाइप असेल पण फिशिंग चा आधार घेऊन पटकथा लिहिली आहे. पण मस्त आहे .काहीतरी वेगळ.

रंगपंढरी वरच्या सगळ्याच मुलाखती सुंदर आहेत. अगदी सुरवातीला मी नीना जोशींची बघितली आणि बघतच गेले . बघतच गेले. इतक्या सुंदर मुलाखती यु ट्यूब वर कधीच पहिल्या नव्हत्या . मधुराणी पण मस्त घेते मुलाखती . समोरच्याला सारखं बोलत ठेवण्यात तिची हातोटी आहे . खूप मुलाखती बघितल्यानंतर जाणवत प्रश्न खूपसे सारखे सारखे असतात. . त्याला हि कारण आहे सगळेच अभिनय क्षेत्रातले कलाकार त्यामुळे ते अपरिहार्य आहे . पण खूप सुंदर Happy

खूप मुलाखती बघितल्यानंतर जाणवत प्रश्न खूपसे सारखे सारखे असतात. . >>+१ मुलाखतीचे स्वरुप ठरलेले आहे.

Handmaid's tale >>> झी-प्राइमवर दाखवत होते तेव्हा मी ४-५ एपिसोड्स पाहून सोडून दिली. फारशी आवडली नाही.

hotstar वर Homeland >>> क्लेअर डेन्सची का? स्पाय थ्रिलर्स आवडत असतील तर नक्की बघा. पूर्वी इंग्रजी चॅनेल्सवर दाखवायचे तेव्हा मी ५ सीझन्स भक्तीभावाने पाहिले आहेत. मस्त होते सगळेच. पहिले ३ तर खूपच छान. ६-७-८ मला पाहायला जमले नाहीत. कॅरी आणि पीटर क्विन यांच्यातलं प्रोफेशनल नातं फार सुंदर मांडलं आहे.

Spoilers Alert ****

Handmaid's tale - अजिबातच आवडली नाही. खूपच slow आहे. जेवढी hype आणि अवॉर्डस मिळाले होते त्यामानाने काहीच नाहीये. सारखं फ्लॅशबॅकस आणि वर्तमान खूपच कंटाळवाण होतं. विषय नक्कीच वेगळा आणि catchy आहे पण बात कुछ जमी नाही. सगळेच दिसायला बोर आहेत. एकही commamnder ची बायको fertile नाही कसं शक्य आहे. एवढी fertility महत्त्वाची तर मुलं होतं नाही म्हंटल्यावर open मॅरेज / surrogacy/ पैसे द्या मूल घ्या concepts का नाही वापरले. सगळे fertile लोक्स बिनडोक दिसतात, इतके indications मिळत असताना वेळेवर पळून गेले नाही. मॅट्रिक्स movie मध्ये माणसांची शेती हा विषय already वापरलाय इथे fertile बायकांची शेती!
Help, Rabbit fence असे सिनेमे जास्त परिणामकारक वाटले होते.

तुम्हाला हॉरर जॉनर ठाऊक आहे? बहुतेक नसावा किंवा असलाच तर भुता खेतांचे चित्रपट अशी तुमची धारणा असावी. पण खऱ्या अर्थाने घाबरवून सोडेल, थरकाप उडवेल, मस्तकात थैमान घालीत जगण्याच्या, अनुभवांच्या हरेक तुकड्यांना पुन्हा पुन्हा जोडून, तपासून पहायला लावेल. माणूस म्हणून जी टोकाची काळी बाजू पहायला, स्पर्श करायला मिळेल असे काही पाहायचे आहे तर The Handmaid's Tale पहा. मालिकेची मूळ थीम किंवा गाभा पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्री किती शूद्र, केवळ भोगयोग्य असते इतकेच दाखविणे नाही. धर्म, धारणा, श्रध्दा यांच्या साखरपेरणी खाली जिथून अफूचा थर चालू होतो तिथून माणूस बुध्दी कशी गहाण टाकत जातो. मूळ हिंसक, द्वेष, गुलामी वर्चस्वास कसा आपलेसे करतो. स्वतच्या आकलना बाहेरील गोष्टींना एकसुरी, एकरंगी किंवा नष्ट करीत सुटतो याचं अगदी यथार्थ चित्रण आहे. समता या तत्वावर चालणाऱ्या कुठल्याही समाजास आपल्या आजूबाजूच्या गोष्टी डोळ्यांत तेल घालून पहाव्या लागतात. त्या सतत दोलनामय असतात. कुठल्याही एका बाजुला झुकणे बहुसंख्यांना धोकादायक असते. त्या बिघडणे ही कुणा एका सरकार, संस्था किंवा व्यक्तीची जबाबदारी नसते. समाज म्हणून, व्यक्तिशः त्या समाजाचा एक भाग म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे कसे व किती महागाचे पडू शकते याचा उत्तम आढावा आहे. खरेतर इतिहास अशा किंवा त्याच त्या चुका, गोष्टींनी खचाखच भरलेला असूनही आपण त्यातून काही शिकत नाही तेव्हा या मालिकेतून कुणी काही घ्यावे, शिकावे अशी भंपक आशा नाहीच. ज्यांना इतिहासातून शिकता, जाणता आले त्यांना रीलेट होईल बाकी काही नाही. आता इतकं सगळं झणझणीत असताना कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, इत्यादी इत्यादी अतिउत्कृष्ट असणारच हे ओघाने आलेच!
- ट्यागो @मायबोली

नेटफ्लिक्स वर Locke & Key कॉमिक्स वर आधारित ( प्रचंड बदल करून, पण तरीही आधारीतच म्हणते) त्याच नावाची वेबसिरीज आली आहे. एकदा पहायला आवडेल. फार मोठं रहस्य नाही, पण जो काही सस्पेन्स आणि थ्रिल आहे ते शेवटपर्यंत टिकून राहते. मला छोटा हिरो जॅकसन रॉबर्ट स्कॉट आवडतोच, यामध्ये पण मस्त काम केलं आहे. हॉटी टायलर आणि ब्युटीफुल किन्सी पण आवडले. कास्टिंग परफेक्ट आणि acting छान आहे. कॉमिक वर आधारित असली तरी लहान मुलांना आवर्जून दाखवावी अशी नाही. Adult सीन्स आहेत. शिवाय adult प्रॉब्लेम्स (भावनिक) दाखवले आहेत, जे मुलांना समजणं थोडं अवघड जाईल

प्राईमवर अफसोस बघितली. अर्ध्या तासाचे आठ भाग आहेत. हंटरवाला गुलशन तेव्हाच खूप आवडला होता. ही मालिकाही त्याच्यासाठी बघितली आणि आवडली. विचित्र लोकांनी भरलेली, त्यामुळे होणारे विनोद, मजेशीर घटना आणि शेवटी काहीतरी संदेश देणारी आहे. चिल्लर पार्टी मधला गुगली आहे, त्याला कुठे बघितलं होतं ते आठवतच नव्हतं, शेवटी गुगल केलं. अंजली पाटीलचं काम पहिल्यांदा बघितलं, सर्व साधारण मुलगी वाटते हाच प्लस आहे. एकदा बघायला हरकत नाही ही मॅड कॉमेडी, पटकन बघून होते.

नेटफ्लिक्सवर 'मोतीचुर चखनाचूर' पाहिला. प्रचंड आवडला. गाणी तर रिपीट मोडवर ऐकण्यासारखी. सगळ्यांची कामं मस्त.
चित्रपटातली हिंदी कोणत्या राज्यात बोलतात म्हणे?

ताज महल 1989 आज पूर्ण बघितली. मी एकसलग बघितल्याने मला सिनेमाचा इफेक्ट आला. तुकड्या तुकड्यांमध्ये बघताना कदाचित तेवढी मजा येणार नाही.

पण मला वेबसिरीज आवडली. प्रेमाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. आणि तरीही ती तितकीच सच्ची असू शकते हे खूप छान पद्धतीने समोर येतं. कलाकार चांगले आहेत पण एकही ओळखीचा नाही प्रोफेसर सरिता वगळता. सरिता तशी रूढार्थाने सुंदर नसून अभिनयाच्या जोरावर मनात रेंगाळत राहते.

फक्त एकच झालं की सिनेमा माझ्या जन्माच्याही आधीचा काळ दाखवत असल्याने त्या काळात समाजात / लखनौ विद्यापीठात एवढी मोकळीक होती का याबद्दल सतत कुतूहल वाटत होते. त्या काळच्या मानाने मिठ्या मारणे, फ* ऑफ म्हणणे, डेटिंग आणि त्या अनुषंगाने से* वगैरे अगदी सहज घडताना दाखवले आहे. प्रत्यक्षात 1989 ला हे इतके सर्रास होत असेल का?

प्रोफेसर अख्तर प्रचंड हँडसम दिसून गेलेत सिनेमाभर. (डोळ्यात बदाम वगैरे) त्यांच्यापुढे विशीतले अंगद आणि जीवन वगैरे सुद्धा फिके पडतात. जास्त लिहीत नाही. मस्त आहे एकदा बघायला.

Pages