वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी , अंजली. मी समांतर नंतर आणखी काही आहे का म्हणून शोधत होते. एकदम "ऑं" झालं Happy
नावही भयानक आहेत.

आणि काय हवं पाहिली. मिथीला पालकरची small things अशीच आहे. उमेश कामत मधून मधून मुंबई पुणे मुंबईच्या स्वप्निल जोशीची कॉपी करतोय असं वाटलं. बाकी ठीक. दुसरा सीजन पुढे ढकलला. फोर मोर शॉट्स चा दुसरा सीजन बघतेय. इतकी छान छान मुंबई दिसते त्यात की बस्स!! सगळ्यांची मोठ्ठी मोठ्ठी घरं.... काही गोष्टी आवडल्या काही सोडून द्यायच्या झालं.

Four more shots please 2 ..... Nothing new.... Just new problems...n same flow as season 1 ....

फोर मोअर शॉट्स कशी आहे?
इथल्या कमेंट्स वाचून माधवन ची breathe पाहिली. चांगली आहे. मात्र मला अमित सधच्या ऐवजी दुसरा कोणी चालला असता. माधवन मात्र मस्तच!
आणि काय हवं झी मराठीवर दाखवणार आहेत २९ एप्रिल ते २ मे रोज रात्री. सध्या जोरात जाहिरात चालली आहे.

4msp season 2.......काल एका दिवसात सगळे एपिसोड पाहिले .... पण bore झाले ... reapeated वाटली

@वर्षा, आणि काय हवं mx player वर चकटफू आहे, ऍप डालो करण्याची गरज नाही. गूगल वर नाव टाकल्यावर आपोआप लिंक येते. तेथे तुम्ही सगळे एपिसोड बघू शकता, मीही सध्या बघते आहे.

थँक्स सान्वी. mx player वर आहेत ते दिसले गुगल केल्यावर पण आमच्या रिजन (अमेरिका) ला अव्हेलेबल नाहीयेत. असो. Happy

Four more shots please 2 ..... Nothing new.... Just new problems...n same flow as season 1 .... >>>> असं नाही वाटलं. पहिला सिझन फन, मस्ती, सेक्स आणि तरुणपणीचे स्ट्रगल्स यावर जास्त भर होता. दुसऱ्या सीझनमध्ये मला थोडी जास्त मॅच्युरिटी, जास्त इमोशनल बॉंडिंग आणि थोडी आयुष्याबद्दल clarity आल्यासारखी वाटली. मला त्या चौघींच बॉंडिंग फारच फॅसिनेटिंग वाटतं. मुंबई फारच सुंदर दिसते, रादर मुंबईचा सुंदर भागच फक्त प्रोजेक्ट केला आहे. बाकी ड्रेसेस, फॅशन्स, सोबो लाइफस्टाइल बघायला आवडत असेल तर सीरिज एकदा बघायला हरकत नाही Happy

त्या चोघींच बॉंडिंग.... fashions ह्यामुळेच तर एका दिवसात series संपवली..... सतत तेच तेच प्रॉब्लेम्स related to sex ..... अजून new add करता आले असते असे मला वाटतय....

कन्नामूचि पाहिली. तेच्तेच घिसे टॉपिक घेउन बनवलीये. ठीक ठीक.
आता पंचायत बघेन. मेंटलहूड बघणार होते पण इथलं वाचुन नाही बघणार.
असुर मधला निखिल तोंडातल्या तोंडात डायलॉग बोलतो. काय बोलतो कळत नाही ला +१
मला कितीवेळा मागे जाउन कानावर हाताचा जोर देउन ऐकावं लागलं त्याच्यामुळे. Happy अर्शद वारसी बेस्ट आहे.
मला आवडली असुर. ग्रिपिंग होती.
द रायकर केस बघतंय का कुणी?

आणि काय हवंचा दुसरा सीजन आला आहे.>>>> आला का? मला फक्त तो कुत्रा मांजर एकच एपिसोड दिसला.>>>६ एपिसोड आहेत ना सिझन २ मध्ये पण? मला आवडले दोन्ही सिझन. छान कामं आहेत दोघांचीही. एका दमात बघून झाले.

फोर मोअर शॉट्स प्लिज aka देशी सेक्स अँड द सिटी सिझन २ बघून संपवला.
रिअ‍ॅक्शन जी पहिला सिझन पाहिल्यावर होती तीच सेम,तरी काही सिरियल्स नावं ठेवत का होईना पहिल्या जातात त्यातलीच एक, टिपिकल बॉलिवुडी फेमिनिस्ट म्हणजे फक्त स्ट्राँग व्ह्युज , इक्वालिटी ,इन्डिपेन्डन्ट वगैरे इनफ नाही. एकुणएक सगळ्याच फिमेल कॅरॅक्टर्स चेनस्मोकर, मुंबईच्या लाइफमधे करिअर -कम्युट वगैरे सगळ्यातून वेळ काढून विकडेजमधे दररोज बार मधे जाऊन शॉट्स मारणार्या , एक्स्ट्रॉ मॅरिटल अफेअर्स , बायसेक्शुअल वगैरे दाखवणे मस्ट आहे बहुतेक.
सेक्स अँड द सिटी कॉपी करताना या सिझनला मार्व्हलस मिसेस मेजलची स्टँडप कॉमेडी लाइनही कॉपी केली आहे (कु.फे.हे.पा.)
प्रॉब्लेम असा आहे कि सेक्स अँड द सिटी, फ्लिबॅग, वर्किंग मॉम्स, मिसेस मेजल मधली कॅरॅक्टर्स खरीखुरी वाटतात, पण यातल्या बायका अत्यंत फेक , ट्रायिंग टु हार्ड टु लुक सो कॉल्ड “फॉरवर्ड” अशा वाटतात.
जाउद्या, तरी नावं ठेवत ३ दिवसात सिरीज पाहून संपवलीच Proud
बाकी आजकाल देशी वेबसिरीजचे कन्टेन्ट कसेही असो, स्टारकास्ट , पॅकेजिंग, बजेट जोरदार असते .
इस्तानबुल, उदयपुर पॅलेस डेस्टिनेशन वेडिंग, सागळ्यांचे आउटफिट्स, बॅग्ज, शुज यावर भरमसाट खर्च केलाय.
चौघींपैकी फिट्स्नेस ट्रेनर झालेली उमंग सर्वात बिलिव्हेबल वाटते, इतर तिघी बिनडोक.
सपोर्टिंग कास्ट बेटर आहे, त्यात लिसा रे चं स्क्रीन प्रेझेन्स मस्तं आहे , अमृता पुरीचा रोल लहान असला तरी मस्तं काम करते ती आणि गेस्ट अपिअरन्स मधे शिबानी दांडेकर भाव खाऊन जाते , फारच सुंदर , एकदम इंडियन बार्बी शोभेल अशी डेलिकेट दिसते ती.
प्रतीक बब्बर ओके, मिलिंद सोमण शोभेचा बाहुला Happy
असो, तर मेन्शन केलेले सगळे फ्लॉज असले तरी वन टाइन वॉच नक्की आहे Happy

हॉस्टेजेस मी पाहिलीये. वन टाईम वॉच आहे.

६ एपिसोड आहेत ना सिझन २ मध्ये पण? >>>>>>> युट्युबर वर नाहीयेत आता. काढलेत.

मी २-३ एपिसोड्स पाहिले आहेत या सिरीजचे. इण्टरेस्टिंग वाटले.

ती सयानी गुप्ता एकूणच सरप्राइज पॅकेज आहे. जॉली एलएल बी मधला छोटा रोल, या सिरीज मधला एकदम आधुनिक रोल, तर आर्टिकल-१५ मधला खेडुत मुलीचा रोल, या व्यतिरिक्त सर्वात इण्टरेस्टिंग म्हणजे तिचे 'इन्साइड एज' मधले कॅरेक्टर. खूप विविधता असलेले रोल्स करत आहे ती.

"पंचायत" बद्दल एक निरीक्षण. त्यातील घटना आपल्यासारखे शहरी लोक त्या "सचिवजी" च्या नजरेतून पाहतात. आपली प्रतिक्रिया साधारण त्याच्या प्रतिक्रियेसारखी असते. पण खेडेगावातील लोक ही सिरीज पाहताना कशी पाहात असतील? त्यातील "प्रधान" किंवा ग्रामपंचायतीत काम करणारे ते इतर लोक यांच्या नजरेतून पाहणारे कोणी असेल का? Happy

हो, सयानी गुप्ता खूप व्हर्साटाइल आहे, पार्च्ड मधेही होती ना ती ?
इनसाइड एज पुन्हा पहायला हवे, विसरलेय पण तिचं काम चांगलं होतं त्यात एवढं आठ्वतय.

हो मलाही इनसाइड एज मधे ती फार आवडली होती. डीजे, ती अ‍ॅनालिस्ट असते. आणि वायू ची बहीण. खेळाडूंचा डेटा अनालाइज करून कुणाचे काय वीक पॉइन्ट्स आहेत, परफोर्‍मन्स इम्प्रुवमेन्ट कशी करता येईल किंवा ऑपोझिट प्लेयर ला अटॅक करण्यची स्ट्रॅटेजी काय वगैरे सल्ले देत असते. तिचं महत्त्वाचं कॅरेक्टर होतं. आर्टिकल १५ मधे पण काम चांगलं होतं, पण तिचा लूक मॉडर्न वाटला होता इतर मजूर बायांच्या तुलनेत.

फोर मोरचे सीजन एकचे दोन भाग बघितले. फारच मॉडर्न आहेत बाया सगळ्या. दामिनीचा प्रॉब्लेम कळलाच नाही मला. ती पटेल आवडली मला. तिचे दारूचे शॉट्स तिच्या किटो डाईट मध्ये कसे बसतात. सिमॉन सिंग अजून तशीच दिसते. विकांताला संपवून येते इकडे परत टायपायला.

व्हिस्की , जिन ,ब्रँडी , टकीला , वोडका मध्ये झिरो कार्ब्स असतात. किटो मध्ये फिट बसतात.

पंचायत पाहिली इथे प्रतिसाद बघून. खरंच छान आहे. साधी सरळ सोपी. त्या मानाने फोर मोर shots फारच मेलोड्रामा आहे. सगळं नकली नाटकी वाटत राहतं. Atleast मला तरी फेमिनिझम वरची नाही वाटली सो नाही आवडली तेवढी. फक्त उमंग च पात्र लॉजिकल आहे तेवढं बाकी सगळे tp.

त. टी. इथे कंपॅरीजन नाहीये फक्त दोन्ही सिरीज एकामागोमाग एक पाहिल्याने असं वाटतं.

पंचायत खूप आवडली. सगळ्यांची कामं, स्टोरी आणि बॅकग्राऊंड म्युझिक सगळच छान आहे. एकदम सटल ह्युमर असल्याने आवडली. फाच्या पोस्टीला अनुमोदन.
फोर मोर शॉट्स अर्धा एपिसोड पाहून सोडून दिली. जेव्हडा पाहिला तेव्हडाही आवडला नाही, त्यामुळे कंटाळा आला.

Pages