वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पंचायत बघून संपवली. छान वाटली. दुसरा सीझन नक्की पाहीन. सगळ्यांचे acting छान झाले आहे. विषय नेहमीचाच आहे पण मांडणी चांगली आहे खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे.

आता असुर पाहण्यास सुरवात केली आहे पण खास remarkable वाटत नाहीये अजून तरी

माफ करा पण पुन्हा एकदा प्राईमवर कोणत्या मालिका छान आहेत. मागची खुपच पाने झालीत. सगळी वाचेपर्यंत धीर नाही. फॅमिली मॅन तेव्ढी आठवत होती ती पाहिली ती मस्त आहे.
अजुन सांगाल प्लीज. माधवनची ‘ब्रीद’ कशी आहे?

@jui - असुर बघ, भारी आहे.
समांतर ला बरेच रेको येतायेत, पण स्वप्नील जोशी असल्यानेच अजिबात धीर होत नाहीये. Lol

ब्रीद मी पाहिली. मला माधवन्मुळेच पुर्ण पाह्ता आली. आम्ही तीऩ जणंनी मिळून सुरु केली होती एकत्र. मी एकटीनेच संपवली. सिरिय्ल किलिंग आणि सायको थ्रीलर प्रकारआवडत्/झेपत असेल तर पहा. थोडे फ्लॉज आहेत पण दॅट्स ओके

कोणी स्टार वॉर्स फॅन्स आहेत का? मला जुन्या पहिल्या मुव्हीज आवड तात. व स्टार वॉर्स पहिला सिनेमा आला १९७७ तेव्हा त्याचे पुस्तक पण आलेले मराठीतून. ते मी उत्क र्ष लायब्ररीतून आणून वाचून काढलेले. तर आता हॉट स्टार वर डिस्ने प्लस मध्ये पूर्ण स्टार वॉर्स सिनेमे उपलब्ध आहेत. नवे सिनेमे जरा लांबड लावतात पण अ‍ॅक्षन छान असते.

सांगायचे म्हणजे द मेंड्लोरिअन नावाची स्टार वॉर्‍स युनिवर्स वर आधारित एक वेब सीरीज आता डिस्ने प्लस वर उपलब्ध आहे. नोव्हेंबर २०१९ मध्येच ही आलेली व जालावर अनेक चर्चा वगैरे झडल्या. तसेच बेबी योडा पात्र एकदम भारी क्युट आहे. ह्याचे आठ भाग आहेत. व तुफान अ‍ॅक्षन
बेबीचा क्युट पणा वगैरे मसाला आहे. सायन्स फिक्क्षन फॅन्स ना नक्की आवडेल.

टिपिकल दूरदर्शन फील घ्यायचा असेल तर पंचायत (prime) आणि ताजमहाल १९८९ (नेटफ्लिक्स )पहा . विशेष करून ताजमहाल . लखनौ मध्ये असल्यामुळे हिंदीची लज्जत मस्तच आहे . physics प्रोफेसर च्या भूमिकेत अतुल कुलकर्णी ची बायको आहे. title song पण मस्त . एकदम नॉस्टॅल्जिक वाटते

आणि काय हवं दुसरा सीजन संपवली. भुताच्या गोष्टी सोडली तर बाकी भाग चांगले आहेत. बेबी प्लॅनिंग सिरीयस आहे शेवटचा भाग. उमेश कामत उत्तम नट आहे पण त्याला आव्हानात्मक रोल मिळत नाहीत असे वाटते. प्रिया आवडत नाही. सगळीकडे सारखीच वाटते.

पंचायत बरीचशी बघितली. उत्तर प्रदेशातील एका खेडेगावातील ग्रामपंचायत, तेथील फुटकळ घडामोडी, त्यातून निर्माण होणारे साधे पण स्वाभाविक विनोद हे सगळे मस्त जमले आहे. उगाच कोणीतरी येताजाता विनोदनिर्मिती करायचा प्रयत्न करतोय असला प्रकार नाही. एक दोन सीन्स सोडले ("मॉनिटर" एपिसोड मधला शेवटचा सीन, किंवा सेक्रेटरीला आलेला एक मिनीटांत सोडवायचा व्हॉट्सॅप मेसेज वगैरे) तर यातल्या विनोदाचा प्रकारही दे-धमाल आर-ओ-एफ-एल टाइपचा नाही. पण आधी अस्सल व सहज होउ शकणार्‍या प्रसंगांतून कधा लिहून मग त्यावर एपिसोड्स बनवलेत असे जाणवते. कोठेही कॅमेर्‍याचे अनावश्यक झूम, जोरदार बॅकग्राउण्ड म्युझिक, पाणी घातलेले प्रसंग असला प्रकार नाही. ८० च्या दशकात दूरदर्शन वर हलक्याफुलक्या सिरीज असत तशी वाटते ही.

यातला त्यातील पात्रांच्या नेहमीच्या संवादांतून होणारा विनोद हा मस्त वाटतो. किंबहुना कोणताही विनोदी संवाद हा प्रत्यक्षात त्या कॅरेक्टरने बोलताना त्याला स्वतःला आपण विनोद करतोय असे वाटत नाही - त्यांचे ते नेहमीचे बोलणे आहे. उदा: भिंतीवर लिहीली जाणारी एक सरकारी स्लोगन, त्यावर वाद होताना पंचायतीचा "प्रधान" (रघुवीर यादव) सहजतेने बोलून जातो, "वैसे भी कौन पढनेवाला है". किंवा साधी खुर्ची व "चक्का वाली कुर्सी" मधून निर्माण होणारे इगो प्रॉब्लेम्स वगैरे.

अजून एक एपिसोड बघायचा राहिला आहे. पण दुसर्‍या सीझनबद्दल उत्सुकता आहे. अजूनतरी मुख्य पात्रे ३-४च आहेत. खरे "गावकरी" व त्यांचे स्वभाव, वागणे वगैरे अजून फारसे आले नाही एखादा भाग सोडला तर. ते चांगले डेव्हलप केले तर मजा येइल.

असुर बघ, भारी आहे.
समांतर ला बरेच रेको येतायेत, पण स्वप्नील जोशी असल्यानेच अजिबात धीर होत नाहीये. Lol
>> ओक्के Happy

sleepy hollow बघा >) ओक्के Happy

युट्युबवर आणि काय हवं बघितली. मस्त आहे हलकीफुलकी. छोटे भाग असल्याने पटापट बघून संपले.
कमी वजन एपि मस्त एकदम. दुसरा सिझन आला का?

आणि काय हवं आणि अजून दोन मराठी सिरीज झी मराठीवर दाखवणार आहेत. आणि काय हवंचा दुसरा सीजन आला आहे.

आणि काय हवं दोन्ही सिझन बघून झाले. चांगली आहे सिरीज, एखाददोन भाग बोअर झाले मला पण overall मस्त. सर्वात धमाल भाग पुरणपोळीचा, जो पहिल्या सिझनमधे होता.

उमेशने फार सहज काम केलंय, तोच आवडतो मला जास्त म्हणा Lol तिनेही चांगलं केलंय पण तो best.

पंचायत पाहून संपवली आजच. खूप सुंदर, साधं, अस्सल असं बऱ्याच दिवसातून पाहिलं. प्रचंड आवडली, खूप गाजते आहे, imdb रेटिंग 9.1 आहे. तसं रेटिंग वगैरे मी फार मनावर घेत नाही पण खूप जणांनी suggest केली होती. सर्व कलाकारांचा नैसर्गिक अभिनय हा खूप मोठा ऍसेट आहे सिरीज चा. जमल्यास यावर स्वतंत्र धागा काढेन.

मी पंचायतचा पहिला एपिसोड बघितला. हिरवंगार शेत वगैरे बघून मस्त वाटलं. सर्वांनी छान काम केलं आहे, नीना गुप्ता कडक पण मनाने छान वाटली, शेवटी कुलूप तोडू पण देते आणि हिरोला जेवायला पण बोलावते, मला नाहीतर त्याची फार काळजी वाटत होती Lol

उमेशने फार सहज काम केलंय-> खूप सीन्स मध्ये त्याने प्रशांत दामले सारखा अभिनय केला आहे असं जाणवत .

Pages