हल्ली मुली ह्या मुलां ईतक्याच स्वावलंबी आहेत
मुलगा असो वा मुलगी, आईवडील त्यांना घडविण्यासाठी, वाढविण्यासाठी, एक चांगली व्यक्ती बनविण्यासाठी सारखीच मेहनत घेतात. तर फक्त लग्न झाल्यावर मुलींना सासरी जावे लागते म्हणून मुलींच्या त्यांच्या पालकांप्रति असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपतात का? खासकरुन आर्थिक जबाबदाऱ्या.
माझ्या एका मैत्रिणीचे नुकतेच या कारणावरून ब्रेकअप झाले. तिच्यामते, जसे मी वर लिहीलेय, ईतके वर्ष ज्या आईवडिलांनी सांभाळले, आपल्या सर्व गरजा त्यांच्यापरीने भागविल्या. त्यांना त्यांच्या उतारवयात मदत करणे आपले कर्त्यव्य आहे. तसे तिने आपले हे मत तिच्या मित्राला आधीही सांगितले होते पण त्याने ते तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. पण आता जेव्हा दोघे लग्नाचा विचार करीत होते तेव्हा त्याने तिला स्पष्ट सांगितले की जर तिला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर त्याच्या काही अटी आहेत, त्याची ह्याबाबत काही वेगळी मते आहेत, जे तिला पटले नाही अन हिचे म्हणणे त्याला पटले नाही. आणि झाले काय, यावर काहीच तोडगा निघाला नाही म्हणून दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला अन एक नाते खऱ्या अर्थाने सुरु व्हायच्या आधी संपले.
तसे पाहता मला दोन्ही बाजू नीट माहित नाहीत, म्हणून मला कुणीच चुकीचे किंवा बरोबर वाटत नाही, पण वाईट मात्र वाटले.
• प्रत्येक प्रौढ व्यक्तीने
• प्रत्येक प्रौढ व्यक्तीने (१८+) आपापला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, मेडिकल, इतर खर्च स्वतः करावा.
• १८+ नंतर पालकांनी पाल्यवर जो काही खर्च केला असेल तो कर्ज (व्याजस/रहित) समजून परत करून टाकावा.
• त्याखेरीज इतर काही खर्चाची (उच्च शिक्षण, लग्न, व्यवसाय, घर घेण्यास मदत, वारसा हक्कात प्रॉपर्टी, शेती इ) अपेक्षा पाल्याने करू नये.
• आणि इतर काही आर्थिक मदतीची अपेक्षा म्हातारपणात पालकांनीदेखील करू नये.
• वय १८ पर्यंतचा खर्चदेखील उचलता येत नसेल तर मूल जन्माला घालू नये. म्हणजे मग उगाच नंतर 'जन्मापासून आतापर्यंत तुझ्यावर १२ ते १५ लाख खर्च झाले' असल्या ओकार्या काढत बसाव्या लागणार नाहीत.
• आई वडलांनी मुलांचा खर्च समप्रमाणात शेअर करावा.
• बायकांनी आयुष्यभर बापाच्या, भावाच्या, नवऱ्याच्या, मुलाच्या पैशावर जगत राहू नये. आम्ही घरात DBMS करतो वगैरे फालतू बडबडी करू नयेत. ह्या कामाचा मोबदला आणि त्या बायकांचा अन्न, वस्त्र, निवारा, कपडे दागिने, इतर खर्चाचा हिशोब लावला तर उच्च,मध्यम वर्गतल्या 'गृहिणी' स्वतःचा खर्चदेखील उचलण्याइतक काम करत नाहीत हे सहज कळेल. चीप लेबरकाम करायचे आणि राहणीमान मात्र उच्च वर्गाचे मिळवायच असला चमकोपणा बंद करावा.
• लग्नानंतर कोणीही आडनाव बदलू नये. 'आपण आधी बापाची प्रॉपर्टी होतो आता नवर्याची झालो' असले डिफॉल्ट कायदे असलेल्या लग्नसंस्थेचा भाग बनू नये.
• दुसऱ्याच्या घरी फुकटात रहायला जाऊ नये. आपापला निवाऱ्याचा खर्च उचलावा.
अजून मुद्दे आठवेल तसे.....
तुम्हाला काय म्हणायचं आहे ते
तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजतंय पण तेच थोडं प्रेमाने, समजुतीने शक्य होत असेल तर त्याला प्राधान्य द्यावे. पाचही बोटं सारखी नसतात, याचं ही भान ठेवावे.
वेगळं राहिलं की आनंदाच्या, सणाच्या, मदतीच्या प्रसंगी (आणि इतर मनाला येईल तेव्हा) एकत्र जमून परत वेगळं रहाता येतं याने बरेच प्रश्न सुटतात. हे आर्थिक दृष्ट्या शक्य असेल तर जरूर करावे.
दोन्ही बाजूचे समजूतदार असतील,
दोन्ही बाजूचे समजूतदार असतील, थोडं थोडं मोल्ड केलं त र कुठलेच प्रश्न तेवढे भयंकर रहात नाहित.
मुलीने जबाबदारी उचलावी का हा प्रश्नच कसा येऊ शकतो? ह्या प्र श्नातच स्त्रीभ्रूण हत्ये चे मूळ दडलेय.
जर मुलगा मुलगी दोघही जबाबदारी उचलणारच नसतील तर प्रश्न च मिटला. पण पोटच्या गोळ्यांनी जबाबदारी उचलावी असे ठरले तर त्यात मुलगा मुलगी भेद कशाला?
रुन्मेश तुझ्या उदाहरणात भाऊ आहेत असे उदाहरण आहे. माझ्या आजुबाजुला फक्त दोन मुली असलेले (माझ्या वयाच्या मुलींचे पालक) आणि ह्या जनरेशन ला फक्त एकच मुलगी असलेले अनेक आहेत.
मग त्यांच्याबाबतीत काय म्हणशील? एकॉनॉमि कली परवडत असेल तर जवळजवळ घरे घेऊन रहावे जोपर्यंत फिजिकली शक्य आहे. फि जिकली शक्य नसताना, आईवडिलांना एकटं सोडायचा विचार ही करू नये. ह्यात आईवडि ल स्व भावाने भयानक नाहित हे गृहित धरलेले आहेत. तसे असल्यास ईक्वेशन बदलेल.
माझं आणि माझ्या सासुचं शंभर टक्के पटणार ना ही तसच माझं-माझ्या स्पाऊस चं, माझं - माझ्या आईवडिलांचं आणि माझं माझ्या मुलांचही शंभर टक्के पटणार नाही हे लक्शा त ठेवलं आणि प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी सुट दिली (गोंदवलेकर महाराजांचा फंडा), राग खूप काळ मनात ठेवला नाही तर खूपसे प्रॉब्लेम्स आपोआप सुटतात.
दोन्ही आईबाबा आपलेच ही खूणगाठ मनात बांधावीच ह्यापुढे तरी.
साईडनोटवर: वर उल्लेखलेल्या उदाहरणातले मुलांशी वागताना हावरेपणा करणारीही उदाहरणही माहित आहेत तसेच सॉलिड सपोर्ट म्हणून उभे रहाणारेही आजी आजोबा अनुभवात आहेत.
अजून एका उदाहरणात - everybody loves remond च्या एका एपिसोडमधे त्याच्या आईबाबांच्या ओल्ड एज होम्/कम्युनिटी होम मधून ह्यांना घेऊन जा म्हणून फोन येतो, तशी एक आजीही (भारतात) माहिती आ हे
<< मुलीने जबाबदारी उचलावी का
<< मुलीने जबाबदारी उचलावी का हा प्रश्नच कसा येऊ शकतो? ह्या प्र श्नातच स्त्रीभ्रूण हत्ये चे मूळ दडलेय. >>
------ स्त्रीभ्रूण हत्येस अनेक कारणान्पौकी हे असेलही. माझ्या मते रोजच्या जीवनात (घरात, बाहेर, सार्वजनिक ठिकाणी) स्त्री कमालीची असुरक्षित आहे याची जाणिव/ अनुभव. साधा लोकल, रेल्वे किव्वा बसचा प्रवस आठवा... निव्वळ जगण्यासाठी पहिल्या दिवसापासुन पुढे दर दिवशी झगडावे लागते. विषय बदलतो आहे म्हणुन थाम्बतो.
रुन्मेश तुझ्या उदाहरणात भाऊ
रुन्मेश तुझ्या उदाहरणात भाऊ आहेत असे उदाहरण आहे. माझ्या आजुबाजुला फक्त दोन मुली असलेले (माझ्या वयाच्या मुलींचे पालक) आणि ह्या जनरेशन ला फक्त एकच मुलगी असलेले अनेक आहेत.
>>>>>
जेव्हा भाऊ नसतील आणि मुलीच असतील तेव्हा हा प्रश्न उद्भवू नये.
म्हणजे समजा एक वा दोन मुली आहेत. तर जे आईबापांचे आहे ते पुढे त्या मुलींनाच मिळणार. तर तुम्हीच आम्हाला सांभाळा आणि आमच्यानंतर हे तुमचेच किंवा मग आम्हीच आमची प्रॉपर्टी विकून आमचे काय ते बघतो..
आता जर आईवडिलांकडे प्रॉपर्टी नसेल, हा प्रश्नही वर काहींना पडलाय. तर मग ईथेही क्लीअर आहे की लग्नाआधीच मुलींना ठाऊक आहे की आम्ही मुलीच आहोत तर आता आईबाबांना आम्हालाच सांभाळायचे आहे. किंबहुना त्यांच्याशी लग्न करणारयांनाही हे आधीच ठाऊक असणार..
प्रॉब्लेम तेव्हा आहे जेव्हा तुझा भाऊ बघेन तुझ्या आईवडिलांकडे म्हणून नवरा आडकाठी घेईन..
विचार करा काही वर्षांपूर्वीचाच काळ होता, मुलीला हुंडा द्यावा लागायचा. त्यात पलटून तिने आईवडिलांना काही द्यावे हा विचारही त्यावेळी हास्यास्पद ठरला असता.
आज तुम्ही हा विचार करू शकता कारण आज त्यामानाने सुधारणा आहे.
पण तरी आजही मुलालाच वंशाचा वारस समजले जाते. आपला जमीनजुमला मुलीला पर्यायाने जावयाला आणि पुढे त्यांच्या वंशात जाण्याऐवजी आपल्या मुलाकडे, आणि पुढे आपले आडनाव लावणारया नातवंडांकडे जावा असा विचार आजही लोकं करतात आणि तसेच वागतात.
या विचारावरच कायद्याने घाव घाला, पुढच्या पिढीत तुम्हाला लेखात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधायची गरज नाही पडणार.
एकदा का मुलाला आणि मुलीला मिळणारे आर्थिक हक्क समान झाले की जबाबदारयाही आपसूक समान होतील आणि मग मुलीने जबाबदारी घ्यावी का हा प्रश्नच उद्भवणार नाही. ती बाय डिफॉल्ट घ्यायचीच असे समजले जाईल. वर धागाकर्तीच्या मैत्रीणीचे चर्चेअंती लग्न तुटले तसे होणारच नाही. दोघांच्याही पालकांची गरजेनुसार जबाबदारी घ्यायचीच आहे हे गृहीतच धरले जाईल. त्याची वेगळी चर्चा करावी लागणार नाही. यात नवरा बायको असे भेद मिटून दोघे एकमेकांचे लाईफ पार्टनर म्हणून बघितले जातील.
एकदा का मुलाला आणि मुलीला
एकदा का मुलाला आणि मुलीला मिळणारे आर्थिक हक्क समान झाले की जबाबदारयाही आपसूक समान होतील आणि मग मुलीने जबाबदारी घ्यावी का हा प्रश्नच उद्भवणार नाही. ती बाय डिफॉल्ट घ्यायचीच असे समजले जाईल. वर धागाकर्तीच्या मैत्रीणीचे चर्चेअंती लग्न तुटले तसे होणारच नाही. दोघांच्याही पालकांची गरजेनुसार जबाबदारी घ्यायचीच आहे हे गृहीतच धरले जाईल. त्याची वेगळी चर्चा करावी लागणार नाही. यात नवरा बायको असे भेद मिटून दोघे एकमेकांचे लाईफ पार्टनर म्हणून बघितले जातील. >>
काही ठिकाणी तर सर्वच्य सर्व संपत्ती मुलांना मिळूनही मुलं आईवडिलांकडे पहात नाहीत तर मुली पाहतात (संपत्तीतली काडीही न मिळता) समान पैसे मिळाले तर जबाबदार्या समान होतील आपोआप... ? हे काय लॉजिक आहे?
जबाबदारी मनातून मानावी लागते... संपत्तीचा तिथे संबंध सुद्धा असता कामा नये.
पण तरी आजही मुलालाच वंशाचा
पण तरी आजही मुलालाच वंशाचा वारस समजले जाते. आपला जमीनजुमला मुलीला पर्यायाने जावयाला आणि पुढे त्यांच्या वंशात जाण्याऐवजी आपल्या मुलाकडे, आणि पुढे आपले आडनाव लावणारया नातवंडांकडे जावा असा विचार आजही लोकं करतात आणि तसेच वागतात.
या विचारावरच कायद्याने घाव घाला, >>
वडीलोपार्जीत मालमत्तेची वाटणी २००४ नंतर झाली असेल && तेव्हा मुलीचे वडील जिवंत असतील तर तिला कायद्याने सम्पत्तीत वाटा मिळतो.
स्वर्जित सम्पत्ती कोणालाही (मुलगी/मुलगा/कोणीही त्रयस्थ व्यक्ती/संस्था) देता येते.
संपत्तीत वाटा हवा असेल तर मुलींनी लग्नानंतर आडनाव बदलू नये अशी अट ठेवावी मालमत्ताधारकानी.
धागा विवाहानंतर मुलीने
धागा विवाहानंतर मुलीने आईवडिलांची जबाबदारी घ्यायला काय हरकत आहे पासून मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळायला हवा' कडे वळतोय.
मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत
मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळावा असा कायदाच आहे ना? त्यामुळे तिथे गोंधळ उपस्थित होऊ नयेच.
स्वर्जित संपत्ती आई वडील कोणालाही देऊ शकतात, म्ह़णजे सगळी मुलाच्या नावावर करू शकतात किंवा मुलीच्या नावावरही करू शकतात. त्या संपत्तीत मुलामुलीला समान वाटा असावा असा मुद्दा आहे का?
चला, म्हणजे आईवडिलांच्या
चला, म्हणजे आईवडिलांच्या संपत्तीत हिस्सा मिळत असेल, तर आणि तितकीच त्यांची काळजी घ्यावी यावर एकमत व्हायला हरकत नाही.
जबाबदारी मनातून मानावी लागते.
जबाबदारी मनातून मानावी लागते... संपत्तीचा तिथे संबंध सुद्धा असता कामा नये..........+१
काही ठिकाणी तर सर्वच्य सर्व
काही ठिकाणी तर सर्वच्य सर्व संपत्ती मुलांना मिळूनही मुलं आईवडिलांकडे पहात नाहीत तर मुली पाहतात (संपत्तीतली काडीही न मिळता)
>>>>
काही ठिकाणी
जबाबदारी मनातून मानावी लागते.
जबाबदारी मनातून मानावी लागते... संपत्तीचा तिथे संबंध सुद्धा असता कामा नये.
>>>
ओके, आईवडिलांची जबाबदारी मनातून मानावी पण त्यांच्यावर आपली संपत्ती खर्च करू नये, संपत्तीचा ईथे काही संबंध नाही.
मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत
मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळावा असा कायदाच आहे ना? त्यामुळे तिथे गोंधळ उपस्थित होऊ नयेच.
>>>>
बहुतेक आहे पण फार लफड्याचा कायदा आहे, बहिण आली वाटा मागायला तर फार गोंधळ पाहिले आहेत..
माझ्या वकिलाला विचारून सांगतो. तसेही ईथे अजून कोणी वकील धाग्यावर आला नाही. मी माझ्या पहिल्याच पोस्टमध्ये लिहिले होते की वकिलांनी वा कायद्याच्या जाणकारांनी या विषयावर मत मांडावे.
आभार सगळ्यांचे
आभार सगळ्यांचे
हा, धागा अगदीच काही भरकटला नाही, इथल्या चर्चांतून माझ्याबर्यापैकी शंकांचे निरसन झाले आहे.
आईवडिलांच्या प्रोपीटीत हक्क वगैरे चर्चेत किमान मला तरी इंटरेस्ट नाही, कारण माझ्या मते, जेव्हा त्यांनी आपल्याला योग्य ते संस्कार देऊन घडविले आहे, शिक्षण देऊन आपल्या पायांवर ऊभे केले आहे, मग कशाला हवी त्यांची प्रॉपर्टी,. ती आपण आपल्या स्वकर्तृत्वावर मिळवू शकतो की. त्यासाठी त्यांच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून त्यांची काळजी घ्यायची म्हणजे.....
जसे मी आधीही म्हटले या जगात फक्त हि दोनच माणसे ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे फक्त आणि फक्त तीच आपल्यावर निरपेक्ष प्रेम करू शकतात रादर करतात बाकी कोणी असे असेल तर ते अपवादाने
अर्थात हेमावैम
हि दोनच माणसे ज्यांनी
हि दोनच माणसे ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे फक्त आणि फक्त तीच आपल्यावर निरपेक्ष प्रेम करू शकतात
>>>>
ईतरांच्या तुलनेत या नात्यात प्रेम जास्त मिळते, रक्ताच्या या नात्याची ओढ जास्त असतेच, पण सरसकट ते निरपेक्षच असते असे म्हणने धाडसी आणि पुस्तकी ठरेल.. मुळात प्रत्येक मुलावर आईवडिलांचे समसमान प्रेम नसते. अरे हो, गर्भातच मूल मारणारे लोकं असतात, तिथे आणखी उदाहरणं काय द्यावी..
आपण आदर्शवादी गृहीतके तयार करून ठेवतो आणि त्यानुसार विचार करतो. बरेच लोकं प्रॅक्टीकल विचार स्विकार करायला घाबरतात. कित्येक तो करतही नाहीत. असे लोकं मग आपल्या रक्ताच्या नात्यातील मुलेच आपली सर्वात जवळची म्हणून जिवंत असतानाच आपली प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करतात आणि वृद्धाश्रमात पाठवली जातात. ना बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपैय्या असे कोणीतरी पुरातन काळातच म्हणून गेलाय, आसपास एवढी उदाहरणे घडताना दिसतात, तरी लोकांना प्रेमाची परीक्षा घ्यायला आवडते.
प्रेमाची ह्यारारकी नेहमी
प्रेमाची ह्यारारकी नेहमी डोवनवर्ड्स असते..
हि दोनच माणसे ज्यांनी
हि दोनच माणसे ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे फक्त आणि फक्त तीच आपल्यावर निरपेक्ष प्रेम करू शकतात
>>
https://www.maayboli.com/node/65585 या बाळाला सांगा मोठं झाल्यावर तिच्या आई वडिलांचं तिच्यावर कित्तिकित्ती निरपेक्ष प्रेम होतं ते....
आपण आदर्शवादी गृहीतके तयार
आपण आदर्शवादी गृहीतके तयार करून ठेवतो आणि त्यानुसार विचार करतो. बरेच लोकं प्रॅक्टीकल विचार स्विकार करायला घाबरतात. कित्येक तो करतही नाहीत. असे लोकं मग आपल्या रक्ताच्या नात्यातील मुलेच आपली सर्वात जवळची म्हणून जिवंत असतानाच आपली प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करतात आणि वृद्धाश्रमात पाठवली जातात. >>>>>>>>>>>>> बरेचदा हे वृद्धाश्रम वृद्धाश्रम ऐकतेय वाचतेय. पण माझ्याशी संबंधित जगात आजवर कुणीही आईवडिलांना वृद्धाश्रमात घालवलेलं उदाहरण नाहीये. (अर्थात असतीलच काही. उगीच काही वृद्धाश्रम नाहीयेत म्हणा.) पण मी आजवर मुलाने आईवडिलांना वृद्धाश्रमात घालवलेली एकही केस पाहिलेली नाहीये.
उलट आईवडिलांनी काय खस्ता खाल्ल्या असतील मुलं वाढवतांना त्याच्या दुप्पट खस्ता मुलांना खाव्या लागताहेत वृद्ध आईवडिलांना सांभाळतांना.
प्रॉपर्टी म्हणुन एक रहातं घर तेही वृद्ध वडिलांनी अजुनही स्वतःच्याच नावर ठेवलंय. (लगेचच मुलाच्या नावार कशला करायचं घर. त्याने वृद्धाश्रमात घालवलं म्हणजे लगेच. हाच त्यामागचा विचार :-))
बाकी ना पेन्शन, ना गुंतवणुक, ना कसलाही इन्कम सोर्स. त्यात ह्या मुलाचा आणि सुनेचा पगार यथातथाच. दोन शिकणारी मुलं.
त्यात ह्या वृढांची अजारपणं, महिन्याची औषधं, इतर खर्च वै वै. मुलांच्या फिया, महिन्याचा फिक्स खर्च, ह्यात खर्चाचा ताळमेळ करताना दोघांचा जीव मेटाकुटीला.
वर घर आमचं आहे. आम्हाला वाटेल ते करु. आम्ही वाटेल ते करुन खाउ. तु केलेली भाजी आम्ही खात नाही. रोज चारी ठाव स्वयंपाकच आम्हाला लागतो. आम्ही तसंच करणार. बोलायचं काम नाही. असं, गॅस सिलिंडर वर फक्त १५ दिवस जातात म्हणुन चिड्चिड करुन जरा बचत करायला हवी असं म्हणणार्या सुनेला ऐकवलं जातं.
आपलं घर आहे म्हणुन आता ह्यांना रहायला घर आहे. आणि आपल्यानंतर घर ह्यांना मिळणार आहे. भाडं भरायला लागलं असतं तर कळलं असतं.
वैगेरे ऐकुन नवर्यापेक्षा जास्त पगार असलेली सुन जर डोक्यात राग घालुन वेगळी जाउन राहिली तर ह्या वॄद्धांचं कसं काय होईल?
वास्तविक तिला तिच्या आईवडिलांनी शिक्षण देउन स्वतःच्या पायावर उभं रहाण्याची हिम्मत दिलीये. त्यांना मदत करणं तर दुरंच. पण लग्न केलंय म्हणुन ह्या घराचा खर्च उचलताना तिला स्वतःसाठी काही घ्यावं तर मन मारावं लागतं. का तर ह्या माण्साशी लग्न केलंय आणि ह्याच्या जबाबदार्या त्या माझ्या जबाबदार्या हे मनाचं कंडीशनिंग. त्याचे आईवडील ते आपले आईवडील असं समजुन रहायचं
अॅमी , खरेच ही बाजु माझ्या
अॅमी , खरेच ही बाजु माझ्या लक्षात आली नव्हती,
मी ज्या वातावरणात वाढलीये, माझ्या आजुबाजुची माणसे आणी स्वानुभावावरुन मी तसे बोलली.
पण तरीही, प्रॉपर्टी बाबत म्हणायचे तर आईवडीलांच्या संपत्तीवर डोळा ठेवुन त्यानुसार वागणे मला पटत नाही.
**** स्वानुभव म्हणजे माझे मम्मी-पप्पा त्यांनी आम्हाला जसे वागविले त्यावरुन, आम्हाला त्यांनी कधीच असे जाणवु दिले नाही की, त्यांच्या आमच्याकडुन काही अपेक्षा आहेत , अन तसे त्यांनी बरेचदा स्पष्ट सांगीतले देखिल आहे
पण माझ्याशी संबंधित जगात आजवर
पण माझ्याशी संबंधित जगात आजवर कुणीही आईवडिलांना वृद्धाश्रमात घालवलेलं उदाहरण नाहीये.
>>>>
सस्मित, वृद्धाश्रम शब्दशा घेऊ नका. मुलांनी जबाबदारी टाळली की राहत्या घरालाच वृद्धाश्रम म्हणू शकता..
बाकी आपली पुढची पोस्ट सुद्धा योग्यच आहे. नाण्याला दोन्ही बाजू आहेत. म्हातारवयात येणारया हेकटपणामुळे आणि विचारांतील जनरशेन गॅपमुळे प्रॉब्लेम होतातच. हल्लीच्या काळात ही जनरेशन गॅप फार वाढली आहे. आणि स्त्रिया कमावत्या झाल्याने त्यांच्यातही प्रत्युत्तर करायचे बळ आले आहे. त्यामुळे सर्वात बेस्ट म्हणजे जबाबदारी न टाळता वेगळे राहून चांगले संबंध जपणे हेच आहे.
यावरून एक म्हणता येईल, मुलीचे आईवडिलांशी संबंध कायम चांगले राहू शकतात कारण ती त्यांच्या सोबत राहत नाही. तेच मुलगा सोबत राहत असेल तर सूनही सोबत असते. त्यामुळे कुरबूरी अपेक्षित असतात.
तसेच आपल्याकडे जावयाला मानसन्मान दिला जातो, त्याउलट सुनेला डॉमिनेट करायला बघितले जाते. यानेही फरक पडतोच. सून नवरयाला आपल्या बाजूने वळवायला बघते. नवरयाला त्याच्या आईवडिलांपासून तोडायला बघते. बरेचदा माणूस चांगला वाईट नसतो. निर्माण होणारया परिस्थितीनुसार तो रिएक्ट करतो.
मुलीचे आईवडिलांशी संबंध कायम
मुलीचे आईवडिलांशी संबंध कायम चांगले राहू शकतात कारण ती त्यांच्या सोबत राहत नाही. तेच मुलगा सोबत राहत असेल तर सूनही सोबत असते. त्यामुळे कुरबूरी अपेक्षित असतात.>> +१
आईवडिलांसोबत रहाणार्या मुलीचे आईवडिलांशी उडणारे खटके बघितलेत.
आणि स्त्रिया कमावत्या
आणि स्त्रिया कमावत्या झाल्याने त्यांच्यातही प्रत्युत्तर करायचे बळ आले आहे. >>>>> हे थोड्याफार प्रमाणात खरं आहे पण हा कमावत्या पेक्षा स्वभावाचा भाग आहे.
सस्मित, पोस्ट आवडली..
संपत्तीत वाटा हवा असेल तर
संपत्तीत वाटा हवा असेल तर मुलींनी लग्नानंतर आडनाव बदलू नये अशी अट ठेवावी मालमत्ताधारकानी. >>> अॅमी, हे मत म्हणून लिहीले आहे की कायद्याने असे काही आहे? सासरी जबरदस्तीने नाव बदलायला लावले, व तसे केले म्हणून माहेरची संपत्तीही नाही असे नको व्हायला
बहुतांश मुली आवडीने नाव बदलत असतील असे वाटत नाही.
मुलींनी नाव आडनाव बदलणे हा
मुलींनी नाव आडनाव बदलणे हा प्रकार फारच विचित्र आहे. काळ बदलला नाही का अजून?
आताशा ते सासर माहेरचं दोन्ही आडनाव लावणे तर अजून हास्यास्पद आहे. त्यात आणखी आपलं नाव-आईचंनाव-बाबाचंनाव-आडनाव पद्धत सुरु झाली आहे. आता इथे मुलींनी असे सुरु केले तर काय मज्जा येईल उदा: गौरी-लता(देशमुख/मराठे)-रामचंद्र (वडील)-भालचंद्र(नवरा)-मराठे/गायकवाड. आजकालची ती आडनावंनावांची खिचडी येकदम मुसलमानांवानी वाटायलीत . किसका क्या नाम है समझताच नही.
अवांतर को समांतर मारो. सॉरी.
दोन्ही आडनाव फसक्त सोशल
दोन्ही आडनाव फसक्त सोशल मीडिया वर असतात. फ्रेंड्स नि ओळखावे म्हणूज.
आरती अंकलेकर-टिकेकर. पटकन
आरती अंकलीकर-टिकेकर. पटकन आठवलेलं नाव. नॉट ऑन सोशलमिडिया, नॉट फॉर सोशल मिडिया
माझ्या माहिती प्रमाणे हि
माझ्या माहिती प्रमाणे हि प्रथा मराठीत भक्ती बर्वे-इनामदार यांनी ७०च्या दशकात चालु केली...
बरोब्बर!
बरोब्बर!
सोशल मीडियाच हो... भक्ती
सोशल मीडियाच हो... भक्ती बर्वे नाव फेमस, लोकांना कळणार कसे इनामदार याच बर्वे,
सेम विथ अंकलेकर.
जे नाव फेमस तेच ओळखणार.
Pages