मुलींनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य

Submitted by VB on 4 April, 2018 - 13:23

हल्ली मुली ह्या मुलां ईतक्याच स्वावलंबी आहेत

मुलगा असो वा मुलगी, आईवडील त्यांना घडविण्यासाठी, वाढविण्यासाठी, एक चांगली व्यक्ती बनविण्यासाठी सारखीच मेहनत घेतात. तर फक्त लग्न झाल्यावर मुलींना सासरी जावे लागते म्हणून मुलींच्या त्यांच्या पालकांप्रति असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपतात का? खासकरुन आर्थिक जबाबदाऱ्या.

माझ्या एका मैत्रिणीचे नुकतेच या कारणावरून ब्रेकअप झाले. तिच्यामते, जसे मी वर लिहीलेय, ईतके वर्ष ज्या आईवडिलांनी सांभाळले, आपल्या सर्व गरजा त्यांच्यापरीने भागविल्या. त्यांना त्यांच्या उतारवयात मदत करणे आपले कर्त्यव्य आहे. तसे तिने आपले हे मत तिच्या मित्राला आधीही सांगितले होते पण त्याने ते तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. पण आता जेव्हा दोघे लग्नाचा विचार करीत होते तेव्हा त्याने तिला स्पष्ट सांगितले की जर तिला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर त्याच्या काही अटी आहेत, त्याची ह्याबाबत काही वेगळी मते आहेत, जे तिला पटले नाही अन हिचे म्हणणे त्याला पटले नाही. आणि झाले काय, यावर काहीच तोडगा निघाला नाही म्हणून दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला अन एक नाते खऱ्या अर्थाने सुरु व्हायच्या आधी संपले.

तसे पाहता मला दोन्ही बाजू नीट माहित नाहीत, म्हणून मला कुणीच चुकीचे किंवा बरोबर वाटत नाही, पण वाईट मात्र वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईथून चर्चा मुलांना बाबांचेच आडनाव का लावायचे आईचे का लावू नये यावर जायला हरकत नाही...

अ‍ॅक्चुअली यातही तथ्य आहे. याच कारणास्तव मला लहानपणी किंबहुना एका वयापर्यंत वडिलांचे आईवडिल फर्स्ट ग्रँडपॅरेंटस वाटायचे आणि आईचे आईबाबा सेकंड ग्रँडपॅरेंटस .. Happy

कोणाकडून तुला प्रॉपर्टी मिळणार याची समज तुला लहानपणीच आली होती तर Lol
>>>

हा हा... हो एक्चुअली
एवढेच नाही तर त्या प्रॉपर्टीतही वाटण्या पडू नये म्हणून बालवयातच ईतके किडेमस्ती सुरू केली कि आईबाबांनी हात टेकले आणि म्हणाले, अरे देवा.. हा एकच बस्स Happy

मत म्हणून लिहीले आहे की कायद्याने असे काही आहे? सासरी जबरदस्तीने नाव बदलायला लावले, व तसे केले म्हणून माहेरची संपत्तीही नाही असे नको व्हायला. बहुतांश मुली आवडीने नाव बदलत असतील असे वाटत नाही. >> मत म्हणून लिहिले आहे.

खरंतर 'वडिलो'पार्जित म्हणजे मागील चार पिढयात एकत्रीत राहिलेली मालमत्ता. ie खापर-पणजोबाने विकत घेतली/निर्माण केली. पणजोबा+भावंड+बायका, आजोबा+भावंड+चुलतभावंड+बायका, वडील+भावंड+चुलतभावंड+बायका यासगळ्यात ती मालमत्ता एकत्रित पोसली, वाढवली गेलीय.
आता अशी मालमत्ता कोणती आणि कितीजनांची असते?
शेती किंवा दुकान किंवा फॅक्टरी किंवा दागिने.
यासगळ्यात बायका किती काम करायच्या, महत्वाचे निर्णय घ्यायच्या, ह्यूमन रिसोर्स निर्माण करण्याखेरिज त्यांनी काय केलं आणि धुणी भांडी स्वैपक नेहमीच चीप लेबर होते का वगैरे सगळेच विचारात घ्यावे लागेल. झालंचतर लग्नात झालेला खर्च, दिलेले दागिने, हुंडा...

दुसरी गोष्ट म्हणजे २००४ नंतर मुलीला सासर आणि माहेर दोन्हीकडे वाटा आहे कायद्यात. मुलाला मात्र फक्त त्याच्या माहेरचा वाटा.
आता दोन्हीकडचे वाटे हवे असतील तर दोन्ही नाव लावायला हवीत मुलींनी. कायदा तसे सांगत नसला तरी!

माझ्या पहिल्या प्रतिसादात मी म्हणलंय 'आई वडलांनी स्वतःचा सगळा खर्च स्वतः करावा आणि मुलांचा खर्च शेअर करावा'.
आता यात मुलांना कोणाची नाव आडनावं लावायची आणि का?
माझं मत: आईचं लावावं. कारण मुलं निर्माण करण्यात तिचं biological contribution अतिप्रचंड आहे पुरुषपेक्षा.

निम्न वर्गात दारू पिऊन गोट्या खेळत बसणारे पुरुष आणि चार घरी धुणी भांडी करून कुटुंब चालवणाऱ्या त्यांच्या बायका यांत तर मातृसत्ताक पद्धतच हवी.
रादर या पुरुषांदेखील उपभोगायला आणि पुनरुत्पादन करायला बाई मिळालीच पाहिजे असे समाज, सरकार का समजतो? तेपण मुलगा हवा अशी मागणी करत ४-५ पोरं काढून कसे काय घेऊ शकतात?

भारतातल्या ४७% बायकांचे लग्न+कमीतकमी एक मुल १९- वयातच होत असेल तर तिथे कसलं पालकांनाकडून मिळणार निरपेक्ष प्रेम, प्रॉपर्टीत वाटा अन पालकांची म्हातारपणीची जबाबदारी वगैरे असणार आहे.... सगळंच बदलत राहिली त्या त्या व्यक्ती, वर्ग, परिस्थिती नुसार...

<दुसरी गोष्ट म्हणजे २००४ नंतर मुलीला सासर आणि माहेर दोन्हीकडे वाटा आहे कायद्यात. मुलाला मात्र फक्त त्याच्या माहेरचा वाटा.>
अ‍ॅमी, हे नक्की का? जोडीदाराला वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीत वाटा मिळायचा प्रश्न त्याच्या मृत्यूनंतरच येतो आणि तो मिळतो. इथे नवरा आणि बायको असा फरक नाही (अशी माझी समजूत आहे).
घटस्फोटाच्या वेळी पोटगी ठरवताना नवर्‍याची वडिलोपार्जित संपत्तीही लक्षात घ्यावी असा बदल २०१३ साली झालाय.
(त्या संपत्तीची विभागणी करणं किचकट असल्याने)

नक्की का? जोडीदाराला वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीत वाटा मिळायचा प्रश्न त्याच्या मृत्यूनंतरच येतो आणि तो मिळतो. इथे नवरा आणि बायको असा फरक नाही (अशी माझी समजूत आहे). >> नक्की माहित नाही. चुक असू शकत मी लिहलय ते....

आतापर्यंत मी समजत होते की वडिलोपार्जितची वाटणी per capita होते ie सगळे हयात पुरुष, त्यांच्या बायका, मुलगे, मुलगी सगळे सगळे समान वाटेकरी असतात. पण ती समजूतदेखील चुकीची आहे बहुतेक...

मुळात वडिलोपार्जित प्रॉपर्टी खूप कमी जणांची असते, ज्यांची असेल त्याच्या वाट्याची किंमत फार असेल असेदेखील नाही. द्यायचं पाणी सोडून त्यावर कुठे खिटपीट करत बसणार...

<सगळे हयात पुरुष, त्यांच्या बायका, मुलगे, मुलगी सगळे सगळे समान वाटेकरी असतात. >
आधी शाखेला, ती तुटल्यावर उपशाखेला.
म्हणजे पुरुष गेल्यावर बायको आणि मुला(मुलींना) समान वाटे. पण सुनाजावयांना नाही. पण तेच मुलगा मेला की त्याच्या सुनेला आणि त्याच्या मुलांना. फर्स्ट इन लाइन, इ.
अर्थात हेही इकडे तिकडे वाचूनच समजलेलं.

<मुळात वडिलोपार्जित प्रॉपर्टी खूप कमी जणांची असते, ज्यांची असेल त्याच्या वाट्याची किंमत फार असेल असेदेखील नाही. द्यायचं पाणी सोडून त्यावर कुठे खिटपीट करत बसणार...>
हे खरंय, पण यातसुद्धा आर्थिक पेक्षा भावनिक की असलेच कुठले गुंते जास्त असतात.

लेखातल्या मुद्द्याच्या अनुषंगाने - अजूनही मुलाने(आणि सुनेने) दुर्लक्ष केलेल्या आणि मुलींनी होईल तितकी काळजी घेतलेल्या आयांच्या कथा या प्रचलित आहेत. अगदी माहेरच्याच अलीकडच्या एका अंकात वाचलीय.

आईवडिलांनी "पुढ्यातलं ताट द्यावं, पण बसायचा पाट देऊ नये," हा धडा कायम लक्षात ठेवायला हवा आणि मुलांच्या शिक्षणाइतकंच स्वतःच्या रिटायरमेंट प्लानिंगलाही महत्त्व द्यावं. शिवाय मुलांना स्वतःच्या पायावर उभं केल्यावर उंच उड्या मारायला मदत करू नये.

मुळात वडिलोपार्जित प्रॉपर्टी खूप कमी जणांची असते, ज्यांची असेल त्याच्या वाट्याची किंमत फार असेल असेदेखील नाही. द्यायचं पाणी सोडून त्यावर कुठे खिटपीट करत बसणार...>> -असहमत .
५ वर्षापुर्वी टाईम्स ऑफ ईडिया मध्ये लेख आला होता की मुंबईमध्ये फक्त २% लोक त्या घरात राहाणार्या लोकाच्या उत्पन्नात स्वताचे राहाते घर स्वताच्या बचतित किंवा ग्रुह कर्ज काढुन विकत घेउ शकतात. ह्याचा अर्थ ९८% लोकाना वारसा हक्काने मिळालेल्या घरात राहावे लागेल किंवा मुंबई बाहेर राहावे लागेल.
बाकीच्या शहरात एवढी वाईट अवस्था नसली तरी निम्म्यापेक्षा जास्त लोक तरी स्वताचे घर विकत घेउ शकते नाहीत आणि त्याना वारसाहक्काने मिळालेल्या घरात राहावे लागेल.
छोट्या गावात घर ही समस्या नसली तरी रोजगार ही प्रमुख स्मस्या आहे आणि लोक आप्ल्या पिढिजात व्यवसायावर अवलंबुन असतात जो वारसाहक्काने येतो. ५०% लोक शेती करतात. त्याची जमीन ह्या पिढी कडुन दुसर्या पिढी कडे जात असते. जर तरुण शेतकर्याने वारसाहक्कावर पाणि सोडले तर तो तरुण शेतकरी शेत मजुर होतिल
सर्वसामन्यात आजुनही बरेच लोक वारसा हक्कावर अवलंबुन आहेत. परंपरेनुसार मुलाला वारसा हक्क आणि मुलानी जबाबदारी उचलावी असा अलिखित कायदा झाला होता. जेव्हा लोकाचे राहाणिमान वाढेल आणि वारसा हक्कावर पाणि सोडायला तयार होतिल तेव्हा मुली पण जबबदारी उचलतिल. सध्या मला तर वारसा हक्काने काही मिळनार नाही तर आम्ही जबाबदारी का उचलु असा मुलीचा सासरच्या लोकाचा कल असतो. (ह्यात अपवाद आहेत , सुशिक्षित लोकात तर भरपुर अपवाद दिसतिल ) मी फक्त मुलानी आईवडिलांची जबाबदारी उचालावी याचे समर्थन करत नाही आहे फक्त समाजात काय चालु आहे हे सांगत आहे.

कायद्यानुसार मुलानी आपल्या आई-वडलाची जबाबदारी उचलणे बंधनकारक आहे पण मुलीनी आई-वडलाची जबाबदारी उचलावी याबद्दल कायदात काय तरतुद आहे ते माहित नाही.

<लोकाच्या उत्पन्नात स्वताचे राहाते घर स्वताच्या बचतित किंवा ग्रुह कर्ज काढुन विकत घेउ शकतात. ह्याचा अर्थ ९८% लोकाना वारसा हक्काने मिळालेल्या घरात राहावे लागेल किंवा मुंबई बाहेर राहावे लागेल.
बाकीच्या शहरात एवढी वाईट अवस्था नसली तरी निम्म्यापेक्षा जास्त लोक तरी स्वताचे घर विकत घेउ शकते नाहीत आणि त्याना वारसाहक्काने मिळालेल्या घरात राहावे लागेल.>

भाड्याच्या घरात राहणे हा प्रकार ऐकलाय का तुम्ही?

< जर तरुण शेतकर्याने वारसाहक्कावर पाणि सोडले तर तो तरुण शेतकरी शेत मजुर होतिल>
शेतजमिनीचे लहान लहान तुकडे पडल्याने शेती करणे अव्यवहार्य होऊ लागले आहे. त्यामुळे काही वारसदारांनी शेतीव्यतिरिक्त रोजगार शोधायची गरज आहे. (भारतात शेतीवर अवलंबून असलेल्यांची संख्या शेतीच्या जीडीपीतील वाट्यापेक्षा प्रचंड जास्त आहे. शेतीवर लोकसंख्येचा भार आहे)

<कायद्यानुसार मुलानी आपल्या आई-वडलाची जबाबदारी उचलणे बंधनकारक आहे पण मुलीनी आई-वडलाची जबाबदारी उचलावी याबद्दल कायदात काय तरतुद आहे ते माहित नाही.> फक्त मुलगामुलगीच नाही, तर हे नसतील तर ज्यांना वारसाहक्काने काही मिळणार आहे, त्यांचीही जबाबदारी आहे. (हे अर्थातच कायद्यात- कागदावर)

हळूहळू लोकांना प्रॉपर्टीचा मुद्दा नेमका काय होता हे समजू लागला आहे. पटणे न पटणे हे त्यानंतर आले. चर्चा योग्य दिशेत चालू आहे ...

सध्या मला तर वारसा हक्काने काही मिळनार नाही तर आम्ही जबाबदारी का उचलु असा मुलीचा सासरच्या लोकाचा कल असतो. (ह्यात अपवाद आहेत , सुशिक्षित लोकात तर भरपुर अपवाद दिसतिल )
>>>>>>>
+786
यातही ग्रामीण भाग, शहरी भाग, सुशिक्षित, अशिक्षित असा ओवरऑल समाजाचा विचार केला तर ही अपवादाची टक्केवारी फार कमी आढळेल.

मुळात मुलीच्या घरचे (सासरचे) पाणीही पित नाही हे अभिमानाने सांगणारी संस्कृती आहे आपली. बदल घडायला वेळ लागणारच..

साहिल,

मी वडीलोपार्जीत मालमत्तेबद्दल बोलत होते. गेल्या ४ पिढ्यात वाटणी न होता एकत्र राहिलेली म्हणजे जवळपास १०० वर्ष जुनी मालमत्ता.
मला नाही वाटत मुंबईतले ९८% लोक वडीलोपार्जीत घरात रहात असतील :D.

===
भरत,

आधी शाखेला, ती तुटल्यावर उपशाखेला.
म्हणजे पुरुष गेल्यावर बायको आणि मुला(मुलींना) समान वाटे. पण सुनाजावयांना नाही. पण तेच मुलगा मेला की त्याच्या सुनेला आणि त्याच्या मुलांना. फर्स्ट इन लाइन, इ. >> हे बघा बरोबर आहे का:

• खापर पणजोबा A ने १९०० साली घेतलेली मालमत्ता याची वाटणी होतोय २०१५ साली
• त्याची ३ मुलं म्हणजे पणजोबांची पिढी B, C, D प्रत्येकाला १/३ मिळणार
• B ला ४ मुलं असतील E, F, G, H म्हणजे आजोबांची पिढी, तर त्यांना १/३ च्या १/४ प्रत्येकी मिळणार ie मुळ मालमत्तेच्या १/१२
• C ला २ मुलं असतील I , J तर त्यांना १/३ च्या १/२ प्रत्येकी मिळणार ie मुळ मालमत्तेच्या १/६
• D ला ३ मुलं असतील K, L, M तर त्यांना १/३ च्या १/३ प्रत्येकी मिळणार ie मुळ मालमत्तेच्या १/९
• हेच असेच पुढच्या दोन पिढ्यांसाठी चालू राहील.
• आता समजा J २००७ ला वारला. तर त्याच्या वाट्याचे १/६ त्याच्या वारसांना ie बायको, मुलगा, मुलगी समप्रमाणात वाटले जातील ie १/६ च्या १/३ म्हणजे मुळ मालमत्तेच्या १/१८.

मी ज्या वातावरणात वाढलीये, माझ्या आजुबाजुची माणसे आणी स्वानुभावावरुन मी तसे बोलली. >> हा फारच लिमिटेड डेटा असतो प्रत्येकाचा. आता माझ्याच आजूबाजूची काही उदाहरण बघा

• आमच्या बिल्डिंगच्या कचरा घेऊन जाणारी बाई. मला चार मुलीच आहेत, नवर्याने घराबाहेर काढलं, आता बहिणीकडे राहतेय, नवर्याने दुसरी बाई आणून ठेवली आहे, मुली त्याच्याकडेच आहेत.
- निम्न वर्ग, जात दलित

• आमची शेजारीण. आपल्या मुलींची ओळख करुन देताना "या मोठ्या दोघी जुळ्या आहेत. आणि हि तिसरी accidental baby". सगळीकडे ही असली ओझं झाल्यासारखी ओळख करून देण्यापेक्षा गर्भपात करून घ्यायचा होता. हि बाई आपल्या बेडरिडन सासूला मारहाणदेखील करायची.
- उच्च मध्यम वर्ग, जात देशस्थ ब्राह्मण

• पोस्टात काम करणार्याने मुलगा हवा म्हणत ५ मुली जन्माला घातल्या आणि ६वा मुलगा झाल्यावर थांबले एकदाचे. त्यातली ४थी मुलगी माझी मैत्रीण होती. बरंचसं शिक्षण स्कॉलरशिप, लोकांकडून मदत घेत झालेलं. घरात सारखी भांडण चालू असायची.
- निम्न मध्यम वर्ग, जात मराठा

यातल्या कुठल्या मुलींना आपल्या पालकांबद्दल प्रेम, जबाबदारी वगैरे वाटायची अपेक्षा करता येईल?

उच्च/नव मध्यम वर्गीय -
आजकाल मुलगा असो मुलगी, कोणी जास्त इंटरेस्ट दाखवत नाही आई बापावर टाईम खर्च करायला.
लग्नांनातर मुलगी घर सोडन जाते, मुलगाही जातोच सर्रास जॉब मुळे. राहतात ते फक्त आई बाबा.
FD करावी govt एम्प्लॉय नसेल तर म्हणजे पेन्शन नाही तर FD च्या व्याज येत राहील.
वर्षातून सरासरी एकदा भेट होणार, मुलगा असो मुलगी. परदेशात असेल तर तेही नाही अनलेस third generation येणार आहे आणि घरकामाला मदत हवी/ मुलांना सांभाळायला मदत हवी- मग त्यांना बोलावणे येतेच.

आईवडिलांनी "पुढ्यातलं ताट द्यावं, पण बसायचा पाट देऊ नये," हा धडा कायम लक्षात ठेवायला हवा आणि मुलांच्या शिक्षणाइतकंच स्वतःच्या रिटायरमेंट प्लानिंगलाही महत्त्व द्यावं. शिवाय मुलांना स्वतःच्या पायावर उभं केल्यावर उंच उड्या मारायला मदत करू नये.

- प्रचंड सहमत.

<दुसरी गोष्ट म्हणजे २००४ नंतर मुलीला सासर आणि माहेर दोन्हीकडे वाटा आहे कायद्यात. मुलाला मात्र फक्त त्याच्या माहेरचा वाटा.>
असे नाही. मुलीच्या माहेरचा वाटा तिच्या नवर्याला मिळतोच की

या शिवाय अजून एक पाहण्यात आलेला प्रकार म्हणजे. समजा एखाद्या कुटुंबात दोन अपत्य असतील (एक मुलगा, एक मुलगी) दोघे ही बाहेर देशी असतात आणि आई वडिल भारतात. मुलगा सून, मुलगी वगैरे येऊन जाऊन असतात आणि हे ही येऊन जाऊन असतात. मज्जेत चाललेले असते. काही मुलगे फक्त पैसे पाठवून भारतात आईवडिलांची बडदास्त ठेवतात. आणि कित्येक आईवडिलांना सुद्धा ते अभिमानास्पद वाटते. त्यात गैर काही नाही म्हणा.

Pages