मुलींनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य

Submitted by VB on 4 April, 2018 - 13:23

हल्ली मुली ह्या मुलां ईतक्याच स्वावलंबी आहेत

मुलगा असो वा मुलगी, आईवडील त्यांना घडविण्यासाठी, वाढविण्यासाठी, एक चांगली व्यक्ती बनविण्यासाठी सारखीच मेहनत घेतात. तर फक्त लग्न झाल्यावर मुलींना सासरी जावे लागते म्हणून मुलींच्या त्यांच्या पालकांप्रति असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपतात का? खासकरुन आर्थिक जबाबदाऱ्या.

माझ्या एका मैत्रिणीचे नुकतेच या कारणावरून ब्रेकअप झाले. तिच्यामते, जसे मी वर लिहीलेय, ईतके वर्ष ज्या आईवडिलांनी सांभाळले, आपल्या सर्व गरजा त्यांच्यापरीने भागविल्या. त्यांना त्यांच्या उतारवयात मदत करणे आपले कर्त्यव्य आहे. तसे तिने आपले हे मत तिच्या मित्राला आधीही सांगितले होते पण त्याने ते तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. पण आता जेव्हा दोघे लग्नाचा विचार करीत होते तेव्हा त्याने तिला स्पष्ट सांगितले की जर तिला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर त्याच्या काही अटी आहेत, त्याची ह्याबाबत काही वेगळी मते आहेत, जे तिला पटले नाही अन हिचे म्हणणे त्याला पटले नाही. आणि झाले काय, यावर काहीच तोडगा निघाला नाही म्हणून दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला अन एक नाते खऱ्या अर्थाने सुरु व्हायच्या आधी संपले.

तसे पाहता मला दोन्ही बाजू नीट माहित नाहीत, म्हणून मला कुणीच चुकीचे किंवा बरोबर वाटत नाही, पण वाईट मात्र वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सपोर्ट करायलाच हवा.. मुलाच्या आई वडिलाना आणि मुलीच्या पण इक्वली..
अर्थातच लग्नाआधी कल्पना द्यायला हवी आणि दोघाना मंजुर असाय्ला हवं..
माझं अरेंज मॅरेज.. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हाच मी सांगितल की मी माझ्या आई बाबाना नेहमीच मदत करणार आणि महिन्याला ठराविक रक्कम त्याना पठवणार.. नवर्याने त्यावेळीही लगेचच मान्य केलं होतं..
आणि लग्नानंतरही न चुकता महिन्याच्या सुरुवातिला तो स्वतःच पैसे ट्रान्फर करत होता.. सध्या तर ते माझ्या बरोबरच राहतात..
अर्थात प्रत्येक माणुस वेगळा असतो आणि प्रत्येकाच्य स्वभावा नुसार यात कॉम्प्लिकेशन्स येउ शकतात..
तुमच्या मैत्रिणिने आधीच वेगळं व्हायचा मार्ग निवडला ते योग्यच केले.. आणि तिचा स्टँड पण बरोबरच आहे..

ही जर का माणुसकी त्याच्यात नसेल तर तिचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. माझ्या आसपास अशी दोन उदाहरणं आहेत की पालकांनाच मुलांचा संसार सांभाळावा लागतोय काही अघटित घटनेने. कोणावर कशी वेळ सांगता येत नाही तसेच आज जे ठरवू ते तसंच होईल सांगता येत नाही

>> त्याने तिला स्पष्ट सांगितले की जर तिला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर त्याच्या काही अटी आहेत

सुरवातच अशी जर तर आणि अटी वगैर लादून करणारा इसम पुढे जाऊन खूपच त्रासदायक ठरला असता. हि लिटमस टेस्ट एका अर्थाने चांगलीच झाली. एकाच टेस्ट मध्ये समंजसपणा वृत्ती स्वभाव इत्यादी दिसून आले. मला वाटते प्रत्येक मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबत निर्णय घेताना लग्नाआधी अशा प्रकारचा एखादा प्रश्न विचारायला काही हरकत नाही. संसारात स्वभाव, वृत्ती, सामंजस्य, वैचारिक परिपक्वता या गोष्टी महत्वाच्या असतात.

धन्यवाद

इथले सगळे प्रतिसाद वाचुन एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे द्रुष्टीकोन दिसले.

जसे मी आधीही लिहीलेय, मला त्या दोघांपैकी कोण चुक वा कोण बरोबर हे जाणुन घ्यायचे नाही की कुणा एकाला दोषी ठरवायचे नाही कारण मला दोन्ही बाजु माहित नाहीत.

मला फक्त या विषयावर लोकांची विवीध मते जाणुन घ्यायची होती.

सर्वांनी मतं दिली आहेतच तरी पण ..... .
एका अर्थी अशा असमंजस माणसाबरोबर गाठ बांधली गेली नाही हे उत्तम झालं म्हणायचं. कोणत्याही रिलेशनशिप मध्ये अटी घालणं म्हणजे त्या नात्याच्या विनाशाची सुरूवातच समजावी. लग्न म्हणजे नवर्‍याने हुकुमत चालवावी आणि बाईनी ती चालवून घ्यावी असा अर्थ मुळिच होत नाही. इथली सर्व चर्चा वाचून मला उगिचच ३०-४० वर्षा पुर्वीच्या स्त्रिची अवस्था काय असेल असा विचार आला. पुर्वीच्या आईवडिलांना एकुलत्या एक मुली किंवा सर्व मुलिच नसतील असे नाही. पण निव्वळ समाज व्यवस्थेमुळे सर्व हक्क लग्नानंतर पतिअधिन असल्याने तेव्हाच्या स्त्रियांची मुस्कट्दाबी होत असणार हे नक्की. कित्येक आईवडिल मुलगी असूनही तडफडून अथवा मदतीशिवाय एकाकी झिजून गेले असतील. कित्येक देव माणसे कदाचित अशी हि होउन गेली असतील ज्यांनी आपल्या पत्नीचे आईवडिल हे आपले मानून अगदी मनापासून त्यांचे केले असेल (कष्टाने आणि पैशाने सुद्धा) आणि आपल्या बायकोला ही ते करू दिले असेल.
पण आता जमाना बदलला. पुर्वी पुरुष बाहेर वावरत असल्याने त्याला व्यवहार खूप कळतो असे एकूण गणित होते पण आता तो जमाना राहिला नाही. समान हक्काची जाणिव आणि तो बजावण्याची स्त्रियांची वाणी ही बाब पुरूषांना जाचक वाटू लागली आहे.
मुळात एखाद्या व्यक्तिने तिच्या आईवडिलांना मदत करावी की नाही, किती करावी, कशी करावी हा सर्वस्वी त्या व्यक्तिचा प्रश्न आहे. मग त्यात नवरा अथवा बायको कुणिही ढवळाढवळ करू नये. ते अयोग्य आहे.

वर कुणितरी प्रॉपर्टीचा उल्लेख केला आहे तो तर हास्यास्पद आहे.

वर कुणितरी प्रॉपर्टीचा उल्लेख केला आहे तो तर हास्यास्पद आहे.
>>>
कुणीतरी नाही ऋन्मेष Happy
नाण्याची दुसरी बाजू दाखवलीय ईतकेच..
पैश्याचे सोंग घेता येत नाही.. आणि ईथे आदर्शवादाचे विचार सारेच मांडतात, पण प्रॅक्टीकली प्रॉपर्टीवरून किती वाद होतात याची समाजातील टक्केवारी काढल्यास दूध का दूध पाणी का पाणी होईल.. सख्खे भाव आपापसात भांडतात, पोर सख्या आईबापाच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून असतात, तिथे पैश्याचा विषय निघताच सासूसासर्‍यांबद्दल कोणाला कितपत प्रेम असेल शंकाच आहे.

मैत्रीण आत्ता दु:खी असली तरी तिने कालानुसार रिक व्हर व्हावे. हळू हळू पण वैयक्तिक नुकसान सोसून तिने बरोबर निर्णय घेतला ह्याचे मला फार कौतूक वाटले मी ह्या इशू संदर्भात एकदम ए प्लस कामगिरी केली आहे. आईबाबांना मरेपर्यंत संभाळले आहे. बाबांचे तर फ्युनरल पण व्यवस्थित ऑर्गनाइज केले. मिस्टर तेव्हा कामानिमित्त बाहेर गावी होते.
मला वैयक्तिक व प्रोफेशन ल शैक्षणिक बाबींवर अनंत काँप्रमाइजेस करावी लागली पण माय मांइड इज अ‍ॅट पीस. योग्य तेच केले. फक्त माझे सासर हैद्राबादला असल्याने तिथे घर घेतले. ( ही प्रॉपर्टी त्यांच्या पैशातूनच घेता आली)
पण मरे पर्यंत दोघे तिथे राहिले. मला इन हाइंड साइट एव्ढेच वाटते. पुण्यात कोथरूड मधला त्याम्चा प्लॉट त्यांनी विकला व मला घर घेउन दिले त्या ऐवजी आम्ही तिथेच बंगला बांधायला हवा होता. त्यांना परक्या शहरी राहायला लागले नसते. व पुण्यातले नातेवाइक विद्यार्थी सर्व त्यांना भेटत राहिले असते. ते कायम स्वरूपी हैद्राबादला आल्यावरही मी दो न तीनदा त्यांना पुन्याला नेउन सर्वांना भेटवून आणले होते. पण ते वेगळे. त्यात ट्रेनचा प्रवास
दोन दोन व्हीलचेअर कूली सर्व सोपस्कार करून. आता हे नातेवाइक मला फोन पण करत नाहीत. सच इज लाइफ.

तुमच्या मैत्रीणीला धीर द्या व रिक व्हर व्हायला मदत करा. मित्र लाखो भेटतील आईबाबा एकच.

अमा ए प्लस +७८६ !

या निमित्ताने सहज सोशलसाईटवर फिरणारे मेसेज आठवले. आशय - मुलगा आईवडिलांकडे बघेल न बघेल, मुलगी नेहमी त्यांच्यावर प्रेम करते.
आणि इमोशनल कोशंटचा विचार करता मला यात तथ्य वाटते. इनफॅक्ट म्हणून मला मुलगीच हवीय, फार आधी तसा धागाही काढलेला.

कुणीतरी नाही ऋन्मेष >> अच्छा! मी पोस्टकर्त्याचं नाव नाही लक्षात ठेवलं.
दुसरी बाजू मांडलीस ते ठिक आहे पण बाजू माझ्यामते अत्यंत हास्यास्पद आहे. (तु नव्हे)
असा विचार करणार्‍या व्यक्तिला मी माझ्या आयुष्यातून आधी हद्दपार केले असते. पण तु म्हणतोस ते ही बरोबरच आहे, असे विचार करणारे लोक अस्तित्वात असतील नक्कीच. त्यामुळे तर दुनिया टिकून आहे. नुसतेच चांगले आणि नुसतेच वाईट असे कोणतेच रसायन जगात उपलब्ध नाही. पण बायकोला कधी तरी प्रॉपर्टी मिळेल म्हणून तिला आईवडिलांची सेवा करू देणं किंवा नसेल तर त्यापासून रोखणं हे अमानवी आहे. कोणत्याही पुरूषाला असं रोखलं तर त्याला चालेल काय?

आता मी पण एक बाजू मांडते. पुरुषच नव्हे तर बायकाही कधी कधी पुरूषाला त्याच्या माहेरी काही मदत करण्या पासून रोखत असतील. पण मी पाहिलेल्या उदाहरणात बर्‍याच वेळेला त्याला थोडी लॉजिकल बाजू असल्याचं माझ्या लक्षात आलं आहे. याचा अर्थ माझा पाठिंबा पुर्ण पणे बायकांना मिळतो असे नाही.

माझ्या मैत्रिणीचा नवरा भारताबाहेर काम करून पैसे कमवतो ( बायको आणि दोन लहान मुले इथे सोडून) हा सोडून ३ भाऊ, पैकी २ व्यवस्थित नोकरी करतात आणि तिसरा मात्रं मुम्बईत काम करता करता अचानक डोकेदुखीचे कारण घेऊन गावी परतला, खूप उपचार केले, सर्व उपचार केले पण एकच तक्रार.... डोक थांबत नाही...
मुम्बईला या भावंडांच्या वडिलांचा एक फ्लॅट भाड्याने दिला आहे त्याचे जे काही उत्पन्न आहे ते सर्व या (डोकेदुखीवाल्या) भावाला मिळते, शिवाय गावाला शेती आहे. (तो शेतात ही काम करत नाही) कुणितरी सांगितले की लग्न करून द्या ठिक होइल (डोकेदुखी) पण झाली नाही, मग म्हटले मूल होऊ द्या, मुल झाले तरिही या माणसाची डोकेदुखी गेली नाही. उलट लग्न करून आणलेली बायको आणि मुलाची जबाबदारी आता ओघाने बाकी भावांवर वाढली आहे. खास करून मा झ्या मैत्रिणीच्या नवर्‍यावर. काही झाले की तु डॉलर मध्ये कमवतो.. पैसे पाठव. मग माझी मैत्रिण विरोध करते आणि त्यात मला चूक काही वाटत नाही.
हे उदा. निव्वळ बायका विरोध करतात त्याच्या वानगीदाखल दिले आहे.
याचा अर्थ उगिच करायचा म्हणून विरोध करायचा अशा स्त्रिया नाहितच असा माझा दावा नाही. पण निदान माझ्या पाहण्यात तरी अश्या स्त्रिया फारच कमी आल्यात.

आमच्या घरात आमचे वडिल्/काका यांनी कधीही आमची आई/ काकू लोकांना विरोध केला नाही स्वतःच्या आईवडिलांचे करायला.

मुलगा आईवडिलांकडे बघेल न बघेल, मुलगी नेहमी त्यांच्यावर प्रेम करते.
आणि इमोशनल कोशंटचा विचार करता मला यात तथ्य वाटते. >> हे २०० % सत्य आहे.

मुळात "मी/आम्ही बायकोला तिने कमावलेले पैसे तिच्या माहेरच्यांवर खर्च करायची परवानगी देतो/देत नाही" हा अप्रोचच "घरात रिसोर्स आणला आणि त्याला नियम लावले आणि थोड्या फॅसिलिटी दिल्या" अश्या एम्प्लॉयी एम्प्लॉयर रिलेशन चे प्रतिक आहे.
पण आपल्या सोसायटीत हे पटायला वेळ लागतो.आपल्या इथे लग्नानंतर सुनांना जीन्स घालायचं/रात्री उशिरा यायचं "स्वातंत्र्य देतात."
आणी बायकोची प्रॉपर्टी तिच्या भावाला जाते/तिच्या आईबापांवर खर्च वगैरे मुद्दे येणार असतील तर लेट धिस बॉईल डाऊन टू सून देणार्‍या सर्व स्वयंपाक्/हाऊसकिपींग्/क्लिनिंग इ.इ. सर्व्हिसेस्/त्यांचे मार्केट रेटस.

पण बायकोला कधी तरी प्रॉपर्टी मिळेल म्हणून तिला आईवडिलांची सेवा करू देणं किंवा नसेल तर त्यापासून रोखणं हे अमानवी आहे. कोणत्याही पुरूषाला असं रोखलं तर त्याला चालेल काय?>> बिग हग.

आईव डील दोघे वारले तेव्हा माझी पस्तीशी आली होती व मूल उशीरा झाले. आता माझ्यावयाच्या लोकांचे आईबाप सत्तरीत ऐशीत आहेत व त्यांना स्वतःच्या मध्यम वयात आई बापांकडे बघणे अवघड जाते खरेतर. माझी सर्व उमेदीची वर्शे ह्यात खर्ची पडली. पण आता एकदम फ्री बर्ड फीलिन्ग आहे. फक्त स्वतःचीच जबाबदारी.

अवांतर रोखलं असं नका लिहू मुलांमुलीं नो थांबवलं असे लिहा आपल्या मराठीत.

मी वैयक्तिक रेफरन्सेस एव्ढ्या साठी लिहीले आहेत की व्ही बींची मैत्रीण लहान आहे वयाने. ऑब्जेक्टिव उदाहरण त्यांना कमी माहीती असतील. तुम्ही आईवडिलांची काळजी घेउन सुद्धा एक रॉकिंग जीवन जगू शकता. व कर्मा इज ऑन युर साइड. त्यांना ब्रेकप मधून सावरता यावे म्हणून लिहीले आहे. प्रौ ढी मिर वायचा आजिबात उद्देश नाही.
आई बाबा जिवंत अस्ताना त्यांना मुलग्याची कमी भासतच असे. व आईला तिरूपतीला जायचे होते ते काही जमले नाही. आपली पण लिमिटेशन्स असतात.

माझी मात्र मुलीने संभाळावे अशी आजिबात इच्छा व अपेक्षा नाही. वाय फाय असलेला वृद्धाश्रम बास आहे मला.

अमा.... Happy
सध्या माझ्या कडे सासू बाई व माझी आई दोघीही असतात. मी एकुलती एक मुलगी. बाबा ०५ साली गेले.
आई आता पर्यंत एकटीच होती गावाला पण आता होत नाही. दोघींचं फार काही पटतं असं नाही. त्या डॉमिनेटींग आहेत व आफ्टर ऑल 'मुलाच्या आई' असल्याने तो इगो आहे. आईची पण पेंशन आहे. तरीही धुसफूस असतेच त्यांची! पण तुम्ही म्हणता तसं..'कर्मा इज ऑन माय साईड'....
सो चालतंय आपलं................. कधी हसू तर कधी आसू...!!

पण बायकोला कधी तरी प्रॉपर्टी मिळेल म्हणून तिला आईवडिलांची सेवा करू देणं किंवा नसेल तर त्यापासून रोखणं हे अमानवी आहे. कोणत्याही पुरूषाला असं रोखलं तर त्याला चालेल काय?
>>>>>>>

हो मग मी कुठे म्हणतोय रोखणे हे योग्य आहे. पण रोखू नये यासाठी काय तरतूद आहे?
तुम्हीच पुढे म्हणत आहात की कोणत्याही पुरूषाला असं रोखलं तर त्याला चालेल काय? याचा अर्थ पुरुषांना रोखले जात नाही.
का रोखले जात नाही याचा विचार करा.. आणि तिथे ईलाज करा.
जोपर्यंत पुरुषप्रधान संस्कृती जाऊन ५०-५० टक्यांची स्त्रीपुरुष समानता येत नाही तोपर्यंत जे पुरुष बिनबोभाट करू शकतो तेच करायला स्त्रियांना पुरुषाची परवानगी लागणारच आणि ती नसल्यास अशी नाती तुटणारच..
प्रॉपर्टीत मुले मुली यांना समान हक्क हा मुद्दा ईथे येतो. स्त्री-पुरुष यांना घटनेने आणि समाजाने दिलेली पॉवर समान असेल तरच स्त्रियांना निर्णय स्वातंत्र्याचा हक्क बजावता येईल.

(खूप पूर्वी: एकदा मुलीचं लग्न झालं की तिच्यासाठी माहेरचं घर परकं, तिचा तिथे ना काही हक्क ना काही जबाबदारी) ---> (जरा पूर्वी: अगदीच गरज पडली तर सुनेच्या आईवडिलांना मदत करायची, मग ती खरच मनापासून केलेली असेल, किंवा उपकार म्हणून) --> (जरा अलिकडच्या काळात: मुलींनी लग्नानंतर आईवडिलांना मदत करण्याचं प्रमाण थोडं वाढणं, पण त्यात बराच संघर्ष असणं) --> (आता: मुलींनी लग्नानंतर आईवडिलांना मदत करावी का हा प्रश्न उपस्थित होणं आणि त्यावर चर्चा, आणि त्या चर्चेत बहुतांश प्रतिसाद हे प्रत्येकाकडे व्यक्ती म्हणून पहावं याचा पुरस्कार करणारे). इथपर्यंत तरी आलोय. हा प्रश्न विचारण्याची वेळच येणार नाही तो सुदिन माझ्या हयातीत उगवेल असं वाटत नाही प्रगतीचा रेट पाहता.

खूप पुर्वी, पुर्वी, सध्या अनेक मुले-मुली शून्य रुपये प्रॉपर्टी असलेल्या आपल्या आई वडिलांना सांभाळत असतात. यात आदर्शवादी वगैरे काही नाही - शेकड्यानी सामान्य माणसांची उदाहरणे आहेत. घरातून सासु-सुना, आई/बाप - मुलगा असे वाद होत असतात. पण बहुसंख्य घरातून आई-बापांना सांभाळले जाते.
बा.ॠ जणुकाही आई-वडिलांना सांभाळणारे मालमत्तेसाठीच सांभाळत असतात असा हायपोथेसिस करून पुढे इमले चढवत आहेत.

अनु तुझी पोस्ट आवडली खूप.
दिल धडकने दो मध्ये पण एक डायलॉग आहे अख्तर च्या तोंडी की तुम्ही जेव्हा कुणाला तरी स्वातंत्र्य दिलं म्हणता तेव्हा तुम्ही आपोआप स्वतःला एका सुपिरियर पोझिशन मध्ये ठेवता, आणि तुम्ही जेव्हा स्वतःला सुपिरियर समजता तिथे नात्यात समानता नसते.
आपला समाज हा असाच आहे. नात्यातले फायदे हवेत, जबाबदार्‍या कुणाला नको असतात. यासाठी सेल्फ रिफ्लेक्शन, मॅच्युरिटी, सदसदविवेक बुद्धी हेच उपयुक्त ठरते. अशा गोष्टी शिकवून कुणाला ही शिकता येत नाहीत त्या उपजत असतात.

अवांतर रोखलं असं नका लिहू मुलांमुलीं नो थांबवलं असे लिहा आपल्या मराठीत. >> अमा काहि केल्या मला हा शब्द आठवत नव्हता.. धन्यवाद Happy आता रोखलं हा शब्द न लिहिता थांबवलं हा शब्द लिहिन Happy

इंटरेस्टिंग प्रतिसाद येत आहेत,
मला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल,
>>>>>
त्याने तिला स्पष्ट सांगितले की जर तिला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर त्याच्या काही अटी आहेत, >>>>
इकडे , अटी आहेत?? अपेक्षा आहेत?? आपण एकदा बोलू मग तू ठरव?? यातली कुठली छटा होती?

काही दिवसांपुरी एक डॉक्टर id ने धागा काढला होता , ज्यात आपली बायको तिच्या आई वडिलांना अंधाधुंद मदत करते अशी परिस्थिती सांगितली होती.( यांनी तिला बजेट वगैरे समजावून दिल्या नंतर सुध्दा)

त्यामुळे या केस मध्ये सुद्धा मुलाच्या नावे रिसीट फाडली जाऊ नये असे वाटते.

दोघांना आपल्या मतात कॉमन मिनिमम ग्राउंड शोधता आले नाही हे दोघांचे अपयश आहे.

'मुलींनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य?' अजुन ही मुलिंना हा प्रश्न पडतो हे च मला अयोग्य वाटते आहे. Wink

दोघांना आपल्या मतात कॉमन मिनिमम ग्राउंड शोधता आले नाही हे दोघांचे अपयश आहे. >> अनुमोदन सिम्बा.
कधी कधी मुद्दा फार छोटा असतो पण शब्दाला शब्द वाढून मग त्याचे इगो मध्ये रुपांतर होऊन सर्व होत्याचे नव्हते होते.
तुझी पोस्ट एकदम मुद्देसूद आणि योग्य शब्दात मांडली गेली आहे. माझ्याकडून बर्‍याच वेळेला फापटपसारा होतो.

ऋन्मेषभाऊ,

वय वर्षे २० / २५ होईपर्यंत आईबापांनी सांभाळले - म्हणजे शारिरीक / मानसिक झीज तर सोसलीच शिवाय जी मुलगी आज लग्नाची झालीये म्हणजे १९९२ / ९३ साली जन्मली असेल तर त्या काळच्या परिस्थितीनुसार खाणेपिणे, घरभाडे, शिक्षण, कपडेलत्ते, सिनेमानाटके इत्यादी सर्व धरुन तिच्यावर आजतागायत तिच्या आईबापांनी (व्याज + महागाई निर्देशांक धरुन) साधारणतः १५ ते २० लाख खर्च केले असणार. आता या करिता कृतज्ञता म्हणून त्यांच्या उतारवयात मदत करायची की ते मेल्यावर करोडोंची प्रॉपर्टी सोडून जाणार की नाही यावर डोळा ठेवून मदत करायची?

मुलीने (किव्वा मुलाने) त्यान्च्या आईवडिलान्ना काही मदत करावी असे वाटणे नैसर्गिक आहे. मदत करणे त्यान्चा हक्क तसेच कर्तव्याचा भाग आहे.

मदत करण्याचा हक्क मला पुर्णपणे मान्य आहे. असा हक्क बजावणार्‍या नव्या पिढीचे कौतुकच व्हायला हवे. मदत निव्वळ आर्थिकच असायला हवे असे नाही. वेळ, पैसा किव्वा दोन्ही असण्याची शक्यता आहे.

किती गंमत आहे ना - 'मुलांनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य?' हा प्रश्न कोणालाच पडत नाही!!

'मुलांनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य?' हा प्रश्न कोणालाच पडत नाही!!
>> पडत नाही हे नक्की कारण हा प्रश्न स्त्रिया निर्माण करत नाही. ( ही वेगळ्या प्रकारची प्रगल्भता) कारण कोणत्या गोष्टींचे प्रश्न बनवावेत याला सुद्धा एक स्तर असतो आणि तो स्त्रियांना साधता येतो Happy
आता पुर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार 'मुलगे' आईवडिलांची काळजी घेतात, किंवा घ्यावी हे अपेक्षित असलं तरिही अनेक मुलं ही आपल्या आईवडिलांकडे पहात नाहीत.

खूप पुर्वी, पुर्वी, सध्या अनेक मुले-मुली शून्य रुपये प्रॉपर्टी असलेल्या आपल्या आई वडिलांना सांभाळत असतात. यात आदर्शवादी वगैरे काही नाही - शेकड्यानी सामान्य माणसांची उदाहरणे आहेत. घरातून सासु-सुना, आई/बाप - मुलगा असे वाद होत असतात. पण बहुसंख्य घरातून आई-बापांना सांभाळले जाते.
बा.ॠ जणुकाही आई-वडिलांना सांभाळणारे मालमत्तेसाठीच सांभाळत असतात असा हायपोथेसिस करून पुढे इमले चढवत आहेत.>>>+१११११

Pages