मुलींनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य

Submitted by VB on 4 April, 2018 - 13:23

हल्ली मुली ह्या मुलां ईतक्याच स्वावलंबी आहेत

मुलगा असो वा मुलगी, आईवडील त्यांना घडविण्यासाठी, वाढविण्यासाठी, एक चांगली व्यक्ती बनविण्यासाठी सारखीच मेहनत घेतात. तर फक्त लग्न झाल्यावर मुलींना सासरी जावे लागते म्हणून मुलींच्या त्यांच्या पालकांप्रति असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपतात का? खासकरुन आर्थिक जबाबदाऱ्या.

माझ्या एका मैत्रिणीचे नुकतेच या कारणावरून ब्रेकअप झाले. तिच्यामते, जसे मी वर लिहीलेय, ईतके वर्ष ज्या आईवडिलांनी सांभाळले, आपल्या सर्व गरजा त्यांच्यापरीने भागविल्या. त्यांना त्यांच्या उतारवयात मदत करणे आपले कर्त्यव्य आहे. तसे तिने आपले हे मत तिच्या मित्राला आधीही सांगितले होते पण त्याने ते तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. पण आता जेव्हा दोघे लग्नाचा विचार करीत होते तेव्हा त्याने तिला स्पष्ट सांगितले की जर तिला त्यांना आर्थिक सहाय्य करायचे असेल तर त्याच्या काही अटी आहेत, त्याची ह्याबाबत काही वेगळी मते आहेत, जे तिला पटले नाही अन हिचे म्हणणे त्याला पटले नाही. आणि झाले काय, यावर काहीच तोडगा निघाला नाही म्हणून दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला अन एक नाते खऱ्या अर्थाने सुरु व्हायच्या आधी संपले.

तसे पाहता मला दोन्ही बाजू नीट माहित नाहीत, म्हणून मला कुणीच चुकीचे किंवा बरोबर वाटत नाही, पण वाईट मात्र वाटले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<ती स्वतः कमावती आहे तर तिच्या आईवडिलांना गरज असल्यास त्याला मध्ये पडायची काहीच गरज नाही.>>>
साधारणपणे लग्न अश्यासाठी करतात की नवरा बायकोंनी एकमेकांबरोबर भांडण न करता गुण्या गोविंदाने रहावे, कोणत्याहि कामात एकमेकांना मदत करावी, पाठिंबा द्यावा. प्रोत्साहन द्यावे.
तर नवर्‍याने मधे पडणे मी अपेक्षित धरतो - निदान नवीन लग्न असेस्तवर.
आमच्या सारखी लग्नाला ४८ वर्षे झाली असतील, तर शक्य तितके एकमेकांच्या मधे न पडलेलेच बरे. पण त्या साठी आर्थिक शारिरीक समर्थता पाहिजे.
आता त्या नतद्रष्ट नवर्‍याला वाटत असेल की बायकोच्या आईवडीलांना मदत करूच नये तर गेलास खड्ड्यात. आपण घटस्फोट घेऊ असा विचार योग्य.
फक्त त्याने प्रॉब्लेम सुटणार आहे का? बिचार्‍या त्या मुलीच्या आईवडीलांना तरी आवडेल का की त्यांच्यामुळे मुलीचे लग्न मोडले? कदाचित त्यांना तेच हवे असेल! (असतात काही काहीआई वडील सुद्धा नतद्रष्ट! )

उलटपक्षी जर नवरा त्याच्या आईवडीलांना मदत करत असेल नि ते बायकोला आवडले नाही तर?

अरे, शिकलेले ना तुम्ही, विचार करणे, मार्ग शोधणे, पैशाचे व्यवहार इ. गोष्टी शिकलात की नाही? का फक्त प्रोग्रामिंग करून पैसे मिळवायचे नि ४०० रु. ची कॉफी नि हजारो रुपयांची दारू पिण्यात धन्यता मानायची?

पडत नाही हे नक्की कारण हा प्रश्न स्त्रिया निर्माण करत नाही. ( ही वेगळ्या प्रकारची प्रगल्भता) कारण कोणत्या गोष्टींचे प्रश्न बनवावेत याला सुद्धा एक स्तर असतो आणि तो स्त्रियांना साधता येतो>>> दक्षिणा उत्तर आवडलं पण ह्यात प्रगल्भता किती आणि खोलवर रुजलेलं कंडीशनिंग किती???

'मुलांनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य?' हा प्रश्न कोणालाच पडत नाही!!
>>>
जसा 'संसार सांभाळून करियर पुढे कसे करावे?' किंवा 'नोकरीला प्राधान्य देणार की मुलांच्या देखभालीला?' हे प्रश्न मुलांच्या बाबतील सहसा पडत नाहीत तसंच आहे हे Happy

मुम्बईला या भावंडांच्या वडिलांचा एक फ्लॅट भाड्याने दिला आहे त्याचे जे काही उत्पन्न आहे ते सर्व या (डोकेदुखीवाल्या) भावाला मिळते, शिवाय गावाला शेती आहे. (तो शेतात ही काम करत नाही) कुणितरी सांगितले की लग्न करून द्या ठिक होइल (डोकेदुखी) पण झाली नाही, मग म्हटले मूल होऊ द्या, मुल झाले तरिही या माणसाची डोकेदुखी गेली नाही.
Submitted by दक्षिणा
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Just out of curiosity ... डोकेदुखी च कारण / निदान झाल कि नाही.
म्हणजे काही MRI or CT scan वगैरे केल्यास ते नक्किच कळाल असेल.

आर्थिक बाबीत संधिसाधूपणा करणाऱ्यात भारतीय समाजाचा हात कुणीच धरू शकणार नाही.

आमच्या स्वतःच्या कुटुंबात प्रॉपर्टीवरचे दावे, कोणावर किती खर्च केला, आईवडिलांना कोणी सांभाळायचे याच्यावरून बहीण भावात उभी फूट पडलेली मी स्वतः पाहिलीय. अन इथे मला तरी "मुलीलाच खरी कुटुंबाची काळजी" अशी कोणी दिसली नाहीच. सगळ्यांचा फक्त प्रॉपर्टीपुरता मामा आणि वाटणीपुरती आज्जी.

पश्चिमेकडे मामला बराचसा रोखठोक असतो. जाणता झाल्यावर बरीच मुलं एक तर स्वतःहून बाहेर जातात, नाहीतर आईवडीलच तो घराबाहेर जाईल याची व्यवस्था पाहतात. पुढे त्याचा तो आणि आमचे आम्ही. पुढील आयुष्यात पोरग प्रेसिडेंट झालं काय किंवा भिकेला लागलं काय, त्याचा या घराशी आर्थिक संबंध जवळजवळ संपलेला असतो. आर्थिक बाबीत नात्यामध्ये तिढे येणं, आणि एकमेकांची उणीदुणी काढणं पर्यायाने कमी होतं. आर्थिक बाबी एकदा वेगळ्या झाल्या की दोन घरातल्या दुराव्यामधली ९०% कारणंच नाहीशी होतात.

अर्थात तिकडे म्हाताऱ्या-कोताऱ्यांची काळजी घ्यायला त्यांची मुलं नसली तरी सरकार आहे, त्यामुळे असं मुलामुलींवर अवलंबून राहायची वेळ फार कमी येत असावी.

आपल्याकडे काय आनंदी आनंद. घरटी एक महाभारत चालू आहे, कौरव पांडव जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचे गळे घोटताहेत, अन धृतराष्ट- गांधारी वृद्धाश्रमाची वाट धरताहेत Sad

हे सर्व वाचून मला स्वतःबद्दल लिहावेसे वाटते
मला एकच भाऊ आहे .माझ्यापेक्षा आठ वर्षानी लहान . बहीण नाही.
माझ्या आई वडिलानी आम्हा दोघामधे जराही भेदभाव केला नाही. दोघानाही हवे तेवढे शिकू दिले . माझे लग्न योग्य पद्धतीने लावून दिले
तेव्हा माझा भाऊ इन्जिनियरिन्गच्या पहिल्या वर्षाला होता. वडील निव्रुत्त झाले होते.
लग्नानन्तर आम्हाला कर्ज काढून मुम्बईत घर घ्यायचे होते. दोघान्च्याही नोकर्या नवीन होत्या. आईवडिलाना आर्थिक मदतीची गरज होती. ती करायची नवर्याची हरकत तर नव्हतीच उलट इच्छाच होती. पण हात खूप बान्धलेले असत त्यामुळे फार काही करता आले नाही. ती खन्त मनातून अजूनही जात नाही.
भावाचे शिक्षण ,नोकरी लग्न ही यथावकाश झाले .
खरे सान्गायचे पुढेच आहे. मला नोकरीचे ठिकाण लाम्ब पडते म्हणून आईवडिलानी त्यान्चे जुने दादरचे घर माझ्या नावावर केले . यावर माझ्या भावाने अजिबात आक्षेप घेतला नाही. माझ्या आईवडिलान्चा व आत्याचा उत्तम प्रकारे साम्भाळ केला. माझ्यावर आईवडिलान्ची कुठचीही जबाबदारी दिली नाही. फक्त त्यान्च्या आजारपणात तो माझ्यावर अवलम्बून असतो कारण तो स्वत; आजारपणाच्या बाबतीत खूप घाबरट आहे. माझे आई वडील वर्षातून एखाद दोन वेळा सुटीला आल्यासारखे माझ्याकडे येतात तेसुद्धा हजार विनवण्या केल्यावर . कितीही वेळा सान्गितले तरी माझा भाऊ आईवडिलासाठी कुठलाही खर्च मला करू देत नाही. मी जी काही छोटी मोठी प्रेझेन्टस त्याना घेते तेवढीच .
माझे हजारात एखादे उदाहरण असेल की मला सम्पत्तीत वाटा मिळाला पण जबाबदारी नाही उचलावी लागली. असेही घर असते एखादे .

नाही ना मोरपंखीस तेच तर काय गौडबंगाल आहे समजत नाही. अनेक डॉक्टर झाले. पण डोकेदुखीचे निदान झाले नाहिये.

>>>मुलगा आईवडिलांकडे बघेल न बघेल, मुलगी नेहमी त्यांच्यावर प्रेम करते.
आणि इमोशनल कोशंटचा विचार करता मला यात तथ्य वाटते. >> हे २०० % सत्य आहे.<<<<<<

नाही, हे खरे नसते. काही मोठ्या बहिणी लहान भावाच्या संसारात सारखी ढवळाढवळ करतात सारखे भावावर दडपण आणून आणि ईमोशनल ब्लॅकमेलींग करतात की,
लग्नानंतर आता तु आई वडीलांना विसरशीलच,
आई वडीलांची सेवा नाही केलीस तर तुला पुण्य नाही मिळणार, तु जॉईंट अकॉउंट उघड कारण आई वडील आमच्याकडे आले तर त्यांचा खर्च आम्ही त्यातून करु शकतो,
तु अमीरीकेत रहातोस तर तुझे सेवींग्स ज्यास्त आहेत,
तुझ्या मास्टर्स वर बाबांने खर्च केला म्हणून तु आहेस तिथे, आता हि तुझीच जबाबदारी आगे. आता मुलं केलीस तर आई बाबांचं करायला येणार नाहीस.
आणि ह्या बहिणी मात्र पाच पैसे खर्च करत नाहीत आई वडीलांवर. स्वतः नोकरी करतात तरी.
शेवट काय, आठ वर्षे मुल होवु दिलं नाही, बायकोला खूप त्रास झाला त्याच्य एककल्ली विचारांच की आई वडीलांचे आधी करतो मग आपण मुले वगैरे करुया. आता त्याचा डिवोर्स आणि एकटं आयुष्य जगतोय. आई वडीलांची जबाबदारी मस्त घेतोय.
आई वडीलांन्न मुलाच्य दुखा:चे काहीच नाही, बहिणी खुष आता भाउ पुर्ण फोकस्ड आहे आई वडीलांवर. असली हलकट माणसे आहेत आणि त्याच्या बायकोची खोटी कहाणी साण्गतात की तिला जमले नाही म्हणून सोडून गेली. ह्या मुलीने, आपले पैसे वेळोवेळी नवर्‍याला देवून, सासु सासर्‍यांचे लाड केले, फिरवले. आणि हे मात्र हनीनूनला गेले नाही कारण आपण नंतर जावू, माझ्या आई वडीलांनी काहीच मजा नाही केली, आधी आपण त्यांचे करु.

हे २००५ ते २०१५ मधले उदाहरण आहे. आता लोकं म्हणतील मुलगी वेडी होती जी ती १० वर्षे अशी काढली? तर व्यवहारीक दृष्ट्या वेडीच वाटेल, आहे असे झालेले. कारण तिचे झालेले कण्डिशनिंग, आणि ती व तिचे साधे आई वडील ज्यांनी सांगितले, तुझी कर्म चांगली करशील तुझ्या सासु सासर्‍यांचे करशील तर.

झाली का कर्म चांगली? तेव्हा चांगली कर्म करताना वहावून जावु नये.
काही आई वडील अतिशय नीच पद्ध्तीने मुलाला सतत, भावनिक दडपण आणतात, त्याला अपराधी वाटायला लावतात खोट्या रडक्या गोष्टी सांगून.
तेव्ह, जगात अगदी सर्व प्रकाराची लोकं आहेत व असतात अशी उदाहरणं जिथे मुलाचा/ मुलीचा संसार फुलायल्ला देत नाहित किण्वा अगदी विरुद्ध .

"तू आपले दोघांचं/मुलाबाळांचे घर चालव, मी माझ्या आई-वडिलांच्या घरचा खर्च करणार" हे पटणारा मुलगा किंवा मुलगी सापडणे कठीण. >>>
आणि हेच मुलगा म्हणाला तर चालेल का? घर चालवणं ही मुलाचीच जबाबदारी आहे हे इथे गॄहीत धरलय का?
मुलगी जेव्हा जॉब करते तेव्हा त्याचा घरावर परिणाम होतो, उदाहरण मुलांचे पाळणाघर, बाहेरचे जेवण, कुटुंबासाठी कमी वेळ मिळणे, इत्यादी
अशा परिस्थितीत मुलगी घरात काहीच contribute करत नसेल तर हे कितपत योग्य आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे. आजकाल सगळ्या जबाबदार्या मुलाच्या आणि सगळे हक्क मुलींचे असं काहीसं आहे. Wink
लग्नाआधी हे सांगितलं आणि दोघांनाही पटलं तर खुप छान.

Submitted by झंपी on 6 April, 2018 - 00:25
असली चु'निंदा पब्लिक पाहिली की लै लै राग होतो.

आपल्या आईबापांनी आपल्यासाठी खस्ता काढल्यात, मग आपण त्यांच्यासाठी काढूया.. अरं हुट! खस्ता काढायचेच होतं तर पोरं कशाला जन्माला घातलीत. ह्यांच्या नावावर आपल्या आयुष्याची बिलं फाडणार.. तुमच्यासाठी आम्ही हे सहन केलं ते सहन केलं. पळा लेको, कोण आलं नव्हतं तुम्च्याकडे अप्लिकेशन घेऊन. नसता जन्म दिला तर उपकार झाले असते मुलांवर..

काही आई वडीलही ‘काढू’ वृत्तीचे असतात. मुलांकडून सतत अपेक्षा. पण त्यामागे त्यांचंही हेच कंडिशनिंग असावं की मुलं म्हणजे म्हातारपणची काठी. आम्ही तुमच्याकरता इतक्या खस्ता खाल्यात तर तुम्हीही आमचं करा.
आईवडिलांकडेही आपल्या म्हातारपणीची प्रोव्हिजन असावी. आपला पैसा त्यांनी सांभाळून वापरावा. आपण जिवंत असताना जागा आणि पैसे मुलांमध्ये वाटायचा वेडेपणा मुळीच करु नये.

मला आता इथली पद्धत जास्त पटायला लागली आहे. नोकरी वगैरे लागली की मुलं घराबाहेर पडतात. अर्थातच स्वतःचं अपार्टमेंट बघून आपले आपण रहातात. लग्नानंतरही आपला संसार थाटतात. आईवडिलांना गरज पडल्यास आर्थिक मदत करतातही पण भारतातल्यासारखं चित्र दिसत नाही फार.

<< आपण जिवंत असताना जागा आणि पैसे मुलांमध्ये वाटायचा वेडेपणा मुळीच करु नये. >>
----- (मुलान्ना पैसे वाटण्याची) काहीन्ना खुप घाई झालेली असते...

काहीन्ना खुप घाई झालेली असते...

अगदी अगदी. मला तर आईबापांनी पैसे वाटणेच पटत नाही. मरेपर्यंत खा ना लेको त्यातून. आणि मेल्यावर करा दान कुठेतरी. पोरांना तर अजिबात एक रुपया देऊ नये.

बा.ॠ जणुकाही आई-वडिलांना सांभाळणारे मालमत्तेसाठीच सांभाळत असतात असा हायपोथेसिस करून पुढे इमले चढवत आहेत.
>>>>>

असा हायपोथेसिस केला हाच चुकीचा काढलेला अर्थ आहे.
मुलगा आईवडिलांना कश्यासाठी सांभाळतो याचा ईथे काही संबंधच नाही. फक्त सांभाळताना खिश्यातले पैसे जाणार, ते कोणाच्या जावे हा प्रश्न आहे.

उदाहरण देतो,
आणि प्रॉपर्टीलेस उदाहरण घेऊया. म्हणजे असे समजूया की आईवडिलांची प्रॉपर्टी शून्य आहे किंवा त्यांच्या निधनानंतर ती मुलांना न मिळता सरकारजमा होते असा नियम आहे. पण तरीही ज्या आईवडिलांनी मुलांना सांभाळले त्यांना वृद्धापकाळात मुलांनी सांभाळने अपेक्षित आहे.

आता या उदाहरणात रमेश आणि रमा हे जोडपे आहे. रमेशला मीना नावाची बहिण आहे. मीना लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलत नाही. कारण तिच्या नवरयाचीही याला तयारी नाही. त्यांचे सर्व रमेशच बघतो.
रमेशची बायको रमा मात्र आपल्या आईवडिलांना सांभाळते. तिचा एक भाऊ आहे तो देखील अर्धा खर्च उचलतो.

आता यात रमेशची बहिण मीना आणि तिचा नवरा यांना बरे आहे, त्यांना एकाच घरातले आईबाप सांभाळायचे आहेत. तसेच रमाच्या भावालाही बरे आहे, त्याची बहिण सुद्धा त्याला मदत करतेय.
पण रमेश आणि रमा यांच्यावर मात्र दुप्पट भार पडला आहे.

आता रमेशने जर आपल्या बहिणीला सांगितले की तू सुद्धा आईवडिलांचा भार उचल तर ती त्याला सुनावेल तू त्यांचा मुलगा, त्यांचा वंश, त्यांचा वारस आहेस. तर हे तुझे काम आहे. आणि तिच्या या वागण्याचे समाजाला काही गैरही वाटणार नाही.

पण जर हा दुप्पट भार न सोसल्याने उद्या रमेशने असेच आपल्या बायकोला वागायला सांगितले तर मात्र तुम्ही लोकं त्याला निर्दयी ठरवाल. ईनफॅक्ट ठरवत आहात..

मला त्या रमेशबद्दल सहानुभुती आहे.. आणि ज्यांचा नवरा रमेश नाही अश्या रमांबद्दल सुद्धा आहे.

पण जर हा दुप्पट भार न सोसल्याने उद्या रमेशने असेच आपल्या बायकोला वागायला सांगितले तर मात्र तुम्ही लोकं त्याला निर्दयी ठरवाल. ईनफॅक्ट ठरवत आहात.. >> इथे सुबक ठेंगणी. Proud
आणि तुम्ही लोकं! हे काय मराठी स्किन डीप मुव्हीचं कथानक नाहीये! बरेच कंगोरे असतात, असं आधी प्रॉब्लेम/ आपली बाजू ठरवून नंतर समस्या निर्माण करणे स्टाईल चालत नाही. दुसर्‍याच्या चपलेत पाय ठेवून मैलभर चालल्याशिवाय प्रवचन दिलं की काही टाळ्या मिळतात आणि 'अहं' सुखावतो बाकी काही नाही.
बाकी रमा आणि माधव आणि रमेश आणि सीमा ना?

पोटच्या मुलांनी आई-बापाचा म्हातारपणी सांभाळ केलाच पाहिजे असा कायदा झालेला आहे ना आता भारतात? मग त्यात जबाबदारी फक्त मुल्ग्यावर येते कि मुल्गा, मुल्गी दोघांवर?

प्रॉपर्टीचा मुद्दा काढून धागा कुठच्या कुठे नेऊन ठेवलाय!!! Uhoh

मुळात विषय काय आहे....मुलींनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य?

मुलींनी लग्नानंतर आपल्या आईवडिलांची जबाबदारी उचलणे योग्य का अयोग्य?
>>>

अरे पैसा लागतो सांभाळायला... तो झाडाला लागत नाही.. काही कमवावा लागतो तर काही वडिलोपार्जित मिळतो..

ज्या समाजात प्रॉपर्टी वाटप करताना मुलींना डावलून मुलांना प्राधान्य दिले जात असेल तो समाज जबाबदारी बाबत मात्र मुले मुली दोघांनीही सांभाळले पाहिजे अशी अपेक्षा कशी ठेवू शकतो.

भले एखादी मुलगी स्वताहून ती जबाबदारी घ्यायला तयार असेल तर त्यावर आक्षेप घेणारा नवरा भले आदर्श नसेल पण चुकीचाही नाही हे वर रमा रमेशच्या उदाहरणात सांगितले आहे ईतकेच..

<<<आपल्याकडे काय आनंदी आनंद. घरटी एक महाभारत ..........धृतराष्ट- गांधारी वृद्धाश्रमाची वाट धरताहेत >>>
वाचून आनंद झाला.
म्हणजे आपण आपली (हु)उच्च भारतीय संस्कृति टिकवून आहोत असे म्हणायचे.
आमच्या इथल्या भारतीयांनी ती पाSSर लयाला घालवली हो. जो तो स्वतंत्र, आई वडील पण. वेळेवर काय येतात, वहातुकीचे नियम काय पाळतात, अगदी राग येतो आपली संस्कृति डोळ्यादेखत अशी नाहिशी होताना पाहून.

आपल्या आईबापांनी आपल्यासाठी खस्ता काढल्यात, मग आपण त्यांच्यासाठी काढूया.. अरं हुट! खस्ता काढायचेच होतं तर पोरं कशाला जन्माला घातलीत. ह्यांच्या नावावर आपल्या आयुष्याची बिलं फाडणार.. तुमच्यासाठी आम्ही हे सहन केलं ते सहन केलं. पळा लेको, कोण आलं नव्हतं तुम्च्याकडे अप्लिकेशन घेऊन. नसता जन्म दिला तर उपकार झाले असते मुलांवर.. >> +७८६

हो न
माझ्यामते आईवडिलांचे मुलांवर अन मुलांचे त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम असायला हवे.
प्रॉपर्टी नसणारे किंवा मुलांवरच्या प्रेमखातीर, त्यांच्या गरजांसाठी काहीही शिल्लक ठेवू न शकलेल्या पालकांचे काय?
जर मुलांना अगदीच अडचण आहे अन त्यात त्यांची आयुष्यभराची कमाई संपणार आहे पण त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उपलब्ध नाही आहे, ह्या परिस्थितीत पालकांनी काय करावे? मरू दे मुलांना आम्ही आपली म्हातारपणाची सोय बघूया असे थोडीच कुणी आईवडील बोलतात. मग मुलांनी त्यांच्यासाठी काही करताना अपेक्षा का ठेवाव्या?

<<<आपल्याकडे काय आनंदी आनंद. घरटी एक महाभारत ..........धृतराष्ट- गांधारी वृद्धाश्रमाची वाट धरताहेत >>>
वाचून आनंद झाला.

>>>>>

एक्चुअली हे खरे आहे. आपल्याकडे हे असेच आहे. सत्य स्विकारले तरच सोल्यूशन मिळेल. नाहीतर उगाच आपल्या एकत्र कुटुंब पद्धतीचे, लग्नसंस्थेचे गोडवे गात बसण्यात काही हशील नाही.

म्हणजे आपण आपली (हु)उच्च भारतीय संस्कृति टिकवून आहोत असे म्हणायचे.
आमच्या इथल्या भारतीयांनी ती पाSSर लयाला घालवली हो. जो तो स्वतंत्र, आई वडील पण. वेळेवर काय येतात, वहातुकीचे नियम काय पाळतात, अगदी राग येतो आपली संस्कृति डोळ्यादेखत अशी नाहिशी होताना पाहून.
>>
ज्यांना स्वतःच्या मर्जीने जायचे त्यांनी खुशाल जावे, इतकं स्वातंत्र्य आहेच ना.
पण आपल्या जीवपरी जीव घेणाऱ्या नातेवाईकांचा महिमा काय वर्णावा ? चुलतभावांचे घरात इतके तंटे झाले की माझ्या सख्ख्या काकाला शेवटी स्वतः बांधलेल्या घराचं विक्रीखत करून वृध्दाश्रमाची पायरी चढावी लागली. किती जण आहेत, ज्यांना वयपरत्वे, वेळेअभावी स्वतःची बाजू बरोबर असताना पडतं घ्यावं लागतं. कायद्याची लढाई लढणं प्रत्येक वृद्धाला शक्य होईलच असं नाही.

जर मुलांना अगदीच अडचण आहे अन त्यात त्यांची आयुष्यभराची कमाई संपणार आहे पण त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उपलब्ध नाही आहे, ह्या परिस्थितीत पालकांनी काय करावे? मरू दे मुलांना आम्ही आपली म्हातारपणाची सोय बघूया>>>असेच म्हणावे Happy मुले पुढे सावरू शकतात. आईवडील नाही.
वरच्या ऋन्मेषच्या पोस्ट्स मध्येही थोडं तथ्य आहे. लोक केवळ त्याने लिहिलंय म्हणून हेटतायत भौतेक Wink

Pages