बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खानविलकरने आल्या आल्या मजा आणली बिगबोसमध्ये, छान नाटकी बोलते.
आधी तिथे सेन्स ऑफ ह्युमर नावाचा प्रकार एकट्या भूषणकडेच दिसायचा... ही सुद्धा थोडी घेऊन आलीय.

बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ? >> याचे उत्तर मी दुसऱ्या ( नवीन धागा -१ ) धाग्यात दिले आहे . ते बऱ्याच जणांनी वाचले नाही कि काय ? त्यामुळे नवीन धाग्यावरचे उत्तर परत इथे चिकटवत आहे

आधीच्या धाग्यांवरून :
रिअली ?आवडलं ?
बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ?
Submitted by दीपांजली on 17 May, 2018 - 03:55
बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ? >> इथे पुरुष स्त्री / वयाने लहान मोठे हा या शो मध्ये प्रश्न नसावा असं वाटत . नाहीतर मेघा आरती गेली तेव्हा थत्तेंवर कॅमेरासमोर ओरडली ( वयाचा मान न बाळगता ) नंतर त्यांना थेरडा म्हणून असभ्य भाषेत -संताप येण्याजोग्या भाषेत बोलली .( त्यांच्या तोंडावर नाही ) तेव्हा तिच वागणं असभ्य नव्हतं का ? सुशांत ओरडला तर त्याच वागणं असभ्य आणि मग हिच्या वागण्याला काय म्हणाल ? सुसंकृत ? इथे सुशांत आणि मेघा निदान एकाच वयोगटातले तरी आहेत . थत्ते तर हिच्या वडिलांच्या वयाचे आहेत तरी कॅमेरासमोर थेरडा ? . तेव्हा कुठे गेली होती हिची सभ्यता ?

Submitted by सुजा on 17 May, 2018 - 06:25

सुजा तुम्ही फारच चिडलेले दिसताय मेघा वर... पण इथे कितीही पटवून द्यायचा प्रयत्न करा - वि विल स्टील सपोर्ट मेघा..☺️ आणि तिच जिंकणार...

वि विल स्टील सपोर्ट मेघा..☺️ आणि तिच जिंकणार...>> आय विल नॉट सपोर्ट मेघा पण येस गेम तीच जिंकणार आहे . हे मी आधीच लिहिलेलं आहे . कारण बिग बॉस ने ते ठरवलं आहे आणि आणि गेम खेळताना गेम कसा स्वतःला वाचवत वाचवत खेळायचा . अजिबात घुसून बिसून खेळायचा नाही /इन्जुर्ड व्हायच नाही आणि स्वतःला कस सेफ ठेवत ठेवत खेळायचं हे तिला पुरेपूर समजलंय . बाकीचे सगळे स्पर्धक या बाबतीत ( अगदी सई सुद्धा ) बिनडोक आहेत. इतकं काय घुसून बिसून खेळायचं आणि स्वतःला इन्जुर्ड करायचं कि पुढच्या पार्ट मध्ये भागच घेऊ शकत नाहीत . तिच्या टीममध्ये इतर सई / पुष्कर सगळे बिनडोक . तिला गेम मस्त समजलाय म्हणून तीच जिंकणार. जी फक्त तोंडाने टिव टिव करते मी तुझी मैत्रीण वगैरे पण जितनेका धूर्त दिमाग तो उसकेही पास है Happy

मेघा काहीबिग बॉस आधी फेमस किंवा मोठी स्टार नाही त्यामुळे तिला जिंकवायच ठरवण्यात चॅनलचा काही फ॑यदा दिसत नाही, मी तर हे रेशम जिंकणार स्पर्धा सुरु होण्या आधीपासून वाचतेय.
काही असो ,मेघा जिंकलेली आवडेल, किंवा ऋतुजा - सई-पुष्की पैकी कोणीही !

मेघाला गेम कसा खेळायचा ते समजलंय . ती व्यवस्थित अभ्यास करून आलेय . आणि तिला गेम समजलाय हे बिग बॉस ला पण समजलंय त्यामुळे रेशम च्या बरोबरीने बिग बॉस तिला वाचवताना दिसतात . त्यामुळेच मला असं वाटत मेघा गेम जिंकण्याची शक्यता ९९% आहे . निदान आता तरी हे माझं मत आहे . माझ्या आवडीचा विचार केला तर मला पुष्कर जिंकलेला आवडेल Happy

पुष्कर जिंकलेला मलाही आवडेल, सिन्सिअर टास्क करतो, परफेक्ट जंटल्मॅन, मला या मेघासईऋतुजापुष्की टिमचे कोणीही जिंकलं तरी आवडेल.

मला पुष्कर जिंकलेला आवडेल जास्त. अतिशय डीसेंट आहे. सॉफ्ट स्पोकन, टास्क पण मनापासून खेळतो. हॅटस ऑफ.

मला पुष्कर जिंकलेला आवडेल जास्त. अतिशय डीसेंट आहे. सॉफ्ट स्पोकन, टास्क पण मनापासून खेळतो. हॅटस ऑफ.>>+१
तो कोणालाही शिव्या देत नाही. सुरुवातीला तो आस्ताद, सु रा ला समजावत होता कि मुलींवर जोरात ओरडून नको बोलूया.
आता रारेच्या गटातले कोणीतरी बाहेर पडायला हवे. पुष्करच्या गटातले कोणी गेले तर उना बाहेर पडायला हव्या, त्यांना कार्य करताही येत नाही आणि आता त्या हळव्याही झाल्या आहेत. सु भुंकत होता तेव्हा जाम झापायला हवे होते त्याला नियम तोडण्यावरुन पण रडत आत गेल्या Sad

I heard Jui got eliminated but honestly I doubt if they will let her go so soon !

I heard Jui got eliminated but honestly I doubt if they will let her go so soon !>> तो एक प्रँक आहे असपन कळल मला एकिकडून..
रच्याकने नव्या धाग्यावर लिहायचं ना हे.. इथे का प्रतिसाद दिलास तू.

मला पुष्कर जिंकलेला आवडेल जास्त. अतिशय डीसेंट आहे. सॉफ्ट स्पोकन, टास्क पण मनापासून खेळतो. हॅटस ऑफ.
Submitted by अन्जू on 19 May, 2018 - 13:45>> अंजुताई, पहिल्या धाग्यावरचे प्रतिसाद सहज वाचत होते, त्यात तुझा हा प्रतिसाद दिसला, याच. शेवटच्या पानावर. Proud पुष्की ते स्मिता हा तुझा प्रवास कसा झाला? कधी झाला?
डीजे मात्र इथपासूनच मेघा फॅन दिसतेय. Happy

मला 2 ते खुर्ची टास्क भाग पाहायला मिळाले नाहीत, आणि आता दाखवत असलेले मॅरेथॉन एपिसोड्स नेटवर अपलोड करत नसल्याने ते इकडे वाचूनच समजून घेईन आता! Proud
बिबॉ मिस करतेय आता.

पुढच्या धाग्याची लिंक:
https://www.maayboli.com/node/66162

अन्जू मेधा धाडे कोण? Uhoh

Submitted by दक्षिणा on 3 April, 2018 - 18:18

फार फेमस नाहीये पण नाव ऐकल्यासारखं वाटतंय, acting करते

Submitted by अन्जू on 3 April, 2018 - 18:38

>>>
इसको बोलते है सक्सेस Happy

पुष्की ते स्मिता हा तुझा प्रवास कसा झाला? कधी झाला? >>> Lol

अरे ह्या धाग्यावर स्मिता आवडते लिहिलं नाहीये का कधी. हो पुष्कर आवडायचा खूप. मी त्याला सर्वांनी नावे ठेवली तेव्हा एक चान्स दिला परत पण शेवटी महिनाभर तो हळूहळू उतरत गेला मनातून.

आरती सोलंकी मला जाम बोअर आणि इरिटेट वाटते. ती, धाडेबाई, एक हेमलता बाणे बाई कसल्या वचावचा भांडायच्या झुंज मराठमोळी मध्ये. >>>

ही मी सतरा एप्रिलला लिहिली. मेघा धाडेला बघितल्यावर झुंज मराठमोळीमध्ये ती होती आठवलं. तिथे खरंचं भांडखोर प्रतिमा होती तिची. लवकर बाहेर पण पडली होती शो मधून. नंतर तिने स्वत: मध्ये आमूलाग्र बदल घडवला. मला इथेही भांडखोर वाटायचीचं ती, आधी आवडली नव्हती मग हळूहळू गुण दिसले तिचे आणि आवडत गेली.

स्मिता बरी वाटली स्वभावाने, ते ओठ काही सूट होत नाहीत मात्र तिला. >>> ही माझी १९ एप्रिलची कमेंट.

मजा येतेय जुनं वाचताना.

स्मिता, आरती याचं आधीचे आयुष्य खडतर पण तरीही स्मिताचा स्वभाव चांगला वाटतो. >>> वीस ची कमेंट. म्हणजे १९ एप्रिलपासून स्मिता आवडायला लागली हळूहळू. हे दिसतंय. पुंबा, सुलू, दक्षि यांना पण आवडायला लागलेली स्मिता याच सुमारास. पुंबानी माझ्याही आधी चांगलं म्हटलं तिला. दत्तू यांनी पण स्मिताचे आधीच कौतुक केलेलं.

सई लोकुर अती आगाऊ वाटते.
स्मिता चेहर्‍यावरून अ‍ॅटिट्युड वाली वाटते पण आतून मऊ आणि हळवी आहे असे वाटते. (एव्हन डाऊन टू अर्थ) >>> दक्षिची २० एप्रिलची कमेंट, कित्ती सही.

हम्म, अंजुताई, मी पण सगळे जुने प्रतिसाद वाचतेय. मजा येतेय मला. बहुतेकांना ऋतुजाचं नावही माहिती नव्हतं. तिच्या सिरियलच्या भूमिकेतल्या नावावरुन तिला राखेचा तली सुषमा म्हणतायत सुरुवातीला. आता कसे सगळे अगदी व्यवस्थित ओळखीचे झालेत!! Happy

पुष्कर फिनले पर्यंत जाईल आणि हरेल.>> क्या बात! मस्तच , करेक्ट prediction च्र्प्स!!

कंटाळा यायला लागला बघायचा.

सई अतीच करते. पुष्कर बरोबर वागतोय खरं म्हणजे. ही काय अति लाडात. पहिल्या पाचात खरे पुष्कर आणि सुशांत हवे होते. पुष्कर काहीतरी चुकीचं बोलला बहुतेक त्यामुळे त्याला nominate केलं. ते मी बघितलं नाही. येता जाता, कामे करताना बघते त्यामुळे बरंच समजत नाही.

भूषण आणि स्मिता चांगले आहेत स्वभावाने, त्यांनी जागा सोडली त्यांची. खरं म्हणजे स्वतःवर विश्वास पेक्षा सत्य आणि रिस्पेक्ट दिला त्यांनी. बिग बॉस ने त्या दोघांना पण nomination पासून दूर ठेवायला हवं होतं.

मेघा जरा अति आहे पण गेमसाठी परफेक्ट बहुतेक. रेशम पण अति समजते स्वतः ला. ती त्या राजेशपुढे म्हातारी वाटते. राजेश का तिला एवढं महत्व देतो. फालतू फेक फ्लरटींग.

Submitted by अन्जू on 24 April, 2018 - 01:08

कधीच कंटाळा येऊन मी सर्व bb बघितलं Lol

वरच्या कमेंटमध्ये मी मेघाचं वागणं अति असलं तरी गेमसाठी परफेक्ट हे लिहिलं होतं. तेव्हापासून मेघा हळूहळू समजत गेली पण आवडायला जरा उशिरा लागली.

सानी १९, २० एप्रिलपासूनचं स्मिता मला आणि बऱ्याच जणांना आवडायला लागली आणि सई खटकायला लागली हळूहळू असं दिसून येतंय.

दक्षी, अनिष्का यांनापण स्मिता आवडायला लागली होती, ती शेवटपर्यंत आवडली. सुजाला पण आवडलेली स्मिता आधीपासून.

सई पहिल्या आठवड्यापासून स्मितावर जळायची ती अगदी just एक आठवडा आधीपर्यंत. अगदी शेवटी ती आणि पुष्कर चांगलं म्हणाले स्मिताला. तिला काढायला निघाली सई बाहेर पहिल्यापासून आणि तीच बाहेर पडली तिच्या आधी ते पण सोशल मिडियावर रिस्पेक्ट गमावून. ह्यालाच karama hits back म्हणत असावेत. जबरदस्त चपराक सईला.

पुष्करला कसं वागायचं ते कळत नाहीये. तो जाईल लवकर. >>> हे मी लिहिलेलं २५ एप्रिलला. तो, स्मिता फिनालेला असतील असं वाटत नव्हतं.

Pages