Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋतुजा, सै व पुष्कर या तिघांना
ऋतुजा, सै व पुष्कर या तिघांना २०,१५,१० अशी मते दिली.
मेघा सुध्दा अतिशय प्रामाणिक,
मेघा सुध्दा अतिशय प्रामाणिक, माझ्याकडे काम आणि फॅन्स नाहीयेत म्हणून मला वाचवा,>>हे मला प्रचंड आवडले.
ऋतुजा, सै व पुष्कर या तिघांना
ऋतुजा, सै व पुष्कर या तिघांना २०,१५,१० अशी मते दिली.
>> वेगवेगळ्या आयडीने / मोबाईल मधून दिली का? कारण मी voot वर वाचलेल्या नियमानुसार एका व्यक्तीला एकच वोट अलाऊड आहे. मी पण घरातल्या सगळ्यांच्या मोबाईलवर voot टाकून जास्त वोट देईन म्हणते.
अरे काय , उलट मेघाने मुलीला
अरे काय , उलट मेघाने मुलीला मी कशी दिसतेय असं विचारणे वॉज सो क्युट, अगदीच awwww moment !!
नवीन Submitted by दीपांजली
>>>>>>
अगदी सहमत.... +१११११
मेघाने खेळाचे नियम वाचून
मेघाने खेळाचे नियम वाचून दाखवून आजच्या टास्क ची सुरवात केली त्यात ती म्हणाली " हा एक नळ हे पाणी भरण्यासाठी एकमेव स्तोत्र असेल" अरे ? . स्तोत्र नाही स्रोत ( प्रवाह ) मेघा . मराठी कार्यक्रमासाठी ज्यांना व्यवस्थित मराठी बोलता येतेय अशाच लोकांना का नाही घेत बिग बॉस ? पाणी भरण्याचा एक्स्पीरियंस राजेश /सुशांत आणि भूषण यांना आहे कारण हे सगळे चाळकरी . आधीच्या टास्क मध्ये आस्ताद म्हणतो " मेघाचं नशीब बघा कस चांगलं आहे ते आमच्या गळ्यात बरोबर मेघाचा फोटो नाही नाहीतर आम्ही नसत का तिला नॉमिनेट केलं ? "बरोबर . बिग बॉस कायमच मेघाला वाचवत आला आहे . पाणी वाचवण्याच्या टास्क मध्ये सई म्हणते मी असं कधी फेसच नाही केलं . ती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेय . आस्ताद ने तिला चांगलं समजावलं " असं आपण पाणी वाचवलं तर बऱ्याच लोकांना ज्यांना कोणाला पाणी मिळत नाही त्यांना मिळेल "
पाणी सेव्ह कस करायचं ते इम्पॉर्टन्ट आहेच पण पाणी वाया जाऊ द्यायचं नाही .ते दोन्ही टीम्स ना कठीण पडलं . पाण्याचा टास्क ताकदीचा पण होता आणि पाणी सेव्ह करण्याचा पण होता. आधी ते जस वागत होते "तुम्ही आधी भरा आम्ही नंतर भरू "असं सामंजस्याने चालणार नव्हतं. सईने डॅम्बीस पणे समोरच्या पार्टीच पाणी ड्रम मधून बादलीने घेतलं आणि स्वतःच्या ड्रम मध्ये भरलं . असं अलाऊड आहे का ? फक्त नळाशी जाऊन पाणी भरणं अलाऊड आहे . मग भूषण ने पण त्यांचा ड्रम ओतून टाकला. सईने नळ च तोडून टाकला आणि स्मिता ला खेचत होती तर लं स्मिताने सईला चांगलं लोळवल पुष्कर ने सईच्या बाजूने सांगितलं कि तिला ( कन्फेशन रूम मध्ये ) बिग बॉस ने सांगितलं थोडं पाणी वेस्ट झालं तरी चालेल असं बिग बॉस ने काहीच सांगितलं नव्हतं .ती खोट बोलली .बिग बॉस ने सगळ्यासाठी सांगितलं होत पाणी सेव्ह करण हा टास्क आहे . तिला एकटीला कानात येऊन सांगितलं नव्हतं कि ओतून दिल तरी चालेल सईने नळ च तोडला त्याची तिला चांगली शिक्षा मिळाली
पाणी भरणे टास्क बेस्ट झाला की
पाणी भरणे टास्क बेस्ट झाला की! रडकी सई, पाय तुटकी मेघा, पेशंट आऊ आणि बिनकामाची ऋ एकत्र आलेत. त्यांच्यातील आस्ताद आणि पुष्की भरपूर प्रयत्न करत होते पण रा, रे, स्मि, भू, सु पुढे अगदीच फिके पडले. राजेशनी पळता भुई केली पुष्कीला.
उद्या सु आणि छपरी क्वीन भांडणारेत. सु मला वाटतं छक्वी चा ड्रम उलटा करतोय.
स्वीमिंग पूलचं पाणी घ्यायला बंदी होती का? आठवत तरी नाही. सई पडली तरी फालतू ड्रॅमेबाजी केली नाही ते आवडलं, तुमची काळजी तुम्ही घ्यायची. तो नळ तुटला तेव्हा हसू आवरत न्हवतं.
<कारण मी voot वर वाचलेल्या
<कारण मी voot वर वाचलेल्या नियमानुसार एका व्यक्तीला एकच वोट अलाऊड आहे.>
फुस्स..
मला वाटलं स्विकारताहेत एकाहून जास्त मते म्हणजे रजिस्टर होत असतील.
असो, म्हणजे ऋतुजाला मिळाले माझे मत.
रा अणि रे ला वेगवेगल्या
रा अणि रे ला वेगवेगल्या ग्रुप मध्ये का नाही ठेवत task असताना??
नेहमी ग्रुप मेम्बर सेम का असतात task खेळताना?
सगळ आधिपासुनच ठरलेल आहेका?
राजेश ड्रग्स घेतो का? कायम
राजेश ड्रग्स घेतो का? कायम नशेत असल्यासारखा बोलतो-वागतो.
सगळ आधिपासुनच ठरलेल आहेका? >>
सगळ आधिपासुनच ठरलेल आहेका? >> हो मेघाला पण कायम नॉमिनेशन पासून वाचवतात.
बिग बॉस ला मेघाला जिंकवून द्यायच आहे म्हणून
बिग बॉस एकंदरीत वागतंय
बिग बॉस एकंदरीत वागतंय त्यानुसार रे रा मेघा फायनलला जातील अशी चिन्हं दिसतायेत. मग तसं झालं तर मेघा जिंकलेली बघायला आवडेल. स्क्रीप्टेड असेल तर हे असतील तिघं.
माझे आवडते पुष्कर, स्मिता फायनल ला पोचतील की नाही शंका आहे.
एकच वोट नाही , तुम्हि बरेच
एकच वोट नाही , तुम्हि बरेच वोट करू शकता .
( बिग बॉस ११ मध्ये बघुधा १०० होते . एका लिमिट नंतर रोबोट चा कॅप्चा येतो , तिथे योग्य उत्तर दिले की पुन्हा चालू)
आज पुन्हा शून्य क्रिएटीव्हिटी
आज पुन्हा शून्य क्रिएटीव्हिटी, व्हॉयलेन्स ओरिएंटेड टास्क, बिग बॉसकडून पूर्णपणे अनइव्हन टिम

पैलवानांचच टास्क द्यायचय तर अॅक्टर्स का जमा केलेत बिग बॉसच्या घरात ?
आणा अजुन डझनभर पैलवान आणि बनवा पैलवानांचा कुस्तीचा आखाडा!
बिग बॉसने पुन्हा एकदा फक्त आणि फक्त राजेश ला फेवर करण्यासाठी आणि केवळ त्याला हे टास्क जिंकता येऊन कॅप्टन बनता यावं असा चक्क स्पेशल टास्क डिझाइन केला, तेही केवळ त्याने ‘झोपडपट्टी’ शब्द वापरून भांडणं केली म्हणून ही शिक्षा सगळ्या मेंबर्सना !
आज पहिल्यांदाच आस्ताद प्रामाणिक वाटत तरी होता टिमशी खेळताना, पण राजेश पैलवानापुढे असा टास्क दिल्यावर कोणाचा निभाव लागणं अवघडच होतं पण पुष्करने सुध्दा खूप मस्त प्रयत्न केले, हॅट्स ऑफ टु पुष्कर .
कधी कधी वाइट वाटत पुष्करसाठी , तो जिंकता जिंकता हारतो, समोरच्या टिमचे सांड त्याच्यावर धाऊन येतात , केवळ याच्या टिममधे तो सोडून सगळ्याच बायका म्हणून हारतो , त्याच्या चेहर्यावर निराशा दिसते आजकाल.
मला स्मिता आणि सई सुध्दा खूप इंप्रेसिव वाटल्या , आस्तादला लोळवायची ताकद आहे स्मितामधे .
सई भारी अॅग्रेसिव असते अशा टास्क्स मधे, मला सगळ्यात आवडलं ते ती सरळ जाऊन राजेश टिमच्या टंकीमधल पाणी आणून स्वतःकडे ओतत होती.
जुई सुध्दा चक्क नाजुक असूनही बर्यापैकी अॅक्टिव्ह होती.
आउंनी बिचार्यांनी युक्ती वापरून फडकी पिळून पाणी जमवल ज्याची नंतर स्मितानेही कॉपी केली.
पण ओवह्रऑल कसली ही टास्क्स आणि किती ती पाण्याची नासाडी, थोडी तरी क्रिएटीव्ह, डोकं वापरायची टास्क्स द्या यांना !
बाकी मला उद्याच्या टिझर मधे मेघामुळे सुशान्त चिडलेला बघून मज्जा आली, ती त्याला इरिटेत करते , त्याचा तो चेहरा बघून मला जाम असुरी आनंद होतो, त्यात रड्या आज अस्तादच्या नॉमिनेशन मुळे चिडलाय, आता राजेशसारखा त्यालाही पॅनिक अॅटॅक तरी येऊ देत नाहीतर खूप चिडून खूssssप रडु देत, बादल्या तरी भरतील
बाप रे! म्हणजे आज पण पाणी
बाप रे! म्हणजे आज पण पाणी पुराण पुढे सुरू राहणार आहे?

राजेश एकांतवासात राहून काहीच शिकलेला दिसत नाही
नळावर शोभेल अशी भाषा पुन्हा सुरू झालेली आहे त्याची. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच.
पुष्कर ने पण त्याचा बेड देऊन टाकला या राघू मैनेच्या जोडीला. राजेश किती गृहित धरतो आहे घरातल्या लोकांना. वर आणि बदललेल्या बेडवर दोन्ही बाजूला लाईट्स आहेत याचं वाईट वाटत होतं दोघांना आणि नव्याने दुसरा बेड शोधत होते. कठिण आहे.
उना फडकी पिळून पाणी जमवत होत्या, पण ते पाणी वापरायचं होतं ना दैनंदिन कामांसाठी? मग असं फडकी पिळलेलं पाणी कशाला वापरणार होते हे लोक?
दीपांजली अगदी माझ्या मनातली
दीपांजली अगदी माझ्या मनातली वाक्यं लिहिलेस तू जशीच्या तशी !! कसला तो टास्क..

मला नाही आवडला
ज्या टास्क मध्ये शांत राहून खरंच डोक्याचा वापर करता येईल असे टास्क का नाही डिसाईन केले ?
हे काय आपलं हाणामारी आणि मारामारी आणि हमरी तुमरी करायच सारखं सारखं
तेही केवळ त्याने ‘झोपडपट्टी’
तेही केवळ त्याने ‘झोपडपट्टी’ शब्द वापरून भांडणं केली म्हणून ही शिक्षा सगळ्या मेंबर्सना !.. पण शिक्षा इतर लोकांना ना..त्याला बरच झालं की हे.
हो आस्ताद इतक्या दिवसात मला
हो आस्ताद इतक्या दिवसात मला प्रामाणिक पणे खेळल्यासारखा वाटला. भुषणचं मला खुप हसु येत होतं स्वताची बॉडी ती काय अन आस्तादला अडवत होता. रेशम जुई सईला नळाकडे जाऊच देत न्हवत्या. पण तिला जे लागलं ते पाहुन वाईट वाटल. पुष्कर ने खुप प्रयत्न छान केले.
राजेश ड्रग्स घेतो का? कायम
राजेश ड्रग्स घेतो का? कायम नशेत असल्यासारखा बोलतो-वागतो. >>> मलाही सेम वाटतं. तो गांजा सेवन करतो की काय? सदैव तारेत असतो.
बिगबाॅसमधे रूम एस्केप सारखे मस्त एंजाॅएबल आणि क्रिएटिव खेळ हवेत. नुसतेच लठ्ठालठ्ठीचे खेळ बघून माबोवरचे काही विशिष्ट बाफ वाचल्याचं फील येतं.
>>बिगबाॅसमधे रूम एस्केप सारखे
>>बिगबाॅसमधे रूम एस्केप सारखे मस्त एंजाॅएबल आणि क्रिएटिव खेळ हवेत. नुसतेच लठ्ठालठ्ठीचे खेळ बघून माबोवरचे काही विशिष्ट बाफ वाचल्याचं फील येतं.
हाहाहा!
अगदीच काही सुचत नसेल तर अंधारी लपंडाव खेळा म्हणाव घरातल्या घरात..... त्यात जास्त मजा येइल या असल्या रावडी खेळांपेक्षा!
वोटींगसाठी वूट अॅप डाऊनलोड
वोटींगसाठी वूट अॅप डाऊनलोड कराव लागतय काय ?
अगदीच काही सुचत नसेल तर
अगदीच काही सुचत नसेल तर अंधारी लपंडाव खेळा म्हणाव घरातल्या घरात..... त्यात जास्त मजा येइल या असल्या रावडी खेळांपेक्षा! >>>+१११११११
काहिहि खेळा पण राष्ट्रीय
काहिहि खेळा पण राष्ट्रीय संपत्तीची नासधूस नको.
एक दिवस सर्व खेळाडूंना अभय द्या, आणि एकमेकाम्च्या अन्गावर सोडा.. मज्जा बघा अंगावर सोडा म्हणजे फक्त शाब्दिक...
>>म्हणजे फक्त शाब्दिक...
>>म्हणजे फक्त शाब्दिक...
म्हणजे आपल्याला फक्त एपिसोडभर बीपच ऐकायला लागतील
काल ऋतुजाने आपली अॅथलेटिक
काल ऋतुजाने आपली अॅथलेटिक पावर का नाही दाखवली? साइड लाच होती पूर्ण वेळ. त्या जुईला वगैरे उचलून फेकू शकली असती ती! सांडाला थांबवणे अवघडच होते या लोकांना. दॅट इज बिबॉ फिक्सिंग. बिचारा पुष्कर! राजेश त्याला उचलून बाजूला करत होता. अन तो हवेत हात पाय झाडत होता
आस्ताद नेही प्रयत्न तर केले पण काही निभाव लागत नव्हता. सई ने मस्त फाइट दिली.
पण एकूण या टास्क मध्ये काही क्रिएटिव करता येण्यासारखे नव्हतेच, नुस्ती गुंडागर्दी. आज पण तेच कंटिन्यू करणार? का?? दोन दिवसांचा टास्कच नाहीये हा!
टास्क चे वाचन होईपर्यंत
टास्क चे वाचन होईपर्यंत कोणीही "लॉन्ग कॉल/ शॉर्ट कॉल" (
) ला गेलं नव्हतं कारण पाणी च नव्हतं म्हणून ..
मग त्यानंतर टास्क मध्ये एवढी ताकद लावून कसे खेळू शकले हे ?
कारण नळावरचं पाणी भरून कोणी त्याचा वापर करताना नाही दाखवलं .. पिण्याचं पाणी सोडून
का मधलं मी काही मिस केलं ?
अन्जली मला पण सेम प्रश्न
अन्जली मला पण सेम प्रश्न पडला होता.
वोटींगसाठी वूट अॅप डाऊनलोड
वोटींगसाठी वूट अॅप डाऊनलोड कराव लागतय काय ?>>> हो
पुढली चर्चा बिग बॉस - मराठी -
पुढली चर्चा बिग बॉस - मराठी - १ या धाग्यावर करा... यावर झाल्या जवळजवळ २००० पोश्टी...
2000 चा नियंम आहे का एखादा?
2000 चा नियंम आहे का एखादा?
शुद्ध मराठीत बिगबॉस आणि मेघा
शुद्ध मराठीत बिगबॉस आणि मेघा ची डील झालेली आहे.मेघा कायम safe आहे. फोटो कुणाच्या तर उनाच्या गळ्यात. दर वेळी मेघा ला वाचवण्यात येतं आहे. आणि मेघा सै इतके cheap या घरात कुणीही नाही. सै चक्क चावत होती. पण फायटिंग स्पिरिट साठी तिला नक्की दाद द्यावी लागणार.
Pages