बिग बॉस - मराठी

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47

येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर Happy

मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?

बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्य उच्चारांवर माझा भर नक्की आहेच. भूषण चे मी एकवेळ माफ करीन की इंग्रजी आपली मातृभाषा नाही. पण मेघाला स्तोत्र/ सोत्र ला माफी नाही. मराठी आपली मातृभाषा आहे आणि ती आपण शुद्ध बोलली पाहिजे असे वाटते. >>>दक्षिणा अगदी सहमत. माझे म्हणणे फक्त दुसर्‍या भाषे बद्दल होते. मातृभाषा हि यायला हवी, शब्द माहित नसतील तर शोधावे. निदान नीट वाचता तरी यायला हवे. रच्याकने जसा भूषण जसा 'स्टॅटर्जी' म्हणत होता तसेच मागच्यावेळी राजेश 'फादरली फिगर' म्हणत होता. Happy

'नळावरचे भांडण' कार्य खूपच कंटाळवाणे होते. यात युक्ती आणि चलाखी वापरायला वाव नव्हता. गट विभागणीही चुकिची. त्यामुळे मजबूत गट जिंकण्याची शक्यता जास्त. सुरुवात चांगली झाली. जसे असते तसेच चालू होते कि तुम्हाला जेवढे पाणी मिळाले तेव्हढे आम्हालाही मिळाले पाहिजे. पण बिबॉला ते बघविले नाही आणि परत काहीतरी नियम सांगून गोंधळ केला. त्यापेक्षा पाण्या भोवती बरेच कार्य-गुप्त कार्य रचून मजा आणि भांडणे आणता आली असती. जसे नळाला पाणी येण्यासाठी करण्याचे कार्य, पाणी भरायला सुद्धा बर्याच अडचणी आणि भरलेले पाणी साठविण्यासाठीची कसोटी. त्यात ३-४ जणांना गुप्त कार्य देता आले असते जसे कि या खेळात गटाला अजिबात मदत न करणे, साठविलेल्या पाण्यातल्या २ बादल्या पाणी स्वतःसाठी वापरणे, दुसर्‍या गटाला १ बादली पाणी दान करणे, कमीत कमी १ तास दुसर्‍या गटाला मदत करणे.

दिलेल्या पिंपाला भोके होती. तिथपर्यंतही पाणी भरता आले नाही. उलट पिंप भरला असता तर तो वाहून रिकामा होऊ नये म्हणून गटाला रात्रभर काम पडले असते. पाणी वाया घालवले त्याबद्दलही तिथल्या तिथे शिक्षा व्हायला हवी होती. दुसर्‍याचे पाणी वाया घालविले तर अजून कडक शिक्षा.

आजचा भागही फक्त नळावरचे भांडण असेल तर पळवत बघावा लागेल.

राजेश एकांतवासात राहून काहीच शिकलेला दिसत नाही
नळावर शोभेल अशी भाषा पुन्हा सुरू झालेली आहे त्याची. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच.>> मला नाही तस वाटलं आधी तुम्हीं आधी पाणी भरा नंतर आम्ही भरू असाच चाललं होत . बिग बॉसने सई आणि रेशम ला कंफेश रूम मध्ये बोलावून इतकं असं गोडीगुलाबीत टास्क चालणार नाही सांगितल्या वर त्यांची दोन्ही टीमची मी आधी नळाखाली बादली लावणार का तू आधी लावणार यात भांडं भांडी झाली / विरुद्ध टीम मेंबर्स ना बाजूला खेचून हे प्रकार सुरु झाले नंतर सईने पाणी ओतलं म्हटल्यावर त्यानेही ओतलं . व्यवस्थित चाललं होत त्याच . तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं

आजचा भागही फक्त नळावरचे भांडण असेल तर पळवत बघावा लागेल. >>>> टास्कच्या लेटरमध्येच साम, दाम, दन्ड, भेद लिहिले होते. म्हणून ही अशी मारामारी करायची का?

काल मानल सई ला.... ति एकटी रेशम आणि जुईला भारी पडत होती... त्या दोघी सईला पकडत होत्या... अन सई त्याना हुसकावत होती..
त्या स्मीता ला पण मस्त लोळवल तिने...
आणि कोणी हे पाहीला का ? मेघा पण त्या स्मीताला लोळवत होती... मी तर घाबरलो ते पाहुन, म्हणल बसते कि काय तिच्या अंगावर... ... Happy

सुजा शी सहमत.. राजेश आधी नीट खेळत होता.. one by one पाणी घेणे चालू होते.
बिग बॉस ने काडी टाकली नंतर.

जुई चा स्पॉंडीलायटीस गायब झाला का.. पडत काय होती, खेचत काय होती. घाण फेक आहे...

>>जुई चा स्पॉंडीलायटीस गायब झाला का..--- महानाटकी आहे ती

नवीन Submitted by राया
>>>>

हो ती खुपच महानाटकी आहे आणि खुप जळकी आहे त्या सई वर...

Jui

दक्षिणा..मलाही सेम वाटले...त्या फडक्याने पिळलेल्या पाण्याने हे लोक चुळा भरणार व ते पाणी वापरणार...? यक्स!!

आणि रड्या सुशांत कसला वासकून बोलतो मेघाबरोबर. >> आवडलं मला . धूर्त आणि कावेबाज आहे ती . डबलढोलकी . बिग बॉस ने ठरवलंच आहे तिला जिंकून द्यायचं . म्हणून कायम मेहेरनजर करतात तिच्यावर . तीच जिंकणार आहे . फक्त या पुढे टास्क ची मजा घ्यायची

आवडलं मला . धूर्त आणि कावेबाज आहे ती . डबलढोलकी . बिग बॉस ने ठरवलंच आहे तिला जिंकून द्यायचं . म्हणून कायम मेहेरनजर करतात तिच्यावर . तीच जिंकणार आहे . फक्त या पुढे टास्क ची मजा घ्यायची
<<
रिअली ?आवडलं ?
बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ?

चॅनल्च्या सपोर्ट्ने रे-रा उघड्पणे PDA करतायत. ह्याचा अर्थ रे किंवा सांड जिंकणार हे ठरलेलं आहे.ते दोघं म मां ना पण भिक घालत नाहीत.नाहीतर आत्तापर्यंत चॅनल्/बीबी त्यांना समज दिली असती.
टिआर्पीसाठी हे दोघं शेवट्पर्यंत राहणार आणि प्रामाणिकपणे खेळणारे,थेरं न करणारे मेघा, सई, पुश्कर,रूजूता यांना ठेंगा मिळणार.
खुप मस्ती आहे रे-राला.
जाऊ दे, मेघा- सईचे फॅन्स तर वाढले तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे,मनापासून खेळण्यामुळे. रे-रा सारख चुकीच्या गोष्टींना डिफेंड करत नाही. हुशार आहे जिने रे-रा टिम चा प्लॅन लगेच ओळखला आणि सईला सावध केलं.

बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ? >> इथे पुरुष स्त्री / वयाने लहान मोठे हा या शो मध्ये प्रश्न नसावा असं वाटत . नाहीतर मेघा आरती गेली तेव्हा थत्तेंवर कॅमेरासमोर ओरडली ( वयाचा मान न बाळगता ) नंतर त्यांना थेरडा म्हणून असभ्य भाषेत -संताप येण्याजोग्या भाषेत बोलली .( त्यांच्या तोंडावर नाही ) तेव्हा तिच वागणं असभ्य नव्हतं का ? सुशांत ओरडला तर त्याच वागणं असभ्य आणि मग हिच्या वागण्याला काय म्हणाल ? सुसंकृत ? इथे सुशांत आणि मेघा निदान एकाच वयोगटातले तरी आहेत . थत्ते तर हिच्या वडिलांच्या वयाचे आहेत तरी कॅमेरासमोर थेरडा ? . तेव्हा कुठे गेली होती हिची सभ्यता ?

>>>बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ?---

खरेच सुशांत अगदीच बेकार वागतोय.

बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ?--->>++१
आणि त्याहीपेक्षा ते जुने मित्र आहेत.

>>खरेच सुशांत अगदीच बेकार वागतोय.<<
तो सुसायडल पाथ वर आहे. विकेंडला त्याचा किंवा जुईचा नंबर लागेल...

बाकी मेघा आवडत नाही तुमचा चॉइस पण कुठ्ल्याही पुरुषाने मैत्रीणीवर किंवा प्रतिस्पर्धी स्त्री वर हात उगारणे , खेकस्णे हे असभ्य नाही ?
>>> मेघा आवडते आणि बाकीच्या विधानाला +11

मेघा...!!! आपण तर तिचे फॅन झालोय...
काय स्पीरीट आहे...फायटरच एकदम...

व सई पण आपल्याला खुपच आवडते... Wink

मेघा...!!! आपण तर तिचे फॅन झालोय...
काय स्पीरीट आहे...फायटरच एकदम...
व सई पण आपल्याला खुपच आवडते... Wink>>> आपल्याला पण Wink +१११

खानविलकर डिड बेटर दॅन मांजरेकर >>>> + १११११११ मांजरेकरांना अद्याप तरी तीने जे काल शाळा घेतली त्याच्या १०% सुद्धा जमले नाही असे वाटते

बिचारा पुष्कर! तोच होईल बिग बॉस विनर असे वाटतेय >> Rofl दूध अर्धा शेर काय करायचे पाव शेरच पुरे ती.बाबांचा दमा बरा आहे.

Pages